Tujahch me an majhich tu..21 in Marathi Love Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | तुझाच मी अन माझीच तू...भाग २१

Featured Books
Categories
Share

तुझाच मी अन माझीच तू...भाग २१

तुझाच मी अन माझीच तू...भाग २१

आभा आणि रायन एका कोपऱ्यात बसले आणि गप्पांच्या बरोबर दोघे मोठ मोठ्याने अक्षरशः खिदळत होते. त्यांचा आवाज दूर पर्यंत येत होता.. अगदी नेहा ला सुद्धा दोघांच्या हसण्याचा आवाज ऐकू येत होता. नेहा ला त्याने फार फरक पडत नव्हताच.. नेहा कोणती कॉफी ट्राय करायची ह्या विचारात मग्न होती.. पण आभा आणि रायन ह्यांच्या मुळे कॅफेटेरिया मधले काही लोकं वैतागले होते आणि त्यांना दोघांना जरा हळू बोला आणि हळू हसा अशी ताकीद सुद्धा दिली होती.. हे पाहून नेहा ला हसूच आले होते.. तिने पटकन मोबाईल काढला आणि राजस ला टेक्स्ट मेसेज केला.. राजस चा सुद्धा तिला लगेच रिप्लाय आला होता.. "बर.." राजस ला ह्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता, राजस ला आभा आणि रायन काय बोलतायत ह्यामध्ये जास्ती इंटरेस्ट होता.. नेहा ने पटकन आपल्या आवडत्या कॉफी ची ऑर्डर दिली आणि ती दोघांकडे लक्ष ठेऊन होती.. खर तर तिला सुद्धा अशी हेरगिरी करण्यात मजा येत होती त्यामुळे नेहा खुश होती..

नेहा नवीन काहीतरी ट्राय करतांना एकदाम excited होती.. तिच्यातला डिटेक्टिव्ह जागा झाला होता.. तिने स्वतःला डिटेक्टीव्ह ची कॅप घातलेलं इमॅजीन केलं.. "करा करा.. राजस साठी हे पण करा नेहा बाई..राजस इज अ जेम ऑफ अ पर्सन..सो त्याच्यासाठी काय पण..." नेहा हा विचार करून हसली... आणि तिला जागा सुद्धा मोक्याची मिळाली होती.. तिथून तिला आभा आणि रायन स्पष्ट दिसत तर होतेच पण त्याचा बऱ्यापैकी आवाज सुद्धा तिला ऐकू येत होता. त्यामुळे नेहा ला मस्त मजा येत होती.. आणि तिचं ऑफिस च काम राजस करून देणार होता..त्यामुळे ते टेन्शन तिला नव्हत..आणि राजस कडून तिला अजून काही मागेल ते मिळणार होते सो नेहा एकदम खुश होती.. तिने कॉफी चा एक सिप घेतला आणि समोरची मजा ती पाहायला लागली.. तिथे राजस अस्वस्थपणे काम करत होता. त्याचे लक्ष कामात नव्हतेच... त्याचे लक्ष लागून राहिले होते ते नेहा च्या मेसेज कडे.. तो सारखा सारखा मोबाईल तपासून नेहा चा मेसज नाही ना हे तपासात होता.. .

नेहा पाहत होती.. रायन ने आभा साठी खुर्ची पुढे ओढली.. हे पाहून तिला हसूच आले पण आपल्या हसण्यावर तिने कंट्रोल केला.. आभा खुर्ची बसली मग रायन सुद्धा.. कॉफी ची ऑर्डर देऊन दोघे परत गप्पा मारायला लागले.. नेहा ला सगळ ऐकू येत नव्हत पण मधले मधले शब्द ऐकू येत होते..

आभा आणि रायन बोलायला लागले होते...

"रायन तू इंटरेस्टिंग आहेस एकदम!! आणि येस.. हेल्पिंग टू..यु आर अ गुड कंपनी.."

"अरे.. कधीही.. आणि फार काही मदत केली नाही ग मी. फक्त हिंट दिली. तू स्मार्ट आहेस..सो लगेच सोल्युशन मिळाल तुला. आणि ओह.. गुड कंपनी!! थँक्यू."

"हो हो.. पण तू हुशार आहेस आणि त्याच बरोबर यु हॅव्ह अ स्पार्क.."

"ओह रिअली आभा? मेनी से सो...बट आय नेवर ट्रस्टेड देम.."

"अरे नो नो... खर.. मी एकदम सिरिअस आहे.. यु हव्ह स्पार्क!" आभा हसून बोलली.. त्याला रायन ने हसून प्रतिसाद सुद्ध दिला..

"आता तू म्हणतेस म्हणजे असेल स्पार्क.. बाय द वे, तू कोणत्या कॉलेज ला होतील?" जरा वेळ विचार करून रायन बोलायला लागला..

"का? म्हणजे एकदम कॉलेज चा विषय कुठून आला?"

"असच ग... तुला कुठेतरी पाहिल्या सारख वाटत आहे. कुठे ते लक्षात येत नाहीये. पण तुझा चेहरा ओळखीचा वाटतोय हे मात्र नक्की.."

"ओह.. मी फर्ग्युसन मध्ये होते.."

"बिंगो.. फर्ग्युसन मधून पास आउट कधी झालीस?"

"२०१४.."

"बरोबर.. तू मला एक वर्ष ज्युनियर आहेस.. तू प्ले मध्ये भाग घ्यायचीस ना?"

"करेक्ट ...मी प्ले मध्ये भाग घ्यायचे.. मला आवडते अक्टिंग करायला... आपण एकाच कॉलेज ला होतो.. गम्मत आहे! पण तुला कसं आठवलं माझ्याबद्दल?" आभा ने काही न कळून रायन ला प्रश्न केला..

"मला तुला काल पाहिल्यावर वाटल होत.. आधी कुठेतरी पाहिलंय तुला.. मग एकदम क्लिक झालं.. आपण एका कॉलेज मध्ये होतो. अर्थात आपलं कधी बोलण झालं नव्हत.. कारण मी तसा शाय होतो."

"ओह हो.. शाय होतास.. आणि आता?" आभा हसली आणि तिने आठवायचा प्रयत्न केला. पण खर तर तिला रायन अजिबात आठवत नव्हता.. आभा तिच्या विचारात गुंग झाली होती.. ती बोलत नाही हे पाहून रायन बोलायला लागला,

"काय आभा.. कुठे हरवलीस? आणि काय विचार करते आहेस?" रायन ने आभा ला हसत प्रश्न केला.. पण त्याच्या प्रश्नाने आभा ला जरा ऑकवर्ड झाले.. म्हणजे तिला तिच्या मेमरीचा रागच आला होता... आपल्याला इतक सुद्धा आठवत नाही आणि आपण कसे चंबू गबाळ होतो कॉलेज मध्ये असतांना ह्या गोष्टीचा विचार आभा ला त्रास देत होता.

"अ.. काही नाही.. खर सांगायचं तर मला तुला कॉलेज मध्ये पाहिल्याच खरच आठवत नाही...म्हणजे आम्ही कॉलेज मध्ये माच्या ग्रुप मध्ये इतके बिझी असायचो.. त्यात प्ले ची गडबड असायची... सो बाकी कुठे लक्ष द्यायला वेळच मिळायचा नाही.." आभा थोडी खट्टू होऊन बोलत होती.. रायन आणि आभा गप्पा मारण्यात गुंगून गेले होते पण त्यांना हे सुद्धा कळले नाही की नेहा त्यांचे बोलणे ऐकत होती..

नेहाने रायन आणि आभा चे बोलणे ऐकले आणि ती विचारात पडली.. "रायन कधी पुण्यात शिकला?" तिला ह्या गोष्टीचे जरा आश्यर्य वाटलं. तिच्या माहिती प्रमाणे रायनचे बालपण आणि कॉलेज लाईफ मुंबई मध्ये गेलं होतं.. जॉब च्या आधी त्याची पूर्ण फॅमिली पुण्यात शिफ्ट झाले होते.. तरी रायन ने अगदी मस्त प्लान करून आभा ला गुंडाळले होते.. आणि आभा सुद्धा त्याच्या जाळ्यात अडकवले ह्याची नेहा ला खात्री झाली.. नेहा आणि राजस ला रायन ची फक्त नकारात्मक बाजुच माहिती होती..नेहा परत एकदा हसली आणि तिने राजस ला टेक्स्ट करून सांगितले. "रायन वाटतो त्यापेक्षा स्मार्ट आहे राजस..आता तो आणि आभा एकाच कॉलेज मध्ये होते... ओह हो..आपल्याच कॉलेज मध्ये.." आणि तिने भरमसाठ इमोजीस राजस ला पाठवल्या.. आणि मग तिने मोबाईल खाली ठेवला. ती परत रायन आभा कडे पाहायला लागली. तिथे राजस आभा च्या फोन ची वाट पाहत बसलाच होता.. नेहा चा मेसेज आला आणि त्याने लगेच मोबाईल उचलून मेसेज वाचला.. आणि त्याचं डोक इतक फिरलं.. त्याने लगेच नेहा ला मेसेज केला,

"थांब मी येतो.. आणि रायन ला पाहून घेतो.." राजस ने घाई घाई ने मेसेज ला रिप्लाय दिला.. आणि तो जागेवरून उठणार होता. तितक्यात त्याला एक महत्वाचा कॉल आला.. आता आपल्याला इथून हलता येणार नाही ह्या विचाराने राजस जरा अजूनच चिडला.. त्याला काय माहिती पण आभा ची चिंता वाटायला लागली होती. त्याने पटापट काम आवरले आणि कॅफेटेरिया मध्ये जाणार तितक्यात आभा आणि रायन ला त्याने समोरून येतांना पाहिले.. आणि आभा खुश होती हे पाहून तो जरा निर्धास्त झाला.. आभा तिच्या डेस्क वर आणि आणि तिने तिचा लॅपटॉप उघडला आणि तिचं काम करायला लागली.. राजस चे पूर्ण लक्ष आभा कडेच होते..आभा मधेच हसतांना त्याला दिसत होती.राजस ला जाणवलं की रायन ची जादू आभा वर सुद्धा झाली आहे. राजस ला न राहवून परत स्वतःचा राग आला.. आपल्या एका चुकी मुळे आभा काही संकट यायला नको. राजस ने परत स्वतःला २ शिव्या हासडल्या. एक चिट्ठी त्याच्या आयुष्य इतक्या प्रमाणात बदलेल ह्याचा राजस ला अंदाजच नव्हता. खर तर राजस ला आभा चा विचार थांबवायचा होता पण तस न होता आता तर तो एकही क्षण आभा चा विचार मनातून काढू शकत नव्हता..

क्रमशः..