Tujhach me n majhich tu..20 in Marathi Love Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | तुझाच मी अन माझीच तू...भाग २०

Featured Books
Categories
Share

तुझाच मी अन माझीच तू...भाग २०

तुझाच मी अन माझीच तू...भाग २०

राजस च्या डोक्यात काहीतरी विचार चालू होते. चिट्ठी देऊन आपण चुकीच वागलो हे त्याला जाणवले होते. जे होतंय ते होऊन द्यायला हवं होते असे विचार त्याच्या मनात सतत येत होते. कुठून आपण शेण खाल्ले हे राजस ला काही केल्या कळत नव्हते.. पण आता तो झालेली चूक सुधारणार होता..

त्याने लगेच नेहा ला पिंग केले.. ती कामात होती त्यामुळे नेहा ने राजस च मेल पाहिलं नाही.. मग तर राजस चे डोके अजूनच फिरले.. आधी आभा चे वागणे त्याला अजिबात आवडले नव्हते. त्याला आभा बद्दल काही ठरवण्याचा अधिकार तर नव्हताच पण तरी तो आभा बद्दल चे विचार थांबवू शकत नव्हता. त्याचे टेन्शन वाढत होते. आणि नेहा कडून काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्याने मग मोबाईल उचलला.. आणि नेहाला फोन लावला. तो नेहा कडे पाहत होता पण नेहा चे त्याच्या कडे लक्ष नव्हते. ती कामात मग्न होती.. मोबाईल ची रिंग वाजत होती पण ती फोन सुद्धा उचलत नव्हती.. मोबाईल बंद झाला आणि आता राजस त्याच्या खुर्चीवरून उठला. तितक्यात त्याच्या मोबाईल ची रिंग वाजली.. तो आता वैतागला होता पण कोणाचा फोन आहे हे पाहायला त्याने मोबाईल घेतला. नेहा चा फोन होता.. तो लगेच खुर्चीवर बसला.. आणि त्याने नेहा ला फोन घेतला,

"फोन घेत जा ग वेळेत.. "

"हो अरे इतक काय.. हातातलं काम तरी पूर्ण होऊ दे की.. इतकी कसली घाई तुझी?" नेह हसत बोलली..

"काम बंद कर... आणि लगेच कॅफेटेरिया मध्ये जा.." राजस ने नेहा ला जणू ऑर्डर सोडली..

"का? का जाऊ कॅफेटेरिया मध्ये? मला नकोय आत्ता कॉफी.."

"माहितीये मला की तुला आत्ता कॉफी नकोय पण तरी जा ग प्लीज.. उगाच टाईमपास करू नकोस..!!"

"बर बर... जाते पण काय काम आहे ते तर सांग..." नेहा राजस च्या विचित्र वागण्याने विचारात पडली होती. तिला एकदम राजस कॅफेटेरिया मध्ये जायला का सांगतोय हे तला कळत नव्हते. आणि राजस ला नेहा कधीही नाही म्हणायची नाही.

"काम? ह.. आधी हवी तिकटी कॉफी पी... आणि प्लीज आभा कडे लक्ष ठेव..." राजस ने उत्तर दिलं आणि त्याचे उत्तर ऐकून नेहा ला एकदम हसूच आहे..

"हवी तितकी कॉफी पी? मला आत्ता कॉफी नकोय म्हणून मुद्दाम ना?"

"ए बाई.. तुला हव ते ख पी... पण जा प्लीज आणि आभा कडे नीट लक्ष दे..." थोडा वैतागून राजस बोलला. त्याच बोलण ऐकून नेहा ला हसू कंट्रोल करता आलेच नाही...

"का..? आभा काय लहान मुलगी आहे का की मी तिच्याकडे लक्ष ठेऊ?"

"ऐक ग...आणि हसू नकोस!! मी आत्ता एकदम सिरिअस मोड मध्ये आहे.. आभा आणि रायन कॅफेटेरिया च्या दिशेने गेले.. मी पाहिलं त्यांन जातांना.. आणि रायन कसा आहे हे आपल्याल्याला माहिती आहे."

"ओह.. सो इतकी फेवर..." खरी गोम कळून नेहा बोलली.. "नो नो रे राजस..डोंट वरी.. रायन आता सुधारला आहे.. लास्ट इयर किती काय काय झालेलं.. आणि आता रायन जरा सुधारल्या सारखा वाटतोय.. "

"वाटण वेगळ.. असण वेगळ.. तू निघ आता आता आणि जा कॅफेटेरिया मध्ये...लक्ष ठेव जरा.."

"नोप्स राजस.. मला कामा पूर्ण करायची आहेत..."

"गप ग नेहा.. तुझ काम मी पूर्ण करून देतो पण आत्ताच्या आत्ता निघ.." राजस चा आवाज थोडा चढला होता.. आणि ते पाहून नेहा वैतागली..

"ए राजस.. माझ्यावर काय ओरडतो आहेस? मी काय तुझी गर्ल फ्रेंड नाही.. सो काहीही ऐकून घेणार नाही.. तुला काळजी वाटत असेल तर तू जा की.. मी कशाला जाऊ...." राजस च्या बोलण ऐकून रीयॅक्शन नेहा कडून लगेचच आली.. ती येणार होतीच.. कारण आपण राजस च्या आयुष्यात फक्त एक बेस्ट फ्रेंड राहनर ह्य गोष्टीचा तिला नेहमीच त्रास व्हायचा.. नेहा आणि राजस तसे खास मित्र असल्यामुळे बऱ्याच वेळा नेहा ला त्याच्या बद्दल आकर्षण वाटायचं... आणि एकदा हिम्मत करून तिने त्याला तसं सांगितलं पण होत.. पण राजस ने "तू माझी बेस्ट बडी आहेस पण गर्ल फ्रेंड नाही पाहू शकत.." इतक्या सहज वाक्यात नेहाला ला नकार सांगितला होता. त्यावेळी नेहा जरा दुःखी झाली होती पण ती त्या दुःखातून भर सुद्धा लगेच आली होती... कारण तिला माहित होतं, बॉय फ्रेंड पेक्षा राजस मित्र म्हणून खूप चांगला आहे..

"मला जाता येत नाही म्हणून तुला सांगतो आहे न.. जा न ग प्लीज!!" नेहा ऐकत नाही हे पाहून त्याने आपला सूर बदलला.. त्याच्या आवाजात विनवणीचा सूर होता... राजस चे बदलेले बोलोने पाहून नेहा ला हसूच आले..

"अब आय उंट पहाड के नीचे.. वा वा.. वा वा!! आणि मला काय मिळणार ह्या बदल्यात?" नेहा चेष्टेच्या सुरात बोलली...

"तुझ काम पूर्ण करून देतो.. आणि तुला काय हवाय ते देईन ग बाई... आत्ता प्लीज जा..महत्वाच आहे सो सांगतोय ना..समजून घे ग.. आणि आता प्लीज चर्चा करण्यात वेळ वाया घालवू नकोस... लगेच निघ.." राजस अधीरपणे बोलत होता.. नेहा ला त्याची फिलिंग जाणवत होती.. मधेच तिला आपल्याबद्दल राजस ला असं कधीच वाटल नाही ह्या विचाराने वाईट सुद्धा वाटत होत पण राजस तिचा खास मित्र होता सो ते त्याच्यासाठी हे करणार होतीच.. तिने सगळे नकारात्मक विचार झटकले.. आणि ती बोलायला लागली,

"येस येस... जाते!! काय करायचं आहे मी?"

"तू फक्त रायन वर लक्ष ठेव.. तो आभा शी वेडावाकडा वागत नाही ना हे पहा... आणि तसं काही वाटलाच तर मला लगेच कॉल कर.. ठीके?" राजस एका दमात सगळ बोलून गेला आणि मग तो श्वास घ्यायला लागला.. त्याच्या श्वाशोश्वासाचा आवाज नेहा ला स्पष्ट ऐकू येत होता.. आणि नेहा आता राजस ला अजून त्रास देणार नव्हती.. तिने अंगठा उचलून थम्स अप ची खूण गेली आणि ती लगबगीने कॅफेटेरिया च्या दिशेने गेली.. पण जाता जाता तिला मध्ये एक दोघांना हटकलं. राजस ने ते पाहिलं आणि तो जरा चिडलाच.. त्याने नेहा ला लगेच फोन लावला..

"हेलो.. नको ग करूस टाईमपास.. जा लवकर कॅफेटेरिया मध्ये.."

"जातीये रे...आणि कळवते तुला.. त्याचे चार्जेस वेगळे.." नेहा इतक बोलली..मग हसली..

"देतो देतो तुला हव ते..आता निघ.." राजस नेहावर खेकसला.. आणि नेहा ने फोन बंद केला.. तिने तिच्याशी बोलायला आलेल्या लोकांना कटवलं आणि ती कॅफेटेरिया मध्ये पोचली.. तिने पूर्ण कॅफेटेरिया वर नजर फिरवली.. तिला आभा आणि रायन कुठे दिसत नव्हते.. तिला एक मिनिट अस्वस्थ वाटल.. राजस ला हे सांगू ह्या विचाराने तिने फोन उचलाल.. आणि राजस ला फोन लावणार तितक्यात समोरून तिला रायन आणि आभा हसत खिदळत येतांना तिला दिसले.. आभा रायन बरोबर एकदम फ्रेंडली वागत होती.. मग तिने पटकन जाऊन एक जागा पकडली.. आभा आणि रायन कोपऱ्यातल्या जागेवर बसायला गेले.. पण नेहा जिथे बसली होती तिथून तिला काहीच दिसत नव्हते.. मग नेहा पटकन उठली आणि तिला दोघे दिसतील अश्या ठिकाणी जाऊन बसली.. अजूनही रायन आणि आभा गप्पा मारत होते..

क्रमशः