मी फ्लॅट नं बघितला ए -१४०७ आणि दारावरची बेल वाजवली ... बघतो तर आतून तीच आली जिने मला परवा ड्युटी ना करताच हाकलून दिला होतं .. मी तिला सामान दिल आणि थँक्स बोललो
मी लिफ्ट जवळ आलो तर मला आवाज आला .. excuse mi .. मी मागे वळलो बघतो तर तीच होती
काय मॅडम काही चुकलंय का ऑर्डर मध्ये
ती - नाही , सॉरी मी तुम्हाला त्या दिवशी दुखावलं पण मला दुर्गंध नाही सहन होत
मी - चालायचंच मॅडम दिवस असतात एक एक .. तुम्ही रिजेक्ट केल म्हणून मला हा जॉब मिळाला
ती कसनुसं हसली म्हणाली चहा घेऊन जाणार
मी मानेनेच नकार दिला आणि निघालो ..
मग एक ऑर्डर पोहचवायला लागलो ओळख वाढत होती पण मनातली जखम काही केल्या बसत नव्हती ... येणारे दिवस जात होते सहा महिने निघून गेले .. एक दिवस आशाताई (ज्यांनी मला नोकरी दिली त्या माय माउली ) निराश बसल्या होत्या, मी म्हणालो काय झाला मॅडम
आशाताई- काही नाही समाजात नाही आहे काय करू ?
मी - सांगा तर काय झाल? काही तोड निघेल
आमच्या कंपनीच्या मॅनेजर ने काही घोटाळा केला होता कंपनीचे महत्वाचे दस्तावेज कुणाला तरी चोरून विकले होते आणि म्हणून आमच्या बिझनेस वर परिणाम होत होता .. मी पण बेचैन झालो आणि घरी आलो .. झोप लागायची लागेना .. पहाट झाली होती आमच्या बिल्डिंग मध्ये राहणारे दोन व्यक्ती खालून वर येत होते आणि जोर जोरात बोलत होते .. आता एवढ्या रात्री काय मिळणार रात्रीचे तीन वाजलेत कॉल सेंटर मध्ये काम करून परत यायचं तर रात्री चहा पण नाही मिळत.. मी दार उघडलं आणि म्हणालो मी चहा देऊ का का सोबत काही ब्रेड ? ते आनन्दाले मीम्हणालो पण २०० रुपये होतील ... ते आनन्दाने द्यायला तयार झाले .. मी चहा दिला २०० रुपये घेतले आणि एका पेपरला जोडले आणि आनन्दाने झोपी गेलो .. मला सकाळीच जाग आली आणि मी ऑफिसला गेलो .. मुद्दाम आशाताईंच्या केबिन मध्ये डोकावलो बघतो तर त्या नुकत्याच आल्या होत्या आणि अगरबत्ती लावत होत्या .. मी आत गेलो आणि तो २०० रुपये लावलेला पेपर टेबले वर ठेवला ..
आशाताई अवाक होऊन बघत राहिल्या आणि म्हणाल्या हे काय ? धंदा कमी झालाय माझ्यामधील हिम्मत नाही ..
मी म्हणालो - हा नवीन धंदा आलाय मॅडम
आशाताई - म्हणजे ?
मी - मॅडम मुंबई शहर झोपत नाही .. हे टप्याटप्याने चालू असते आपण प्रत्येक टप्पा आपल्या ताब्यात घ्यायचा .. हे काळ रात्री मी २०० रुपये कमावले २ चहा विकून
आशाताई - मला नाही काळलं तुला काय म्हणायचंय ते
मी आशाताईला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि म्हंटल आपण २४ तास डिलिव्हरी करू धंद्याला जोडधंदा देऊ , रात्री कुणालाही काय हवे ते पोहचवू .. त्यासाठी आपल्याला आपली इंटरनेट वर ओळख करून द्यावी लागेल सर्वाना एक वेबसाईट उघडून. चहा कॉफी दूध अन्न काय पाहिजे ते ...
आशाताईला हा माझा प्रस्ताव खूप आवडला आणितिने मला इन्व्हेस्टर मीटिंगला बोलावलं मी आपला प्रस्ताव मांडला आणि त्यांना पण खूप आवडला .. आमचा नवा धंदा सुरु झाला ... महिना झाला आशाताईंच्या त्यातून निघणारा प्रॉफिट मला दाखवला आणि म्हनाल्यात आज पासून ह्या धंद्याचा तू शिलेदार मला केबिन मिळाली माझ्या नावासमोर मॅनेजर लागलं .. मी रात्र बेरात्री मेहनत करू लागलो ..
असंच एक रात्री मी ऑफिस मध्ये बसलो होतो २ वाजले होते मला घरी निघायचं होतं पण एक डिलिव्हरी बॉय आला नव्हता .. तेवढ्यात हेल्पलाईन खणखणली .. मी उचलली ...
हॅलो , शगुन फूड्स , प्रेम सरदेसाई बोलतोय ..
तिकडून एक किणकिणता आवाज आला , ए १४०७, जस्मिन टॉवर , हायलँड्स मधून बोलतेय, मला आता काय खायला मिळू शकते?
मी आश्चर्याने थक्क झालो , हि आता !!!!
मी - मॅडम रोल्स अँड रॅप्स , चहा मिळेल
ती- ठीक आहे पाठवून द्या
मी डिलिव्हरी बॉयस बघायला लागलो पण कुणीच दिसेना ५० डिलिव्हरी बॉयस गेलेत कुठे ?
मी पॅकिंग घेतलं आणि बाईक ला किक मारली .. माझ्या छातीत धडधड होत होती .. मी थरथरत धडधडत दारावरची बेल वाजवली ... आणि एक हात बाहेर आला .. आणि मला आत ओढून घेतलं ..
आणि मी थक्कच झालो