Being a girl is not easy - 4 in Marathi Fiction Stories by Vrushali Gaikwad books and stories PDF | मुलगी होणं सोपं नाही - 4 - बाबांच्या नावाची कमी..

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

मुलगी होणं सोपं नाही - 4 - बाबांच्या नावाची कमी..

संध्याकाळी सात वाजायला आले होते, मी अणि माई वाटेकडे डोळे लावुन बसलो होतो. तेवढ्यात समोरून ताई आणि आजी येताना दिसल्या.. त्यांना दोघींना बघुन माई धावत घरात गेली आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन आली. चिऊ, "काय गं अशी दरवाजात बसलेस??"
काही नाही गं आजी, मी आणि माई तुमचीच वाट बघत होतो.
माई आजीला पाणी देत, "हो ना.. सात वाजत आले आजी, तरीही तुमचा पत्ता नाही.. म्हणुन आम्हांला काळजी वाटत होती."
अगं माझ्या चिमुकल्यांनो मला रोजच ऊशिर होत राहील.. ताई तु लवकर येत जा गं.. तु नको इतका वेळ थांबु बाहेर..
"चालेल आजी ऊद्या पासुन मी लवकरच जाईल आणि लवकरच येईल."
जा.. तुम्ही दोघी हात पाय धुवुन घ्या.. मी चहा बनवु का आपल्यासाठी??
माई बघ इकडे जरा . तु आणि चहा बनवशिल???
बस जा गप्प.. मी हात पाय धुवते आणि बनवते चहा..
आजी बघ गं.. या ताईला वाटतं, मला काही येतंच नाही, .. आता तुम्ही दोघी बाहेर जाता, मग मला शिकु द्या ना..चहा बनवायला..
आधी शाळा शिक.. तु उद्यापासुन शाळेत जायचं .. समजलं ना..?
हो ताई बस्स.. नाही करत काम...
बराच वेळ आमची गंमत सुरुच होती, ताई ने सर्व काम आवरुन घेतले. माई आणि आजी माझ्यासोबत खेळत होत्या. रोज आठ वाजता येणारा प्रशांत मामा मात्र आज नऊ वाजून गेले तरी आला नव्हता. आजी सारखी दरवाजात जाऊन बाहेर फेरी मारुन यायची, रस्त्यावर नजर टाकून यायची पण मामा मात्र लांब पर्यंत कुठेही दिसत नव्हता. आजीने घड्याळात बघितले तर दहा वाजले होते, मला झोप आली होती म्हणून मी माईच्या मांडीवर डोकं ठेवुन झोपली होती. ताई.. जा गं ऊठ, तुम्ही तिघी जेवुन घ्या जा. . मी मामा आल्यानंतर जेवेल.
आजी, मी पण नंतरच जेवेल...माई आणि चिऊला देते जेवायला..
चिऊ बाळा ऊठ, ये गं माई.. ताटं भरली मी दोघींसाठी...
ताई .."ऐक अगं तु पण जेवुन घे मी थांबते, तु जेव, तु पण दमली आहेस आज..."
"अगं आजी.. "
"जेव, जेव तु पण मी आहे .."
"हो चालेल...आजी."
ताई आमच्या सोबत जेवायला बसली खरी, पण तीला आजीची अवस्था समजत होती. आमचं जेवुन झाल्यानंतर ताईनी अंथरुण करुन दिले. आजीने मला आणि माईला झोपायला सांगितले. ताईला सुद्धा झोप आवरत नव्हती, तीने पण भिंतीला डोकं टेकवुन डोळे मिटले होते. मध्यरात्री बारा वाजता जोराचा आवाज आला, ताईला आवाजाने जाग आली. तिने ऊठुन बघितले तर दरवाजात मामा दारु पिऊन ऊभा होता. त्याला धड ऊभेही राहता येत नव्हते.
प्रशांत, प्रशांत.. कुठे होतास तु??
आज इतका वेळ का लागला???
आणि हे काय तु दारु पिऊन आलास.. नक्की.. होतास कुठे तु??
आजीने मामाला खाद्यांला पकडत एकावर एक प्रश्नांची सुरुवात केली होती.
मामाला मात्र शुद्ध नव्हती, तो काहीच बोलत नव्हता.. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला तरी, ते ताई आणि आजीला समजत नव्हते. त्याची अवस्था बघुन आजीने त्याला अंथरुणावर झोपवला, तिथेच तो झोपुन गेला. पण आजीला आता चिंता लागली होती, तिच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केले होते.
आजी, आता मामा आला ना.. तु थोडं जेवुन घे गं... तु नको विचार करु.
अगं ताई, अचानक तुमचा मामा असा कसा वागला?? तो असा नाही.. आपण बघतो ना, रोज वेळेत येतो घरी.. हो गं.. आजी, आता तु नको चिंता करु आपण बोलु सकाळी मामासोबत..
मी तुला जेवण वाढते, थोडं तरी खाऊन घे तु...
ताई ने कसंतरी आजीला जेवायला दिले. आजी जेवल्यानंतर ताई आणि आजी झोपल्या.
काही तासांत पहाट झाली, आजीला कामावर जाण्यासाठी ऊठावेच लागले. लगेच ताईपण ऊठली, आजीने भाकरी थापल्या आणि ताईने भाजी बनवली. ताई आणि आजी आवरतच होत्या, तर मामा ऊठला आणि अंघोळ करुन नाश्ता न करताच, आजीसोबत एकही शब्द न बोलता कामावर निघुन गेला. आता मात्र आजीची चिंता वाढली होती. तिला कळायला मार्गच नव्हता, की मामा कोणत्या कारणांमुळे असा वागतोय. ताईपण विचारात गुंतली होती पण आता आजीला सांभाळणं जास्त गरजेचं होतं..
आजी, ऐक ना... आज लवकर ये तु कामावरुन.. आपण संध्याकाळी मामा आल्यानंतर मस्त मज्जा करु..
ताई.. तुला खरंच वाटतंय का? मामा तुमचा लवकर येईल आणि आपल्यासोबत मज्जा करेल..
हो.. मग, येईल तर...आज माईच्या शाळेचा पहिला दिवस आहे, त्याला पण माहिती आहे चांगलं.
तुझं बोलणं खरे झाले ना ताई तर खुप आनंद होईल बघ मला.
"होईल गं आजी.. चल आता आवर तुझं सर्व, तु जा.. तुझ्या कामावर. मी फुलं काढुन आणते, एका गल्लीतुन... आणि संध्याकाळी भेट मग मला त्या छाया काकुच्या घरी ...
"हो चालेल चल.. घे ती तुझी टोपली तुला फुलांसाठी.."
"घेतली..." माई कट्ट्यावर बघ तिथे डब्बा भरुन ठेवला आहे, पण मी आल्याशिवाय चिऊला एकटी ठेवुन शाळेत जाउ नको..मी येतेच अर्ध्या तासात...
हो गं... ताई जा जा..तुम्ही...किती बोलशील आता..
ताई आणि आजी घरातुन गेल्यानंतर माईने मला तिचा नविन दप्तर आणि पाटी दाखवली. ती शाळेत जाण्यासाठी खुप उत्सुक होती. माईला झालेलं कधी ताई येईल आणि मी कधी शाळेत जाईल..माईला बघुन माझ्या मनात आले, मी पण माईसारखी शाळेत जाणार.. शिकुन आजी आणि ताईला मदत करणार..
माई, मला शाळेत गेल्यानंतर काय काय करणार हे सांगण्यात दंग झाली होती. तेवढ्यात ताई आली आणि माईला आवरत गणवेश आणि डब्बा दिला. तिची छान दोन वेण्या घालुन तयारी केली.. माई खुप सुंदर दिसत होती. ताईने माईला गावातल्या मुलींसोबत शाळेत पाठवली आणि तीने गजरे ओवायला घेतले..आज पण मीच ताईला फुले देण्याचा काम करत होती.
तिकडे माईचा शाळेचा पहिला दिवस होता. शाळा म्हणजे तिच्यासाठी नविनच जग होते आणि शाळेत नविन नविन चेहरे.. ती हरवुन गेली होती, त्या वातावरणात. शाळेचा पहिला दिवस म्हणुन मुलांना मैदानात ऊभे करुन पहिली ते सातवीच्या मुलांनी कोणत्या वर्गात बसायचं हे सांगण्यात आले. माईचा वर्ग ऊजवीकडुन शेवटी होता आणि बाजुला मुख्याध्यापकांचे ऑफिस होते. माईच्या बाई वर्गात गेल्या, सर्व मुले ऊभी राहीली..
बसा बसा मुलांनो...
मी सौ. माधुरी पाटील मॅडम. मीच तुम्हांला इयत्ता पहिली पासुन तिसरी शिकवायला असणार... मॅडम मुलांसोबत ओळख करत म्हणाल्या..
आता तुम्ही सर्वांनी एक एक करुन स्वतःचे नाव सांगायचे....एकाचे नाव सांगुन झाले की सर्वांनी टाळ्या वाजवायच्या मग दुसरा ऊठुन सांगणार...
चला करु या सुरुवात.. बाळा उठ तु सांग तुझे नाव..
मॅडम मी हर्षला रवि मोहीते.
व्वा छान..
पुढे.. उठा चला..
मॅडम मी सौरभ मंदार जाधव..
सर्वांनी टाळ्या वाजवल्या...
नंतर माई ऊभी राहिली...
मॅडम मी... इतकेच बोलली आणि ती बोलायची थांबली.
काय झालं बाळा??? घाबरु नको बोल तु..
मॅडम मी माई..
इतकेच बोलुन माई खाली बसली..
अगं सांग बाळा तु घाबरते का..? सर्व मित्र मैत्रिणीच आहेत तुझे..
मॅडम.. मला माझ्या बाबांचे नाव नाही माहिती..(माई खाली मान घालुन बोलली)
बाई हा वाक्य ऐकुन थोडा वेळ थांबल्या आणि त्यांना आठवले की, जी छोटी मुलगी तिच्या बहिणीचा ॲडमिशन करण्यासाठी आली होती, त्या मुलीची बहिण हीच आहे .
हो चालेल बाळा नंतर सांग तु.. आपण बोलु हा नंतर..
असे बोलुन बाईंनी विषय आवरत घेतले...पण माईला बाबांच्या नावाची कमी वाटत होती. बाईंनी मात्र तिला त्याची जाणिव नाही होऊन दिली आणि माईला त्यांच्या बाजुलाच बसायला सांगितले... माईचा पहिला दिवस आता मजेत चालला होता.
ताईने सुद्धा सर्व गजरे ओवुन विकायला जाण्याची तयारी केली होती पण मला एकटीला घरात ठेवुन ती जाऊ शकत नव्हती..मी ताईला म्हणाले, ताई मी येऊ आज तुझ्यासोबत गजरे विकायला..
नको गं..चिऊ, तुझे पाय दुखतील.. तु कुठे गाव फिरणार..?
ताई मी त्या बाजुंच्या काकुकडे नाही राहणार ... मला यायचं आहे तुझ्यासोबत..
माझा हट्ट काही थांबत नव्हता, म्हणुन ताई मला सोबत घेऊन घराबाहेर पडली.. घरातुन बाहेर पडल्यापासुनच ताईने जोरात आवाज द्यायला सुरुवात केली..
गजरा... ताजा ताजा गजरा...
ताईच्या मागे मी पण बोलत होती..
गजला... ताजा ताजा.. गजला..
ताईसोबत मला बघुन काहींना हसु येत होते तर काहींना नवल वाटत होती.