2. कोरोना व्हायरस;लोभ टाळा
लालच बुरी बला सगळेच म्हणतात. मानतातही. पण कोणीही लोभ सोडलेला नाही. सगळीच माणसं लोभ करीत असतात. त्यातच गडगंज संपत्ती गोळा करीत असतात. प्रसंगी या लोभापायी एकमेकांचे मुदडेही पाडत असतात.
सर्वांना माहित अाहे की लालच बुरी बला आहे. तरीही आम्ही लोभ का करतो? ते आम्हाला कळत नाही. कळणारही नाही. ते का बरे कळत नाही हे समजायला कारण नाही.
संत सांगून गेले की लालच बुरी बला आहे. तरीही आम्ही लालच करतो आणि आपला विनाश करुन घेतो. एवढंच नाही तर महाभारतातही लोभाचा परीणाम दाखवलेलाच आहे.
पांडवांनी फक्त पाच गावं मागितली होती. पण सुईच्या टोकावरही मावेल एवढीही जागा मी पांडवांना देणार नाही. असं म्हणणा-या नव्हे तर लोभ करणा-या दुर्योधनाला धडा शिकवून त्या दुर्योधनालाच पराभू्त केलं नाही. तर संपूर्ण राज्याचं नुकसान झालं. म्हणून अति लोभ बरा नाही.
आजही कर्ण मरण पावला जरी असला तरी कर्ण अजरामर आहे. कारण त्या कर्णानं आपलं कवचकुंडल दान केलं. हा इतिहास आहे.
आज आपण पाहतो की निव्वळ सगळी माणसं लोभ करीत असतात. लोभानं हानीही होते तरी लोभ. त्यातच मरण सत्य आणि अटळ आहे हे आपल्याला माहित आहे. तरीही आपण लोभ करीत असतो. माणसं मरणाच्या दारात असतात, तरी लोभ सुटत नाही. त्यातच इंच इंच जागेसाठी भांडण करतात. मेल्यावर मिळणार नाही हे माहित असूनही भांडण. महाभारतात प्रसंगी युद्ध झालं. पण पाच गावं दिली नाही. हाच लोभ. मेल्यावर एक अंगावरचा पोशाख व शाल शिवाय काहीच मिळत नाही. सोनं टाकतात तोंडात पण किती...... तुकडा. जी मालमत्ता आम्ही गोळा करतो. ज्या मालमत्तेसाठी आम्ही एवढा लोभ करतो. तो लोभ असा म्हणत नाही की बापू तुला जगायला मी दोन वर्ष जास्त देतो. कारण तू जी मालमत्ता गोळा केली. ती मालमत्ता तू उपभोगलेली नाही.
अलिकडे माणसात एवढा स्वार्थ वाढला आहे की माणूस या ना त्या कारणाने मालमत्ता गोळा करीत आहे. त्यासाठी भ्रष्टाचार करीत आहे त्यासाठी भांडण काेर्ट कचे-या. त्याला माहित असते की मी ज्याच्यासाठी एवढं करतो. तो मुलगा उद्या या मालमत्तेचा वापर कसा करेल.
आम्ही मोठ्या मेहनतीनं या ना त्या कारणानं पैसा गोळा करतो. पण ती मालमत्ता उपभोगणारी आमची मुलं तर चांगली निघायला हवी ना. जर ती मुलं आम्हाला वृध्दाश्रमात टाकत असेल तर त्या मालमत्ता जमविण्याचा फायदा कोणता?एका माणसाची गोष्ट सांगतो.
एक व्यक्ती असा होता की ज्याला घर बांधायचे होते. त्यासाठी त्याला पैसा हवा होता. पैसा मिळेल कोठून?तो विचार करीत असतांना त्याला सहज आठवलं की गावाकडं जमीन आहे. गावची जमीन विकावी व पैसा आणून घर बांधावं. तो गावाला गेला.
हा व्यक्ती मायबापाची सेवा करीत नव्हता. कारण पत्नी बरोबर नव्हती. तिला सासूसास-याबद्दल प्रेम नव्हते. पण घर तर बांधायचेच होते. कसे करावे?तो विचार करु लागला.
असाच विचार करीत असतांना तो गावाला गेला. पण तो गावाला गेला खरा, मायबापानं सांगितलं. आमची सेवा कर. आम्ही मरण पावल्यानंतरच तुला शेती विकायला मिळेल. त्या मुलाला वाईट वाटलं. तो आल्यापावली परत गेला.
तो परत येताच त्याच्या पत्नीला राग आला. पत्नीनं वकीलाचा सल्ला घ्यायला लावले. त्यानं वकीलाचा सल्ला घेतला. वकीलानं खटला टाकायला लावला.
मुलगाच तो...... मुर्ख मुलगा. त्यानं पत्नीचं ऐकून व वकीलाच्या सल्ल्यानं मायबापावर खटला भरला. कोर्टाची केस सुरु झाली. त्यातच तारखावर तारखा पडू लागल्या. न्यायालयालाही निकाल कसा द्यावा याचा विचार येवू लागला. त्यातच न्यायालयानं निकाल दिला. त्या शेतीचे अर्धे अर्धे तुकडे करावेत. अर्धा मायबापाचा व अर्धा पोराचा.
शेतीची वाटणी केली गेली. जी शेती मायबापानं काबाडकष्ट करुन घेतली होती. आपल्या म्हातारपणाची शिदोरी म्हणून. ती शिदोरी आज विभाजीत झाली होती.
मायबापाचं थकतं वय. म्हातारपणी सेवा करायला मुलगा नाही. त्यातच हाय खावून मायबाप मरण पावले.
आता काय पोरासमोर रान मोकळे झाले होते. मुलानं लागलीच संपुर्ण शेती विकली आणि त्यानं घर बांधायला पैसे आणले. घर बांधण्यासाठी बाहेर झोपडं टाकण्यात आलं. घर तयार झालं. आता फक्त घरात गृहप्रवेशच बाकी होता.
गृहप्रवेश बाकी होता. अशातच त्या गृहस्थाचा अपघात झाला. उपचार करता येत होता. पण पैसा खर्च होईल म्हणून घरच्या लोकांनी त्याचा उपचार केला नाही. त्यातच तो गृहस्थ मरण पावला.
प्रेत...... प्रेत रुग्णालयातून घरी आणले गेले. कोणी म्हणत होते. ते प्रेत नवीन घरी ठेवायला हवं. पण घरच्यांनी म्हटलं की नको. कारण गृहप्रवेश व्हायचा आहे. होमहवन, शांती व्हायची आहे. प्रेत त्याच रस्त्यावर बांधलेल्या तुटक्या झोपड्यात ठेवण्यात आलं. तिथूनच त्याची मैयत आटोपवण्यात आली. ज्या घर बांधण्यासाठी लोभ करुन ज्या माणसानं प्रसंगी मायबापासोबत खटला लढला. काय मिळालं त्याला? तर रस्ता. रस्त्यावरचा अपघात अन् रस्त्यावरुनच पलायन. साधं घर त्या प्रेताच्याही नशीबात नव्हतं आणि ते गृहशांतीत अडकलं होतं.
अलिकडे कोरोना असाच आहे. कितीही लोभ करुन पैसा मिळविलेला असला, तरी हा कोरोना त्याला सोडत नाही. तसेच ज्याच्याकडे काही नाही, त्यालाही कोरोना सोडत नाही. शिवाय कितीही पैसा असेल तरी त्याची मैयत ही जास्त लोकांच्या साक्षीनं होत नाही. मैयतीला केवळ पाचच लोकं असतात. मुलगा असेलच अशी शाश्वती नाही. शिवाय ती मैयत घरच्या लोकांना मिळेलच असं नाही. कारण जी माणसं आज कोरोनानं मरत आहेत. त्यांच्या प्रेताची विल्हेवाट रुग्णालयातीलच कर्मचारी करीत आहेत. ते प्रेत घरच्यांना मिळत नाही. मग काय फायदा एवढ्या मोठ्या मालमत्तेचा की जी मालमत्ता आपल्या कामात येत नाही.
आम्ही भ्रष्टाचार करुन एवढी प्रचंड मालमत्ता गोळा करतो. ती मालमत्ता जर आमच्या कामात येत नसेल तर त्या मालमत्तेचा आम्हाला उपयोग कोणता? त्यापेक्षा आमच्याकडे मालमत्ता नसलेली बरी कोरोना आला. विदेशी प्रवाशांकडून आला. विदेशात कोण जातो?साधारण माणूस जात नाही, तर श्रीमंत. तो अजून गरीबांच्या झोपडीत पोहोचायचा आहे. तेव्हा माझे एवढेच सांगणे आहे की कोरोनाकडून हेच शिका. लोभ सोडा, मालमत्ता जोडू नका. भ्रष्टाचार करु नका. सन्मानानं वागा. सन्मानानं वागवा. कारण अजूनही वेळ गेलेली नाही. उद्याचा दिवस कसा निघेल हे काही सांगता येत नाही. स्वच्छ राहा. हातपाय धुवा तसंच मनही स्वच्छ पाहिजे.