Mi ti aani shimla - 3 in Marathi Fiction Stories by Ajay Shelke books and stories PDF | मी ती आणि शिमला - 3

Featured Books
Categories
Share

मी ती आणि शिमला - 3

आणि दरवाजावर टकटक झाली. दार उघडताच समोर घामाघूम झालेला वेटर आणि त्याच्या मागे बॅगा घेऊन केतन आणि मानसी. "सहाब निकालो याहासे रेड पढ़ी है नीचे. वो लोग यहां आने से पहले निकालो वरना बुरा फसोगे". मला काहीच समजत नव्हत पण रेड हा शब्द ऐकून मी तसा केतनला बोललो "स्वरा च सामान घे बाजूच्या खोलीतून" आणि आत येऊन स्वराली ला उठवायला आलो तशी ती माझ सामान भरताना बघून मी थांबलो की नक्की ही उठली की मला जास्त झाली? "अरे मंदा लॅपटॉप घे आणि चार्जर आणि बाथरूम मध्ये काही असेल तर घे" स्वराली मला ओरडून सांगत होती. "काही नाही तिथे. पण तू कधी उठली?" "अरे बाबा काय नको ते विचारतोय केतू आला का बघ माझ सामान घेऊन" तसा मी बाहेर च्या रूम मध्ये आलो की वेटर बोलला "साहब जल्दी करो बोहोत नीचे जाना है" आम्ही हॉटेलच्या २१व्या मजल्यावर होतो. केतन आला "चल रे झाल का तुमचं?". "हो झाल चल रे चल लवकर गाडी ची चावी घे आणि निघ" मागून स्वरा बोलली तसा मी निघालो. वेटर पुढे आम्ही त्याच्या मागे त्याने आम्हाला बाजूच्या बिल्डीग मध्ये पाठवलं आणि बोलला की "इधर से सीधा जाके बाए मुड़ो और लिफ्ट लेकर जाओ सीधा बाहर गाड़ी के लिए २०मिनट बाद फोन करो होटल में कोई तो गाड़ी लेकर आजाएगा पर होटल में रुको मत" तसे मी पळत सुटलो लिफ्टकडे खाली आलो तर बाजूला १६-१७ पोलिसांच्या गाड्या त्यात पोलिस काही आत पळत होते आम्ही गप्प पणे जात होतो जस आम्ही चेकाऊट करून जात आहोत बाहेर आलो आणि एका चहा वालयच्या इथे थांबलो सर्व जण पळून थकले होते एक एक चहा सांगितला आणि मी हॉटेलला फोन केला गाडी साठी कारण गाडी आत होती. "कोण छे?" पलीकडून आवाज आला "अरे मैने फोन किया था गाड़ी कब तक आयेगी पंचर हुआ कि नहीं?". "ए इधर क्या गैरेज है क्या? होटल है ये रख फोन" मी ओळखल होत की हा पोलिस आहे म्हणून पण नाटक कारण भाग होत."अरे मालूम है मुझे और ऐसा बात करते क्या तुम होटल वाले अपने कस्टमर्स से गाड़ी आप का आदमी पंचर किया ऊपर से मुझे ही आवाज" "ए भाई मै पुलिस हु और यहां आकर गाड़ी ले जा" "अरे साहब मैं अब आगे आया हु आप स्टाफ को दो ना फोन प्लीज़ मै बोहोत आगे आया हु अब यहां से मुझे जाना है मेरी फ्लाइट है" खूप वेळ विनवणी केल्यावर त्याने स्टाफ ल फोन दिला आणि बोलला की "मी येतो आहे पण एक पोलिस सोबत असेल आणि तो बघेल गाडी कोणाची आहे वगेरे" मी ok बोललो आणि केतन ला सांगीतल. आम्ही सर्व जण बाजूच्या टॅक्सी मागे लपून बसलो आणि १० मिनिटानंतर गाडी आली आणि २ हवालदार त्यांनी केतन ची ड्रिंक टेस्ट घेतली आणि जायला सांगितलं. पण आम्ही इथे होतो केतन पुढे गेला आणि थांबला पोलिस जाताच तो परत आला आणि आम्ही अजून एक एक चहा घेतला.
चाहावालला सर्व प्रकार विचारला "साहब शू करु छे ड्राय स्टेट होकर दारु बेचेगा तो पुलिस तो आयेगा ना" मग त्याने आम्हाला सर्व प्रकार सांगितलं की कसं पैसे देऊन दारू वगेरे विकली जाते. पण रात्री चे वाजले होते ४. सर्व जण कंटाळले होते त्यात प्रवास आणि रात्रीबेरात्री असली धावपळ आणि लफडी. रात्री हॉटेल भेटणार नव्हत आणि रेड ची बातमी धुरा सारखी बाहेर पसरली असणार म्हणून हॉटेल भेटणार पण नव्हत मग आम्ही विचार केला की रात्र गाडीत काढून उद्या इथेच थांबून उद्या रात्री निघायचं. मी आणि केतन बाहेर बसलो आणि ह्या दोघी गाडीत जाऊन बसल्या गाडीत पडदे असल्यामुळे फायदा झाला. पडदे लावून सीट लांब करून ह्या थोडा वेळ झोपल्या मी आणि केतन ने ह्या त्या गप्पा मारत आणि चहा सिगरेट सोबत रात्र काढली. माझी सर्व झोप उडाली होती आणि दारू पण आत्ता गुजरात बाहेर गेल्या शिवाय दारू नको अस मी ठरवल. सकाळी ६.३० ला स्वरा बाहेर आली "अरे हॉटेल बघणार कधी उद्या? बघू एक दम आणि काय रे गाडीत नाही यायचं का बाहेरच बसलात दोघे" आळस देत स्वारा बोलली. "हो मी बघीतल आहे ७.३० ला जाऊ आपण जवळच आहे आणि मी जाऊन झोपणार आहे २-३ पर्यंत आणि हो तिथे सेपरेट रूम नाही आहेत सो शेअरिंग करावं लागेल" केतन बोलला. "हो रे झोप तुम्ही मी तरी झोपली थोड आत्ता आणि रात्री पण हा माठ्या नाही झोपला. कधी आलास रे तू रात्री आणि काय तू आला तेव्हा हा प्रकार नव्हता का?" स्वराली मला विचारत होती. पण मी मात्र तिच्या ह्या रूपात हरवलो होतो. ते मोकळे केस, बिना मेकप ची स्वराली मेकअप वाल्या स्वराली पेक्षा सुंदर दिसत होती."अरे मूर्खा विचारते तुला ती काही" माझ्या डोक्यात टपली मारत केतन बोलला. मी भानावर आलो आणि बोललो "अग नाही मी लवकर आलो होतो पण झोप लागणार की हे सर्व झाल बर निघायचं का आपण?" मी विषय बदलत गाडी कडे जाऊ लागलो. तसे सर्व मागे बसले मानसी अजून झोपली होती. तिला न उठवताच गाडी हॉटेल मध्ये नेली आणि रूम मध्ये जाताना तिला उठवल पण ती रूम मध्ये गेली की झोपली आणि मी केतन आणि स्वरा दुसऱ्या रूम मध्ये येऊन बसलो. "मी काय बोलतो तू आणि स्वराली रूम शेअर करा कारण मला मानसी ला नंतर माझ एक काम आहे ऑफिस च ते करायला सांगून झोपणार आहे सो प्लीज". मला हळूच हात दाखवत केतन बोलला". मला त्याचा डाव समजला पण मी ही गप्प बसलो विचार केला की थोडा टाईम भेटेल स्वरा सोबत. त्याच न ऐकल्या सारखे मी केलं आणि स्वरा बोलली " मला काही प्रो्लेम नाही तुला आहे का रे माठ्या?" मी बस नाही मान हलवली आणि आत जाऊन बेड वर आडवा झालो.
मी पडलो तसा मी झोपलो डोळ्याला डोळा कधी लागला समजल च नाही मला. दुपारी २ च्या आसपास मला जाग आली आणि डोळ्यासमोर दिसलेलं चित्र पाहून मला तर अगदी वाटल की मी स्वप्नात आहे की काय? पण ते सत्य होत स्वरा माझ्याकडे एका अंगावर पडून पाहत होती. तसा मी मागे सरकलो आणि विचारल "काय ग अशी काय बघतेस? काही झाल का?". "किती प्रश्न विचारतोस रे तू". "काय रे माणसाने मनात असलेली गोष्ट सांगावी अस तूच म्हणतोस ना मग बोलत का नाही लपाऊन काय ठेवतोस?" स्वरा बोलली आणि माझा ठोका चुकला ह्याने हिला सांगितले की काय? हा प्रश्न मनात आला पण सारवासारव करत मी बोललो "काय ग कशाबद्दल बोलतेस मला समजेल अस बोल". "शब्दांची जाळ नको टाकुस". "हेच की तुझा एकटेपणा जो तू नेहमी सगळ्यांपासून नेहमी लपवत आलास तेच". "चल हा अस काही नाही तू उगीच तुझे तर्क नको लाऊस आणि बाकीचे कुटे आहेत जेऊन निघुयात का आजचा दिवस वायला गेला आहे आधीच". " बरं असो पण सांगत जा अस लपवत नको जाऊस निदान माझ्या समोर तरी घे आत्ता आवरून".
सर्व आवरून जेवण करून आम्ही संध्याकाळी ५ च्या सुमारास पुढच्या प्रवासाला सुरुवात केली हसत खेळात प्रवास सुरू झाला. केतन गाडी चालवत होता बाजूला मानसी होती नेहमी सारखी बडबड चालू होती तिची मागे मी आणि स्वरा मात्र अजूनही गप्प होतो. का कुणास ठाऊक पण अस पहिल्यांदा झालं होत आमच्यात अस की बोलत नव्हतो आम्ही. आज पूर्ण रात्र प्रवास करणार होतो कारण एकदिवस वाया गेला होता आणि अजून उशीर नको म्हणून. मध्ये जेवण्यासाठी थांबलो पण पुढे परत प्रवास चालू पण आत्ता मी पुढे गाडी चालवत होतो पण स्वरा आणि हे दोघे मागे होते केतन झोपला होता म्हणून शांतता होती. रात्री १ ला मी गाडी एका हायवे च्या बाजूला असणाऱ्या हॉटेल वर गाडी उभी केली तस केतन आणि स्वरा उठली जरा चहा वगेरे पिऊन परत गाडीत बसलो की केतन बोलला "थांब मी चालवतो तू रेस्ट कर". "हो तू ये मागे" केतन च बोलणं मध्येच थांबवत स्वराली बोलली. झालं मग तर काय केतन ऐकणार नव्हता. मी मागे आलो आणि झोपलो मानसीला मागे झोपवलं होत कारण ती हॉटेल मध्ये झोपली नव्हती. हवेत गारवा होता म्हणून गाडीच्या काचा उघड्याचं होत्या मी ही हवे मुळे थोडा ओळशवलो की दचकलो. पाहतो तर स्वरा मांडीवर डोकं ठेऊन झोपी जात होती. ते पाहून केतन ने ठसका काढला " तू गप्प गाडी चालावं मला झोप आली आहे आणि बसून नीट झोपता नाही येत आहे म्हणून आडवी झाली आहे" स्वरा ने तडकन केतनला उत्तर दिलं. मग काय झालं ती मांडीवर असल्यामुळे मी ही चुळबुळ न करता गप्प बसलो. थोड्या वेळाने तिनेच माझा हात घेतला आणि तिच्या कानावर ठेवला तस मी काचा वरती केल्या आणि मी ही मागे डोकं ठेऊन बसलो.
सकाळ होत होती उजेड सुद्धा पडायला लागला होता. आम्ही जवळ जवळ जयपूर आलो होतो. स्वरा अजून झोपली होती आणि मागे बघीतल तर मानसी माझ्याकडे कुत्सी नजरेने बघून हसत होती. समोर केतन सुद्धा थोड अजून पुढे जाऊन दुपार पर्यंत जयपूर थांबण्याच ठरलं होत तस एका हॉटेल मध्ये थांबलो....


क्रमशः