Sansaar - 10 in Marathi Fiction Stories by Dhanashree yashwant pisal books and stories PDF | संसार - 10

Featured Books
Categories
Share

संसार - 10

रुहीचा आत्मविश्वास पाहून खरतर बाबा ना खूप छान वाटले . आपण आपल्या मुली ला आज खऱ्या अर्थाने तिच्या पायावर उभे केले .तिचे निर्णय ती स्वतः घ्य्ला लागली .ते पण परिणामाची तमा न बाळगता .पण, ह्या वेळीं ने जर तिला काही सासरी त्रस्स झाला .तर मी तिच्या पाठी खंबीर पणे उभा राहील . जे मझ्या मुलीला बोल लावतील, त्यना सडेतोड उत्तर देईन . लोक तर नावे ठेवण्यासाठी च असतात ,पण त्यांना घाबरून आपण आपल्या मुलांची साथ नसती सोडून दयची, तर त्याच्या पाठी खंबीरपणे उभे रहायचे असते .पण, आता आदित्य राव तिला माफ करतील ना, आणि त्यानी जरी तिला माफ केले तरी त्याचे घरचे तिला माफ करतील ना . करतील, .....नक्की करतील ..
ई कडे रुहीने आदित्य ला फोन केला .आदित्य ने तिचा फोन काहीही मनात न आणता उचला . आदित्य ने फोन उचला , हे पाहून रुही ला जरा बर वाटल . आणि तिला त्याची माफी मागायला ही जरा हुरूप आला . तिने आधी आदित्य ला कसा आहेस? म्हणून विचारल . तीच बोलण ऐकून, आदित्य ओठत्ल्या ओठात मीशीग्ल पणे हसला . त्याच हसणं ऐकून रुही ने त्याला विचरले, काय, रे..... काय जाहाले? का हस्लस ? तिचा प्रश्न ऐकून आदित्य तिला म्हणला? माहीत असून हा प्रश्न विचारतेस? ज्याची बायको आणि त्याची लहानगी मुलगी एक वर्ष त्याच्या पासून दूर आहे .
तो कसा सुखी असेल? जेवढे दुख त्याच्या बायको च्या दूर जाण्याने झल्य तेवढे दुःख एखाद्या व्यक्तीला कश्या मुळेच जाहले नसेल ......जाऊदे ..... तू बोल कश्या साठी फोन केल्त्स. आता कोणता निर्णय सांगायचंय..... आदित्य चा प्रश्न ऐकून रुहीला थोडा राग आला .पण तो आवरत ती आदित्य ला म्हणली, आदी, , प्लीज, टोमणे नको ना देऊ . मला तुला काही सांगायचंय .......पण, अस फोन वरून नाही. तर, भेटून बोलायचय ....तुला कधी वेळ आहे . मी येईल तेव्हा, राधा ला घेऊन. तीच बोलण ऐकून , आदी रुही ला म्हणला, तू हे मला सांगतेस, का विचारते स? मला तूझे म्हणे ऐकण्यात काहीच इंटेरेस्ट नाही .पण, राधा ला भेटायला नक्की येईल . मला वेळ असेल, तेव्हा तुला सांगेन. आता मी कामात आहे, नंतर बोलू ......आणि आदित्य ने फोन ठेवून दिला . आदित्य च बोलण ऐकून रुहीला आनंद ही झाला ,आणि दुःख ही जाहले. तिच्याशी आदित्य एवढा उर्मट कधीच बोलला नव्हता , त्यामुळे तिला थोडे वाईट वाटले, पण तो यायला तयार झाला .म्हणून आनंद ही जाहला. आता रुहीला अस जाहालेहोते, कधी आदित्य तिला भेटतोय, आणि ती त्याला कधी तिचा मनातल सांगते, आणि कधी तो तिला माफ करून त्याच्या घरी नेह्तौय, आणि कधी सगळ पूर्वी प्रमाणे होतय . तिला अस वाटत होत .
चार दिवस जाहले होते, अजून आदित्य च फोन काही रुहीला आला नव्हता . तिला भीती वाटायला लागली, आदित्य विसरला, तर नसेल ना ... का? तो अस मुदाम तर नाही ना ..करत ? पण, मला जरी त्याला भेटायचे नसेल, तरी तो राधा साठी तर नक्की च तो आला असता . मग का त्याने फोन का केला नसेल? का त्याच्या घरच्यांनी तर त्याला काही संगितले नसेल ना? त्याच्या बहिणी तर त्याला मला भेटण्यापासून दूर ठेवल नसेल ना? किती विचार येतात रे मनात ? एवढ विचार करत बसण्यापेक्षा त्याला फोन च करते .जाऊदे, तो काय बोलेल, ते ऐकून घेईल, पण ,त्याला आज च भेटीन. तिने, फोन उचलला, पटपट नंबर दाबला .तिकडून आवाज आला हेलो, रुही ने बायकोच्या हक्काने, आदित्य च काहीही न ऐकून घेता त्याला भेटायला बोलवल.आणि फोन ठेवून दिला .मग स्वतःच आणि राधा च आवरून ती ही निघाली . जवळच्या गार्डन मधे भेटायचे ठरले होते . त्या गार्डेन मधल्या रुहीच्या आणि आदित्य च्या सुखी संसारा मधे खूप आठवणी होत्या . रुही राधाला घेऊन गार्डेन मधे येऊन जवळजवळ दोन तास जाहले होते, तरीही आदित्य चा काहीच पत्ता नव्हता, आता राधा ही कंटाळली होती . रुहीला त्रस्स देत होती . आदित्य येईल, अस काहीच चिन्ह दिसेना . आता रुहीची शेवटची आशा ही संपली होती, तिला आपल्या वागण्याची लाज वाटू लागली होती . आपण फार काही तरी गमावल्या ची जनीव तिला होऊ लागली होती . तिने आता घरी जायचे ठरवले होते, पण ह्या पुढे आदित्य ला कधीच फोन करायचा नाही, अस तिनी ठरवल होत . तिने राधा ला उचलले, आणि घरचा रस्ता पकडला, घरी जातांना तिचे डोळे भरून आले होते .ती गार्डन च्या बाहेर आली . ऐत्क्यात समोर तिला आदित्य दिसला .आदित्य ला अस अनपेक्षित रित्या पाहून आणि तो आलाय, हे पाहून रुहीला खूप आनंद झाला . आणि तिला थोड रडू ही आल. तिने कशाची ही तमा न बाळगता, आणि आपण कुठे आहोत, कशाचा ही विचार न करता, तिने आदित्य ला घट्ट मिठी मारली . रुहीच्या डोळ्यातून घळ घळ वाहणारे अश्रू आणि आदित्य ला तिने मारलेली घट्ट मिठी हे पाहून आदित्य ला रुहीला अचानक काय जाहाले, काहीच कळेना . पण, रुहीने त्याला मारलेली मिठी त्यालाही हवी होती . त्यमुळे त्याने ही रुहीला काहीही न बोलता, ती मिठी आणखीन घट्ट केली, त्या मिठीत सगळे राग, रुसवे चिरडले गेले .रहील्ते फक्त प्रेम, माया, आपुलकी ......रुही आता भानावर आली .तिने डोळे पुसले, आणि आदित्य च्या मिठीतुन ती दूर जाहली .
आदी, प्लीज मला माफ कर .....मी चुकले, मझा निर्णय चुकीचा होता ....मी तूझ्या पासून तूझ्या मुलीला दूर केलय, प्लीज मला माफ कर ...ह्या पुढे अशी चुकी होणार नाही ....पण, प्लीज मला आणि राधाला दूर लुटू नकोस ...तुझ्याशीवय सगळ अधुर आहे, तू जे बोल्षिल ते मी करेल ....
रुही च बोलण ऐकून आदी ने तिला जवळ घेतले, तिचे डोळे पुसले, छोट्याश्या राधाला उचलून घेतले .रुही अगं रडू नको .तुला तुझी चुकी कळली, तूझा निर्णय चुकलायस हे तुला समजल, बास, मला आणखी काही नको ....आता मी आणखी तुमच्या दोघींन पासून दूर नाही राहू शकत .ऐत्क्यात दिवसांत मला कळलय, की मी मझ्या बहिणी, आई तुझ्याशी चुकीच वाग्ल्या ,पण, ह्या पुढे मी तस होऊ देणार नाही आणि तूही काही गोष्टी मनला न लावून घेता, सोडून दय्ला शीक, कोणीही असल तरी आपण चुकीच वागायचं नाही, आपण आपल कर्तव्य करायच ....आणि आनंदी रहायचे, तुझी स्वप्ने तू पूर्ण कर ...मी आहे तूझ्या सोबत....कायम..... आदी च बोलण ऐकून रुहीला थोडस हायस वाटल .आपल्याला अगदी चांगला नवरा भेटलाय ह्याची तिला खात्री जाहली . तिने आदित्य ला वचन दिल, ती ह्या पुढे असा कोणताच चुकीचा निर्णय घेणार नाही .
आणि जस आदित्य सांगेल तसच वागेल . मैत्रिणींनो जर, आपल्या घरात एखादी मुलगी सून म्हणून, आली तर तिला सून नाही मुलगी माना, आणि सासूला आई ....बघा संसार किती सुखी होतोय .अगदी द्रुष्टी लागण्याजौगा , कधीतरी वागून तर बघा ...