Guntata hruday he - 10 in Marathi Love Stories by preeti sawant dalvi books and stories PDF | गुंतता हृदय हे!! (भाग १०)

Featured Books
Categories
Share

गुंतता हृदय हे!! (भाग १०)

ऑफिसच्या काही फॉर्मलिटी पूर्ण करून ती तडक घरी निघाली..

तिला उद्या पासूनच ऑफिसमध्ये रुजू व्हायला सांगितले गेले होते.

असो, ती घरी मिठाई घेऊन आली आणि तिने सुमती काकूंना आनंदाची बातमी दिली..

काकूंनी देवाजवळ मिठाई ठेवून नमस्कार केला..मग गौरीने तिच्या बाबांना फोन करून ही बातमी कळवली..

आज सगळं शास्त्री कुटूंब अगदी आनंदात होतं..सुमती काकूंनी रात्री गोडाधोडाचा पण बेत ठरविला..

अरे हो!! गौरीने समीरला ही आनंदाची बातमी कुठे दिलीये..हेच विचारायचं होतं ना तुम्हाला..पण ती देणार तरी कशी!! त्याचा नंबर कुठे होता तिच्याकडे..

कळलं... तुम्ही काय विचार करताय ते..

अहो, पण तुम्हीच विचार करा..ती काकुंकडे कशी काय मागेल समीरचा नंबर..!!

मग काय समीरची वाट बघण्याखेरीज गौरीकडे काहीच पर्याय उरला नव्हता..

समीर नेहमीप्रमाणे रात्री जेवायला हजर झाला..तो आल्याआल्या काकांनी त्याला आनंदाची बातमी दिली..

त्यामुळे गौरीचा चेहरा जरा हिरमुसला..कारण तिला ही बातमी स्वतः समीरला सांगायची होती..

जेवणं आटोपलं..तसं समीर काकांशी थोडं बोलून सगळ्यांना शुभ रात्री बोलून झोपायला गेला..

दुसऱ्या दिवशी गौरी लवकर उठली..आज तिच्या ऑफिसचा पहिला दिवस जो होता..

गौरीची तयारी झाली आणि तिने देवाला व तिच्या आई-बाबांना नमस्कार केला आणि ती निघणार इतक्यात समीर दरवाजात उभा..

तिला कोण आनंद झाला..समीरने तिच्यासाठी फुलांचा बुके आणला होता..तो त्याने तिच्या हातात ठेवला आणि त्याने गौरीचे अभिनंदन केले व तो ऑफिसला जायला निघाला..

तेवढयात त्याच्या लक्षात आले की, गौरीचं ऑफिस तर त्याच्या ऑफिसच्या जवळच आहे..पण तो गौरीला हे कसं विचारणार..पण काय माहीत कसं..शास्त्री काकांनी स्वतः गौरीला आज समीर बरोबर जायला सांगितले..गौरीला खूप खूप आनंद झाला..

गौरी समीरच्या गाडीत बसली..आज तिने काल सारखचं समीरला गाणं लावायला सांगितलं..

त्याने कालसारखचं एक रँडम गाणं लावलं..

🎶कितने ही दूर दूर हों उन दोनों के रास्ते
मिल जाते हैं जो बने एक दूजे के वास्ते;एक दूजे के वास्ते ||
जैसे दिल है धड़कन है एक दूजे के वास्ते
जैसे आँख है दर्पण है एक दूजे के वास्ते
जैसे बरखा सावन है एक दूजे के वास्ते
एक सजनी एक साजन है एक दूजे के वास्ते🎶

गौरी पूर्णपणे त्या गाण्यात हरवून गेली होती..ऑफिस कधी आलं तिला कळलं सुद्धा नाही..

समीरने गौरीला हाक मारताच ती भानावर आली आणि तिच्या लक्षात आले की, ऑफिस तर आलं पण..

गौरीने समीरला निरोप दिला..आणि ती ऑफिसमध्ये निघून गेली..

काही दिवस असेच गेले..गौरी आता पूर्णपणे तिच्या कामात रुळली होती..समीर तर तिला रोज रात्री घरी भेटायचाच पण त्याच्याशी काही जास्त बोलणं व्हायचं नाही..

एक दिवस अचानक संध्याकाळी खूप पाऊस सुरू झाला..इतका की काही समजायच्या आधीच सगळीकडे पाणीचं पाणी झाले..

जवळ जवळ सुनामीचं ती..

त्यादिवशी गौरी सोडून सुदैवाने सगळेच घरी वेळेवर आले होते..अगदी समीर सुद्धा..

पण त्यादिवशी गौरीला एक महत्वाचा प्रोजेक्ट दिला गेला होता..त्यामुळे तिने आधीच घरी तिला यायला थोडा उशीर होईल असे कळवले होते..

तेव्हा तर वाटलं पण नव्हतं की, इतका पाऊस पडेल म्हणून काकूंनी ही गौरीला परवानगी दिली होती..

आता मात्र कहर झाला, पाऊस थांबायचं नाव ही घेईना..त्यात गौरीचा फोन पण लागत नव्हता..

सुमती काकू फारच चिंतीत झाल्या..काकांना ही काय करावं हे कळतं नव्हतं..वेदांतला एकट्याला ही ते इतक्या पावसात पाठवू शकत नव्हते..तेवढ्यात समीर तिथे आला..

काकांनी सगळी हकीकत समीरला सांगितली..समीरने गौरी कदाचित ऑफिसमध्येच असेल असे सांगून काका काकूंना दिलासा दिला..आणि काही वेळातच मी येतो असे सांगून तो निघून गेला..

इथे पावसाचा कहर वाढतच चालला होता..गौरी हिम्मत करून पण ऑफिसमधून निघू शकत नव्हती..

कारण पाणीच इतकं भरलेलं..त्यात ती आज सकाळी घाईघाईत फोन चार्ज करायचा विसरली होती म्हणून तिचा फोन बंद झाला होता..

लाईट गेल्यामुळे आता ती तो चार्ज ही करू शकत नव्हती..ऑफिसमध्ये काही निवडक सहकारीच थांबले होते..बाकी सगळे घरी निघून गेले होते..

गौरी खूपच टेन्शन मध्ये आली होती..तिने एका सहकाऱ्याकडे फोन मागितला आणि ती घरचा फोन लावू लागली..

पण तो काही लागत नव्हता..तिला काय करावे काहीच कळत नव्हते..

तिला ऑफिसमध्ये रात्र काढणे कठीण जात होते..घरची, आई-बाबांची तिला खूपच आठवण येत होती..

तिला अगदी रडू कोसळले..इतक्यात तिच्या हातात कोणी तरी रुमाल दिला..

तिने वर पाहिले तर तो समीर होता..समीरला पाहताच ती इतकी खुश झाली की, तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि ती रडू लागली..

समीरने तिला दिलासा दिला..आणि म्हणाला, "रडू नकोस गौरी, मी आलोय ना..पाऊस थांबला की, आपण निघू..तू काही खाल्लस का?" यावर गौरीने नाही असे उत्तर दिले..

मग समीरने त्या ऑफिसच्या कॅन्टीनमधून जे मिळेल ते आणले आणि गौरीला दिले..

गौरी समीरकडे बघत होती..तिला विश्वासच होत नव्हता की, समीर तिच्यासाठी इथे आला होता..

तिने समीरचा हाथ घट्ट पकडून ठेवला होता..त्याला पाहता पाहता ती स्वतःच्या विश्वात हरवून गेली..ती सारखी हेच मनोमनी बोलत होती..

🎶थोड़ा सा प्यार हुआ है थोड़ा है बाकी
हम तो दिल दे ही चुके
बस तेरी हाँ है बाकि
थोड़ा सा प्यार हुआ है थोड़ा है बाकी🎶

सुदैवाने रात्री पावसाचा जोर ओसरला आणि हळूहळू पाऊस पडायचा ही थांबला..

पण सगळीकडे कमरे इतके तरी पाणी साचले होते..त्यामुळे सकाळ शिवाय निघणे ही कठीण होते..

ऑफिस मधले सहकारी पेपर वगैरे पसरून त्यावर झोपी गेले..

गौरीने तिच्याजवळ असलेला स्कार्फ खाली अंथरला आणि समीरला झोपायला सांगितले..

पण समीर गौरीला म्हणाला, "तू झोप, मी इथेच बसतो"

मग गौरी कसली झोपतेय, ती पण त्याच्या बाजूला बसून राहिली..

कधी मध्ये त्या दोघांचा डोळा लागलाच तर कधी समिरचं डोकं गौरीच्या खांद्यावर जाई..तर कधी गौरीचं समीरच्या..

गौरीला तर हे सगळं स्वप्न वाटत होतं..क्षणभर तर ती इतकी स्वार्थी झाली की, तिला हा पाऊस थांबू नये असचं वाटत होतं..हा हा म्हणता रात्र निघून पण गेली..

सकाळी आवाजाच्या गलबल्याने समीरला जाग आली..पाहतो तर गौरी त्याला अगदी पकडून झोपली होती..त्याने गौरीला उठवलं..

तशी गौरी समीरला अजून बिलगली..समीरला तिच्या अश्या वागण्याचं फार हसू आलं..

समीर प्रथमच तिच्याकडे इतकं निरखून पाहत होता..तिचा चेहरा खूपच निरागस वाटत होता..पण तिच्या केसांची बट तिला त्रास करत होती..म्हणून तो ती बाजूला करणार..इतक्यात गौरीने डोळे उघडले..तसे समीरने लगेच दुसरीकडे बघितले..

गौरी गालातल्या गालात हसली..समीरने तिला तिचा हात दाखवला..तिने तो पटकन समीरच्या गळ्याभोवताहून बाजूला केला..नंतर काही घडलंच नाही असं दाखवत दोघेही उठले..

दोघांनी उठून बघितलं तर पाणी ओसारले होते..रात्रभर ऑफिस मध्ये राहिलेले लोक ही घरी चालले होते..हे दोघेही उठले..

एव्हाना लाईट्स पण आल्या होत्या..समीरने घरी फोन करून काकांना मी गौरीला घेऊन येतोय असे सांगितले..

त्याने काल रात्री काकांना गौरी ऑफिसमध्ये असल्याचे आधीच सांगितले होते व पाणी ओसरल्यावर मी तिला सुखरूप घरी आणेन असं आश्वासन ही दिलं होतं..

त्यामुळे काका निश्चिन्त होते आणि त्याबद्दल त्यांनी सुमती काकूंलाही सांगितले...हे ऐकून सुमती काकूंची चिंता मिटली जरी असली तरी ते दोघे सुखरूप घरी यावेत म्हणून त्या मनोमनी देवाजवळ प्रार्थना करीत होत्या..

समीरच्या गाडीची पावसाच्या पाण्यामुळे पुरती वाट लागली होती..

त्यामुळे तिचे चालणे खूप मुश्किल होते..कालच्या अचानक च्या पावसामुळे टॅक्सी मिळणे ही कठीण दिसत होते..

मग दोघांनी चालत जायचं ठरवलं..गौरीला तर खूपच मस्त वाटत होतं..कारण ती समीरच्या खूप जवळ होती..आणि का कोण जाणे तिला हा रस्ता संपू नये असच वाटत होतं..

ती सारखी मधेच समीरकडे बघत मनात गुणगुणत होती..

🎶जादू है तेरा ही जादू
जो मेरे दिल पे छाने लगा
दीवाने मेरे ये तो बता क्या किया तूने
मीठा सा दर्द होने लगा🎶

क्रमशः

(ही कथा आवडल्यास ती आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा..)
©preetisawantdalvi