कादंबरी – प्रेमाची जादू -२.
भाग- १६ वा
------------------------------------------
कादंबरी –प्रेमाची जादू
भाग-१६ वा
-------------------------------------------
पहिल्या दिवसाची काम ..ठीक सात वाजता संपवून ..मधुरा यशच्या केबिन मध्ये आली ,
मी बाहेर बसलेल्या माझ्या मेनेजर साहेबांना विचारले आहे ..कामाचे स्वरूप ..आणि त्या प्रेमाने
आजचे काम संपले ..तू जाऊ शकतेस ,असे सांगितल्यावर मी निघाले आहे .
मधुराकडे पाहत यश म्हणाला –
ओके ,ठीक आहे ,उद्यापासून मात्र .तू मला रिपोर्ट करण्याची गरज नाहीये ,
ऑफिस –स्टाफ हा डायरेक्ट मेनेजर –काकांच्या कंट्रोल मध्ये आहे..तू त्यांना रिपोर्ट करीत जा .
मी नेहमीच माझ्या केबिन मध्ये असतोच असे नाही , बाहेरची कामे करण्यात माझा वेळ जातो .
बँकेत जाणे, तिथले सगळे व्यवहार बघणे .वगरे ..
मधुरा म्हणाली ..बँकिंगची कामे मी सुद्धा करू शकेन ..माझी टू व्हीलर आहेच मला ..सकाळी
आले की साधारण ११ ते एक या वेळेत मी बँकेत जात जाईन, चेक जमा करणे , पैसे भरणे
या कामाची माहिती आहे मला .बी.काम करीत असतांना ..आमच्या गावी मी एक छोट्याश्या
प्रायव्हेट बेन्केत पार्ट-टाईम जोब केलेला आहे.
मधुराचे ऐकून घेत यश म्हणाला ..
हे बघ मधुरा , मी सांगतो त्याचा राग नकोस मानू. त्यातील भावना समजून घे .
तू आधी ऑफिस मधल्या कामात तुझा स्पार्क दाखव , मेनेजर –काकांचा विस्वास संपादन कर ,
ते स्वतःच हळूहळू तुझ्यावर एकेक जबाबदारी सोपवत जातील ..
त्यातूनच तुला तुझा जॉब- प्रोग्रेस कळू लागेल .
तुला खूप छान वर्क नॉलेज आहे ही खूप छान गोष्ट आहे . नक्की उपयोग होईल याचा .
त्याचे ऐकून घेत मधुरा हसत म्हणाली ..
यश - मला राग नाही आला , वाईट ही नाही वाटले ..
उलट तू खूप मैच्युअर बॉस आहेस . याचा आनंद वाटला .
मला तू ज्या पद्धतीने सांगितलेस ..त्यात .आता नाही, सध्या नको “असेच मला सांगायचे होते ..
पण, तू हीच गोष्ट अशा पद्धतीने सांगितलीस की.
.मी निरुत्तर झाले ..मी नवखी आणि शिकाऊ उमेदवारआहे हे तू म्हणू शकला असतास .
.पण, छान शब्दात तू मला माझी जागा दाखवून दिलीस. “
यशला हे ऐकून वाटले ..ही मुलगी वरून हसून बोलते आहे, पण, मनात दुखवली आहे की काय ?
तो म्हणाला –
मधुरा ..दुसरी कुणी व्यक्ती आता माझ्या समोर उभी असती तर त्याला मी अजून वेगळ्या शब्दात
समजावले असते . पण ,तुला तसे नाही बोलू शकत मी ..कारण ..
काही झाले तरी ..या ऑफिसच्या बाहेर आपल्यात पारिवारिक परिचयाचे नाते आहेत . आणि तुझ्याशी
मी ऑफिस मध्ये व्यवस्थित नाही वागलो “हे बापुआजोबा आणि अम्माआजीला अजिबात आवडणार नाही.
यशचे बोलणे ऐकून मधुरा हसत म्हणाली ..
अच्छा –अच्छा ..म्हणून आपण माझ्याशी इतके सौम्य-सज्जनपणे वागत आहात तर ..
सोरी यश सर , मला उगीचच वाटत होते की ..आपण थोड्या का होईना, ओळखीचे मित्र आहोत.
यापुढे तुमच्या ऑफिस-स्टाफसाठी असलेल्या मर्यादेत राहूनच वागेन-बोलेन आपल्याशी.
बाय सर.
आपले बोलणे मधुराला दुखावणारे होते ..हे जाणवून यशने कपाळावर हात मारून घेत ,स्वतःला
शिव्या देत म्हटले ..
नंबर एकचा गाढव आहेस तू यश. विनाकारणच त्या मधुराला हुशारीचे धडे शिकवत बसलास ,
उलट ती तर किती विश्वासाने ..शेअर करीत होती , तिला काय काय येतं ..
आणि तू मात्र तिला ..!
यशला आता थोडा झटका बसला ..
तो आठवू लागला ..ती मोनिका चार-पाच वेळा इथे येऊन गेली .तेव्हा हे असे बोलणे का बरे सुचले नाही कधी ?
की ..मोनिकाच्या जादू समोर आपले डोके चालणे बंद पडले होते ?
आपल्या ऑफिसमध्ये पहिल्या दिवशी आलेला कटू अनुभव .मधुरा आपल्या घरी आल्यावर नक्कीच
शेअर करणार ..त्यावेळी घरचे सगळे मिळून .आपली चांगली खरडपट्टी काढणार हे नक्की.
आता उद्या सकाळी ..या मधुरा मैडम कशा मूड मध्ये येतात की
आजचा अनुभव घेत्ल्य्वर ..पुन्हा कशाला येईल ती इकडे ?
बाप रे ..असे होऊ शकेल याचा विचार पण नव्हता केला .
यशचा मूड एकदम ऑफ होऊन गेला .
*********
२.
मधुराने घरी गेल्यावर दीदीला ..जोब मिळाल्याचे सांगितले आणि म्हणाली ..
दीदी एक तारखेपासून मी माझ्या एम्बीए च्या क्लास मधल्या मैत्रिणी सोबत राहायला जाते आहे.
उद्या संध्याकाळी ..आम्ही चौघीमिळून ..चांगला flat शोधण्यास सुरुवात करू . या पंधरा
दिवसात कोलेज एरियात मिळून जाईल आम्हाला .छानसा flat. फारसे अवघड नाही .
दीदी म्हणाली ..तुम्ही यशची मदत का घेत नाही ? तो तर कायम मदत करीत असतो सगळ्यांना .
किंवा ..यशच्या आई-बाबांकडे विषय काढ, झालीच तर मदतच होईल .विनाकारण पायपीट
करणे वाचेल तुम्हा पोरींचे .
मधुरा म्हणाली-
दीदी –तुझी सूचना बरोबर आहे.. पण ,मला वाटते ..”उस गोड लागला म्हणून,मुळा सकट खाण्यासारखे
होईल हे.
आजच फक्त एकदा म्हटल्यावर ..मला जॉब दिला त्याने , आता पुन्हा ..हे जागा शोधून दे.
असे सांगायचे ..मला जरा संकोच वाटतो आहे ..त्या पेक्षा आपणच आपले काम केलेले बरे.
दीदी म्हणाली ..आपली गरज आहे त्यात ..कसला संकोच नि कसला कमीपणा आलाय ?
अग मधुरा ..आपण लकी आहोत असे समज ..
की यश, यशचे आई-बाबा ,आजी-आजोबा ..आपल्यासाठी इथले फमिली मेम्बर्स असल्या सारखे आहेत.
कुठे ही रेफेरंस द्याचे काम पडले तर..यांचा रेफेरंस ,यांची ओळख , यांची शिफारस ..दिली की
आपले कोणतेच काम अडणार नाही.
आणि आपण ही योग्य त्या कारणासाठी यांच्या ओळखीचा उपयोग केला तर “त्यात त्यांना काही
वावगे वाटायचे कारण नाहीये. अर्थात हे माझे मत , तू तुझ्या मता प्रमाणे विचार कर ..कसे करायचे ?
मधुरा विचार करू लागली –
एक अर्थाने दीदीच्या सांगण्यात तथ्य आहेच .. पण काय करावे ..आपल्या स्वभावात ..संकोच वाटणे ,
बोलू की नको, सांगू की नको ? अशी भीती वाटत असते ..
या कॉम्प्लेक्स ला काय करावे ?
आणि इथल्या वातावरणात असे वागण्याने नुकसान होणार “हे ही खरेच आहे.
शेवटी तिने ठरवले ..
येत्या रविवारी ..सकाळी यशच्या घरी जाउनच यावे ..सगळे घरी असतात , त्यावेळी मैत्रिणी
मिळून राहणार आहोत, त्यासाठी सोयीचा flat बद्दल गाईड करावे .
आपल्याला नक्कीच मदत मिळेल. आणि आजी-आजोबाना बरे वाटेल येऊन भेटल्याने.
अजून एक करावे लागेल आपल्याला ..सगळ्यांच्या समोर ..यशच्या ऑफिसचा आणि आपल्या
नोकरीचा विषय अजिबात काढायचा नाही.
त्यांनी आपणहून विचारले तर ..मोघम बोलायचे .
या विचाराने मधुराला बरे वाटत होते.
*********
अंजलीवहिनी त्यांच्या ऑफिसमध्ये मिटिंग मध्ये बिझी होत्या ..उद्यापासून दोन दिवस पुन्हा
सुट्टीचे ..आज त्यांना घरी जाण्यस उशीरच होणार होता . या कंपनी जोब मध्ये ..दर शुक्रवार म्हणजे
उशिरा पर्यंतच्या वर्क लोड मुळे..खूपच थकून जायला होते.
मिटिंग संपवून ..अंजलीवहिनी त्यांच्या केबिनमध्ये येऊन बसल्या आणि मिटिंग चालू असतांना
ऑफ करून ठेवलेला फोन on केला .. .
whatsapp ग्रुपचे मेसेज शेकडोंनी आलेले आहेत असे दिसत होते .कोणते मेसेज पाहावे-कोणते डिलीट
करावे ? याचा विचार करीत असतांना ..त्याना फोन आला .
अनोळखी नंबर ,अनोळखी आवाज ..
त्यांनी .विचारले ..कोण बोलताय ?
पलीकडून आवाज आला .. मी मिसेस ..सरदेसाई ..
गीतांजली ..माझी मुलगी ..तिचे नाव नोंदवले आहे विवाह मंडळात , तुमच्या दिराचे ..यश चे
प्रोफाईल पाहिले , तुमचा संपर्क आणि संदर्भ वाचला ..आणि आम्ही आत्ताच आमचा इंटरेस्ट दिला
आहे.
तुम्ही गीतांजलीचे प्रोफाईल पाहून ..तुमचे ओपिनियन कळवले तर ..आम्ही म्हणजे ..
मुलगी -गीतांजली , मी तिची आई ,आणि तिचे बाबा ..रविवारी पत्रिका वगरे घेऊन तुमच्याकडे येऊ शकतो .
आम्ही सगळे इतर दिवशी बिझी असतो आपापल्या उद्योगात ,फक्त रविवार फ्री असतो.
तेव्हा प्लीज ..हा रविवार आमच्यासाठी द्यावा ही विनंती आहे तुम्हाला .
पलीकडून अशी विनंती आल्यावर ..त्यांना “नाही “असे कोणत्या कारणाने म्हणयचे ?
असा प्रश्न अंजलीला पडला होता.
त्या म्हनाल्या .आता तर मी ऑफिस मध्ये आहे. तरी आमच्या घरी फोन करून विचारते .
या रविवारी घरी काही दुसरा प्लेन आहे ? विचारून ..लगेच तुम्हाला कळवते .दहा मिनिटे वाट पहा .
अंजलीवहिनीनी लगेच फोन केला घरी –
यशच्या आईने विचारले – काय ग अंजली ..उशीर होणार आहे की काय तुला आजपण ?
अंजली म्हणाली – नाही नाही , निघतेच थोड्या वेळात ..
बरे मला एक सांगा ..या रविवारी आपल्या घरी काही विशेष असा कार्यक्रम वगेरे नाही ना ?
मला सांगा बरे .पाहून ..
यशची आई म्हणाली – नाही , काही कार्यक्रम नाहीये ..एकदम रिकामा रविवार आहे .
अन्ज्लीव्हिनी म्हणाली – अहो आई , सकाळी अकरा वाजता एक फ्यामिली येते आहे ..त्यांच्या
मुलीला घेऊन ..त्यांनी आपल्या यशचे प्रोफाईल पाहून इंटरेस्ट दिलाय .
आई म्हणाली- हो का ..येऊ देत की , या म्हणवे मुलीला घेऊन. रविवार सार्थकी लागावा बाई हा तरी.
अंजली – तू घरी आल्यवर या मुलीचे स्थळ –प्रोफाईल बघून आपण पण आपला इंटरेस्ट लगेच
पाठवू या.
हो आई , मी आलेच तसा भरात . अंजली वहिनीनी फोन ठेवून दिला ..आणि लगेच मघाशी
येऊन गेलेल्या गीतांजलीच्या आईला फोन लावला..
अंजलीवहिनी म्हणाल्या ..आमचा रविवार फ्री आहे ..सकाळी अकरा वाजता ..यावे तुम्ही ..
दुपारचे जेवण आमच्या सोबत होईल तुमचे . ठीक आहे ना ?
गीतान्ज्लीची आई म्हणली –
अंजलीवाहिनी ..थांक्यू , आम्ही आमचा ब्रेकफास्ट वगरे आटोपून येतो तुमच्या कडे .
आणि हो ,लंचसाठी पण इन्व्हाईट केलेयाब्द्दल पुन्हा एकदा थांक्यू.
आमची गीतांजली ..तुम्हा सर्वांना नक्की आवडेल.
बाय ,भेटू रविवारी ,.असे बलून अंजली वहिनीनी फोन कट केला
आणि ऑफिसच्या बाहेर येऊन उभ्या राहिल्या .
.सुधीरभाऊ त्यांच्या ऑफिसातून निघाले होते ..त्यांची गाडी असते म्हणून अंजली त्यांची गाडी फारशी युज करीत नाहीत.
घरी येई पर्यंत आज त्यांना रात्रीचे दहाच वाजले होते.
*********
पहिल्या दिवशी यशच्या ऑफिस मध्ये भरपूर काम होते ..त्यावरून मधुराला यशच्या
व्यापाची कल्पना आली, त्याच्या वयाच्या मनाने ..खूप मोठे यश त्याने मिळवले होते हे उघड आहे.
घराचे संस्कार ..आणि वडील माणसांच्या सहवासाने त्याला नक्कीच एक चांगला माणूस बनवले
आहे .
यश आपल्याला जे काही बोलला ..ते चुकीचे मुळीच नाहीये. आपण ही ते मनावर घेतले नाही.
पण..भलतेच बोलून बसलोत ..अशा भावनेने यश नक्कीच परेशान झाला असणार ..
आता उद्या ऑफिसमध्ये गेल्यवर “काल काहीच गह्डले नाही “असे आपण वागू या . एकदम
रीलैक्स आणि नॉर्मल.
म्हणजे..रविवारी ,,सकाळी ..यशच्या घरी गेल्यवर आपल्याला पाहून त्याला आनंद वाटला “हे दिसले पाहिजे .
मधुरा .आतुरतेने येणाऱ्या रविवारची वाट पाहत झोपी गेली.
------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकीचे पुढच्या भागात
भाग - १७ वा लवकरच येतो आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी - प्रेमाची जादू
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------