बेदर्द साजीष का हिस्सा हु
कमनसिबी का जाणा पेहचाना किस्सा हु
वैसे तो मिल जाता है कभी भगवान का औदा
पर सच बोलू तो बदनसीब मै रिषता हु..
हा मै औरत हु ..हा मै औरत हु
नित्याची कहाणी कधीतरी अशा वळणावर येईल यावर तिला विश्वासच बसत नव्हता ..घरच्यांनी तिला मृन्मयकडे जाण्यासाठी भांभावून सोडलं होत ..तो गेल्या सात वर्षात किती बदलला आहे याचे गुणगान गाऊ लागल्या जात होते ..या सर्वात तिला फक्त शुभमवरच विश्वास होता पण अलीकडे तोही तिला मृन्मयकडे जाण्यास सांगू लागला होता एवढंच काय मृन्मय शुभमची भेटही आता नेहमीच घडू लागली होती .नेमकी मृन्मयने सर्वांवर काय जादू केली आहे हे तिलाच कळत नव्हते ...तस पाहता तिच्यावर जाण्यासाठी कुणी प्रेशर घालत नव्हते पण प्रत्यक्षात मात्र जाण्यासाठी ते प्रेशर घालत आहेत अस नित्याला वाटू लागलं होतं ..घरात तो विषय निघाला की नित्याचा मूड खराब होत असे..तिला आता ते सर्व असह्य होऊ लागलं होतं ..तिला किती त्रास झाला यापेक्षा तो किती बदलला आहे यावर सर्वांनी एक मत बनविल होत आणि बहुदा तिला कसेही मृन्मयकडे पाठविण्याचा निर्णय त्यांचा झाला होता ..आणि म्हणून ती विसरायला लागली की सर्व तिला आठवण करून देता होते ..आजही तेच घडलं होत म्हणून तिने मोबाइल हातात घेत सारांशला मॅसेज केला
📱कामात आहेस का ?
समोरून काही क्षणातच रिप्लाय आला
📱नाही तर ..बोल ना काय झालं ? ..सर्व काही ठीक आहे ना ? # सारांश
📱हो रे सर्व ठीक आहे पण आता घरच्यांमुळे डोकं दुखायला लागलं आहे ..रोजच रोज ते सर्व एकूण डोकं फुटण्याची वेळ आली आहे ..काय योग्य नि काय अयोग्य काहीच कळत नाही आहे ..# नित्या
📱नक्की काय झालं ते सांग ? # सारांश
📱काय सांगू सर्वाना वाटत आहे की तो बदलला आहे म्हणून सर्व त्याच्याकडे परत जायला सांगत आहेत ..यात आता शुभमही सामील झाला आहे ..मला वाटत मी आता सर्वांवर ओझं होऊ लागले आहे त्यामुळेच ते मला घरातून काढू पाहत आहेत..मला न स्वतःचाच राग येतोय..कदाचित माझ्याकडे कागदपत्रे असते तर एखादी जॉब केली असती पण वडिलांची कीर्ती आणि आता तेही करू शकत नाही ।.जॉब कागदपत्रे नसताना मिळाली तरीही विना कागदपत्र कुणीही घर देणार नाही ..विशेष म्हणजे एकट्या मुलीला ।.आता तर काय एकदा त्याला भेटून ये म्हणून तगादा लावला आहे माझ्या मागे ..नुसता ताप झाला आहे डोक्याला ..कोण चूक आणि कोण बरोबर काहीच कळत नाहीये ..
📱तुझी स्थिती कळते आहे ..तुला जर प्रॉब्लेम नसेल तर एक उपाय आहे # सारांश
📱कुठला ? # नित्या
📱तू सरळ ये निघून माझ्याकडे ..घरी आईला समजावेन मी त्याची काळजी नको करू ..आणि तुला इथे कुणी काहीही बोलणार नाही हा माझा शब्द आहे .कायमसाठी बनवून घेईल तुला..# सारांश
📱सारांश तुला कळत नाहीये ..माझीही इच्छा आहे तुझ्याकडे यावं पण मी आले तर मृन्मयने लावलेला आरोप खरा ठरेल आणि तेही सोड ..माझा घटस्फोट झालेला नाहीये तेव्हा आले तरी आपण लग्न करु शकत नाही आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्या घरच्यांना कळलं ना तर ते तुला आणि मला मारून फेकून देतील ..मला माझी चिंता नाहीये पण तुला काहीही झालेलं मला आवडणार नाही .तुला काय वाटत माझ्या मनात आलं नसेल हे पण मी स्वतःसाठी तुझा जीव धोक्यात घालू शकत नाही मग तू काहीही म्हण .# नित्या
📱बर !! मग आता काय करणार आहेस ..तुला वाटत का तो बदलला आहे असं ? # सारांश
📱मला माहित आहे रे तो बदलला नाहीये पण ह्यांना कोण समजावणार ..हे मला समजावून सांगत आहेत की तो बदलला पण मला त्याच्यावर काडीचाही विश्वास नाही.# नित्या
📱मग त्यांचं समाधान व्हावं म्हणून भेटून ये ..त्यानंतरही तुला वाटलं तर नको जाऊ ..तुला काका जाच थोडी म्हणणार आहेत .# सारांश
📱हो आता तसच करते ..इच्छा तर नाही पण बघू काय होत तर ..सॉरी चल तू ऑफिसला असशील ..मी माझंच रडगाणे सांगत बसली आहे तुला आणि जमलं तर उद्या त्याला बोलावून घेते भेटायला मग सांगते तुला काय घडलं ते ..बाय # नित्या
सारांशने बाय म्हणताच दोघांनीही फोन बाजूला ठेवून दिला ..तर नित्या आपल्या कामात व्यस्त झाली ।.त्या रात्री दोघांचही बोलणं झालं नाही आणि सारांश एका प्रोजेक्ट वर काम करत असल्याने तोही तिच्याशी मॅसेज करू शकला नव्हता ..आणि त्याच्या डोक्यातून निघून गेल ..नंतर त्याला आठवणीतही राहील नाही की ती मृन्मयला भेटायला गेली होती ।.सारांश अलीकडे बिजी झाला होता ..फार तर रात्री दोघात थोडं फार बोलणं व्हायच ..तेही लवकरात लवकरात आटोपून तो झोपून जायचा आणि नित्यालाही त्याला फार त्रास द्यायचा नव्हता म्हणून ती शांत होती ..
सुमारे 15 - 20 दिवस आणखी झाले होते ..सारांश प्रोजेक्टसाठी प्रेझेन्टेशन सादर करीत होता ..ती दुपारची वेळ होती ..लंच टाइम झालेला असतानाही त्याने जेवण केलं नव्हत आणि तो त्यावर कामच करीत होता ..तेवढ्यात त्याचा मोबाइल वाजला ..त्यावर नित्याचा मॅसेज दिसला..त्याने थोडा ब्रेक घ्यावा म्हणून कॉफी मागवून घेतली आणि तिचा मॅसेज वाचू लागला ..
📱सारांश आज मनाने सर्वांसमोर हरले ..रोज रोजच हे मानसिक टॉर्चर मला आता सहन होत नव्हतं ..कुणाला समजावून काहीही फायदा नाहीये .तुझ्याशीही अलीकडे बोलायला मिळत नाहीये त्यामुळे स्वतःच एक निर्णय घेतेय.तुला मागे सांगितलं होतं की मी मृन्मयला भेटायला जाणार आहे ..फक्त तू विसरलास की मी त्याला भेटायला गेले होते ..भेटायला गेले तेव्हा मला त्याच्यात फार काही बदल झाला आहे असे जाणवले नाही ..त्याच्याशी रागात बोलत बोलतच मी कसेतरी क्षण काढले आणि घरी परतले ..घरी बहुदा माझे सर्वच वाट पाहत होते ..घरी पोहोचले तेव्हापासून सर्वांनी तगादा लावला आहे की त्याच्याकडे जा ..मागचे काही दिवस तू कामात होतास म्हणून काही सांगू शकले नाही पण आता मी सर्वांसमोर हरले आहे ..आणि एक निर्णय घेतला त्याच्याकडे जाण्याचा ..बाहेर गाडी उभी आहे आणि मी माझं सामान घेऊन जात आहे आणि मनात ठरवलं की याघरी कधीच परत येणार नाही .याच घरी काय कुणाशीच संबंध ठेवायचा नाही ..आता मेले तरी मृन्मयकडेच मरेन ..तुलाही मी जावं हेच हवं होतं ना तर घे तुझीही इच्छा पूर्ण करते ..तुम्हाला हवं असलेला मी निर्णय घेतला .मग तो आनंदाने घेतला की नाईलाजाने ह्याच्या विचारात नको पडू ..शेवटी माझ्या नशिबात हेच लिहिलं असणार आणि नशीबापेक्षा जास्त कुणाला मिळाल आहे ..जे मला मिळणार ..मी घेईल स्वतःला सांभाळून ..इतके दिवस तुला त्रास दिला त्याबद्दल सॉरी ..आता तिकडे कस वातावरण असेल माहिती नाही ..तेव्हा हा शेवटचा मॅसेज समज ..बाय ..काळजी घे कायम तुझी ..सॉरी
मॅसेज वाचताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले ..त्याने हातातली कॉफी बाजूला ठेवली आणि तिला मॅसेज करू लागला पण मॅसेज काही पोहोचत नव्हते ..त्याने कॉल लावण्याचा प्रयत्न केला पण तिने मोबाइल बंद करून ठेवला होता ..क्षणभर त्याला आज नित्या आपल्या आयुष्यातून कायमची निघून गेली असल्याचा त्याला भास झाला ..मन भरून आलं ..त्याला काय करावे समजत नव्हते ..पुढच्याच क्षणी त्याने डोळे मिटले आणि चेअरवर डोकं टेकवूनस शांत पडला ..विचार सुरूच होते आणि तो मनातल्या मनात म्हणू लागला , " सॉरी नित्या मला तुला कधीही त्याच्याकडे पाठवायच नव्हतं पण ते करणं तितकंच गरजेचं होतं ..मी एका नित्याला तासंतास अश्रू गाळताना पाहिल आहे ..कधीतरी नित्याही आई नसल्याने खचली होती तेव्हा त्याच घरी पुन्हा एक नित्या संध्याच्या रूपाने जन्माने यायला नको होती म्हणून मी तुला पाठवल ..या सर्वात तिची काय चूक ? ..मी विचार केला असता तर तुला केव्हाही घेऊन आलो असतो पण स्वार्थी बनण मला नाही जमलं ..नित्या संध्याला तुझी गरज आहे आणि तिला ते प्रेम फक्त तूच देऊ शकते ..सॉरी नित्या पण तू आयुष्यातून जाऊन मला इतकी मोठी शिक्षा देशील अस वाटलं नव्हतं ..असो तुला तिकडे पाठवण्यासाठी ही शिक्षा देखील मंजूर आहे ..फक्त तू आनंदी राहा .."
सारांश विचार करतच होता की कुणीतरी आवाज दिला आणि तो भानावर आला ..त्याने डोळे पुसले आणि पुन्हा कामावर लागला ..सायंकाळी घरी आला तेव्हा त्याने फक्त चहा घेतला होता ..सकाळपासून जेवण केलं नसतानाही त्याने रात्री जेवण केलं नव्हत कारण कुठेतरी त्यालाही वाटत होतं की ह्यात मीही सगभगी आहे ..आईने बोलावलं तरी तो जेवायला आला नाही उलट लाइट बंद करून फक्त वर पाहत होता आणि डोळ्यात होते अश्रू...सारांश पहिल्यांदाच कुणासाठी तरी इतकं रडल होता ..रात्रभर रडून रडून त्याने स्वतःची तब्येत खराब करून घेतली होती ..सकाळी आईने पाहिलं तेव्हा त्याला ताप भरलेला होता म्हणून त्याला झोपेतून उठविण्याचा आईने प्रयत्न केला नाही ..सकाळचे 10 वाजले तरी तो उठला नव्हता शेवटी आईने त्याला उठवून फ्रेश व्हायला सांगितले ..तो ऑफिसला जायचा हट्ट करत होता पण आईने जायला साफ नकार दिला.. त्याने ऑफिसमध्ये आज येणार नाही हे सांगायला फोन केला ..त्याने फोन करून सांगितले आणि तितक्यात नित्याचा मॅसेज आला
📱सॉरी सारांश ..रागात बरच काही बोलून गेले तुला ..काल अस वाटलं की मी आज ह्या जगात एकटीच पडले आहे ..घरच्यांचा इतका राग आला होता की काल काहीच सुचत नव्हतं म्हणून फोन बंद करून ठेवला होता .त्या सर्वांचा राग मग तुझ्यावर निघाला..तुझ्याशिवाय हक्काने कुणावर रागावू रे !! आता तूच तर आहेस माझ्या आयुष्यात...पण रागात तुला त्रास होत असेल याचा विचार केला नाही ..सॉरी ..माफ कर रे या वेडीला ..
📱 नित्या माफ करायचा प्रश्नच येत नाही कारण त्यासाठी मी तुझ्यावर रागवन गरजेचं आहे आणि मला ते नाही जमत ...राग स्वाभाविक आहे तुझा ..आम्ही वागलोच तुझ्याशी अस की तुझं तस वागणं योग्यच आहे ..उलट मीच सॉरी तुझी साथ देऊ शकलो नाही त्यासाठी ...# सारांश
📱सॉरी रे !! स्वतःला दोषी समजू नको ..कुणाला कधीच नशिबाच्या वरच मिळत नाही ..कदाचित हेच माझ्या नशिबात लिहिलं आहे म्हणून मी इथे आहे आणि काल रागात म्हणाले हा शेवटचा मॅसेज पण सत्य हे आहे की तू माझा श्वास आहेस तेव्हा तुझ्यापासून दूर राहण्याचा विचार मी करूच शकत नाही ..स्वतःची काळजी घे ..आणि जास्त त्रास करून घेऊ नकोस ..मी ठीक आहे ..मी आवरते ..नंतर बोलू बाय ..#नित्या
📱बाय # सारांश
सारांशने त्याच्या तब्येतीबद्दल तिला काहीच सांगितलं नव्हतं पण त्याला स्वतापेक्षाही तिची जास्त काळजी होत होती ..त्याला कळत होतं तिची काय अवस्था आहे पण तो हतबल होता ..आणि त्याला वाईट वाटत होतं की इच्छा असूनही तो काहीच करू शकत नव्हता ..
दिवस जाऊ लागले आणि नित्या त्या घरात कैद झाली ..एकटेपणा जणू तिच्या आयुष्याचा भाग झाला पण एक गोष्ट मात्र छान झाली ..मावशीकडे असताना त्यांना फक्त मॅसेजवर बोलता येत असे तर मृन्मयकडे ते आता रोज कॉलवर बोलू लागले होते ..मृन्मयच ऑफिस सकाळी 10 पासून 7 पर्यंत असायच तेव्हा त्या वेळात दोघेही वेळ मिळेल तेव्हा कॉल करायचे ..सुरुवातीला एकटी पडलेली नित्या आता त्याच्याशी बोलून सतत हसू लागली होती आणि तोही तिला आनंदी ठेवण्यात कुठलीही कसर ठेवत नव्हता ..नित्याही घरच्यांवर काही दिवस राग ठेवून होती आणि तिने मावशी , भावाला टोमणे मारून दाखवले होते पण अलीकडे तिने त्यांनाही बोलणं सोडलं होत आणि जे मिळालं त्यात समाधानी राहू लागली होती ..नित्या आनंदी राहू लागली होती तर इकडे सारांशच्या मनात भीती होती की तिच्यासोबर मृन्मयने जबरी केली तर ? मला खरच सहन होईल का ?..बरेच दिवस त्याने ती गोष्ट मनात ठेवली पण नंतर नंतर त्याला ते पचवणं कठीण झालं आणि त्याने तिला विचारलं त्यावेळी ती थोडी शांत होत म्हणाली की हे बघ सारांश मी ह्यावर विचार केला होता त्यामुळे त्याच्याशी भेटले तेव्हाच सांगितलं होत की मी फक्त मुलीसाठी आले आहे आणि एक बायको म्हणून मी तुला कुठलाही अधिकार देणार नाही ..तो तयार झाला म्हणून कदाचित मी येण्याचा निर्णय घेतला ..मला माहित आहे तो इतक्या सहजा सहजी ऐकणार नाही पण त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही ..त्यामुळे काळजी करू नकोस..तुझी काळजी समजत आहे मला पण मी घेईल स्वतःची काळजी ..तू बिनधास्त राहा .."
ती इतक्या विश्वासाने बोलली होती की त्यालाही बर वाटल होत पण त्याच्या मनात भीतीने घर सोडले नव्हतं हे त्यालाही माहीत होतं आणि तो जबरदस्ती करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल हे तिलाही माहीत होतं..
नित्या आनंदी राहण्याच एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे संध्या ..सुरुवातीला फक्त बापाकडे राहणारी संध्या हळूहळू नित्या सोबत राहू लागली होती ..ज्यादिवशी नित्या घरी आली होती तेव्हा तिने सर्व चाळीला सांगितले होते की आता माझी आई आली आहे तेव्हा कुणी मला मारलं तर ती तुम्हाला सोडणार नाही .हे सर्व नित्याच्या समोर घडत होत म्हणून तीही हसत होत ..सुरुवातीला संध्या फार तर तिच्याकडे यायची नाही पण हळूहळू नित्याच तिची लाडकी झाली ..जेवण भरवन असो की अंघोळ घालन की तिला शाळेतून घरी आणण ह्या सर्वात नित्याचा वेळ कसा जाई हे तिलाही कळत नव्हतं आणि नित्या संध्याच्या फारच जवळची झाली ..नित्या गेल्यानंतर संध्याने तिला सांगितलं होतं की तिची आत्या तिला फार मारत असे हे ऐकून नित्याला फार वाईट वाटलं होतं आणि तिने संध्याला छातीशी कवटाळून घेतलं होतं ..आता घरात फक्त आई आई हाच शब्द घुमत असे आणि नित्या आपल्या लाडक्या मुलीचे लाड पूरविण्यात व्यस्त झाली होती ..तिचे काम करण्यात नित्याचा दिवस कसा जाई हे तिलाच कळत नव्हतं तर दिवसातला एक तास सारांशच्या नावे तिने केला होता ।.ही अशी वेळ होती जेव्हा ती स्वतःसाठी जगत होती ..बऱ्याच वेळा नित्या कॉलवर असताना मागून संध्याचा आवाज यायचा आणि त्या दोघीना मिळवून त्याने एक काम चांगलं केलं म्हणून तो स्वतःच्या मनातलं गिल्ट कमी करू लागला होता ..नित्या आता त्या घरात स्थिरावली होती ..मृन्मय सोबत तीच कामपूरत बोलणं असे परंतु संध्या तिचा श्वास बनत चालली होती ..संध्यानेच तिचा दिवस सुरू व्हायचा नि संध्यानेच संपायचा देखिल ..
आणखी दोन तीन महिने गेले होते ..नेहमीप्रमाणे सारांशने तिला कॉल केला ..तिने उचलताच तो म्हणाला , " नित्या गेस व्हॉट ?..एक आनंदाची बातमी आहे ."
ती त्याच्यावर हसत म्हणाली , " आज काय खास सारांश इतका खुश आहेस ..आणि कसली बातमी बर !! मला नाही जमणार गेस करायला तुच सांग .."
तो आनंदित होत म्हणाला , " तू असच करतेस आधी प्रयत्न तरी करून बघायचा !! असो ऐक फायनली आपली भेट होऊ शकते ..मला एक महिन्याने कोल्हापूरला यायच आहे तेव्हा मी दोन दिवस जास्त सुट्ट्या काढेन मग आपण गोव्याला भेटू ..तुला आवडेल ना ? "
ती खजील होत म्हणाली , " आवडेल रे पण मृन्मयला काय सांगू ? शिवाय संध्या असते सोबत मग तिला कुठे सोडू .. नाही वाटत जमणार मला .."
सारांशच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठेतरी दूर पळाला होता आणि तो त्याच स्वरात म्हणाला , " बघ ना प्लिज नंतर मलाही जमणार नाही यायला ..आणि मला एकदा भेटायचं आहे तुला ..बघ ना काही होत असेल तर !! प्लिज .."
तिला सर्व मॅनेज करणं कठीण होत त्यामुळे तिने नकार कळविला ..तर तो तिला विनंती करत होता ..शेवटी तिने एकल नाही म्हणून त्याने रागात फोन ठेवून दिला ..त्यानंतर प्रत्येक वेळी त्याच्या चेहऱ्यावर उदासी पसरली दिसायची..तिला त्याला तस पाहवत नव्हतं म्हणून तिने मृन्मयला खोट कारण सांगितलं ..त्याची काही हरकत नव्हती पण मेन प्रॉब्लेम होता तो संध्याचा ..संध्या एक दोनदा तिच्या मावशीकडे गेली होती आणि संध्याची भैया सोबत छान गट्टी जुळली होती म्हणून तिने संध्याला त्त्यांच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला ..जेव्हा ही गोष्ट तिने सारांशला सांगितली तेव्हा तो खूप खुश झाला होता आणि तेव्हढीच खुश होती ती नित्या ..कारण नित्याला सारांशला डोळे भरून पाहता येणार होत ..ज्यासाठी ती कितीतरी आतुर होती..
इस कदर मोहब्बत है तुझसे
दूर रेहकर भी दूर नही
खुशीया दे जाती है तेरी हर एक बात
तो सोचती हु मिलन की शाम कैसे होगी ?
क्रमशः ..