Appearance - The journey of a chef in Marathi Motivational Stories by Dhanshri Kaje books and stories PDF | स्वरूप - एका शेफचा प्रवास

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

स्वरूप - एका शेफचा प्रवास

मुलांचं स्वयंपाक करणं म्हणजे जरा विचित्रच. अस पूर्वी वाटायचं. पण याला एक कुटूंब अपवाद होत ते म्हणजे शेफ स्वरूप याच. ही कथा आहे स्वरूपची त्याच्या प्रवासाची. स्वप्न सगळेच बघतात कुणाची पूर्ण होतात तर कुणी नशिबाला दोष देत बसतात. स्वरूप मात्र जिद्दी होता. ते म्हणतात न 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' अगदी तसच लहानपणा पासुन स्वरूपला आपल्या आईला किचनमध्ये मदत करण्याची आवड होती. कुठलही काम असो स्वरूप अगदी बारकाईने लक्ष देऊन पाहायचा आणि करण्याचा प्रयत्न देखील करायचा अगदी भाजी निवडण्या पासुन ते फोडणी देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत अगदी आवडीने रस घ्यायचा स्वरूपला फक्त स्वयपाकाचीच आवड न्हवती तर तो अभ्यासात देखील तितकाच हुशार होता. कधीही त्याने पहिला नंबर सोडला नाही म्हणून तो त्याच्या मित्र - मैत्रिणींचा देखील लाडका होता.
कॉलेजमध्ये तर त्याच्या याच आवडीने त्याला एक वेगळाच मार्ग दाखवला तो म्हणजे शेफ होण्याचा.
हो. आपण एक खुप छान शेफ होऊ शकतो हे त्याला कॉलेजमध्ये असताना समजलं होत. झालं असं होतं की, एकदा कॉलेजची फ्रेशर्स पार्टी होती. सगळे कल्चरल प्रोग्रॅम्स झाले आणि नेमकं जेवणाची वेळ जवळ आली तर केटररला गावाला जावं लागलं. मग काय कुणाचीही वाट न बघता मॅडमशी बोलुन लगेच याने आपली धुरा सांभाळली आणि कामाला लागला मेनु ठरलेले होतेच मग काय केली बनवायला सुरवात त्याचा झपाटा बघुन त्याला मदत करायला त्याचे मित्र-मैत्रिणी देखील पुढे सरसावले आणि बघता बघता त्यांचा सगळा स्वयंपाक बनवुन झाला. त्याचा उरक बघुन सगळे त्याच्याकडे बघतच राहिले.
त्या एका घटनेने स्वरूप एकदम फेमस झाला होता मग काय कुठलाही लहान मोठा इव्हेंट असो हा तिथे हजर. त्याच तर पुर्ण कॉलेजमध्ये नावच पडलं होतं 'मास्टर शेफ स्वरूप' पण अजुन खरी परीक्षा बाकीच होती मार्ग तर सापडला होता पण त्यावरून चालायचं कसं? घरी कस सांगायचं? असे अनेक प्रश्न स्वरूप समोर उभे होते. स्वरूप एक सिव्हील इंजिनिअरिंग चा मुलगा होता. आपल्या मुलांनी इंजिनिअरिंग करावं असं स्वरूप च्या आई- वडिलांना वाटत होतं म्हणून स्वरूपनी मुंबईमधल्या सगळ्यात मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. पण त्याच सगळं लक्ष किचनकडेच होत. मग आला तो निर्णायक दिवस म्हणजे इंजिनिअरिंगची परीक्षा आता स्वरूप विचारात पडला सिव्हिल करायचं? की शेफ व्हायचं, सिव्हीलसाठी आपण खुप मेहनत घेतली आहे आणि शिवाय आपण इंजिनिअर व्हावं अस कित्येक वर्षांपासून आपल्या आई-बाबांना ही वाटत आलंय. तर शेफ होणं आपलं स्वप्न आहे. काय करू काय करू विचार करता करता स्वरूप आपल्या मनाशीच एक निर्णय घेतो. "आधी परीक्षेची तयारी करू पास होऊ मग आई बाबांशी बोलु." असा विचार करून स्वरूप कामाला लागतो. काही दिवसातच परीक्षा येते आणि स्वरूप पेपर्स देतो. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी स्वरूप पेपर देऊन घरी येतो. तो खुप उत्साहीत असतो. आज आपला शेवटचा पेपर आता आपण आपलं स्वप्न पुर्ण करू शकुत. असा विचार करून उत्साहाच्या भरात एका क्षणात आई बाबांना सगळं सांगुन मोकळा होतो. दोघही त्याच्याकडे बघतच राहतात. काही क्षण दोघांना काय बोलावं हेच सुचत नाही. त्यांची इच्छा असते आपल्या मुलानी इंजिनिअर व्हावं नोकरी करावी पण होत वेगळंच त्याच स्वप्न ऐकुन दोघही थक्क होतात आणि स्वरूपला विचारतात. "पण तु तर सिव्हील करणार होतास न? मग अस अचानक विचार का बदललास ?" स्वरूप शांतपणे उत्तर देतो. "आई अग अचानक नाही मी हा खुप शांतपणे विचारपुर्वक निर्णय घेतलाय. तुच पहा न मी स्वयंपाकात अगदी लहानपणापासून तुला मदत करत आलोय तुझ्याचमुळे माझ्यात स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. आणि त्या आवडीचं रूपांतर स्वप्नात झालं पण तुमचं स्वप्नही मी अपूर्ण राहु देणार नाही आई. मी नक्की सिव्हील मध्ये पास होणार आहे आणि मगच हॉटेलमॅनेजमेंट करणार आहे. बेसिक तर मी आधीच शिकलोय आता फक्त डिग्री मिळवायची आहे. आणि आधीच सगळं येत असल्याने मला हॉटेलमॅनेजमेंट अवघड जाणार नाही तु नको काळजी करुस" थोडस निराशेच्या स्वरात आई म्हणते. "बघ बाबा, तु तुझा निर्णय घे मला तरी हे पटलं नाही." स्वरूप आईला जवळ घेत समजावतो. "तु पण न आई. टेन्शन घेऊ नकोस ग एक लक्षात ठेव मी तुमच्या दोघांची कधीही मान खाली जाऊ देणार नाही." लगेच स्वरूपचे वडील स्वरूपला दुजोरा देत म्हणतात. "अग ठीक आहे न, पोरगा म्हणतोय तर देउत एक संधी. बघुयात काय होत ते." ते दुसऱ्याच क्षणी ते स्वरूपला ही समजावतात. "बघ बेटा आज तुझ्या बाजूनी मी आईशी बोललोय आता तुला तुझं स्वप्न पुर्ण करावं लागेल. आणि बेटा जर या संधीच तु सोन करू शकला नाहीस तर आम्ही जे सांगु ते करायचं हं" लगेच हसुन स्वरूप म्हणतो. "म्हणजे नोकरी न ठीक आहे." काही दिवसा नंतर स्वरूपचा निकाल लागतो तो परीक्षेत पहिल्या नंबरनी पास झालेला असतो. आणि आता त्याचा आपल्या स्वप्नाकडे एक सुंदर प्रवास सुरु होतो. स्वरूपनी हॉटेलमॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्या नंतर काही दिवसातच एक कॉलेजमध्ये स्पर्धा होते. त्याच नाव असत. 'मास्टर शेफ' या स्पर्धेत बरेच मोठ-मोठे अनुभवी शेफ जज म्हणून आलेले असतात. स्वरूप सगळ्यांसमोर आत्मविश्वासाने पदार्थ बनवतो. एक एक फेरी होत जाते. आणि मग येते स्वप्नपूर्तींची वेळ एक निर्णायक क्षण . जज प्रत्येका जवळ जाऊन सगळ्यांच्या पदार्थांची चव घेतात. त्यांना स्वरूपाच्या डिशमध्ये वेगळेपण जाणवत. जज आपला निर्णय सांगतात. जज नाव अनाउन्स करताच एकच जल्लोष होतो. कारण नाव स्वरूपच असत. त्याला 'मास्टर शेफ' चा किताब मिळालेला असतो. आता स्वरूप मास्टर शेफ स्वरूप बनलेला असतो हे बघुन सगळे खुश होतात.