The beauty of the forties in Marathi Women Focused by Archana Rahul Mate Patil books and stories PDF | चाळिशीतील सुंदरता

Featured Books
Categories
Share

चाळिशीतील सुंदरता

तरुण वय हे अगदी हातातून कसे निघून जाते, ते आपले आपल्याला समजत नाही.. पण वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावर म्हणजेच30- 40 च्या आसपास असलेली पिढी मात्र स्वतःला म्हाताऱ्या म्हणूनही घेता येत नाही आणि आपण तरुण आहोत असेही म्हणता येत नाही... नाहीं का...😄

नवीन लग्न झालेली म्हणून अल्लड, तर कधी सासरच्यांची भीती मनात असते ..म्हणून आपल्या मनात खूप काही असतानाही आपण काहीच करू शकत नाही असं वाटते..जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपल्या मनातील बेचैनी कमी होऊन आपल्या मनस्थितीत बदल होत जातो.. आणि प्रत्येक वयाच्या टप्प्यावर त्या त्या विषयीचा अनुभव आपल्या गाठीशी राहतो... आणि म्हणूनच सगळ्यांनाच असं वाटतं की पहिल्या पेक्षाही ती आता आणखीनच सुंदर दिसते.. असे जेव्हा तिची चर्चा होते, तेव्हा त्याच्या मागचे रहस्य मात्र तिला आलेला अनुभव आणि तिच्यातील वाढलेला नवा आत्मविश्वास असतो.. ज्या आत्मविश्वासाने ती आपल्या आयुष्यातील पुढचे पाऊल सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि मनस्वी आनंदात असताना सुंदर तर दिसणारच!! नाही का !!!❣️❣️

मुलं थोडी मोठी झाली की आपापली कामे स्वतः करतात आणि म्हणूनच तिला थोडीसी उसंत मिळते..मुलांना खायला देणे ,क्लासेसला सोडणं किंवा आणणं,असं थोडाफार काम करावा लागत..हळूहळू मुलांचं स्वतः स्वतःचं विश्व तयार होत असतं आणि त्यामध्ये ते रमून अगदी दंग होतात..स्री जर नोकरी करणारी असेल तर ती थोडी गुंतलेली असते पण जर ती गृहिणी असेल तर मुलांच्या वाढत्या वयाच्या टप्प्यात मात्र तिला थोडी का होईना मोकळीक मिळते..😊

लग्न झाल्यापासून ती सतत एकापाठोपाठ एक अशा जबाबदाऱ्या पेलत असते.वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये, नात्यांच्या गोतावळ्यात ,नवरा , मुलं, आजारपण ,गृहकलह, सण-समारंभ ,पाहुण्यांची आवक-जावक यातच ती व्यस्त असते..एवढ्या वर्षात तिला साध डोकं वर काढायला ही मिळत नाही..प्रत्येकीला या साऱ्यातून जावंच लागतं.. नाही का !!!संसाराची तारेवरची कसरतकरता करता पंधरा-वीस वर्षे मात्र सहज निघून जातात..आणि मग तिच्या आयुष्यात येते थोडी स्थिरता थोडी मोकळीक...🙂

संसाराची संसाराची घडी व्यवस्थित बसलेली असते... जबाबदार्‍या कमी झालेल्या असतात आणि ज्या आहेत त्या बखुबीणे हाताळता येतात... यावेळी तिला मोकळीक राहते ती छान रमते.. मग ती छान दिसण्याचा प्रयत्न करते... वयाची झाक चेहऱ्यावर ,केसावर दिसून येते.. यावर काही घरगुती तर, काही पार्लरमध्ये जाऊन उपाययोजना करते..🥰
या वयात वजनाचा काटा ही वाढता वाढता वाढतच असतो.. त्यामुळे मग वजन कमी करण्याचा अतोनात प्रयत्न केला जातो.. मग फिरायला जाणे, व्यायाम करणे ,दोनदा जेवणे, वजन कमी करण्यासाठी तासन्तास त्याचेच व्हिडीओ बघणे, कमी जेवणे असे सगळे प्रयोग सुरू असतात.. यातलं टिकाऊ मात्र काहीच नसतं...स्वतःच्या सौंदर्याकडे ती जातीने लक्ष देते कपड्याच्या बाबतीतही तेच... कपड्यातील तोच तो पणा टाकून ती नवनवीन फॅशनचे कपडे मिरवण्याचा फंडा ट्राय करुन बघते.. मेकअप च्या बाबतीतही तसेच ती त्या आधी कधीच साध्या लिपिस्टिक शिवाय वर गेलेली नसते...🙂

आता आता मात्र ती छान मेकअप करते.. कारण तिने याआधी स्वतःकडे कधीच एवढं लक्ष दिलेले नसतं... ती सगळी हाऊस करते... याच काळात तिचं मन भूतकाळात रमत असतं.. माहेरची ,लहानपणीचे ,शाळेतले, कॉलेजचे, जुन्या मित्र-मैत्रिणींचे तर कधी मामा-मावश्या व आत्या आणि इतर भावंड ही तिच्या मनात अगदी रुंजी घालत असतं... पंधरा-वीस वर्षात आपल्याभोवती झालेलं लहान वर्तुळ मोठ वर्तुळ मध्ये विस्तारण्याचा अतोनात प्रयत्न करते... मोठं जीवन जगून घेण्याचाही प्रयत्न असतो.. या काळात तिच्या जिवलग मैत्रिणी तिच्या आयुष्यात मोठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात... सगळ्या सुखदुःखाच्या भागीदार त्या असतात... त्यांच्या सोबत ती दिलखुलास हसते... गप्पांमध्ये रंगते ,बाहेर फिरण्याचा, सहलीचा प्लॅन करते ..इतक्या दिवस कोणासाठी वेळ देता आला नाही म्हणून ती त्यावेळेची भरपाई करण्याचा प्रयत्न करते...✍️✍️💞Archu💞

छानछान छान फोटो काढून ते इतरांसोबत शेअर करते.. आयुष्याचा मनमुरादपणे आस्वाद घेत असते..तिची चिडचिड होते..कधी कधी निराशा जाणवते ..राग अनावर होतो ..आपल्या मनासारखं होत नसल्याचा राग दुसऱ्यावर निघतो ...पण याच काळात तिचा नवरा आणि मैत्रिणी तिला सांभाळून घेतात...🥰

अध्यात्माकडे थोडा कल वाढतो ..त्यामुळे मनःशांती वाढून मनशक्ती मिळते.. तिच्या आयुष्यात येणाऱ्या मोकळीकीला ती सामोरी जाते.. भरभरून जगते ..आनंदी राहते आणि म्हणूनच चाळिशीतही खूप सुंदर दिसते..हे सगळं आज मी माझ्या 30 ते 40 च्या आसपास असणाऱ्या मैत्रिनिसाठी..🥰
तुम्हाला हा लेख वाचून कसे वाटले, ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा. . तुमच्या आमच्या मधीलच ✍️✍️💞 अर्चना 💞

✍️✍️💞Archu💞