To Spy - 4 in Marathi Detective stories by Prathmesh Kate books and stories PDF | To Spy - 4

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

To Spy - 4


नाश्ता होईपर्यंत कुणीच काही बोललं नाही. जेवतान निगेटिव्ह विषयांवर बिलकुल चर्चा करू नये, असा विराटचा आग्रह असायचा. जेवून झाल्यावर विराटच्या आई प्लेट्स घेऊन गेल्या. मग निधीने बोलायला सुरुवात केली.
"पपांच आमचे बिझनेस पार्टनर मिस्टर पंजवाणींसोबत मागच्या आठवड्यात खूप कडाक्याचं भांडण झाल होत. मला तर त्यांच्या वरच doubt येतोय."
"नाही निधी, बिझनेस पार्टनर्समध्ये भांडणं होतच राहतात. त्यात तेवढ्यावरून त्यांच्यावर 'असा' संशय घेणं चूकीचे आहे." विराट समजावणीच्या सूरात म्हणाला.
"नाही वीर, फक्त त्या भांडणामुळे माझा त्यांच्यावर संशय नाहीये. बिझनेस पार्टनर्समध्ये भांडणं होतात हे मलाही मान्यच आहे. पण पंजवाणीबद्दल माझं मत चांगल नाही. तो अत्यंत रागीट स्वभावाचा आहे. एकदा आमच्या ऑफिस मध्ये आला असताना चहामध्ये साखर कमी टाकली, म्हणून प्यूनच्या अंगावरच गरम चहा ओतला होता. पपांची कितीतरी वेळा भांडणात कॉलर पकडली होती. मागच्या वेळी तर वाद अगदी विकोपाला गेला होता. 'तुला सोडणार नाही, बरबाद करुन टाकेल.' अशी पपांना धमकी दिली होती. सर्व बिझनेसमन्स त्याच्यापासून दूरच राहतात. कुणी त्याच्याशी बिझनेस करत नाही. महत्त्वाचं म्हणजे त्याचे मोठमोठ्या डॉन, भाई वैगेरे लोकांशी संबंध आहेत असं ऐकून आहे. त्याच्या सारख्या माणसाला बोललेल खरं करायला वेळ लागणार नाही. म्हणूनच पपांना त्यानं धमकावल्यापासून मला भीती वाटते आहे."
"अच्छा ? मग संशयाला जागा आहे. पण मग अशा
माणसाशी पार्टनरशिप केलीच का देशमुखसाहेबांनी ?
"तेच तर मलाही कळत नाहीये. मी पंपांना बऱ्याच वेळा समजावून सांगितले की अशा माणसासोबत बिझनेस पार्टनरशीपच काय, कुठल्याच प्रकारचा संबंध नको ठेवायला. पण त्यावर पपा मलाच रागवायचे. मागच्या भांडणापासून तर पपा फारच टेन्शन मध्ये होते. कसल्यातरी दबावाखाली असल्यासारखे वाटत होते. इतरवेळी पंजवाणींसोबत झालेला वाद ते कधीच मनावर घेत नव्हते."
"नक्की तुमच्या कामावरूनच वाद झाले होते ना ?" करणने साशंकतेने विचारले.
"माहीत नाही, पपांना विचारलं तर त्यांनी नीट उत्तर दिले नाही. पण मला नाही वाटत ऑफिसच्या कामावरून काही असावं. का ते मलाही नाही सांगता येणार."
"बरं, अजून कुणावर संशय ?"
"नाही." निधीने उत्तर दिले. इतक्यात करणच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने मोबाईल काढून कानाला लावला.
"हॅलो."
"... .."
"काय ? कुठे ?" करणच्या आवाज किंचीत उत्तेजित झाला होता.
".. .. ...."
"अच्छा. ओके, बाय." करणने कॉल कट करून मोबाईल जागेवर ठेवला.
"काय रे, काय झालं ?" करणचा उत्साह पाहून विराटने विचारलं.
"अरे सॉरी, तुला सांगायचं राहिलं. काल देशमुख साहेबांबद्दल कळाल्यावर लगेच आमच्या इन्स्पेक्टर बेंद्रे मॅडमना त्यांच्या मोबाईलची शेवटची लोकेशन ट्रेस करायला सांगितली होती. त्यांचाच आता कॉल होता. शेवटची लोकेशन महाबळेश्वर मध्ये कुठल्याशा जंगलाजवळ आहे."
"महाबळेश्वर मध्ये?" निधी ने चमकून विचारलं.
हो, का ? काय झालं ?"
"तिकडे आमचा एक बंगला आहे. पपा अधूनमधून कामाच्या टेन्शन मधून रिलॅक्स होण्यासाठी तिकडे जात असतात."
"तिथे जवळपास जंगल आहे का ?"
"आठवत नाही. फार दिवसांनपूर्वी पपांसोबत महाबळेश्वरला गेले होते, तेव्हा त्या बंगल्याच्या जवळपास कुठेतरी फिरत असताना लांबूनच पपांनी दाखवला होता."
"दाखवला होता म्हणजे ? तु नाही गेलीस का कधी ?"
"नाही नं, बंगल्यात जाण दूरच, पपा ते सोबत असल्याशिवाय महाबळेश्वरलाच जाऊ देत नाहीत‌. मी बऱ्याचदा एकटीने अनेक ठिकाणी फिरले आहे. अगदी यू. एस, लंडन, स्वित्झर्लंडलाही कधी कामानिमित्त तर कधी नुसतीच फिरायला गेले आहे, पण महाबळेश्वरला माझ्या शिवाय जायचं नाही, अशी पपांनी ताकीदच देऊन ठेवली आहे. मी चोरून त्या बंगल्यात जाईल अशी त्यांना भीती वाटते की काय माहित नाही."
"दॅट्स स्ट्रेंज !" करण तोंडातल्या तोंडात पुटपुटला.
"वीर, करण मला खूप काळजी वाटतीये. पपा मला न सांगता महाबळेश्वरला गेले. त्या़चा मोबाईल स्वीच्ड ऑफ आहे. आणि मोबाईलची लोकेशन जंगलाच्या भागाजवळ. या सगळ्याचा काय अर्थ आहे."
"हे बघ निधी, त्यांना खरंच काही अर्जंट काम आलं असेल. आता त्यांनी सांगितले असते की तिकडे जायचयं, तर एवढ्या रात्री का जायचयं असं तू विचारलं असतस. एवढं सांगत बसायला वेळ नसेल. मोबाईल कदाचित कुठेतरी पडून खराब झाला असेल. आणि तुला आठवत नसेल पण तो बंगला जंगलाच्या भागाजवळ असेल." विराट तिला धीर देत म्हणाला. "बरं आमचे प्रश्न विचारून झाले आहेत, तु थोडावेळ जाऊन आईसोबत गप्पा मार."
त्या दोघांना केसबद्दल काहितरी चर्चा करायची असेल हे ओळखून निधी उठून बाहेर गेली.
ती जाताच करण म्हणाला...

क्रमशः