काही वेळात दोघेही सुखरूप घरी पोहोचले..शास्त्री कुटूंबाने समीरचे खूप खूप आभार मानले..
गौरीने ही काकूंना घट्ट मिठी मारली आणि काल घडलेला प्रसंग सांगितला आणि समीर आल्यामुळे तिला खूप धीर आला हे ही तिने सांगितले..
त्यानंतर गौरी आणि समीर दोघेही फ्रेश झाले आणि काकूंनी दोघांना जेवायला वाढले..
समीर जेवून त्याच्या घरी निघून गेला..गौरी पण आराम करायला तिच्या खोलीत आली..
पण तिला झोप कुठे लागत होती..सारखा कालचा आणि आजचा दिवस तिच्या डोळ्यासमोर येत होता..
इथे समीरची हालत काही वेगळी नव्हती..कालच्या प्रसंगामुळे त्याला इतकं तर नक्की कळलं होतं की, गौरीला त्याच्याबद्दल आकर्षण झालयं म्हणून..
पण याआधी ही खूप मुलींना समिरबद्दल अशी भावना वाटली होती..पण का कोणास ठाऊक त्याला गौरी या सगळ्यांपेक्षा वेगळी वाटत होती..
अर्थात, त्याचं प्रेम फक्त आर्यावर होतं..
पण आर्या तर अनिशवर प्रेम करत होती..
एव्हाना त्यांचे लग्न ही झालं असेल, असा विचार अचानक समीरच्या मनात आला..आणि त्याला खूप रडू आले..
त्याने कितीही विचार केला तरी आर्याला विसरणे त्याला या जन्मी शक्य नव्हते..म्हणून तर तो तिच्यापासून इतक्या लांब ह्या नवीन शहरात आला होता..
त्याला काहीवेळ गौरीचा विसर पडला आणि तो आर्याच्या आठवणींमध्ये हरवून गेला..
त्यामध्ये त्याला कधी झोप लागली हे त्याचे त्यालाच कळले नाही..
रात्री अचानक त्याचा फोन वाजल्यामुळे त्याला जाग आली..तो फोन वेदांतचा होता..समीरला जेवायला बोलावण्यासाठी केलेला..
समीरने उठून प्रथम लाइट्स लावल्या आणि त्याने घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे ९ वाजले होते..
तो पटकन फ्रेश झाला आणि थोड्या वेळातच शास्त्रींच्या घरी पोहोचला..जेवण उरकल्यावर तो परत त्याच्या घरी जाणार..
तेवढ्यात गौरीने त्याला थांबवले आणि त्याला तिच्या नवीन प्रोजेक्टमधल्या काही अडचणी सोडवून देण्याची विनंती केली..
खरं तर समीरने मनातल्या मनात गौरीपासून थोडं लांब राहण्याचा विचार केला होता..
पण का कोण जाणे..तिला नाही म्हणायचं सोडून..तो चक्क तिला मदत करायला तयार झाला..त्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं..
समिरबरोबर अजून काही वेळ घालवायला मिळेल ह्या विचारानेच गौरी खूप आनंदी झाली..त्याचबरोबर संधी मिळताच तिने समीरला तिच्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या असेही ठरविले..
ठरल्याप्रमाणे रोज तिच्या प्रोजेक्टचा जो काही रिपोर्ट असेल तो समीरला सांगून मग त्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्या समितीकडून सोडवून घ्यायच्या तिने ठरविले..
त्यामुळे तिला समीरची खूप मदत होणार होती..
प्रोजेक्टचं काम सुरळीत चाललं होतं..प्रोजेक्टमुळे रोज समिरचं आणि गौरीचं प्रत्यक्षात भेटणं होत होतं..
समीर फक्त कामाच्याच गोष्टी गौरीशी करत असे..पण गौरी योग्य संधीची वाट बघत होती..
म्हणतात ना, "अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात भी उसे तुमसे मिलाने की कोशिश मे लाग जाती है।।" गौरीला ती योग्य संधी मिळाली..
काका,काकू आणि वेदांत ३-४ दिवसांसाठी मुबंईला त्यांच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला जाणार होते..
गौरीला सुट्टी मिळणे कठीण होते म्हणून तिने घरी राहणे पसंद केले..
काकूंनी तिला सांभाळून राहा आणि रोज फोन कर अश्या सूचना दिल्या आणि त्यांनी समीरला ही गौरीकडे लक्ष द्यायला सांगितले..
तसेच तूही स्वतःची काळजी घे..हे समीरला सांगायला सुद्धा त्या विसरल्या नाहीत..
गौरी आज लवकर ऑफिसमधून घरी आली आणि तिने स्वतः जेवण बनवलं..ते पण समीरच्या आवडीचं!!
तिला इतक्या दिवसात तिच्या आईकडून समीरच्या काही आवडीनिवडी कळल्या होत्या..तिने छान टेबल सजविले आणि ती समीरच्या येण्याची वाट बघू लागली..
सुमती काकूंनी समीरला गौरीचा फोन नंबर देऊन ठेवला होता..कारण त्यांना माहीत होते की, त्याच्या अनुपस्थितीत समीर त्यांच्या घरी जाणे टाळेल म्हणून..
समीरला त्याची आठवण झाली आणि त्याने गौरीला फोन केला..
गौरीने फोन उचलला..समीरचा आवाज ऐकताच ती खूपच खुश झाली आणि समीरला म्हणाली, "कुठे आहेस तू? कधीपासून तुझी वाट बघतेय मी जेवायला..तू आधी घरी ये बघू..मग काय ते बोल" असे म्हणून तिने फोन ठेवून पण दिला..
मग काय समीरला घरी जाण्याशिवाय नाईलाज होता..त्याने शास्त्रींच्या घराची बेल वाजविली..गौरीने दरवाजा उघडला..
आज गौरी खूपच छान दिसत होती..तिने साधासा लाईट गुलाबी रंगाचा कुर्ता घातला होता..केस मोकळे सोडले होते..आणि त्यावर हलकासा मेकअप करून डायमंडची टिकली लावली होती आणि त्या पेहरावला साजेसे कानात झुमके घातले होते..
समीरला अचानक आर्याची आठवण झाली..त्याला जणू क्षणभर आर्याच समोर असल्याचा भास झाला..
गौरीने समीरचा हात पकडून त्याला घरात आणले..तिने खोलीभर मंद प्रकाश ठेवला होता व टेबलावर सगळीकडे मेणबत्या लावल्या होत्या..
सगळं वातावरण खूपच रोमँटिक दिसत होतं!!
समीर काही बोलणार..इतक्यात गौरीने त्याच्या तोंडावर बोट ठेवलं आणि अगदी फिल्मीस्टाइल समीरला प्रपोज केलं..
ती म्हणाली, "समीर तुला पहिल्यांदा पाहताक्षणीच मी तुझ्यावर आकर्षित झाले होते आणि हळूहळू कधी तुझ्या प्रेमात पडले हे कळलं देखील नाही..त्यादिवशी तूला ऑफिसमध्ये बघून मी इतकी खुश झाले की, तुला सांगू शकत नाही..मी खूप खूप प्रेम करते तुझ्यावर समीर..एक दिवसासाठी नाही, एक क्षणासाठी नाही तर आयुष्यभरासाठी मला तुझी साथ हवी आहे..माझ्याशी लग्न करशील??"
समीर तिच्याकडे पाहून मंद हसला आणि म्हणाला,"गौरी तू खूप चांगली मुलगी आहेस आणि मला ही तू खूप आवडतेस..का कोण जाणे तुझा सहवास मला हवाहवासा वाटतो..तुला काही होणे... मी सहनच करू शकत नाही..म्हणून त्यादिवशी तू संकटात असताना मी कसल्याही परिणामांचा विचार न करता तुझ्यापर्यंत पोहोचलो..तुला सुखरूप बघून माझ्या जिवात जीव आला होता..मी जितका तुझ्यापासून लांब जायला बघतो तितका मी तुझ्या जवळ येतो..पण तरीही मी तुझा स्वीकार नाही करू शकत कारण माझा भूतकाळ.."
असे म्हणून समीर मधेच थांबला..गौरी सगळं लक्ष देऊन ऐकत होती..
समीर थांबताच ती लगेच म्हणाली,"मला तो जाणून घेण्याची ही इच्छा नाही..पण मला तुझा वर्तमान आणि भविष्य व्हायचंय.."
तरीही समीरने गौरीला त्याच्या पूर्वआयुष्याविषयी सर्व काही सांगून टाकलं..त्याचे मुबंईहुन बेंगलोरला सेटल होण्याचं हेच तर कारण होत..
गौरी हे सगळं ऐकून स्तब्ध झाली..
तिला हे ऐकून खूप वाईट वाटलं की, आजपर्यंत जो समीर फक्त तिचा आहे असे तिला वाटत होते..तो दुसऱ्याच मुलीवर प्रेम करतो..
पण तिला हे ही कळून चुकले की, समीरचे प्रेम हे एकतर्फी होते..पण तिने समीरला ते जाणवू दिले नाही..
पण समीरला ही हे माहीत होते की, आर्या फक्त अनिशवर प्रेम करत होती..आर्याचं खरं प्रेम तर RJ अमेयच्या आवाजावर होते..
पण जेव्हा तिला कळले की, समीर हाच RJ अमेय आहे..तेव्हा ती दुःखी झाली..पण तिने हे स्वीकार केलं की, तिचं खरं प्रेम हे अनिशवरच आहे..
समीर मनात विचार करत होता की, आतापर्यंत तर आर्या आणि अनिशचे लग्न ही झाले असेल..पण तरीही आर्याला विसरणं या जन्मी तरी त्याला शक्य नव्हतं..
आणि आता गौरी...???? असा विचार करता करता तो गौरीकडे पाहू लागला..
गौरी त्याच्याकडेच बघत उभी होती..तिला समीरकडून उत्तर हवं होतं..ती त्याचीच वाट पाहत होती..
पण तिला जबरदस्तीने हे प्रेम जिंकायचं नव्हतं..कारण मग त्या प्रेमाला काहीच अर्थ राहिला नसता..
ती समीरजवळ गेली आणि तिने समीरचा हात तिच्या हातात घेतला आणि ती म्हणाली,"समीर मला माहीत आहे..पहिलं प्रेम प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचं असतं..आपण त्यासाठी आपलं सर्वस्व वाहून टाकतो..कसल्याही परिणामांचा विचार न करता आणि एक दिवस जेव्हा आपल्याला कळतं की, ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय त्याचं प्रेम दुसऱ्याच कोणा व्यक्तीवर आहे..तेव्हा ज्या वेदना होतात त्या शब्दांत नाही मांडता येत..कधीकाळी तू जिथे उभा होतास..तिथेच मी आज उभी आहे..मला जे वाटतंय..ज्या वेदना होताएत त्या फक्त तू आणि तूच समजू शकतोस..पण तरीही मी तुला जबरदस्ती करणार नाही..पण हा माझा विश्वास आहे की, एक ना एक दिवस तू माझ्या प्रेमाला नक्की समजशील..आणि मी त्या दिवसाची वाट पाहीन" असं बोलून गौरी तिच्या खोलीत निघून गेली..
मग तो ही त्याच्या घरी निघून गेला..रात्रभर त्याच्या मनात गौरीचे विचार येत होते..
आज पहिल्यांदा त्याला आर्याची अजिबात आठवण आली नाही..
त्याला गौरीशी झालेली त्याची पहिली भेट आणि त्यानंतर तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आठवू लागला..त्याला मनात खूप छान वाटत होते की, कोणतरी आहे जे त्याच्यावर त्याच्यापेक्षा ही जास्त प्रेम करते..
पण आज त्याने गौरीचं मन दुखवलं होतं..याचं त्याला खूप वाईट वाटलं आणि त्याने मनाशी निश्चय केला की, उद्याच तो गौरीला तिच्याबद्दलच्या त्याच्या मनातील भावना सांगेल व तो सकाळ होण्याची वाट पाहू लागला..
सकाळी लवकर उठून त्याने शास्त्रींच्या घराची बेल वाजवली..
पण २-३ वेला वाजवून ही गौरीने दरवाजा उघडला नाही..मग त्याने तिला फोन करायचे ठरविले..तर तिचा फोन बंद होता..
समीर खूप काळजीत पडला..त्याच्या मनात नको नको ते संशय यायला लागले. म्हणून त्याने पुन्हा एकदा दारावरची बेल वाजवली आणि गौरीला फोन सुद्धा केला..पण पुन्हा तेच झालं..
आता मात्र त्याला खात्री झाली की, गौरीने स्वतःच्या जीवाचं बरंवाईट तर केलं नसेल..म्हणून त्याने दरवाजाला हिसका दिला..पण ते उघडणं त्याला शक्य होईना..
मग त्याने चावीवाल्याला बोलवायचं ठरविले..पण जर वॉचमनला सांगितलं तर तो उगीच बिल्डिंगमध्ये हाहाकार करेल..म्हणून तो स्वतःच खाली गेला आणि चावीवाल्याला घेऊन आला..
चावीवाला दरवाजा उघडेपर्यंत समीर गौरीला फोन लावत होता..पण समोरून अजूनही फोन बंद होता..
काही वेळानंतर शास्त्रींच्या घरचा दरवाजा उघडला..तसं समीर घाईघाईत आत गेला आणि सगळीकडे गौरीला शोधू लागला..पण आश्चर्य!!
घरात कुणीच नव्हते..गौरीचा फोन डायनींग टेबलवर होता आणि तो खरच बंद होता..
समीर विचारात पडला की, गौरी कुठे आहे? इतक्यात चावीवाल्याचा आवाज आला..त्या आवाजाने समीर भानावर आला व त्याने त्याचे पैसे दिले आणि तो चावीवाला निघून गेला..
समीर परत सर्व घरात गौरीला शोधू लागला..इतक्यात गौरी घरी आली आणि तिने लिफ्टकडे चावीवाल्याला पाहिले होते..हा कोण माणूस हा ती विचार करतच होती, इतक्यात तिला तिच्या घराचा दरवाजा सताड उघडा दिसला..
गौरी घाबरली आणि तिने तिच्या हातातलं सामान दरवाज्यातच टाकलं व ती धावतच घरात गेली..
तर आत समीर होता..समीरचे ही लक्ष गौरीकडे गेले..
गौरीला पाहताच तो खूप खुश झाला..त्याने लगेच तिला घट्ट मिठी मारली..
गौरीला काहीच कळतं नव्हते की, काय चालययं ते..ती शांत उभी होती..
क्रमश:
(ही कथा आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा..)
©preetisawantdalvi