Touch - Unique Features (Part 27) in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 27 )

Featured Books
Categories
Share

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 27 )


इक हसरत है के तुझे हर पल चाहु
दुनिया की भिड से हर पल छुपाऊ
तकदिर साथ दे तो शायद जिंदगी बन जाये
ना साथ दे तो तेरी आखरी सास तक सिर्फ तुझसे जुडना चाहु

नित्या आणि सारांशच आयुष्य एका वेगळ्या वळणाला लागलं होतं ...ज्यात ते एकमेकांना ओळखत होते , समजून घेत होते आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांचे स्वप्न पाहत होते ..त्यांना ओढ होती ती एका भेटीची ..ज्या व्यक्तींने दोघांचेही आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं आहे त्या व्यक्तीला भेटण्याची ..पण नशिबाला कदाचित ते मान्य नव्हत..सारांशला ऑफिसमधून सुट्टी काढता येत नव्हती तर नित्याला घराच्या बाहेर पाऊल टाकता येत नव्हतं ..या सात वर्षात तिने आपलं जीवन बनवून टाकलं होतं..एका बंदिस्त वातावरणात स्वतःला ठेवलं होतं ..ना कुणाशी भेटण्याची इच्छा होती ना कुणाशी संबंध ठेवण्याचा मानस ..पण अचानक तो आला आणि तिला या वातावरणातून बाहेर पडायच होत त्यामुळे तिला भेटीची आणखीच ओढ लागली होती ..
त्यांचं आयुष्य बऱ्यापैकी पूढे जाऊ लागलं होतं आणि ती त्याच्यासोबत आनंदीदेखील राहू लागली होती पण अलीकडे काय माहिती नित्या जरा उदास राहू लागली होती ..अचानक तिच्या चेहऱ्यावरून हसू कुठेतरी गायब झाल होत ..ती बोलायची पण नेहमी असणारा उत्साह तिच्या चेहऱ्यावरून उडत चालला होता ..ती मॅसेजवर बोलत असताना त्याला ते सहसा जाणवत नव्हतं पण एखाद्या वेळी कॉल केला की मात्र त्याला ते जाणवत होतं ..सुरुवातीला त्याने त्याबद्दल तिला विचारन टाळलं होत पण नंतर - नंतर त्याच गोष्टी घडत गेल्याने त्याने तिला विचारायला सुरुवात केली होती तर ती त्याला वेळ आल्यावर सांगेल म्हणून वेळ मारत होती ..नित्या वेळ आल्यावर सांगेल अस म्हणायची तेव्हा त्याला कळून चुकलं होत की तिच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी घडत आहे ..ज्याबद्दल तिला आपल्याला काहीही सांगायचं नाही ..त्यामुळे वाट पाहणंच त्याने योग्य समजलं होत ..पण अलीकडे ती दुःखी राहू नये म्हणून तो सतत तिची काळजी घेत होता , तिला हसवत होता ..म्हणूनच कदाचित ती त्यावेळी देखील स्वतःला सावरू शकत होती ...

तुम साथ हो तो
जमाणे से लढ जाऊंगी
तेरा साथ रेहना ही
मेरी सबसे बडी ताकद है

नित्या शांत राहू लागली आणि पाहता पाहता दोन महिने निघून गेले ..असाच एक दिवस उगवला ..सकाळपासून नित्याचा एक मॅसेज आला नव्हता की कॉल आला नव्हता ..सकाळी त्याने तिला कॉल लावायचा प्रयत्नदेखील केला होता पण तिचा मोबाइल बंद येत होता ..तो मनातून फार घाबरला होता म्हणून दर तीस मिनिटात तो तिला मॅसेज करत होता परंतु त्याचा एकही मॅसेज तिला जात नव्हता त्यामुळे सारांशला फारच भीती वाटू लागली होती ।.काळजीने आज सारांशने दुपारी जेवण देखील करणे टाळले होते ..सुमारे तीन वाजताची वेळ होती ..नित्याचा मोबाइल ओपन झाला आणि पटापट सारांशचे मॅसेज तिच्या मोबाइलवर येऊन धडकले ..त्याला काळजी वाटत असेल म्हणून तिने लगेच कॉल केला ..सारांश तिच्या फोनची वाटच पाहत होता ..कॉल येताच तो रिसिव्ह करत म्हणाला , " कुठे आहेस नित्या ? केव्हाचा फोन , मॅसेज करतोय ..आणि फोन का बंद ठेवला आहेस ? किती काळजी वाटत होती मला .."

नित्या लांब श्वास घेत म्हणाली , " हो ..हो ..जरा शांत हो !! ..सॉरी मी जाणूनच बंद केला होता मोबाइल ..मृन्मयच्या बाबांची डेथ झाली आहे त्यामुळे इकडे यावं लागलं ..खर तर इच्छा नव्हती पण सर्व घेऊन आले आणि मला नकार देता आला नाही ..सॉरी काळजी करू नकोस माझी ..आणि स्वतःची काळजी घे .तुला कळवाव म्हणून कॉल केला आहे ..बाकीच नंतर बोलू ..आता मला तुझ्याशी बोलता येणार नाही ..बाय .."

तो समोर काही बोलणार तेवढ्यात तिने फोन ठेवला ..सारांशची तिच्याबद्दलची काळजी मिटली होती पण मृन्मय हे नाव एकूण त्याला कुठतरी बर वाटल नव्हतं तरीही त्याने काहीही चुकीचा विचार केला नाही ..तो दिवसभर काम करून थकला होता आणि सायंकाळी घरी पोहोचला..छान फ्रेश होऊन बेडवर पडला आणि मोबाइल चेक केला त्यावर नित्याचा मॅसेज येऊन होता ..

📱सॉरी सारांश मला माहित आहे तू माझ्याशी बोलण्यासाठी वाट पाहत असशील पण आज मला घरी यायला थोडा वेळ लागेल तेव्हा माझी वाट नको पाहुस ..शांत झोप ..मीही घरी गेल्यावर फ्रेश होऊन पडते ..तशीही खूप थकले आहे ..बोलण्याची मानसिकता नाहीये माझी ..पुन्हा एकदा सॉरी..बाय काळजी घे शुभ रात्री ..

सारांश तिच्याशी बोलण्यासाठी सकाळपासून वाट पाहत होता पण ती ऑनलाइन येणार नसल्याने त्याचा मूडच खराब झाला आणि त्याने तिला विश न करताच झोपण्याचा निर्णय घेतला ..

नित्या सासऱ्यांचे अंतिम संस्कार आटोपून उशिराच घरी परतली होती ..ती थकली असताना देखील सर्वाना भूक लागल्याने तिने स्वयंपाक बनविला आणि स्वतःही थोडस जेवण करून बेडवर पडली ..तेंव्हापर्यंत रात्रीचे 12 वाजले होते ..तिने मोबाइल हातात घेतला पण सारांशचा मॅसेज तिला दिसला नाही ..तिला कळून चुकलं होत की सारांश तिच्यावर रागावला आहे ..तिने लांब श्वास घेतला आणि एक मॅसेज टाइप केला ...

📱सॉरी सारांश ..मला हे तुला फार आधीचं सांगायचं होत पण राहून गेलं ..तू म्हणतोस ना की मी थोडी शांत शांत राहते तर तू योग्यच समजलं होतंस ..त्यालाही कारणे आहेत आणि मला वाटतं हीच योग्य वेळ आहे तुला सर्व काही सांगण्याची ..तुला आठवतंय सारांश तू मला आपल्या मनातलं सांगितलं होतं तो दिवस ..खर सांगू तर त्यादिवशी मी तुला होकार दिला असता पण माझं नशीब की काय माहिती नाही अगदी त्याच दिवशी मृन्मय आणि संध्या घरी आले होते ..मला परत नेण्यासाठी ..त्यादिवशी मी त्याच्याशी वाद घालत होते आणि तुझ्याशिही बोलत होते ..तुझे शब्द मला नवीन जगात घेऊन जात होते तर मृन्मय आणि घरच्यांचे शब्द मला पुन्हा त्याच भीतीदायक जगात घेऊन जात होते ..मी एका वळणावर उभे होते जिथे मला एकच वाट निवडायची होती आणि नेमकं तेच मी करु शकत नव्हते..माझी अवस्था त्यादिवशी कुणालाच कळली नाही ..डोळ्यात अश्रू होते पण तेही कुणाला दाखवता आले नाही ..म्हणूनच मी तुला माझ्या मनातल सांगू शकले नाही ..तुला त्यानंतरही हे सर्व सांगायचं होत पण आयुष्यात पहिल्यांदाच आनंद आला होता त्यामुळे ते सांगून त्यावर विरजण घालायचं नव्हतं ..कदाचित त्याच्या येण्यामुळेच मी तुला दुखावल होत ..त्यादिवशी माझ्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते आणि म्हणूनच मी म्हणाले तुला की मला प्रेम करण्याचा अधिकार नाही ..मी जेव्हा जेव्हा विचार करते की माझ्या आयुष्यात काहीतरी चांगल घडणार तेव्हा काहीतरी दुःखच लिहून ठेवल असत ..त्या दिवसापासून काका - मावशी माझ्या मागे लागले की परत घरी जा ..आता तो बदलला आहे ..रोज तेच ते ऐकून मला राग येत होता म्हणून कदाचित मी तशी वागत होते .तुझ्याशिही रागावूनच बोलत होते.आणि बघ ना आता तर सासरे पण गेले म्हणजे संध्याची काळजी घेणार कुणीच नाही म्हणजे आता सर्वच प्रेशर आणतील मला जाण्यासाठी..मी मरणाला गेले आणि तिथे आजोबा, आजी , मावशी , काका मला तेच सर्व समजावत होते की परत जा ..रोज रोज तेच सर्व एकूण मला त्रास होतोय त्याचा ..फक्त तुला त्रास होऊ नये म्हणून सांगितलं नाही ..आशा आहे माझी स्थिती समजून घेशील ..सॉरी इतके दिवस हे सर्व लपवून ठेवलं त्यासाठी ..पण माझी मनस्थिती नव्हती हे तुला सर्व सांगण्याची ..

नित्याने मॅसेज सेंड केला नि मोबाइल बंद करून बेडवर पडली ..बऱ्याच वेळा विचार केल्यावर थकली असल्याने तिला झोप लागली ..

दुसऱ्या दिवशी मावशीच्या आवाजाने नित्याला जाग आली ..तेव्हा बहुतेक सात वाजले होते ..तिने मोबाइल बघितला तेव्हा सारांशचा मॅसेज आला होता ..तिने डोळे चोळतच मॅसेज ओपन केला

📱मला जाणवत होतच की काहीतरी नक्की घडलं आहे !! ..फक्त तुला स्पेस देता यावी म्हणून मी ते विचारलं नाही ..नक्किच समजू शकतो तुझी स्थिती पण कदाचित तू शेअर केलं असत तर तुला हलकं वाटलं असत ..असो काही हरकत नाही ..ते फोर्स करत आहेत ते ठीक आहे पण मला सांग तुला काय वाटत ..मृन्मयकडे जायला हवं की नाही ?

तिने त्याचा मॅसेज पाहिला पण उत्तर दिलं नाही ..उलट फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये निघाली ..आज मावशीने स्वतः तिला चहा आणून दिला होता ..तिने तो घेतला आणि शांत विचार करत बसली ..काका , मावशी व्यतिरिक्त कुणी उठल नव्हतं त्यामुळे घरात थोडी शांतता होती ..शांत होऊन तिने चहा घेतला आणि काकांसाठी टिफिन बनवू लागली परंतु त्या सर्वात ती सारांशच्या प्रश्नाचं उत्तर शोधत होती ..ती स्वतःच्याच विचारत हरवली होती ..रूममध्ये काका घाई करू लागले होते त्यामुळे लवकर टिफिन आवरत तिने काकांना दिला ..कालचा थकवा अजूनही गेला नव्हता त्यामुळे अंगावर गरम पाणी घेत ती बेडरूममध्ये येऊन पडली ..त्यावेळी दुपारचे 2 वाजले होते ..तिने मोबाइल हातात घेतला..त्यावर त्याचा मॅसेज येऊन नव्हता त्यामुळे जुन्याच मॅसेजच उत्तर ती देऊ लागली ..तिने पटापट मॅसेज टाइप करायला सुरुवात केली

📱 तुला ह्याच उत्तर माहिती आहे सारांश ..ज्याने माझ्याशी सतत चुकीची वागणूक केली आहे त्याच्याकडे जायला मन मानत नाही ..एकदाच विचार करून गेलेही असते पण त्याने माझ्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण केले ..हाच विचार मनात सतत येत असताना मी त्याच्यासोबत सुखाने राहू शकत नाही ...

बहुतेक सारांश तिच्या मॅसेजची वाट पाहत होता आणि तो उत्तरला ..

📱 गुड ..काळजी नको करू तुझ्या प्रत्येक निर्णयात मी सोबत आहे ..फक्त स्वतःची काळजी घे आणि कुणी काहीही म्हणू दे तुला जे योग्य वाटत तेच कर..पण कुणाच्या दबावात येऊन निर्णय घेऊ नको ।.प्रत्येक वेळी हीच चूक करत आली आहेस आता तरी स्वतःसाठी जग ..

📱हमम ..सारांश एक सांग, तुलाही मी जे करतेय ते चुकीच वाटत का रे ?# नित्या

📱 वेडी आहेस का !! मला कळते तुझी स्थिती आणि तू आपल्या स्थितीत योग्य आहेस आणि शुभम आहे ना तुझ्या सोबतीला मग कसली भीती ..तुला जे वाटत तेच कर बाकी इतरांच काहीही ऐकू नको ..# सारांश

📱प्रयत्न तर करतेय !! बघू काय होत तर पण भीती वाटत आहे ...# नित्या

📱होईल ग सर्व नीट काळजी नको करू मी आहे न सोबत ..# सारांश

📱म्हणून तर आधार आहे मला ..पण एक गोष्ट विचारू तुला ? # नित्या

📱हो विचार !!# सारांश

📱तुला काय वाटत मी जायला हवं की नको ..? # नित्या

📱 इथे मला काय वाटत त्याचा प्रश्न नाहींये ..तुला काय वाटत ते महत्त्वाचं आहे ना डिअर ..कारण शेवटी जगायच तुलाच आहे..तुला जेवढं त्याच्याबद्दल माहिती आहे तेवढं कुणालाच माहीत नाही त्यामुळे निर्णय तुलाच घ्यावा लागेल ..# सारांश

📱हो ते आहेच तरीही तुला काय वाटतला जाणून घ्यायच आहे कारण एक प्रियकर असतानाही तू माझा गाईड आहेस तेव्हा तुझं मत खूप महत्त्वाचं आहे मला ? # नित्या

📱मन म्हणत आहेस नको जाऊ ..माझं प्रेम आहे ना तुझ्यावर म्हणून कदाचित असेल ते ..मी स्वार्थी बनून विचार करतोय .मृन्मयच नाव ऐकूनही तिरस्कार वाटतो ..त्यामुळे तू तिथे गेलेलं मला आवडणार नाही... # सारांश

📱आणि डोकं काय म्हणत ? # नित्या

📱 ते म्हणत की तू जायला हवं ..त्यामागे कारण आहे ..तू जस सांगितलं त्याप्रमाणे तुझा नवरा सेक्स अडिक्टेड आहे असं जाणवत त्यामुळे संध्याच आयुष्य धोक्यात आहे ..मला मृन्मयशी काहीही घेणं देणं नाही पण तुझ्या मुलीशी आहे ..वाद दोघांचे होते त्यात मुलीची काहीच चुकी नव्हती मग त्यात शिक्षा तिला मिळते आहे ...कधीतरी तुलाही स्वतःची आई सोडून गेली आणि एक सहन करणारी नित्या जन्माला आली ..काही वेळ विचार केला नि संध्याला समोर पाहिलं तर जाणवेल की तुझ्याविना तीचही आयुष्य कुठेतरी असच होईल ..आई नसणे म्हणजे शाप असतो ग ?..अर्थात हे फक्त माझं वयक्तिक मत आहे ..फक्त संध्याचा विचार करून स्वतःच्या मनाला मारनही कुठेतरी योग्य वाटत नाही ... पण एक निर्णय तर घ्यावच लागेल ..मला वाटत तू आपल्या मनाविरुद्ध काहीही निर्णय घेऊ नये ..

त्याचे विचार एकूण तिचा थोडा गोंधळ उडाला होता कारण सारांश फक्त तिचा जीव नव्हता तर तो तिचा गाईड पण होता ..त्याने संध्याबद्दल म्हटलेला प्रत्येक शब्द तिला पटला होता ..त्यामूळे ती एका वेगळ्याच विचारात हरवली होती ..काही क्षण गेले नि तिने मॅसेज केला ..

📱पटत आहे तुझं म्हणणं पण सध्या मी अशा स्थितीत आहे की विचार करू शकत नाही तेव्हा आता सर्व नशिबावर सोडते ..निर्णय जोही घेईल तेव्हा तुला नक्की कळवेन तेव्हा आता माझी काळजी करू नको ..तुझंही एक आयुष्य आहे त्याचा विचार कर ..माझ्यात गुंतून नको राहुस ..स्वतःच्या भविष्याचा जरा विचार कर ..कळलं बाय

तिने बाय म्हणताच दोघांनीही फोन ठेवून दिला ..पण एक प्रश्न तिच्या समोर येऊन पडला होता ..माझी इच्छा तर नाहींये पण मला पुन्हा एकदा नाईलाजाने तिकडे जावं लागलं तर नक्की काय होईल ? मी फक्त संध्यासाठी ती नाती पुन्हा नव्याने जुळवू शकेल का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसे सर्व म्हणतात तसे तो खरच बदलला आहे का आणि नाही बदलला असेल तर ते सर्व मी खरच पुन्हा सहन करू शकेन का ?

अजीब रंजीश है
जमाणे के सोच की
गलत कोई भी हो
झुकना तो मुझेही है ..

क्रमशः ..