13. कोरोना व्हायरस;शाळा सुरु
कोरोना व्हायरस पाहुणा म्हणून आला असला तरी आता स्थिरावण्याचा प्रयत्न करीत आहे. या पाहुण्यानं हळूहळू करीत आपल्या देशातील सर्वच बाबीवर परीणाम केलेला आहे. त्यामुळं व्यापार, उद्योग, खाजगी काम, घरगुती काम, शिक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रावर परीणाम झालेला दिसून येत आहे.
सरकारनं या कोरोनाच्या पसरणा-या बाबींचा विचार करुन काही काही खासगी क्षेत्र सुरु केलेली आहेत. त्यातच कोरोना होवू नये म्हणून दक्षता ही घ्यायला लावली आहे. मास्क बांधणे, सुरक्षीत अंतर पाळणे इत्यादी निर्बंध लावले आहेत. तरीपण लोकं आज हा आजार एवढा वाढत असला तरी काळजी घ्यायला तयार नाही. सुरक्षीत अंतरही पाळायला तयार नाहीत. तसेच काहीतर तोंडाला मास्क बांधायला तयार नाहीत. सानिटायझर लावणं तर दुरच.
सानिटायझरच्या शंभर एम एलची बाटल शंभर असल्यानं व जवळ लॉकडाऊनमुळं पैसे नसल्यानं लोकं सानिटायझर वापरायला तयार नाहीत. तसेच पाहून घेवू असे म्हणत साबनानं हात धुवायलाही तयार नाहीत. एवढंच नाही तर नशीबावर या सगळ्या गोष्टी सोडून लोकं सैरावैरा फिरत आहेत. त्यातच त्वचा कोरडी होते असा बहाणा करुन काही लोकं वारंवार साबनानं हात धुवायला तयार नाहीत.
लोकं आपल्याला काय होते असे म्हणत वावरतात. मास्क बांधत नाहीत. म्हणून सरकारनं त्यावर कडक निर्बंध म्हणून एक हजार रुपये दंड ठेवला आहे. लोकं दंड स्विरारायला तयार आहेत. पण मास्क बांधत नाहीत. त्यातच सरकारनं काही काही क्षेत्र सुरु केल्यानं त्याचा परीणाम गर्दी वाढण्यावर झाला आहे व हल्ली झपाट्यानं कोरोना पसरायला लागला आहे.
आता आपण सरकारी क्षेत्राचा विचार करु. सरकारी क्षेत्रातही कर्मचा-यांची आता पन्नास टक्के उपस्थिती अनिवार्य केलेली आहे. त्यातच पंच्चावन वर्षापेक्षा जास्त वयाचे, सतत आजारी पडणारे, मधुमेह व रक्तदाब असणारे कर्मचारी अनिवार्य केलेले नाही. तरीपण काही सरकारी क्षेत्रे पंचावन वर्षापलिकडील कर्मचा-यांना त्रास देण्याच्या माणसिकतेनं कामावर बोलावतांना आढळतात. वेगवेगळ्या आजारानं त्रस्त असलेल्याही लोकांना सरकारी कामावर बोलावतातच. असे दिसत आहे.
शाळेच्या बाबतीतील विचार केल्यास काही लोकांना शाळेची मोठी घाई येवून पडली आहे आपली मुले घरीच राहू नये. असं समजून तीन वर्षही व्हायच्या पुर्वीच शाळेत नाव टाकणा-या व बालपण हिरावणा-या पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी नाही. ते सतत विचारत आहेत की शाळा केव्हा सुरु होईल.
कोरोनाचा वाढता पादुर्भाव पाहता शाळा कशी सुरु करावी हा विचार सर्व शिक्षकवृंदच नाही तर अधिकारी, कर्मचारी आणि सरकारलाही पडला आहे. पण निर्णय घ्यायचा कसा?कारण हा तर मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. म्हणून काही लोकांनी यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षणाची योजना मांडली. त्यातच काही भागात विद्यार्थ्यांच्या पालकांजवळ व्हाट्सअपचे मोबाईल नाहीत. तर ज्यांच्याजवळ आहेत ते शिकायला तयार नाहीत. कारण नेटच्या किंमती ह्या अशा पालकांना परवडणा-या नाहीत. याचे कारण जिथे आज लॉकडाऊनमध्ये खायला पैसे नाही, तिथे नेट टाकायचा कुठून? हा प्रश्न उभा आहे. अशातच काही लोकांनी काही सुशिक्षीत पालक जमवून ऑनलाईन शिकवायला सुरुवात केलीही. परंतू त्याच ग्रुपवर काही महाभागांनी अश्लील मेसेज पोस्ट केल्यानं गडबड झाली. मग अँडमीन असलेल्या शिक्षकासह त्या ग्रुपवर कारवाई झाल्यानं शिक्षकही धास्तावले आहेत की मुलांना शिकवावे कसे? यातच सरकारच्या हालचाली दिसत आहेत. कोणी मुक्ताफळे उधळतात की ऑगस्ट महिण्यात शाळा सुरु करु. कोणी सप्टेंबर सांगतात.
कशी सुरु करता येईल शाळा?ऑनलाईनही कसं शिकवता येईल?यावर खरंच विचार करण्याची गरज आहे. ऑनलाईन शिकवलं तर काही लोकांकडे स्मार्टफोन नाहीत. काहींकडे आहेत तर ते नेट टाकू शकत नाहीत. काही टाकतात. तर त्यांचे ग्रुप बनवून शिकविल्यास काही महाभाग अश्लील मेसेज पोस्ट करतात. कारवाई करतांना ज्याने तो मेसेज पोस्ट केला, त्याच्यावर न करता संपुर्ण ग्रुपवर व अँडमीनवर होते. तसेच या अश्लील मेसेजमध्ये चूक मेसेज करणा-याची असूनही बदनाम शिक्षकच होतो. त्यातच ग्रुपवर ज्या विद्यार्थ्यांनी असतात. त्यांना वैयक्तीकपणे मुलांचे मेसेज जातात. ते मेसेज पालकांना दिसल्यावर कारवाई तर होणारच.
कारवाई व्हायला हवी. पण अँडमीन वर नको. कारण त्यांचा यात कोणता दोष?जिथे आपण आपल्या जन्म दिल्या मुलांच्या मनातील भाव ओळखू शकत नाही. तिथं या तरुण विद्यार्थ्यांच्या मनातील भाव कसा ओळखणार!अर्थातच ऑनलाईन शाळा सुरु करणे शक्य नाही.
काही लोकं म्हणतात ऑनलाईन शाळा जरी सुरु केली तरी ते समजणार कसं? त्यापेक्षा अशी सार्वजनिक शाळा सुरु करावी. मुलांना शाळेत बोलवावे. तीन तीन दिवसाची, तीन तीन तासाची शाळा घ्यावी. मुलांना स्वतःच्या चटया आणायला लावाव्या. सुरक्षीत अंतर पाळायला लावावं. सानिटायझर किंवा साबण वापरायला लावावं. मास्क बांधायला लावावं. पण हे तरी कसं शक्य आहे. जिथं आपण मोठीच माणसं सानिटायझर वापरु शकत नाही. एक हजार दंड भरतो. पण मास्क वापरत नाही. पोलिस दिसले की मास्क लावतो. पोलिस गेले की काढून फेकतो. तिथं ही तर मुलं. लहान वयापासून तर मोठे वय असलेली. त्यांना यामधील काय कळतं? तेव्हा तुर्तास तरी शाळा बंदच ठेवावी. जेव्हापर्यंत कोरोनावर हमखास उपाय सापडत नाही. विनाकारण मुलांच्या जीवाशी खेळून कोरोनाच्या महामारीत त्यांच्या जीवाचाअंत करायला नको. एक वर्ष घरी बसल्यानं काही होणार नाही. पण जर का हा व्हायरस अंगावर चालून आलाच तर ते जीवावर बेतेल. कारण कोरोना ही महामारी असून ती जग संपवायला लागली आहे. हे जागतिक कोरोनाच्या आकड्यावरुन लक्षात येते. हे विसरुन चालणार नाही. महत्वाचं म्हणजे स्वच्छता पाळा, सुरक्षीत अंतर ठेवा व मास्क वापरा. अफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच आनंदी जीवन जगा. ही आपली कोरोनाची लढाई आहे. ही नक्कीच जिंकू आपण. पण तुर्तास कोणत्याही गोष्टीची घाई न करता संयम पाळायला शिका. कोराना हा पाहुणा म्हणून आला आहे. तो कधी ना कधी एक दिवस निघून जाईलच हे लक्षात ठेवा.