prem - veda - 6 in Marathi Love Stories by Akash Rewle books and stories PDF | प्रेम - वेडा भाग ६

Featured Books
Categories
Share

प्रेम - वेडा भाग ६







प्रेम वेडा (भाग ६)





अनिरुद्ध ने अंकिताची सर्व हकीकत ऐकली , त्याला त्याच्या सर्व गोष्टीची उत्तर मिळाली होती .

त्याने अंकिता ला काहीच म्हटले नाही . चेहऱ्यावर एक हास्य आणत तिला म्हणाला .

तय्यार हो आपण बाहेर जातोय !!!

कुठे ???

एक धक्का आहे तुझ्यासाठी !!!

धक्का म्हणजे ??? मला नाही समजल , स्पष्ट बोलाल का ?? अंकिता ला काहीच कळत नव्हत ..

" ते कळेल तुला , तय्यार होवून ये ! एक सरप्राईज आहे ." अनिरुद्ध वेगळ्याच हास्यात म्हणाला .

अंकिता तय्यार झाली ... अनिरुद्ध ने आईला सांगितले की येताना उशीर होईल . दोघे ही घराबाहेर पडले ..
अंकिता ला काहीच समजत नव्हतं की अनिरुद्ध च्या मनात काय चाललंय ते !!!

दोघांनी १४३ नंबर ची बस पकडली , ( नशिबाचा खेळ बघा बसचा नंबर सुद्धा १४३ आहे ) अनिरुद्ध ने कंडक्टर ला दोन ' प्रेम वेडा ' स्टॉप साठी तिकीट मागितले .

अंकिता अजुनच गोंधळली , तिला नवीन प्रश्न पडला की ' प्रेम - वेडा ' स्टॉप कुठे आहे ??

तिने अनिरुद्ध ला विचारले की , ' प्रेम - वेडा ' स्टॉप कुठे आल ??

" तुझ्यासाठी एक धक्का आहे !!! " अस बोलून अनिरुद्ध फक्त हसत होता .

अंकिता बसच्या खिडकीतून बाहेर बघत होती . तिला आजूबाजूचा परिसर ओळखीचा वाटत होता . ती चार वर्षांनी आज अशी बस मद्धे प्रवास करत होती .

शेवटी दोघे सिद्धार्थ नगर बस स्थानकाजवळ पोहचले .

सिद्धार्थ नगर बस स्थानक आज खूप वेगळ वाटत होत ... रोज एवढी गर्दी असलेल्या या स्थानकावर आज खूपच कमी गर्दी होती .
आजू बाजूला असलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर जणू वेगळीच नाराजी साफ दिसत होती .

अंकिता म्हणाली " अच्छा तर सिद्धार्थ नगर बस स्थानकाला " प्रेम - वेडा " स्टॉप म्हणतात . छान ..
काय आहे सरप्राईज ???

अनिरुद्ध आता गंभीर झाला होता !!! ...

तो इकडे - तिकडे काहीतरी शोधत होता पण बहुतेक त्याला जे हवं होत ते त्याला सापडल नसल्याने त्याच्या चेहऱ्यावर नाराजी साफ दिसू शकत होती .

तो बस स्थानकाच्या फेऱ्या मारू लागला तेवढ्यात त्याला जे हवं होत ते त्याला सापडल अस त्याच्या चेहऱ्यावरुन वाटत होत .

अंकिता सिद्धार्थ नगर बस स्थानकाजवळ आल्याने तिच्या नितीन विषयीच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या ...
ती त्याच्या विचारात हरवली होतीच तोवर
अनिरुद्ध ने अंकिता ला आवाज दिला , व त्याच्या जवळ यायला सांगितले .

अंकिता च्या मनात सामुद्रेच्या लाटे प्रमाणे एक एक नवीन प्रश्न येवू लागले होते . ती सपा सप पाऊले टाकत पुढे जाऊ लागली .

अंकिता त्याच्या जवळ आली ...

अनिरुद्ध ने रस्तावर बोट दाखवत म्हणाला बघ ...

अंकिता रस्त्यावर बघू लागली होती .
ओह ह ... कविता लीहली आहेस इथे ???
फक्त कविता दाखवण्यासाठी इथ पर्यंत आणलस ???

अंकिता ती कविता वाचू लागली होती ...

देवाकडे तुला मागतोय कारण देवावर विश्वास होत आहे
मोबदल्यात देवाला मी माझा श्वास देत आहे ...

तू येशील ना माझ्या आयुष्यात तोच श्वास बनून
मी वाट बघतोय शेवटची जगण्याची आस बनवून

तू नाही आलीस तरी वेड्यासारखा निर्जीव जगत राहीन
अन रोज नव्याने पुन्हा पुन्हा देवाकडे तुलाच मागत राहीन
अन रोज नव्याने पुन्हा पुन्हा देवाकडे तुलाच मागत राहीन "

आणि शेवटी लीहल होत " happy birthday Ankita "
कविता वाचताना तिला केत्तेकदा वाटत होत की ही कविता नितीन ने लिहली आहे . पण ते शक्य नव्हत !!!

शेवटी अनीरुद्धने तीला विचारले " कविता वाचून काही जाणवलं ?? "

" नाही काही नाही जाणवलं , तुम्ही ही कविता वाचण्यासाठी इथे घेवून आलात ?? कविता छान आहे "
आपल्या डोळ्यातले भाव अंकिता लपवत म्हणाली .

खरच काहीच नाही जाणवलं ??? बर तुला प्रश्न पडला होता ना की सिद्धार्थ नगर ला प्रेम वेडा स्टॉप च नाव का पडल ??

अंकिता - हो सांगा ना !!!

अनिरुद्ध मनावर दगड ठेवून सर्व हकीकत सांगत होता ...आज त्याला नितीन बद्दल जे जे माहिती होत ते ते तो तिला सांगू लागला होता !!

ते ऐकल्या नंतर अंकिता आतून तुटली होती . तिला अजून विश्वास बसत नव्हता की नितीन अजून तिची वाट बघतोय .!! तिने त्याच्या बद्दल किती वाईट विचार केले होते . पण खरं कळल्यानंतर तिला स्वतःवर राग येवू लागला होता . तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते ... अचानक ती म्हणाली नितीन कुठे आहे ???

तो याच बस स्थानकाजवळ असतो ना ! म अजून का नाही दिसला आपल्याला !!! रागाच्या भरात तिची चीड चीड होत होती .

अनिरुद्ध ही गोंधळला होता . तो बस स्थानकाजवळ पोहचल्या नंतर पासूनच नितीनला शोधू लागला होता पण नितीन त्याला कुठेच दिसला नाही !!!

आज इतक्या वर्षांनी तो तिच्या डोळ्यात पाणी बघत होता .

शेवटी तो व अंकिता आजू बाजूला असलेल्या माणसांना नितीन बद्दल विचारत होते ....

" इथे एक वेडा बसलेला असतो , आपण पाहिलत का त्याला ??? "

त्या व्यक्तीच्या वाक्याने अनिरुद्ध आणि अंकिता च्या पायाखालची जमीन सरकली होती , अंकिता अक्षरशा जमिनीवर बसली होती , जणू तिच्यात उभे राहण्याची ताकद सुद्धा राहिली नव्हती .

तो व्यक्ती म्हणाला - तो वेडा ना ... फार वाईट झालं !! त्याला घेवून सर्व TIM इस्पितळात गेले आहेत . एक व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवत होता व बघता बघता त्याची कार फूटपाथ वर चडली . दुर्दैवाने तो वेडा त्या फूटपाथ वर बसला होता , खूप भीषण अपघात झाला , मला नाही वाटत तो वेडा वाचेल ...किती रक्त गेलंय बघा , बघून तुम्हालाच अंदाज येईल !!!

अंकिता उठली त्या फूटपाथ वरील रक्ताला पाहिलं आणि तिने हंबरडा फोडला ...




---------- क्रमशः ----------


कथा कशी वाटली समीक्षे मद्धे नक्कीच कळवा !!!