प्रेम वेडा (भाग ४)
हे सर्व ऐकुन अनिरुद्ध ला नवीनच धक्का बसला होता . अश्या प्रकारच्या कथा त्याने सिनेमात वा एखाद्या कथेतच वाचल्या होत्या . त्याने अंकीताच्या वाढदिवसाची खूप स्वप्न रंगवली होती तिला तो एक सरप्राइझ देणार होता पण आज त्यालाच नियतीने येवढं मोठं सरप्राइझ दिलं होत. .....
त्याला संतोषचा राग येवू लागला होता पण त्याला नशिबानेच शिक्षा दिली होती !
त्याच्या समोर आता एकच प्रश्न होता संतोषने अस का केलं ???
" तू का केलंस अस ??? तुझ्या अश्या वागण्यामुळे तीन जणांचे आयुष्य खराब केलंस तू !!!
अनिरुद्ध ने संतापून त्याला विचारले.
" तीन नाही चार "
" चार कशे काय ?? चौथी व्यक्ती कोण ??
" अर्जुन कुलकर्णी "
" आता हा कोण ??? नितीनशी याचा काय संबंध ?? अनिरुद्ध आता गोंधळला होता !!
" ' अर्जुन कुलकर्णी ' माझा लहानपणीचा मित्र ,
पहिलीपासून ते एम कॉमच्या तिसऱ्या सेमिस्टर पर्यंत आम्ही सोबतच होतो ...
शांत , अभ्यासू , कोणाचाही मदत करण्यासाठी नेहमी पुढे असणारा ... पण एका बाबतीत मात्र तो कच्चा होता , तो म्हणजे मुलींशी बोलण्याच्या बाबतीत .
एम कॉम च्या पहिल्या दिवसापासून त्याला एक मुलगी आवडू लागली होती . आज पर्यंत कधी कोणतीच मुलगी त्याला आवडली नव्हती म्हणून मी त्याची मदत करायचे ठरवले . एक वर्ष होत आला होता पण तो आपल्या मनातली गोष्ट तिला सांगू शकला नव्हता . कारण ती मुलगी अंकिता गुरव होती ...
कॉलेज मद्धे प्रत्येकालाच आवडणारी अशी ती मुलगी . सुंदर तसेच हसरा चेहरा , मनाला भिरणाला मधुर आवाज . एखाद्या अप्सरे प्रमाणे दिसणारी ती मुलगी अर्जुनला काय संपूर्ण कॉलेज ला आवडली होती . तिने कित्तेक मुलांना नकार दिला होता याच भीतीने एक वर्ष झाला पण अर्जुन स्वतःच्या मनातली गोष्ट तिला सांगू शकला नाही .
अर्जून तिला लपून छपून तर कधी एकटक नजरेला नजर मिळवून बघू लागला होता . त्याला नेहमी वाटे मंद वाऱ्याच्या झोक्याने डोलणाऱ्या तिच्या रेशमी केसांशी क्षणभर आनंदाने खेळावं . आयुष्यभर तिच्या सहवासात राहावं . जगातील सार सुख एकवटून तिच्या ओंजळीत द्यावं .
शेवटी त्याला आता राहवलं नाही ... त्याने ठरवले , तिला एक पत्र लिहायचं . पत्राद्वारे आपल्या मनातली गोष्ट तिला पटवून द्यायची म्हणून आठवड्यापासून तो पत्र लिहू लागला होता .
कॉलेज मध्ये नितीन पेक्षा छान कविता कोणीच लिहीत नव्हता म्हणून नितीन कडून एक छान अशी कविता लिहून घेतली होती .
" एसएमएस च्या जगात मी तुला पत्र लिहितोय , हा वेडेपणाच वाटेल तुला , मात्र तुझ्या प्रेमात किती वेडा झालोय ते पटवून देण्यासाठी ' पत्र लीहणे ' हेच बरोबर वाटले मला म्हणून हा प्रयत्न करतोय !!!
पहिल्यांदा तुला मंदिराजवळून फुल घेताना पाहिले , निळ्या ड्रेस मद्धे तुला पाहताच हरवून गेलो . तेव्हा पासूनच ठरवलं की जगातील सार सुख एकवटून तुला द्यावे , तुझ्या हसण्याचे नेहमी मीच कारण व्हावे ...
, त्याच मंदिरात जेव्हा भटजींनी माझा हात पहिला होता तेव्हा त्याने सांगितले की तुझे लग्न A नावाच्या मुलीशी होईल .
आणि पहिल्यांदा मला भटजिंवर विश्वास बसला होता .
पावसाळ्यात जेव्हा जेव्हा तू दिसलीस तेव्हा तेव्हा पाऊस मला भिजवू लागला . जेव्हा तू हसतेस तेव्हा आयुष्यभर तुला असच बघत बसावं अस वाटतं . जेव्हा जेव्हा मी श्वास घेतो मला तुझीच आठवण येते . डोळे मिटून जेव्हा एखादा थंडगार वारा मला स्पर्श करतो तेव्हा तूच स्पर्श करून गेलीस अस वाटत .
तू विचार करत असशील की किती लहान पत्र लिहलय ... पण हेच पत्र लिहण्यासाठी मला आठवडा भर झोप नाही लागली ...
खूप काही लीहतोय ,
खूप काही मागतोय ,
एक दिवस माझी होशील
याच आशेवर जगतोय !!! "
पत्रावर काही अक्षरे पाण्याचे थेंब पडल्याने पुसली गेली आहेत , ते पाणी नाही माझे अश्रू आहे ...
तू माझ्या प्रेमाला नकार देशील तर काय होईल या कल्पनेमुळे अश्रू आले होते .
माझं काही चुकल असेल तर मला माफ कर , नेहमी स्वतःची काळजी घेत रहा , कारण माझा जीव तुझ्यात गुंतला आहे . स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुला काळजी घ्यायला सांगत आहे .
तुला पाहताच प्रेम नजरेस यावे
विसरलेले क्षण पुन्हा आठवावे
दुःख लपवून थोडस हसावे
डोळ्यातले पाणी डोळ्यातच साठवावे
मनातल्या विचारांचं पत्र लिहावे
पत्र लिहून तुला पाठवावे
पाठवून तुला वाचताना बघावे
बघून तुज हास्य मनात साठवावे
पुन्हा सर्वत्र तूच तू दिसावे
पुन्हा मी प्रेमात फसावे
सर्व खोट्या स्वप्ना सारखे भासावे
अन् मी पुन्हा गालातल्या गालात हसावे
अन् मी पुन्हा गालातल्या गालात हसावे ...
.....
अर्जुन ने हे पत्र आपल्या जवळ खूप दिवस ठेवले व एके दिवशी असाच मी त्याच्या बॅग मद्धे पाहिलं तर मला त्याच्या बॅग मद्धे हे पत्र मिळालं ...
मी त्याला चिडवत होतो " डरपोक " " डरपोक "
पण तेवढ्यात नितीन तेथे आला त्याने आम्हाला विचारले " काय रे मी लीहलेली कविता पोहचली का अंकीता जवळ ???" येवढं बोलून माझ्या हातातून ते पत्र हिसकावून घेवून तो पळाला . आम्ही त्याचा पाठलाग करत होतो पण तो पुढे पुढे धावतच होता .
अधून मधून माघे बघून तो पुढे धावत असल्याने त्याचा धक्का एका मुलीला लागला व ते पत्र खाली पडले . व त्या मुलीने ते पत्र उचलले पण नितीन पुढे धावतच होता त्याने त्या मुलीला इशाऱ्याने सांगितलं की ते पत्र अंकिता ला दे असं !!! ती मुलगी अंकिता ची चांगली मैत्रीण होती .
मला व अर्जुनला कळलेच नाही की नितीन ने केव्हा ते पत्र दिलं . त्याच्या जवळ पोहचलो तेव्हा तो म्हणाला " पत्र माझ्या कडे नाही !! पण जीच्या जवळ पोहचायच होत तिथे पोहचलं ...
मी व नितीन एकमेकांना टाळी देत हसत होतो मात्र अर्जुन च्या चेहऱ्यावर बारा वाजले होते .
सर्वांना समजलं होत की ते पत्र अंकिताला मिळाले आहे पण तिची काहीच प्रतिक्रिया नव्हती .
व एका आठवड्यानंतर अंकिता आमच्या सोबत राहू लागली होती ... आमच्या ग्रुप चा एक भाग झाली होती , रोज कॉलेज जवळील चहावाल्याकडे चहासाठी थांबू लागलो होतो , तिला बस स्थानकाजवळ सोडायला जाऊ लागलो होतो .
एकाच ग्रुप मद्धे सोबत असून सुद्धा आता अर्जुनला तिला पत्राचे उत्तर विचारायचे धाडस झाले नाही . तिच्या सोबत वेळ घालवायला मिळतोय यातच तो आनंदी होता . त्याला नेहमी वाटतं होत की तिला सांगून टाकावं मनातलं पण मैत्रीपण गमावून बसण्याची भीती त्याला जास्त होती .
आम्हा दोघांना हेच वाटत होत की त्या पत्रामुळे अंकिता आमच्या ग्रुप मद्धे सामील झाली होती पण कारण काही वेगळंच होत .
ते कारण आम्हाला एका महिन्यानंतर समजल ...
जेव्हा एक चित्रपट बघण्यासाठी मी आणि अर्जुन गेलो होतो . तेव्हा मी त्याच चित्रपट बघताना माझी नजर चित्रपट गृहात असलेल्या नितीन व अंकितावर गेली . मी ही गोष्ट अर्जुनला न सांगायची ठरवली पण नशिबात काही वेगळंच लीहल होत . अर्जुन ने दोघांना सोबत बघितल व त्याचे अश्रू थांबतच नव्हते त्याला अंकिता दुसऱ्याची झाली याच दुःख नव्हत तर आपल्याच मित्राने तिला त्याच्याहून दूर केलं होत , या गोष्टीमुळे तो तुटला होता .
त्याने कोणाला काहीच न सांगताच कॉलेज सोडून दिलं .
दुसऱ्या दिवसापासून तो कुणालाच दिसला नाही .
एक महिन्यानंतर मला एक फोन आला आणि त्या कॉल मुळे माझं आयुष्य संपलं होतं . कारण लहान पणा पासून ज्या व्यक्तीवर मी सर्वात जास्त प्रेम केलं होत असा माझा मित्र आज या जगात नव्हता . त्याने या जगाला कंटाळून झोपेच्या गोळ्याचा ओवरडोज घेवून स्वतःला आयुष्यभरासाठी झोपवलं होत .
मला राहवलं नाही व शेवटी अर्जूनच्या बडल्यापोटी मी हे सर्व केलं ...
अनिरुद्धला अजून समजत नव्हत की पत्र तर अर्जुन ने लिहल मग अंकिताच प्रेम नितींवर कसं ??
ते मलाही माहिती नाही , ते तुम्हाला अंकिता किव्वा नितीन सांगू शकतात . पण एक माहिती आहे " नितीनच अंकीतावर जीवापाड प्रेम आहे . कारण वेडा झाल्यानंतर सुद्धा आजही सिद्धार्थ नगर बस स्थानकाजवळ तो तिचीच वाट बघत आहे ...
अनिरुद्ध ने संतोषचा निरोप घेतला . व तिथून बस स्थानकाजवळ आला त्याला सर्व समजल होत मात्र एक प्रश्न अजूनही त्याला समजला नव्हता . नितीन तर त्याच उत्तर देवू शकत नव्हता , फक्त आता अंकिता या सर्व प्रश्नांची उत्तरे देवू शकत होती . म्हणून त्याने अंकीताला विचारायचं ठरवल ...
बस पकडून अनिरुद्ध घरी आला होता , सतत नितीन विषयी त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू असल्याने तो अंकीतासाठी आणलेलं गिफ्ट बसमध्येच विसरला होता .
. ---------- क्रमशः ----------