kadambari Premaavin vyarth he jivan Part 31 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 31 वा

Featured Books
Categories
Share

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 31 वा

-----------------------------------------------------------------------

१. कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

भाग-३१ वा

--------------------------------------------------------------

देशमुख सरांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळून आता १५ दिवस झाले होते , घरी आल्यावर

त्यांच्या तब्येततीत झपाट्याने होणारी सुधारणा पाहून सगळ्यांना हायसे वाटत होते.

अभिजितचे टेन्शन आता खूपच कमी झाले होते ..त्याचे आणखी एक कारण होते ..

हॉस्पिटल सोडण्याचे त्यादिवशीची सकाळ अभिजीतला आता ही आठवत होती...

अनुशाने या दिवशी केलेल्या एक गोष्टीची .. जादू सगळ्या देशमुख परीवारावर झाली होती .

त्यादिवशी नेहमीप्रमाणे डॉक्टरकाका सकाळच्या राऊंडला आले होते. आल्या आल्या ते म्हणाले ..

देशमुखसर - काल केलेल्या तुमच्या सगळ्या टेस्टचे रिपोर्ट्स एकदम समाधानकारक आलेले आहेत .

मोठ्या संकटातून साहिसलामत सुटून इथून बाहेर पडणारे तुम्ही एक सुदैवी व्यक्ती आहात .

तुमची जबरदस्त विल पॉवर आणि आजची अत्याधुनिक उपचार पद्धती आणि औषध-गोळ्या “या सगळ्यांची ही कामगिरी आहे .

गुड लक सर .घरी जाऊन छान सेटल व्हा , रिकव्हर व्हवा . आणि मला चहाला बोलवा ..नक्की येईन मी .

देशमुखसरांनी ..आपल्या डॉक्टरमित्राचा हात हातात घेऊन ,स्वतःच्या कपाळाला लावला .

त्यांना म्हण्याचे असावे -मित्रा ..जीवनदान दिलेस तू....खूप खूप थान्क्स .

डॉक्टर नंतर अभिजीतला म्हणाले –

अभिजित संध्याकाळी तुम्ही तुमच्या बाबांना घरी घेऊन जाऊ शकता . त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत .

तुम्ही तयारीला लागा ..इथले चार्जेस आणि बिलिंग आणि इतर सोपस्कार करण्यात तुमचा बराच वेळ जाणार आहे .

आणि हो ..तुम्ही स्वतःच्या गाडीत सुद्धा देशमुख सरांना घरी घेऊन जाऊ शकता . आता ते क्रिटीकल वगरे असे पेशंट मुळीच नाहीत .

अभिजितने डॉक्टरअंकलचे आभार मानले . सरिताने सुद्धा आभार मानले .

नेहमीप्रमाणे कॉलेज संपवून दुपारी अनुषा हॉस्पिटलला आली. रूम मध्ये आल्यावर तिला दिसले ..

अरेच्च्या ..इथे तर देशमुख सरांना घरी घेऊन जाणायची तयारी सुरु झाली आहे.

ज्या दिवशी डिस्चार्ज मिळणार ..त्या दिवशी काय आणि कसे करायचे याचा प्लान अनुशाच्या डोक्यात तयार होता.

अभिजीतला ती म्हणाली –

अभि ..आता एक कर ..आता आपण जे करणार आहोत ..ते अतिशय महत्वाची sentimental मूव्ह आहे ..

अभि म्हणाला – सांग अनुषा .आपण तुझ्या आयडीया प्रमाणे करू या .

ऎक आता – तू लगेच ., रंजनादीदींना फोन कर ..

बाबांना डिस्चार्ज मिळाला आहे ..संध्याकाळी त्यांना घरी घेऊन जायचे आहे हे सांग ,

आणि मग मला फोने दे, मी सांगते दीदींना काय करायचे आहे ..

अभिजीतने त्याच्या दीदीला फोन लावला ..

पलीकडून दीदी म्हणाल्या ..

बोल अभि, ठीक आहे ना रे सगलं, आजकाल तुझे फोन आले की उगीचच धडधड व्हायला लागतं ..!

अभि- म्हणाला – दीदी..असे काही नाही , इकडे सगळं ठीकठाक आहे.

दीदी आज संध्याकाळी बाबांना घरी घेऊन जायचे ठरले आहे.. आम्ही त्याच तयारीत आहोत ..

आणि दीदी ..ही अनुषा तुला काही महत्वाचे सांगनार आहे..बोल तू तिच्याशी ..

दीदी म्हणल्या ,अरे व ..ग्रेट न्यूज ..बाबांना घरी घेऊन जायचे ..!

हं अनुषा बोल—काय सांगणार आहेस तू मला ..

दीदी ..तुम्ही ,जीजू आणि आदित्य ठीक पाच वाजताच हॉस्पिटलला या ..आपण सगळे मिळून

एकत्र बोलत बसू या थोडा वेळ ..तुम्हाला आलेले पाहून तुमच्या आई-बाबांना आश्चर्य वाटेल आणि

आनंद होईल .. आणि महत्वाचे ..पुढचे ..आहे..

जातांना हॉस्पिटलच्या बाहेरच्या पायर्या पर्यंत ..जीजू त्यांची गाडी घेऊन येतील ...

मागच्या सीटवर ..देशमुखसर आणि आईच्या मध्ये तुम्ही बसायचे .आणि समोरच्या सीटवर

अभिजीत आणि आदित्य ..मामा –भांजे की जोडी असेल ..

आणि जीजू -देशमुखांचे जावई- स्वतहा गाडी चालवीत –त्यांच्या अख्या सासुरवाडीला त्यांच्या घरी घेऊन जातील .

अनुशाची आयडिया ऐकून ..रंजनादीदी ..खूपच भारावून गेल्या ..

अनुषा .किती डोकं चालवतेस ग तू आमच्या भल्यासाठी ..मानलं बाई तुला ..

तू जसे सांगितलेस अगदी स्टेप बाय स्टेप तसेच होईल ..आणि अर्थातच ..हे सगळ सरप्राईज असणार .

.तुझा आवडता फॉर्म्युला आहे ना ..!

अग अनुषा ..तू नाहीस का आमच्या सोबत घरी येणार ?

दीदी ..नाही ना , मी अजून माझी ओळख उघड नाही करू शकत , थोडसे काम राहिलंय अजून .

रंजना दीदी म्हणाल्या ..ठीक ठीक ..तू आत्ताच सांगावे असा मी मुळीच फोर्स करणार नाही..

एक मात्र नक्की ..तुझ्यामुळे ..खूप काही घडतंय ..ते माझ्यासाठी स्वप्नवत आहे.

चल..आम्ही येतो पाच वाजता .बाय ..!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२,

थोडावेळ थांबून अनुषा निघाली ..जातांना म्हणाली .

अभि-.मी पुन्हा येते ....दीदी आल्यानंतर फोन कर मला , तुम्ही फ्यामिली मिळून बोला थोडा वेळ ,

ते जास्त महत्वाचे आहे.

अनुषा घरी आली ..फ्रेश होऊन हॉलमध्ये बसली. तिचे आई-बाबा तिला आलेली पाहून म्हणाले ..

काय अनुषा ..हल्ली ..तू आमच्या वाट्याला फारच कमी वेळ येत असते ..

कोलेज ,आणि उरलेला वेळ सागर देशमुख प्रोजेक्ट “ यातच जातोय .

आम्हाला काही तुझा वेळ देत जा न बेटा ..!

बाबांचे शब्द ऐकून ..अनुषा म्हणाली ..

काय हे बाबा.. अशी फिरकी काय घेताय माझी , कोई मिला नही क्या ..?

आई म्हणाली – अनुषा ..तुझे बाबा तुला खूप मिस करीत असतात , मग,असे बोलतात ,

तू घेऊ नको मनावर .

देशमुखसरांना admit केलंय हॉस्पिटल मध्ये ..असे तू बोललीस एकदा ..आणि मग आम्ही पण नाही

चौकशी केली पुढे काय स्टेटस आहे ?

बाबा पण म्हणाले – अनुषा .अग आम्ही त्यांना भेटायला यावे असे ठरवत होतो ..

पण. एकतर आम्ही काही फारसे क्लोज फ्रेंड नाही आहोत , आणि तू एकदा म्हणालीस आम्हाला ..

की तू आमची मुलगी आहेस ..हे त्यांना तुमच्या बोलण्यातून कळायला नको. मग बसलो तसेच.

अनुषा म्हणाली – यस बाबा , मी असे सांगितले आहे हे खरे . आणि तुम्ही ही गोष्ट सिक्रेट ठेवलीत

त्याबद्दल थान्क्स.

आता देशमुखसरांचे अपडेट देते ..

ते आता खूप बरे आहेत , स्पीडी रिकव्हरी होते आहे त्यांची , म्हणून त्यांना आज संध्याकाळी

डिस्चार्ज मिळतो आहे . ते आता त्यांच्या फैमिली सोबत घरी जातील.

बाबा म्हणाले – एक मोठे संकट टाळले देशमुख सरांच्या आयुष्यावर आलेले .

आई म्हणाली .. आता तू पुन्हा जाणार आहेस की काय ..संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये ?

आणि तिथून पुढे त्यांच्या घरापर्यंत ..घरा मध्ये ?

अनुषा म्हणाली ..नाही , ते आणि त्यांची फैमिली जाईल ,मी परत आपल्या घरी येईन .

या ..देशमुखांच्या घरात मी अशी इतक्या सहजपणे जाईल ? बिलकुल नाही.

अनुषाचे हे वाक्य ऐकून आई-बाबा दोघेही एकाच आवाजात म्हणाले ..

अनुषा ,हे म्हणजे काय ? ..

काय म्हणायचे आहे तुला ?

त्यांच्या घराचा ,त्यांच्या घरात तुझ्या जाण्याचा काय संबंध ?

या प्रश्नाने अनुषा गडबडून गेली ..आपण भलतेच काही तरी बोलून बसलोत ..याची जाणीव तिला

झाली .

आई-बाबांनी या बोलण्याला जास्त ताणून धरले तर परिस्थिती अजून अवघड होईल “

ते तसे होऊ न देण्यात आपले सध्या भले आहे.

काही नाही हो ..निघून गेले काही तरी शब्द ..सिरीयसली घेऊ नका .

आपल्या बोलण्यावर आई-बाबा सहजासहजी विश्वास ठेवणार नाहीत ..हे अनुशाला पक्के माहिती होते .

पण असे खुलासे करणे गरजेचे होते.

बाबा म्हणाले .. तुझ्या प्रोजेक्टचे काय ठरले आहे ? की सोडून द्यायचे आहे. देशमुखसरांची कंडीशन

पण नसणार न आता .

बाबा – माझ्या प्रोजेक्टला प्रिन्सिपल सरांनी फायनल परीक्षेपर्यंत पूर्ण कर, अशी मुदतवाढ दिली आहे.

मागच्या आठवड्यात ते स्वतहा आले होते .हे सांगयला हॉस्पिटलमध्ये .

अच्छ अच्छ ठीक आहे. चालू दे तुझ्या टाईम-टेबल प्रमाणे . मधून मधून आम्ही विचारण्य ऐवजी

तू स्वतहा आपणहून अपडेट देत जा , बरे वाटेल आम्हाला .

यस बाबा ..प्रोमीस ..मी आठवणीने अपडेट देत जाईन.

त्याच वेळी अभिजितचा मेसेज आला ..ये तू आता , दीदी आणि जीजू आलेत हॉस्पिटलमध्ये .

अनुषा तिच्या आई-बाबांना सांगून हॉस्पिटलला निघाली.

********-

३.

अनुषा स्पेशल रूम मध्ये आली .. रंजनादीदी ,जीजू आलेले दिसले आणि

देशमुखांचा नातू पहिल्यांदा त्याच्या आजोबांच्या जवळ बसला आहे “हे पाहून

आपली आजची ही आयडीया एकदम सुपर –डुपर हिट “ ठरणार “ या खात्रीने अनुषा मनातून खुश झाली.

अनुशाला आपल्या शेजारी बसवून घेत ..रंजना दीदी देशमुखांना म्हणाली ..

बाबा – आपण पुन्हा एकदा नव्याने जवळ यावेत असे वाटणारी ..ही व्यक्ती ..तुम्च्य्वर प्रोजेक्ट करते आहे ,

हे प्रोजेक्ट सगळ्या जगाला माहिती झाले ..ते तिच्या कोलेजात झालेल्या आमच्या मुलाखतीने .

तिचे आणखी एक दुसरेच छुपे प्रोजेक्ट चालू आहे “ ते मात्र फक्त मला माहिती आहे .

सांगेन तुम्हाला ..त्यासाठी घरी घेलात की फटाफट बरे व्हा .

आणि आई – या अनुशामुळे बाबा खर्या अर्थाने एक मोठ्या आजारातून बरे होत आहेत . त्यासाठी यापुढे

तुझी मदत लागणार आहे या अनुशाला .

तुला सांगेन हळू हळू ..

अनुशाने दीदीना पूर्ण बोलू दिले , मध्ये काहीच कशाला बोलायचे .

जीजू म्हणाले .. बाबा ,आता आपण घरी जाणार आहोत ,ते हॉस्पिटलच्या गाडीत नाही ..तर ..

माझ्या गाडीत , मी स्वतहा गाडी चालवत ..तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठीच आलेलो आहे.

आता जातांना ..माझ्या गाडीत ..

अभि आणि आदित्य पुढच्या सीटवर ,

आणि मागच्या सीटवर ..आई –आणि बाबांच्या मध्ये बसणार त्यांची बेटी ..रंजना ..!

हे सगळं पाहून ,ऐकून ..देशमुख भावनावश झाले ..बाजूला बसलेल्या रंजनाच्या खांद्यावर द्दोके

टेकवून त्यांनी मनातल्या भावनाना मोकळेपणाने वाहू दिले ..

समोर बसलेली सरिता ..थक्क होऊन समोरचे ददृष्य पाहत होती ..

सागर नावाचा माणूस ..त्याचे दगडी मन, दगडी हरदय ..असे विरघळू शकते ?

ही अनुषा नेमकी आहे तरी कोण ?

बरोबर सहा वाजता ..

जीजुंच्या गाडीमध्ये ..देशुमुख परिवार ..”प्रेमालाय “ वास्तूकडे निघाला ..

हॉस्पिटलच्या पोर्चमध्ये उभी राहून अनुषा ..त्यांच्कडे पहात होती ..

आजची सोनेरी संध्याकाळ .. उद्यापासुंची नवी पहाट सुरु होणार ..

********************************************************************************

बाकी वाचू या पुढील भागात

भाग -३२ वा लवकरच येतो आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------