kadambari premaavin vyarth he jivan - Last Episode in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .अंतिम भाग- भाग - 32

Featured Books
Categories
Share

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .अंतिम भाग- भाग - 32

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

-अंतिम भाग- भाग-३२ वा

-------------------------------------------------------------------------

सागर देशमुखांना त्यांच्या प्रेमालाय “मध्ये येऊन .आता पंधरा दिवस होऊन गेले होते .

अचानक झालेल्या आजाराने, शारीरिक आघाताने त्यांना खूप नुकसान पोचवले होते ..

त्यातून पहिल्यासारखे होणे ..सध्या तरी खूप दूरची गोष्ट आहे ..हे सत्य मान्य करायला

मानसिक धैर्य लागते , मानसिक बळ लागते आणि मनात प्रबल इच्छा शक्ती असावी लागते .

या सगळ्या गोष्टी ..या आजाराने जाता जाता त्यांना जणू रिटर्न –गिफ्ट म्हणून मुक्त मनाने

दिल्या होत्या . ..देशमुख सरांनी वस्तुस्थिती मान्य केली होती , डॉक्टर सांगितल ते ते अगदी

मनापासून ते करीत होते .

दिवसभर पडल्या पडल्या गेल्या महिन्यातल्या घटना त्यांना आठवायच्या ..

वडिलांचा बिझिनेस सांभाळण्याची जबाबदारी अभिजितला स्वीकारायला लावण्यात ..अविनाश जळगावकर ,

रंजनादीदी , जीजू आणि अनुषा यांनी पुढाकार घेतला आहे..हे देशमुखांना माहिती होते .त्यात अभिजित

पूर्वीचे मनभेद विसरून ..आई-बाबांच्या सोबत त्यांच्या घरात राहायला आला , ही सर्वात मोठी जमेची

बाजू होती . घरी राहून ऑफिसचे सगळे काम करता यावे म्हणून ..

देशमुखांनी..एक मिनी ऑफिस बंगल्याच्या आवारातच पहिल्या सुरु केलेले होते .त्यासाठी वेगळा स्टाफ

होता . त्यांची खूप मदत देशमुखांना आता होत होती .

देशमुखांना अजून हे ही अंतर चालून जाणे शक्य नव्हते , घरच्या हॉल मध्येच मोठ्या खिडकी जवळ

त्यांचा बेड लावण्यात आला होता ..

त्यावर पडून देशमुख ..आपल्या जगण्याचा हिशेब लावीत बसायचे ,

त्यावेळी .त्यांना जाणवले ..आपली एक मोठी चूक दुरुस्त झालीय ..ती म्हणजे –

अभिजीतचे परत येणे ...मोठ्या मनाने आपले लेकरू आपल्यासाठी सगळं विसरून आलाय.

हा विचार मनात आला की..त्यांचे मन आणि डोळे दोन्ही भरून येऊ लागले .

गेल्या चार-पाच दिवसापपासून त्यांनी नवीनच एक सुरु केले होते

..सरिताला ..जवळ तिला दोन्ही हात जोडीत ..म्हणायचे ..

सरिता -तू मला माफ करो वा न करो

..मी तर तुझ्या समोर हात जोडून माफी मागतो आहे ..

माझ्या अपराधाला तुझ्या जवळ क्षमा नाहीये ,

आणि ती तू करावी ..असे मी कोणत्या तोंडाने म्हणू ..आज मला माझीच लाज वाटते आहे..

सरिता ..मी मनापसून तुझी क्षमा मागतो आहे ..

तुझ्या हाताचे सगळे झिडकारत गेलो मी .

पण..बघ ना .

या आजाराने मला अशी काही शिक्षा दिली आहे की ..

खरा खुरा लुळा–पांगळा मी झालोय .. तुझ्या अधुपणाची मी नेहमीच टिंगल केली ,तुला हीन लेखले .

तुझ्या बाबांनी मला फसवले , माझ्या गळ्यात त्यांची पोरगी बांधली ..मंद-बुद्धी ,ना समज , अधूपण

असलेली “

सरिता – डोळे असून ही तुझ्याकडे मी कधी निर्मळ नजरेने पाहिले नाही, धड शब्दाने तुला बोललो नाही.

मोठे अपराध आहेत माझे ..माफी न करण्या इतके .

पण.. एक लक्षात घे ,समजून घे ..

उशिरा का होईना ,माझे डोळे उघडलेत ,मला माझ्या चुकीच्या वागण्याचा पश्चताप झालाय ..

म्हणून तुझी क्षमा मागतोय ..

तू मला माफ केले पाहिजे ....असा ना आग्रह आहे ..ना हट्ट,

आणि तू माझ्यावर दया तर मुळीच करायची नाहीस..

तुझ्या मनाला वाटले तरच तू मला क्षमा कर , माफ कर..

पेशंटच्या औषध पाणी वेळेवर देण्यासाठी ..काळजी घेण्यासाठी तुम्ही नर्स ठेवाल , बॉय ठेवाल

मला ते महत्वाचे नाही..

माझ्या मनाला उभारी यावी.. जगण्याचे बल यावे ..हे काम तू स्वतः हे करावे सरिता .

ही माझी इच्छा ..तू पूर्ण केलीस तर..समजेन ..तू मला माफ करण्यास सुरुवात केली आहेस

सागर देशमुखांचे हे रूप सरिताला अपेक्षित नव्हते ..हा माणूस कधीच बदलणार नाही यावरच

तिचा ठाम विश्वास होता ..पण.. नशिबाचे फटके .बसले की भले भले जमिनीवर कसे येतात ..

हे ती स्वताच्या नवर्याच्या बदलत्या रुपात पहात होती.

सागर देशमुखांच्या इच्छेप्रमाणे सरिताने ..त्यांच्या खाण्या-पिण्याच्या व्यवस्थेकडे लक्ष देण्याची जबाबदारी

घेतली .

----------------------------------------------------

२.

अभिजित ..पहात होता ..त्याच्या आई-बाबांच्या मधील दुरावा ..,त्यांच्यात असलेले अंतर कमी होण्यास सुरुवात झाली आहे .

देशमुखांना घरी आल्यापासून रंजनादीदी आणि जीजू दोघे ही एक-दोन दिवसा आड भेटायला येऊन जात होते .

एका दुपारी ..एकटी रंजनादीदी आली..म्हणाली निवांत वेळ आहे .

आले बोलायला आणि बाबा ..खूप खूप महत्वाचे सांगायला ..असे म्हणाली.

आई – ही गोष्ट तुझ्यासाठी पण तितकीच महत्वाची आहे ..

सागर देशमुख .अडखळते बोलत .रंजनाला म्हणाले –

दीदी ..सांग लवकर लवकर ..उत्सुकता नको वाढवू आमची..

रंजना दीदी सांगू लागली ..

बाबा ..तुमचा आजार होणे ..खूप दुर्दैवाची गोष्ट आहे खरी .. पण..

या वाईट प्रसंगातून एक खूपचांगली

आनंदाची गोष्ट घडली आहे..

ती म्हणजे ..आपला दुरावलेला –दुखावलेला परिवार पुन्हा नव्याने जवळ आलाय ,एकत्र आलाय ..

पण..याची सुरुवात तुम्ही आजारी पडण्याच्या अगोदरपासून सुरु झाली आहे ..

आणि याचे सगळे क्रेडीट ..अभिजितच्या अनुशाला दिले पाहिजे ..

कारण तिच्या प्रयत्नाने आपण एकेक करून जवळ येण्यास सुरुवात झाली ..

सरिता म्हणाली ..दीदी ..जरा डीटेल सांगतेस का .म्हणजे समजेल.

हे काही हि माहिती नाहीये.

हे बघ आई ..

अभिजित आणि अनुषा हे खूप दिवसा पासूनचे मित्र आहेत , सोशल कार्य करणाऱ्या एकाच ग्रुप मध्ये

मिळून काम करतांना यांची मैत्री झाली ..तेव्हा .

हा अभि..सागर देशमुख या मोठ्या माणसाचा मुलगा आहे हे तिला माहिती नव्हते ..पण..

अभि आणि अनुशात जेव्हा प्रेम झाले ..त्यावेळी ..अभिने तिला आपल्या फ्यामिली बद्दल सारे

सांगितले ..

तेव्हा ..अनुषा म्हणाली..

अभि..तुमच्या प्रेमालाय मधील जे प्रेम हरवून गेलाय , त्यातली माणसे दुरावली

आहेत ..त्या सर्वांना एकत्र आणायचे आहे मला .

ज्या दिवशी सागर देशमुख यांना पटेल की- प्रेमावीण व्यर्थ हे जीवन ..त्या दिवशी माझे कार्य सफल होईल.

त्यासाठी आपल्या प्रेमाचे नाते लपवून ठेवीत ..अनुषा तिचे एकेक प्लान करीत गेली ..

मला तर तिच्या या हेतूचे इतके कौतुक वाटले ..की ..ही मुलगी .स्वताच्या प्रेमा पेक्षा ..

आपल्याबद्दल इतक्या तळमळीने विचार करते ..या मागे ..

तिच्या अभिच्या घरात पुन्हा सुख ,आनंद आणि प्रेम यावे वाटणे ..आणि त्यासाठी तिचे हे करणे ..

आई-बाबा ..एक मुलगी आपल्या प्रेमापोटी इतके दिव्य करू शकते ..यावरूनच बघा ..

म्हणून आता -

अभिवर जीवापाड प्रेम करणारी अनुषा ..देशमुखांची सून म्हणून लवकर या घरात यावी ..

अशी इच्छा आणि माझी प्राथना ,विनंती आहे असे समजा ..

इतक्या दिवसात ..तुम्हाला अनुषा कशी आहे हे अनुभवण्यास मिळाले आहेच.

अनुशाने अभिला काय सांगितले आहे ते तर ऐका ..

अभी ..ज्या दिवशी ,सागर देशमुखांच्या प्रेमालाय मध्ये त्यांची सगळीजण जमतील ..

आणि स्वतहा सागर देशमुख ..मला बोलावतील ..तेव्हांच ..मी येईन..

मिसेस अनुषा अभिजित देशमुख नाव घेऊन.

सरिता आणि सागर देशमुख दोघांच्या चेहेर्यावर ..आश्चर्य ,आनंद आणि समाधान दिसत आहे

हे पाहून रंजना दीदी म्हणाली ..

बाबा ..आतच्या आत्ता ..अनुशाच्या आई-बाबांना इथे फोन करून बोलावते आहे मी..

ते आल्यावर तुम्ही ..दोघांनी ..

आपल्या अभिजितसाठी ..त्यांच्या अनुशाला मागणी घालयची आहे..

कराला ना बाबा एव्हढे .. तुमच्या जावईबापूंनी अभि-आणि अनुशा जोडीला त्यांची पसंती दिली

आहे..आशीर्वाद दिले आहेत.

देशमुखांनी दीदीला खुणावले..अनुशाच्या आई-बाबांना ..लगेच या असे सांगायला लावले.

***************

३.

अनुशाचे आजचे कॉलेज खूप उशिरा पर्यंत चालणार होते ..पुढच्या महिन्यात वार्षिक सोहोळा आहे ,

त्याची मिटिंग होणार संध्याकाळी ..आणि अनुशाचे हे फायनल इयर ..त्यांच्यासाठी तर हे लास्ट फंक्शन

तिच्या ग्रुपने सगळ्या इव्हेंट मध्ये भाग घायचा असे ठरवले .

आता महिनाभर फक्त धमाल आणि धमाल करण्याचे दिवस असणार होते..

मग या घाईत अभिजीतची भेट कशी व्हावी ? आणि देशमुखसर घरी गेल्यापासून अभि खूपच बिझी झाला होता ,

त्याचा स्वतःचा बिझिनेस त्यात आता घरचा व्याप मागे लागला होता.

अनुशाने देशमुखांच्या घरी जाण्याचे टाळले होते ..कारण तिचे प्रोजेक्ट सध्या तरी बंद होते ..

त्यामुळे काही कारण नसतांना ..जायचे म्हणजे .अनेक शंका सर्वांच्या मनात येणार ..

आता या पुढे कसे करायचे ..? अभिजित आणि आपल्या नात्याला अजून किती दिवस लपवून ठेवायचे ?

आणि देशमुख सरना प्रोजेक्टसाठी भेटणे ,ठरवणे ते पण करावे लागणार ..

आपल्या आई-बाबांना पण किती दिवस या गोष्टी समजू द्यायचा नाहीत.?.याचा विचार करावा लागणार आहे.

*********

४.

अनुशाच्या घरी ..दुपारची वेळ..म्हणजे तिच्या आई- बाबांच्या आरामाची वेळ ..आणि अशा वेळी

फोन रिंग वाजली ..बाबांनी .नाव वाचले ..

सागर देशमुख ..यांचा फोन ? असा अचानक ? पुन्हा काही त्रास झाला तर नसेल ना ?

बाबांनी फोन घेत म्हटले ..हेल्लो ..

पलीकडून आवाज आला ..

नमस्कार अनुशाचे बाबा ..मी ..रंजना ..सागर देशमुखांची मुलगी बोलते आहे .

अचानक फोन करण्याचे कारण तसे महत्वाचे आहे..तुम्ही दोघे आता दहा मिनिटात आमच्या घरी यावे .

बाबांच्या वतीने मी फोन करते आहे . बाबा अजून स्पष्टपणे बोलू शकत नाहीत ..त्रास होतो त्यांना .

अनुशाचे बाबा म्हणाले ..दीदी ..नो वरी ..आम्ही येतच आहोत .

अनुशाचे आई-बाबा दोघे ही हॉल मध्ये येऊन बसले ..बाबांनी ..देशमुख सरांच्या तब्येतीची चौकशी

केली..

दिदींनी तिच्या आईची आणि अनुशाच्या आईंची एकमेकींना ओळख करून दिली .

रंजनादीदी म्हणाली..

काका काकू .आता मी जे सांगणार आहे ..ती भावना सागर देशमुख यांची आहे..शब्द माझे आहेत .

आणि बाबांच्या या इच्छेत आम्ही सगळे मनापासून सहभागी आहोत.

अनुशाचे बाबा म्हणाले दीदी..तुम्ही सांगा तर खरे..

दीदी सांगू लागली..

आणि सुरुवातीला दीदीने ..त्यांना अनुषा आणि अभिजित यांच्या मैत्रीबद्दल आणि लव्ह-स्टोरी बद्दल

सांगितले ..आणि या प्रेमाच्या पूर्तीसाठी अनुषा करीत असलेल्या प्रय्ताना बद्दल मोठ्या कौतुकाने

सांगितले ..

आणि शेवटी हात जोडीत म्हंटले ..काका –काकू ..

आमच्या अभिजितसाठी ..या देशमुख परिवाराची सुनबाई होण्यासाठी आम्ही तुमच्या अनुशाला

मागणी “ घालीत आहोत . तुम्ही आम्हा सर्वांची ..ही इच्छा पूर्ण करावी.

अनुषच्या आई-बाबांना क्षणभर हे खरेच वाटेना ..

ते म्हणाले ..दीदी ..अनुशाच्या आनंदासाठी सर्वोतोपरी तयार असतो आणि असुत ..

अनुशाने तिच्यातील माणुसकीचे दर्शन आपल्या सर्वांना घडवले आहे.

प्रेम स्वार्थी नसते ..निस्वार्थी प्रेम भावना असणारी व्यक्ती हे असे काही करू शकते .

अनुशाच्या प्रेम-पुरती साठी तुमची इच्छा आणि विनंती आम्ही मनापासून मान्य करतो .

देशमुखांनी अनुशाच्या बाबांना आपल्या जवळ येऊन बसा असे खुणावले .

ते येऊन बसताच .देशमुखांनी अनुशाच्या बाबांना ..आनंदाने मिठीच मारली ..

************

५.

दिदींनी कॉलेजमध्ये फोन केला ..अनुषाने हेल्लो म्हटले ..

दीदी म्हणाल्या ..

अनुषा ..आता ३ वाजलेत , तू पाच वाजेपर्यंत आमच्या घरी ..ये प्रेमालाय मध्ये ..

कोलेजमधून थेट इकडेच ये . वाटल्यास निघतांना तुझ्या घरी सांग , तू महत्वाच्या कामाला

जाऊन मग घरी येईन.असे सांग .म्हणजे .तुझ्या आई-बाबांना पण काळजी वाटणार नाही

बाकी आता काही विचारू नकोस ..मी काही सांगू शकत नाही.

अनुषा धडधडत्या मनाने ..विचार करू लागली

..काय झाले असेल ? देशमुख सरांना काही सिरीयस त्रास तर झाला नसेल ना ?

दिदींनी सांगितले आहे म्हणजे ..जायलाच हवे ..साडेचारला निघू या.

दिदींनी ..बाहेरच्या ऑफिस मध्ये बसलेल्या ..अभिजितला बोलावून घेतले ..

आणि त्याच्या कानात काही सांगितले ..

अभिजित आश्चर्याने थक्कच झाला ..दीदी ..असे होईल ?

दीदी म्हणाल्या ..तू बघच ,मी काय काय करते आता ..

दिदींनी दुसरा फोन ..अभिजितच्या जीजूंना केला .आणि काय करायचे हे सांगितले ..

पलीकडून जीजू म्हणाले ..रंजना ..अजिबात काळजी नको करू ..सब हो जायेगा ..

तिसरा फोन दिदींनी .अविनाश जळगावकरना लावला ..आणि त्यांना काय घेऊन यायचे ते

सांगितले .

चारवाजता जीजू आणि आदित्य आले , त्यांनी कार मधून अनेक ब्याग काढल्या .

साडेचारला अविनाश जळगावकर आले ...त्यांच्या कारमध्ये ..दोन-चार व्यक्ती आलेल्या दिसल्या .

सगळे हॉल मध्ये बसले .. अविनाश जळगावकर काकांनी ..बाहेरच्या ऑफिसमधल्या स्टाफला

बोलवत काही सूचना दिल्या ,काम सांगितले .. आणि अभिजितला हॉलमध्ये बसण्यास सांगितले .

अनुशाचे आई-बाबां अभिजीतला पहिल्यांदाच पहात होते . अनुषा याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे”,

पण..कर्तबगार आहे अभिजित ..त्यांना आतापर्यंतच्या बोलण्यातून समजले होते .

अनुशाची आवड-निवड बेस्ट आहे” अशी कबुली ते स्वताच्या मनाला देत होते.

पाच वाजले ..दीदी आणि अभिजित अनुशाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते ..

अनुशाची बाईक थांबली ..

आज पहिल्यांदा ती सागर देशमुखांच्या “प्रेमालाय “ या बंगल्यात आली होती ..तो भव्य आणि

देखणा बंगला ..यातले प्रेम हरवून गेलाय ..तेच तर परत आणायचा खटाटोप आपण करीत आहोत ..

देशमुख सरांच्या आजाराने ..हे सगळं आता लांबणीवर पडले आहे ...

सिक्युरिटी एन्ट्री करतांना ..तिने पाहिले ..

बंगल्यात कमालीची शांतता आहे, लाईट नाही, प्रकश नाही ? काय विपरीत दिसतंय हे सगळ?

घरात कुणी नाही ? असे कसे होईल ? दीदींचा फोन आलाय , म्हणजे सगळे घरातच असायला पाहिजे .

बंगल्याच्या पायर्या चढून ती गेली ..तरी सगळा अंधारच .बाप रे ..काय झाले असेल आत नेमके ?

आणि त्याच वेळी बंगल्यातले सगळे लाईट एकदम लागले ..लक्ख उजेड ..

अनुशाला दिसले ..बंगल्याचे गेट फुलांनी सजवलेले आहे..दिदींनी आणि जीजूंनी दरवाज्यात येत तिचे

हसून स्वागत केले ..

भल्या मोठ्या हॉल मध्ये अनुषा आली ..बघते तो काय ..

खूप छान सजवलेल्या हॉलमध्ये .

अभिजित ..त्याचे आई बाबा , आणि त्यांच्या बाजूच्या खुर्च्यावार तिचे आई-बाबा बसलेले आहेत.

देश्मुकांचा स्टाफ , अविनाश अंकल आहेत , सगळ्यांनी ..टाळ्या वाजवीत ....अनुशाचे ..स्वागत ..केले ..

दिदींनी ..अभिजित आणि अनुशाला शेजारी उभे करीत म्हटले ..

ऐका सारे जण-

अविनाश जळगावकर काकांच्यासोबत आलेले मान्यवर पाहुणे ..मेरेज रजिस्ट्रार ऑफिसचे साहेब

आणि त्यांचे सहकारी आहेत .

रजिस्ट्रार साहेब आणि अभिचे जिजाजी खूप जुने मित्र आहेत ..आम्ही त्यांच्याकडे या नियोजित

विवाहाची कल्पना देऊन ठेवली होती ..तशी नोटीस आधीच दिली होती .. .

आता आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत . अभिजित आणि अनुषा यांचा नोंदणी –विवाह संपन्न

होतो आहे .

सगळ्यांनी अनुषा आणि अभिच्या झालेल्या लग्नाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

अनुशाला हे सगळे स्वप्नवत वाटत होते ..हे सगळ अशा पद्धतीने होईल ? कल्पना नव्हती केली.

सगळे सोपस्कार आटोपल्यावर ..देशमुखसरांनी अनुशाला जवळ बसवत एक मोठे ग्रीटिंग कार्ड

देत म्हटले ..बघ..मी बोलवले आहे तुला ..

अनुशाने ..कार्ड ओपन केले ..

डियर अनुषा .. प्रेमाविण व्यर्थ ही जीवन ..हे तू पटवून दिलेस मला ..थान्क्स.

आणि..

मिसेस अनुषा अभिजित देशमुख होऊन ..प्रेमालाय “ताब्यात घ्यावेस..

..सागर आणि सरिता देशमुख .

****************************

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

अंतिम भाग .(भाग-३२ )(समाप्त )

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रसिक हो .कादंबरी कशी वाटली अभिप्राय जरूर द्यावेत ,

नमस्कार ..भेटू लवकरच ..नव्यासाहित्य कृती सहित .

ले- अरुण वि.देशपांडे – पुणे.

९८५०१७७३४२

--------------------------------------------------------------------------------------------------------------------