Shree Datt Avtar - 16 in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | श्री दत्त अवतार भाग १६

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 70

    નિતુ માટે જન્મેલ નવીનનું નાનકડું આકર્ષણ દિવસેને દિવસે પ્રબળ...

  • દાદા ભિષ્મ

    પૌરાણિક દ્રષ્ટાંત કથા –                      પિતામહ ભીષ્મની...

  • અધુરો પ્રેમ

    જિગ્નાસુ ખુબ જ સરળ અને શાંત છોકરી.... પરીવાર મા વડિલ અને નાન...

  • વહુના આંસુ

    સવીતા રસોડામાં રસોઈ કરતી હોય છે,  ત્યાં જ છાંયા બહેન જોરથી ચ...

  • ભાગવત રહસ્ય - 164

    ભાગવત રહસ્ય-૧૬૪   પિતાજી નામદેવને કહે છે- કે “સવારે વહેલા જા...

Categories
Share

श्री दत्त अवतार भाग १६

श्री दत्त अवतार भाग १६

पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण मुदच्यते || पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव शिष्यते ||'

याचा अर्थ असा आहे की पूर्णातुन पूर्ण काढल तरी तिथे पूर्णच शिल्लक उरते .

काहीच नसलेल्या या 'शून्य' शब्दाची कीमत महाप्रचंड आहे.
या शुन्याने कशालाही गुणले किंवा भागले असता उत्तर शून्यच येते किंवा जे येते ते सांगता येत नाही.
हेच तत्व उपनिषदांनी 'पूर्णमदः' वाक्याद्वारे सांगितल आहे.
हेच शून्य इतर कोणत्याही संख्येपुढे ठेवले, तर त्याची किंमत दहापट वाढते.
याचाच गुढ़ार्थ असा की, तुम्ही किती होता, त्यावर अत्रिनंदनाच्या अनुग्रहाचा परिणाम ठरतो. म्हणजेच सदगुरूतत्वाने अनुग्रह केल्यानंतर, भक्ताची किंमत किती वाढेल हे त्या भक्तावरच अवलंबून आहे.
कमतरतेचा दोष हा सदगुरूतत्वाचा नसतो. भक्त जर १०० बनला नाही,तर सदगुरू त्याला १००० बनवु शकणार नाही आणि तो जर एकच राहिला तर फक्त १०च बनु शकेल.

याच्याही पलीकडे गणितातील एक सिद्धान्त आहे, तो म्हणजे शून्यामध्ये असंख्य राहतात. याप्रमाणे शून्य स्वतः काही नसतानासुद्धा अनन्त शक्तीच् सामर्थ्य ठेवतो.
जसा हा गणितातला पूर्ण तसाच आत्रेय हा अध्यात्मातला पूर्ण. 'पूर्णराते' इतका समर्पक शब्द सदगुरूतत्वासाठी दूसरा नाहीच. देणारा हा पूर्ण असल्याने अगणित पटीत देतो आहे, घ्यायचे किती हे घेणार्याच्या कुवती वरच अवलंबून आहे. या पूर्ण नावाच्या शून्याचा उपयोग कसा करायचा, हे ज्याने त्याने ठरवायचे. या शून्याचा उपयोग करण्याच् कौशल्य म्हणजे पूर्ण विश्वासासह पूर्ण शरणागती. आपण घोरकष्टोद्धरण स्तोत्रामध्ये "पूर्णराते" हा शब्द म्हणतो.

श्री दत्तावतार हजारो वर्षापासून पूज्य आहे .

'दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा' या श्री दत्तात्रेयांच्या महामंत्राचा गर्भितार्थ

या मंत्रामध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी- त्याचे अनुसंधान. मी देह नाही. मी आहे आत्मा.तो आत्मा म्हणजे शुद्ध अहम्. तो साक्षी आहे. निर्विकार आहे.
आनंदरूप आहे.
पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहम् ला हाक मारली आहे.

दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रम्हाचे अनुसंधान केले आहे. आपल्या भोवती जे सर्व विश्व दिसते आहे ते केवळ भासमान आहे. वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे, परब्रम्हच आहे. परब्रम्हानेच ही अनेक भासणारी रुपे धारण केली आहेत. त्या परब्रम्हाला दुसऱ्या दिगंबरा शब्दाने हाक मारली आहे.

श्रीपादवल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपादवल्लभांना हाक मारली आहे. श्रीपादवल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहेत. ते भगवंताचेच अवतार आहेत. त्यांना संबोधन केले आहे.

चौथ्या दिगंबरा या शब्दाने प्रार्थना केली आहे.माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा. मला लवकर आपल्या जवळ घ्या .
आपले स्वरुप मला प्राप्त होऊ दया. मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे.
तो भ्रम नाहीसा करा.
“अहं ब्रम्हास्मि” हा अनुभव मला येऊ दया. आपल्या सारखी दिगंबर स्थिति मलाही दया. अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा शब्दात आहे.

श्री दत्तात्रेयांचे चोवीस गुरू - यदुअवधूत संवाद

भगवान श्रीकृष्ण ह्यांनी आपले अवतारकार्य संपविण्याचा मानस उद्धवाला सांगितला व त्यावर उद्धवाने मला ज्ञान सांगावे अशी विनंती केली.
तेव्हा माझा पूर्वज यदू याला अवधूतरूपात श्रीदत्तात्रेयाने मी २४ गुरूंपासून घेतले ते ज्ञान तुला सांगतो असे म्हणत हे ज्ञान सांगितले. त्या त्या गुरूचे गुण व त्यापासून घेतलेला बोध हे सर्व उद्धवाला सांगितले.

सदर उपदेशाचा श्रीमद्भागवत पुराणात अकराव्या स्कंधात अध्याय सात ते नऊमध्ये उल्लेख आलेला आहे.
प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज रचित दत्तमहात्म्यातही याचा उल्लेख आढळतो.
‘जो जो म्या जयाचा घेतला गुण तो तो म्या तया गुरू केला जाण’
याप्रमाणे व्यक्ती, वस्तु, पंचमहाभुते, प्राणी, पक्षी यासर्वांकडून श्रीदत्तगुरूंनी गुण ग्रहण करून त्यांना गुरू केले.
सर्वच गोष्टी भक्तांना अभ्यास करण्याजोग्या आहेत.

१) पृथ्वी

पृथ्वीपासून सहनशीलता हा गुण घेण्यासारखा आहे. कारण पृथ्वी सर्व प्राणिमात्रांचे आश्रय स्थान असून कितीही आघात झाले तरी मातेप्रमाणे त्या सर्वांचा सांभाळ करते.
खोदणे, नांगरणे, कचरा, घाण यांसारखे आघात साहून सर्व प्राणिमात्र व वृक्षसंपत्ती यांचे पोषण करते.

पृथ्वीचेच अंग वृक्ष हे परोपकारासाठी प्रसिद्ध आहेत. मुळापासून शेंड्यापर्यंत फळे, फुले देऊन सर्वांना सुखी करतात. ते वाळून गेल्यावरही त्याचा उपयोग होतो.
परोपकाराय तिष्ठंति वृक्षा: । परोपकाराय इदं शरीरम् ।
त्याप्रमाणे मनुष्याने आपल्या देहाचा परोपकारासाठी उपयोग करावा.

पृथ्वीचा अंग असलेले पर्वत हे परोपकारासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्यामध्ये असलेल्या सर्व खनिज संपत्तीचा उपयोग परोपकारार्थच करतात. त्याचप्रमाणे साधु-संन्यासी यांना आश्रय देतात.
याप्रमाणे मनुष्यानेही संग्रही असलेल्या विद्येचा परोपकारासाठी उपयोग करावा.

२) वायू

वायू दोन प्रकारचे असतात .
शरीरातील प्राणवायूमुळे मनुष्याचे जीवन चालते.
म्हणून आहार प्राणवायू चालण्यापुरताच घ्यावा.
दुसरा वायू बाहेरचा. हा कुठेही आसक्त होत नाही. सुगंध दुर्गंध (पृथ्वीचा गुण) दूर करून पवित्र होऊन राहतो, म्हणून संतोष, पवित्रता व अनासक्ती हे गुण वायूपासून घ्यावे.

३) आकाश
आकाश सर्वत्र पसरलेले आहे.
याची मर्यादा आजपर्यंत कळली नाही. ही चराचर सृष्टी आकाशात राहते. त्याचप्रमाणे आत्माही सर्वव्यापक आहे. शरीरे भिन्न असली तरी देहामध्ये वास करणारा किंवा बाहेर असलेला आत्मा एकच अखंड स्वरूपाचा आहे. या सृष्टीत कितीही बदल झाले तरी आकाश निर्विकार राहते.

४) जल (उदक)

जलावरच सर्व जीवन अवलंबून आहे. जल स्वभावत: स्वच्छ, पवित्र, मधुर व समसमान असते. त्याचप्रमाणे सर्वांशी आपले संबंध मधुरपणे ठेवावे, कुणाच्याही दोषाकडे लक्ष ठेवू नये. जलाप्रमणे शिक्षण घेऊन वर्तन करणाऱ्या मनुष्याच्या दर्शनाने सर्वांना पवित्रता येते.

५) अग्नी

अग्नीला आकार नाही. जळणाऱ्या वस्तूचा आकार त्याला येतो. पूर्णपणे वस्तू जळल्यावर तो गुप्त होतो. कोणत्याही वस्तूचा संग्रह तो करीत नाही. त्याचा तेजस्वीपणा प्रख्यात आहे. अग्नीच्या ज्वाला क्षणभंगूर आहेत. तसेच मनुष्याचे जीवनही क्षणभंगूर आहे. आपण जिवंत असेपर्यंत ह्या देहाचा सदुपयोग मोक्षप्राप्ती करता करून घ्यावा..

६) चंद्र

चंद्रावरील कला वाढत असतात. पौर्णिमेला पूर्णचंद्र दिसतो. पुढे कला कमी कमी होऊन अमावस्येला पूर्णपणे दिसेनासा होतो. हे सर्व सूर्याच्या प्रकाशातील भागामुळे होते. चंद्र जसाचा तसाच असतो. त्याप्रमाणे शरीरावर बालपणापासून मृत्यूपर्यंत भिन्न भिन्न अवस्था येतात. पण ही फक्त शरीरावस्था असते. आत्मा हा जसाचा तसाच असतो.

७) सूर्य

सूर्य समुद्रातील पाण्याची वाफ करून यथायोग्य काळी वर्षा करून सर्व वृक्ष, प्राणी व मनुष्य यांना सुखी करतो. त्याचप्रमाणे मनुष्याने परोपकार बुद्धीने कर्म करावे. पण त्यात आसक्त होऊ नये.

८) कपोत पक्षी (कबुतर)

कपोत पक्षी व कपोतीण एका घरट्यात प्रेमाने व आनंदात राहत होते. पुढे त्यांना पिल्ले होऊन त्यांना पंख फुटल्यावर ती बाहेर जाऊ लागली पण ती एकदा पारध्याच्या जाळ्यात अडकली. त्यांना सोडवायला गेलेली कपोती तीही अडकली. पुढे कपोतही अडकला. याप्रमाणे सर्वच जाळ्यात सापडले.
या कथेसारखे मनुष्याने केवळ आपल्या कुटुंबातच मग्न होऊ नये. हे शरीर मोक्षद्वार असल्यामुळे योग्यवेळी संसाराचा मोहत्याग करावा.

९) अजगर

आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानुसार घडत असतात. निर्वाहाकरिता कधी मिळेल, कधी मिळणार नाही अशा अवस्थेत अजगराप्रमाणे निश्चिंतपणे आपला जीवनयोग करीत राहावे.

क्रमशः