भाग ६
ट्रिप वरून परतताना रोहित मात्र अस्वस्त असतो, सायली का नाही बोलत; तिने हा अचानक निर्णय का घेतला, त्याच्या मनाची चलबिचल सुरु होते. सायली मात्र एकच विचार करत होती मी रोहितला इतका चांगला मित्र मानला आणि तो माझ्या विषयी हा विचार करतो.
ट्रिप वरून परत आल्यावर सायली रोहित ला टाळत होती. रोहित आता विचार करून दमला होता, आणि त्याने त्याचे प्रयत्न बंद केले. तो एकच विचार करत होता कि सायली हुशार आहे जर तिने कोणता निर्णय घेतला असेल तर त्या मागे कारण असेल, मग तिला अडवणे म्हणजे तिच्या आणि आपल्या मैत्रीचा अपमान करण्या सारखं आहे. त्यामुळे तिला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ती स्वतः बोलेल. हा विचार करून रोहित अभ्यासाला लागला फायनल एक्साम Campus Interview हे सगळं कसं समोर येऊन थांबला होत. रोहित ला campus Interview देऊन कमीत कमी ६ महिने internship करून त्याला अनुभव घ्याचा होता.
सायली Settel होती, तिचा जॉब होता उलट डिग्री मिळाल्या मुळे तिला छान पोस्ट देखील मिळणार होती. पण या सगळ्यात जर कोणाला त्रास होत असेल तर तो ओंकार होता, कारण ज्या उद्देश्याने तो सायली च्या जवळ जात होता तो सफल होत नव्हता.
त्याला जे हवे ते मिळत नव्हतं, ओंकार खूप प्रयत्न करत होता, सायली मात्र खूप ठाम जे निर्णय तिने घेतले त्यावर ती कायम अटळ.
न राहवल्याने ओंकार शेवटी बोलतो,
ओंकार : तुझा काय प्रॉब्लेम आहे ग ! समजते कोण स्वतःला, का तू त्या रोहित सोबत बोलत नाही. तुझी तर चांगली मैत्री होती ना, मग का असं वागते.
सायली: तुला काय करायचं रे माझं मी पाहून घेईल, जेव्हा त्याचा सोबत मैत्री होती तेव्हा तुला सोडून त्याच्या कडे गेले कि राग यायचा आणि आता काय होत आहे रे तुला.
मी त्याच्या शी बोलत नाही याचा त्याला काही त्रास नाही मग तुला काय त्रास
तुम्ही सगळे मुलं एकसारखी त्याला जे वाटत ते तो करतो, तुला जे वाटत ते तू. माझं काय, मला काय वाटत, माझं मन काय म्हणतं, याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही.
सायली आज खूप बोलते, इतके दिवस जे मनात साठून ठेवलं होत ते सगळं बाहेर काढते.
तिचा चढलेला आवाज पाहून ओंकार शांत होतो, आणि तिला मानवायचा प्रयत्न करतो. आता त्याचा या प्रयत्न मागे त्याचा काय उद्देश आहे हे अजून तरी सायली ला माहित नसत.
असेच काही दिवस निघून जातात, एक्साम आलेली असते सो सगळं त्यात Busy होतात. रोहित मात्र त्या क्षणाची वाट पाहत असतो कधी सायली समोरून येते. कारण सानिका चा वाढदिवस जवळ आलेला असतो.
रोहित सायली सोबत सानिका चा वाढदिवस साजरा करायचा असतो. एक मैत्रीण म्हणून सायली किती स्पेसिअल आहे हे त्याला तिला सांगायचं असत. एक्साम पूर्ण होते. शेवटचा पेपर होतो, रोहित खूप विचार करून सायली समोर येतो, सायली तुला नाही बोलायचं काही प्रॉब्लेम नाही , पण तुला एक पत्ता पाठून देतो जमलं तर या शनिवारी सकाळी १० वाजता त्या पत्त्या वर ये. पण एक request करतो please ये. सायली मोबाइलला पाहते एक पत्ता रोहित च्या number वरून आलेला असतो, तो पत्ता पाहून ती पाठमोऱ्या जाणाऱ्या रोहित च्या आकृती कडे पाहत राहते. तो message पाहून तीच्या डोक्यात खूप सारे विचार चालू झाले. इथे का बोलवलं असेल, असं काय काम आहे माझं तिथे. कारण तो पत्ता वाचून तिला राहवत नाही, ती जागा सायली साठी देखील तितकीच जवळची होती.
रोहित आणि तिचे विचार इतके का जुळतात हा विचार करत ती निघते. ती इतकी विचारत असते कि ओंकार ला भेटून मी निघते हे सांगावं तिच्या लक्षात राहत नाही.
ती घरी येते, फोन पाहते ओंकार चे २० miscall. कॉल बॅक करते, तिला असं वाटत कि ती न विचारता निघून गेली म्हणून फोन आला असेल असं तिला वाटत. पण कुठून तरी त्याला समजलं कि आज रोहित आणि सायली बोलत होती. त्याने फोन उचलताच सायली तू रोहित शी बोललीस, तुम्ही आता बोलता ना, काय म्हणतो आहे तो कोणत्या कंपनी मध्ये इंटर्नशिप करणार आहे तो असे त्याचे प्रश्न सुरु होतात.
सायली ला खूप राग येतो , ती फोने ठेऊन देते आणि रोहित च्या विचारत हारून जाते.
काय असेल तो पत्ता, काय संबंध असेल त्या पत्त्या शी रोहित आणि सायली चा !!!!!
बघू पुठे काय होईल ते.