श्री दत्त अवतार भाग १५
१४) देवदेवेश्वर
दत्तात्रेयांचा 'देवदेवेश्वर' नावाचा चौदावा अवतार आहे.
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला, शततारका नक्षत्रावर, शुक्रवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस श्रीगुरू, नर्मदा नदीच्या तीरावर माहूरच्या जंगलात अवतरीत झाले.
ब्रम्हदेवादी सर्व देवता, गौतम ऋषींचे पुत्र शतानंद महर्षी इत्यादी सर्व श्रीगुरूंचे दर्शन घेण्यासाठी येथे आले. याकाळात श्रीगुरूंनी नर्मदा नदीमध्ये तसेच आसपासच्या अनेक तीर्थांमध्ये स्नान केले आणि इतर अनेक ऋषी-मुनींना दर्शनही दिले.
कृष्णाम्लाच्या वृक्षांनी हा परिसर परिपूर्ण असल्याने या स्थानाला 'कृष्णाम्लाकी तीर्थ' असे नाव पडले.सदगुरु मार्कडेय ऋषिंनी सांगितलेली कथा आहे. माहूर क्षेत्राच्या परिसरात विशेषत: शतानंदाला दर्शन देऊन अनुगृहित करण्यासाठी भगवान श्रीदत्तात्रेय हे देवदेवेश्वराच्या रुपाने प्रकट झाले.
याच अनुषंगाने स्वर्गातील इंद्रादि देव आणि सत्य लोकातील ब्रम्हदेव यांनाही दर्शन देऊन अनुगृहित करण्याचे कार्य देवदेवेश्वर प्रभूंनी केल्याचे पहावयास सापडते.
भगवान श्रीदत्तात्रेय नर्मदेच्या दक्षिण तीरावरील अरण्यातून दक्षिण दिशेने प्रवास करीत करीत अतिप्राचीन अशा व सर्व पर्वतांमध्ये श्रेष्ठ असलेल्या सहयाद्री नावाच्या पर्वताजवळ आले.
प्रवासामध्ये अनेक ऋषिमुनींचे आश्रम पाहात पहात त्यांनी तेथील ऋषिमुनींना आपल्या दर्शनाने पावन केले. अनेक नदया, तीर्थे व इतर जलाशय यांच्यामध्ये अवगाहन करुन त्यांना ते पवित्र करीत होते.
ऋषिमुनींच्या आश्रमात जाऊन सर्वाच्या क्षेमकल्याणाची विचारपूस करीत , कोठे स्नानसंध्यादी अनुष्ठान करुन क्षणभर विश्रांती घेत तर कोठे भोजन करुनही भक्तजनांच्या मनाला संतोषीत करीत .
अशा थाटात दत्तात्रेयमुनींची स्वारी तो सर्व रम्य प्रदेश अवलोकन करीत करीत सह्याचलाच्या रम्य परिसरात येऊन पोहोचली.
सह्याचल पर्वताचा तो परिसर त्यांना फारच रम्य वाटला.
या भागातील पर्वतश्रेणीला काही ठिकाणी सिंहाद्री असेहि नाव दिलेले आढळते.
दत्तात्रेयप्रभूंची ही तर जन्मभूमीच असल्यामुळे या परिसरात त्यांचे मन रमणे हे स्वाभाविकच होते .
तशी तर संपूर्ण सहयाद्रीची सर्व शिखरे त्यांना प्रिय वाटत होती पण त्यातल्या त्यात माहूरगडाच्या परिसरातील अनसूयेच्या शिखराजवळ असलेले एक शिखर दत्तात्रेयांना फारच आवडले.
तेथेच ते बराच काळ आश्रम करुन राहिले. हे सर्व शिखर आज दत्तपादुकाशिखर अथवा दत्तशिखर या नावाने ओळखले जाते.
कृष्णाम्लाकीनिवासाय || सर्वकल्याणकारका ||
देवदेवावताराय || दत्तात्रेयाय नमो नम: ||
कृष्णाम्लाकी तीर्थाच्या परिसरात निवास करणाऱ्या, सर्वांचे कल्याण करणाऱ्या, देवदेवावतार धारण केलेल्या माझ्या श्रीगुरू दत्तात्रेयांना नमस्कार असो.
१५) दिगंबर
दत्तात्रेयांचा हा पंधरावा अवतार 'दिगंबर' या नावाने प्रसिद्ध असून यदुराजास श्री दत्त दिगंबर भेटले व त्यांनी आपल्या २४ गुरुंपासून काय काय ज्ञान घेतले याचा त्याला बोध केला.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, सूर्योदयाच्या वेळेस हा अवतार झाला. श्रीप्रभूंनी या अवतारात सोमवंशी राजा यदु आणि हिरण्यकश्यपु आणि कयाधूचा पुत्र भक्त प्रल्हाद यांचे कल्याण केले.
कावेरी नदीच्या परिसरातील अरण्यात भटकत असताना यदु राजाला एक दिगंबर यती दिसला. त्याने या यतींना वाकून नमस्कार केला आणि विचारले की, "आपण तरूण आहात, तेजस्वी आहात, निरोगी सुद्धा दिसत आहात मग आपण अशा घनदाट अरण्यात का राहत आहात? आणि येथे असूनही आपण आनंदी आणि निश्चिंत आहात! हे कसे काय हे कृपा करून मला सांगा!"
दिगंबर यती म्हणाले, "उदात्त अशा या प्रकृतीपासून मी चोवीस गुरू केले आहेत आणि आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकलो आहे. त्याद्वारेच मला विवेक, वैराग्य, मनःशांती आणि समाधान प्राप्त झाले आहे." हे ऐकताच यदु राजा त्यांना शरण गेला
श्रीगुरूंनी पुन्हा त्यांनाही आपल्या चोवीस गुरूंबद्दल आणि त्यांपासून घेतलेल्या बोधाबद्दल माहिती दिली. हे ऐकताच प्रल्हादांच्या मनाचे समाधान झाले आणि गुरूबोधाने त्यांना ब्रम्हज्ञानही प्राप्त झाले.
पुढे यदुराजाचे कल्याण झाले. त्याची वंशावळ वाढत गेली.
श्रीविष्णूंचा पूर्णावतार - श्रीकृष्ण याच वंशात झाला.
भक्त शिरोमणी प्रल्हादावरही श्रीगुरूंनी अशीच कृपा केली. हिरण्यकश्यपूच्या मृत्यूनंतर शुक्राचार्यांनी प्रल्हादाचा उपनयन विधी केला आणि त्याला राज्यकारभाराचे अधिकार मिळाले. एक आदर्श राजा म्हणून त्याने हजार वर्षांपर्यंत उत्तम प्रकारे राज्यकारभार पाहिला. परंतु ब्रम्हज्ञान झाले नसल्याने आत कुठेतरी प्रल्हाद अस्वस्थ होते. अखेरीस, ते कावेरी नदीच्या परिसरातील अरण्यात निघाले आणि तेथे त्यांना एक तेजस्वी दिगंबर यती जमिनीवर पहूडलेले दिसले. त्यांच्या सर्वांगाला धूळ लागली होती. प्रल्हादांनी त्यांना प्रणाम केला आणि विचारले, "आपण इतक्या घनदाट अरण्यात येथे कसे काय? आणि तेही शांत आणि समाधानी? कृपया मलाही सांगावे" श्रीगुरूंनी पुन्हा त्यांनाही आपल्या चोवीस गुरूंबद्दल आणि त्यांपासून घेतलेल्या बोधाबद्दल माहिती दिली. हे ऐकताच प्रल्हादांच्या मनाचे समाधान झाले आणि गुरूबोधाने त्यांना ब्रम्हज्ञानही प्राप्त झाले.
वैराग्याज्ञानयुक्ताय || आत्मविवेकप्रदायका ||
दिगंबरावधूताय || दत्तात्रेयाय नमो नम:||
ज्ञान आणि वैराग्याने परिपूर्ण असलेल्या, हे संपूर्ण जग परमात्म्याचाच अंश आहे असा आत्मविवेक प्रदान करणार्या, दिगंबरावधूत अवतार धारण करणाऱ्या ज्ञानमूर्ती श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो .
१६) कमललोचन श्रीकृष्णश्यामनयन
भगवान सद्गुरु श्रीदत्तात्रेय यांचा सोळावा अवतार श्रीकृष्णश्यामनयन या नावाने ओळखला जातो.
भगवान श्री दत्तात्रेयांचा हा अवतार कार्तिक शुध्द व्दादशीच्या दिवशी बुधवारी रेवती नक्षत्रावर भगवान सुर्यनारायण उदयाला येत असतानांच झाला.
आदिगुरु श्रीदत्तात्रेय अवधूत यांनी योगिराज, अत्रिवरद इत्यादि अनेक अवतार घेवून या भूतलावर ज्ञान, भक्ती आणि वैराग्य त्याचप्रमाणे अष्टांगयोग या सर्व साधनांचा अधिकारपरत्वे भक्तजनांना उपदेश करुन कृतार्थ केले. त्याला उत्तम पदाला पोहचवले.
असेच एकदा भगवान श्री दत्तात्रेय ज्ञानशय्येवर स्थित होते (परात्परयोग्याची कुठलीही मुद्रा ही ज्ञानमयच असते) आणि योगनिद्रेत होते. त्यावेळी काही भाविक आणि शिष्य त्यांचे दर्शन घेण्यासाठी आले. त्यांना श्रीगुरू सच्चिदानंद स्वरूप दिसले.
श्रीकृष्णासारखे ते रूप पाहून सर्व धन्य झाले.
श्री दत्तात्रेय त्यांना म्हणाले, "सर्व शास्त्रांचा अभ्यास केल्याने जे सार म्हणून प्राप्त होते, ते मूळ तत्व मी तुम्हाला सांगतो ज्याचा अभ्यास केल्याने तुम्हाला लवकरच शाश्वत ज्ञानाची प्राप्ती होईल.
वैदिक धर्म हा चिरंतन आहे. वेदच त्याचे मूळस्वरूप आहेत. म्हणूनच धर्म हा मुख्य आणि कायम आहे. मी केवळ अत्रीऋषींसाठीच 'दत्त' आहे असे नाही तर, ज्यांनी अनन्यभावाने माझे चिंतन केले त्यांना मी स्वत:ला दिले. (ते मत्स्वरूपच झाले) अशा भाविकांना मी सायुज्यता प्रदान केली आणि ते माझ्यातच विलीन झाले."
त्या सर्वांनी गुरुदेवांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला.
ते सर्वांगसुंदर असलेल्या दत्तप्रभूकडे पाहत आहोत तोच पाहता पाहता श्रीकृष्णश्यामकमललोचन या स्वरुपात त्यांना दत्तगुरुंचे दर्शन झाले.
सर्व विश्वाचे अधिष्ठान असलेला तो परमात्मा अवधूत श्रीकृष्णश्यामकमललोचन या रुपाने प्रकट होताच सर्वांनी जयजयकार करुन पुष्पवृष्टि केली.
ज्ञानशय्यास्थिताभगवन् ||नित्यसायुज्यदायका ||
श्रीकृष्णश्यामकमलनयना ||दत्तात्रेयाय नमो नम:||
ज्ञानशय्येमध्ये स्थित असलेल्या (नित्य पराज्ञानस्वरूप असणाऱ्या), (सर्वसमर्पणभावाने आपली भक्ती करणाऱ्यांना) नित्य सायुज्य प्रदान करणार्या, श्रीकृष्णश्यामकमलन अवतार धारण करणाऱ्या परब्रह्म स्वरूप श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.
पूर्णराते दत्तात्रय
श्री दत्तात्रेयांना एक विशेषण वापरतात ते आहे 'पूर्णराते'. या एकाच शब्दात श्री स्वामी महाराजांनी शेकडो व्याख्या सांगितल्या आहेत. पूर्णरात शून्याला म्हणतात किंवा अमावसेलाही म्हणतात. अमावस्येला आकाशात प्रकाश देणार अस काही नसते ,केवळ शून्य असत. शून्य असते याचा अर्थ तिथे काहीच नसते असे नाही ,परन्तु जे काही असते त्याच्या अस्तित्वाला फक्त काहीतरी आहे अस म्हणता येत नाही.
त्याचप्रमाणे हा पूर्णराते सुद्धा स्वतः 'शून्य' आहे. ईशावास्य उपनिषदातील
दत्तसांप्रदायिक श्रीपादवल्लभांना व नृसिंह सरस्वतींना इतिहासकाळातील अनुक्रमे पहिले आणि दुसरे अवतार मानतात.
दासोपंतांच्या परंपरेत दासोपंतांना सतरावा अवतार मानण्यात येते.
'पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण मुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव शिष्यते |'
क्रमशः