११)इन्स्पेक्टर राठोडची आणि रितुची पूर्वतयारी...
सततच्या होत असणाऱ्या शारीरिक यातना, मला होत्या की नाही हे मला माहिती नाही, पण रितूला माझा प्रत्येक दिवस हा एक चॅलेंज होता.इतक्या भयानक वेळीसुद्धा तिने क्षणभरही अंतर मला दिला नव्हता. आणि मी मात्र नेहमी तिला विरहात ठेवलं होतं.
या दोन ते तीन दिवसात माझ्यात काहीच बदल पडलेला नव्हता.याउलट माझ्यावर नको त्या वळांचे जखम मात्र झाले होते.स्वतः डॉक्टरच्या मागे एकच नवे आव्हान उभे राहायचे. आणि माझी आई एका मुलाच्या मायेने त्यांच्या पाया पडत होती. परत एकदा तो व्हिडिओ सगळेच बघू लागले. जे राठोड ने रात्री बघितले होते.
ज्या वेळेस रात्री हे घडत होते त्यावेळेस रितु हे सगळं डोळ्याने बघत होती.आभासी मृत्यू काय असतं? हे तिने चांगल्याप्रकारे जाणले होते. त्या दिवशी अचानक राठोडने सकाळी येऊन माझी चौकशी केली आणि रीतुला विचारू लागले.
इन्स्पेक्टर राठोड-यांच्या या वागण्यावर तुमचं काय मत आहे?
रितू- मत काय आहे त्यात? रोज तो तिळतिळ सोडून जात आहे आम्हाला.. ज्यावेळेस त्याची पूर्ण प्रतिकारात्मक शक्ति संपेल.. तोही पूर्ण संपून जाईन. डोळे पुसता पुसता रितू म्हणाली...
इन्स्पेक्टर राठोड- खरं सांगायचं तर आता मलाही वाटायला लागले की त्या दिवशी पवनने मला जे काही सांगितलं होतं. ते अगदी खरं होतं. पण माझ्या कायद्यात बसत नसल्यामुळे मी ते टाळले आणि केस मिटवली. वाटलं नव्हतं असं परत घडणार म्हणून.
रितु-आता त्याचा काही उपयोग नाही सर... कारण मुळात तुम्ही जे केले असते ते निरर्थकच असते. तुम्हाला तर डोळ्यांना दिसणारे सत्य पाहिजे. आणि इथे न दिसणारे सत्य आहे. ज्यामुळे तुम्हाला खरं काय आहे?ओळखता नाही आले.
इन्स्पेक्टर राठोड- खरंच चुकलो मी... पण आता तयार आहे.या वेळेस जरी का मला कायद्याच्या बाहेरही जाऊन काम करावे लागले, तरी आता तयार आहे. मला एक पोलिस म्हणून जितका अभिमान आहे, तितकाच एक माणूस होण्याची लाज वाटत आहे.आता सांगा काय करावे लागेल?
रितु-काय करायचंय?ते अजूनही मला कळलेलं नाही. पण जे काही आहे ते पेरजागडाशी संबंधित आहे.कारण हे सगळं तिथूनच तयार झालं आहे.गेले काही दिवस बेपत्ता असणारा पवन शेवटी तिथेच मिळाला होता.
इन्स्पेक्टर राठोड-मी रात्री या गोष्टीचा खूप विचार केला. पवनने सांगितल्यानुसार त्याची हत्या एकाच हत्याराने केल्या जात आहे. आणि सगळ्यांचे मृत्यूसुद्धा एक सारखेच आहे. अगदी आता पवन सुद्धा.पवन आणि नमन दोघांचे पण रात्रीला वारंवार व्हिडिओज बघितले. खरंच भयंकर व्हिडिओ आहेत.लोकांनी त्यात तर्कवितर्क केले आहेत. बरंच काही गोड गुपित घडलेला आहे. नक्कीच काहीतरी फार मोठा प्रसंग आहे. ज्यात पवन अडकला आहे, अशी मला खात्री वाटत आहे.
रितू-त्याबद्दल मला पण इतकं खात्रीने माहिती नाही. पण इतक्यात जे काही घडलं, ते सगळं जिथं घडलं, ते पेरजागढ आहे. आणि आज दुपारपर्यंत तिथले काही प्रतिष्ठित माणसं येणारच आहेत. पवनची भेट घ्यायला. नक्कीच काहीतरी मदत मिळेल मी आशा बाळगते.कारण जाताना फक्त पवन इतकाच म्हणाला होता... की त्या दिवशी सकाळीच मी त्याला भेटायला गेले होते कसल्यातरी विवंचनेत आधी सारखाच तो रमलेला होता.मला दारात बघताच अचानक त्याच्या चेहऱ्यावर उसने हसु विस्तारले, आणि म्हणाला...
आज चाललोय रितू.जाण्यापूर्वी तुला सांगू इच्छितो की कदाचित परत येईन, अशी आशा बाळगू नकोस.जर मी परत आलो तर तुझाच असेन..जर नाही आलो तर मात्र तू माझा विचार न करता राहायचं.अगदी शेवटच्या क्षणापर्यंत... माझ्यासाठी.प्रेमाने आपल्याला निरंतन कायम जवळ केलेले आहे. त्याला मृत्यू आपल्याला कितीही करेल तरी दुरावा आणू शकत नाही.पण जर मी नसलो तरी तू लग्न करावं, आणि तुझा सुखाचा संसार मांडावा अशी माझी इच्छा आहे.
फक्त आज मी चाललोय. एका किरणाच्या आशेवर.आता समोरचे काय आहे ते कदाचित मलाही माहिती नाही. म्हणून कधीच माझ्या बाबतीत इतका विचार करु नकोस की तुला स्वतःला त्रास होईल. जा आनंदित रहा, फक्त माझी वाट बघ...मी येणार किंवा नाही येणार आता सगळं त्याच्यावर. असे म्हणून त्याने वर बोट दाखवले होते.
इन्स्पेक्टर राठोड-म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की पवनला याची चाहूल लागली होती. की नक्कीच तिथे गेल्यावर त्याचा जीव वाचू शकेल.
रितू-हो कदाचित.....
दुपारच्या वेळेला काका-काकू समवेत सोनापूर येथील काही प्रतिष्ठित लोकं, सरपंच, पेरजागढच्या ट्रस्ट मधील काही मंडळी असे बरेच जण मला भेटायला आले. राठोडने त्यांच्याकडून हवी ती माहिती घेतली. पण पाहिजेत अशी माहिती त्यांना अजिबात मिळाली नाही.याउलट त्यांना पवन कसा माणूस आहे? त्याच्या बोलण्याचा व्यवहार, त्याचं काम करणं, अशा बऱ्याच त्याच्याबद्दल चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या.
आता असं वाटत होतं की मृत्यूच्या वाटेवर हरवलेला मी, मला शोधण्यासाठी कुणी दोन काजवे कुजबुजत येत होते.त्यात एक रितू आणि इन्स्पेक्टर राठोड ज्यांच्या त्या एकतर्फे बोलण्यामुळे सुरुवात झाली होती.
शोधमोहीम सुरु झाली.वृत्तपत्रांवर नको त्या तर्कवितर्क बातम्या चालू झाल्या होत्या. परत एकदा पवन चाबकाच्या शिक्षेस पात्र. अशी जागोजागी अफवा चालू झाली होती. याचं कारण काय?प्रत्येकजण स्वतःच्या विचारात होता. राठोडने आपले दोन ते तीन सहकारी घेऊन केव्हाच गडावर रवाना झाला होता. काहीतरी त्याच्या डोक्यात तरारत असावे किंवा काहीतरी मिळणार असे त्याला वाटू लागले होते.
शोध मोहिमेवर जाताना राठोडला एक चित्रविचित्र आकृती सोनापूर मधून बघत होती. ती म्हणजे गावातील एक व्यक्ती.कसं आहे जग आपला एक विशाल योग आहे.जितकी त्याची लोकसंख्या आहे तितकीच त्याची तेवढी विचारसरणीही आहे.एखाद्याला एखादं चित्र आवडलं तर पहिला सुंदर म्हणतो तर दुसरा मस्त. अर्थात अर्थ याचा एकच असतो, पण प्रतीक करायच्या भावना तितक्याच वेगळ्या असतात.यातच असते चांगल्या आणि वाईट विचारांचा समावेश. दिसून येत नसतात पण त्यांना बघावं तर आपल्याला वाटत पण नाही.
तो व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून याआधी असलेला सरपंच होता.खेड्यात कसं राजकारण अंगाशी येतं.आणि मराठीतच प्रचलित एक म्हण आहे "ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी".ज्यावेळेस तो सरपंच होता तोपर्यंत त्याने वाईट पद्धतीने पैसा खूप मिळवला होता आणि याच कारणामुळे काही माणसे वगळून गावातून एक वेगळी पार्टी बनवली.त्यामुळे एक गाव दोन तुकडे अशी परंपरा चालू झाली.दोंन पार्टीचे गाव असल्यामुळे गावातील प्रत्येक गोष्ट त्या दोघात रुजत असे. "दोघांची बरोबरी तरच गाव राजी, नाही तर दगाबाजी" अशी गोष्ट व्हायची. गाव छोटं होतं पण त्या गावात बरेच राजकारण चालायचं. अर्थात ते कुणाला पटायचं किंवा नाही.
प्रत्येकाच्या विचारांनी जनजागृती करण्याचे काम चाललं होतं. आपल्या पक्षासाठी नको ते वाद चालायचे.इतक्या पर्यंत मजल चालली जायची, की जर एखाद्याकडे पाहुणा आला तरी वैरपक्षाच्या घरी तो पाणीसुद्धा पिऊ शकत नसे.खरं तर प्रत्येक गावाची एक वेगळीच पद्धत असते. पण इथे जरा वेगळं कारण होतं.काय घडू शकते याची कुणालाच काही माहिती नव्हती.