Touch - Unique Features (Part 26) in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 26 )

Featured Books
Categories
Share

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 26 )





तुम केहते नही
फिर भी हम जाण लेते है
मोहब्बत होठोसे नही जान
दिलं से बया होती है ...

नित्याला आज खऱ्या अर्थाने प्रेमाचा अर्थ सापडला होता ..सारांशचे विचार कायम सकारात्मकता घेऊन येत असतात अशी सकारात्मकता जी दुःख दूर करू शकत नाही पण त्या दुःखावर उपाय काढण्याच काम नक्कीच करत असते ..जेव्हा आपण नकारात्मक होत जातो तेव्हा डोकं विचार करणे बंद करून जात पण सकारात्मकता दुःख असनुही त्याक्षणी आपण यातून मार्ग कसा काढायचा ते दाखवते ..मग ते दुःख कोणतंही असो प्रेमाचं किंवा इतर ..नित्या त्याच्यात हरवलीच होती की त्याचा तिला मॅसेज येऊन दिसला ..

दिलं चाहता है की बेइंतेहा प्यार करे
पर शर्त ये है की तू इकरार करे
तुमसे मोहब्बत है इस बात से कैसे इन्कार करे
गवारा नही के तुझे कोई और प्यार करे
छुपालु तुझको पलकोमे सारी बलाये लेके
आती है दिलं तक तेरी आहटे
तू आये चेहरेसे निगाहे ना हटे
क्यू तुझमे ईतना दिवाना हुआ जाता है
याद नही जाती बस पागल सा हुआ जाता है
क्यू इतना लगावं है तुझसे समझ नही आता
पर तू इकरार करे यही दिलं चाहता है ..

त्याची कविता वाचताच नित्याने त्याला टेक्स्ट केला

📱 लव्ह यु सो मच सारांश ..यु आर द ओन्ली पर्सन हु मेक्स मी स्पेशल अँड ऑलवेज रिअलाइज दॅट द आय एम समथिंग इन धीस वर्ल्ड ..थॅंक्यु सो मच फॉर कमिंग इन मय लाइफ ..आय एम वेरी लकी दॅट आय हॅव स्पेशल पर्सन लाईक यु इन माय लाइफ .."

ती त्याला मॅसेज करून त्याच्या उत्तराची वाट पाहू लागली पण त्याचा काहीच रिप्लाय आला नव्हता म्हणून उदास होऊन फोन बाजूला ठेवून ती बेडवर पडली .पंधरा मिनिटे झाली असतील तेव्हाच तिचा मोबाइल वाजला ..तिने फोन गडबडीत हातात घेतला त्यावर त्याचा मॅसेज होता ..तिने लॉक ओपन केला नि मॅसेज वाचू लागली ..

📱डोन्ट बी ..आय थिंक आय एम द लकी पर्सन दॅट यु हॅव इन माय लाइफ ..फायनली आय फाउंड द गर्ल हु कनेक्ट्स मी ऍट द वेरी फर्स्ट मिटिंग अँड आय वॉन्ट टू किप यु ऑलवेज इन माय लाइफ ..यु टेल मी व्हॉट इज लव्ह !!! आय कांट थिंक माय लाइफ विदाउट यु .लव्ह यु सो मीच डिअर .."

मॅसेज वाचून नित्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू जमा झाले होते ..तिने पुन्हा एकदा त्याला मॅसेज केला ..

📱 इतकं प्रेम करतोस माझ्यावर ?

ती दोन मिनिटं त्याच्या मॅसेजची वाट पाहत होती पण त्याच उत्तर आलं नाही म्हणून पुन्हा तिनेच मॅसेज केला

📱 सांग ना , गप्प का झालास ?

📱कैसे बया करू मैं
हाल दिलं का दुनिया से
क्या चंद लफजो मे भी कभी
मोहब्बत बया हुई है
ये तो महज इक अदायगी है
जो हर कोई युही कर लेता है
पर बेइंतेहा मोहब्बत तो हमने
तेरे दिलं मे झाक कर जानी है

मॅसेज आला नि नित्या मॅसेजकडेच बघत होती ..आज बहुदा तिच्या डोळ्यांनी वाहण्याचीच शपथच घेतली होती ..ती त्यात इतकं हरवलं होती की रिप्लाय करायचे तिला भान राहले नाही ..तेव्हा समोरून सारांशनेच मॅसेज केला ..

📱 काय ग काय झालं ? पुन्हा रडत आहेस की काय ? विचित्र कोड आहेस बाबा तू ..आधी दुःख होते तरी रडायची आणि आता आनंद आहे तरी रडतेस ..

📱तुला नाही कळणार ते!! पण मला सांग माझ्या डोळ्यात पाणी आहे ते तुला कस कळलं ? # नित्या

📱 ते का !!!...आता तुझ्या हृदयाच्या तारा माझ्या हृदयाशी जुळल्या आहेत ना म्हणून मला सर्व लक्षात येत बघ ..डोन्ट क्राय नित्या आय हेट टिअर्स!! # सारांश

📱हाउ फिल्मी ना🤭!! असाच गोड गोड बोलतोस म्हणून साहेबांची फिमेल फोल्लोविंग जास्त आहे बघा..# नित्या

📱 ते तर आहेच पण ते फॅन्स नसते तर तुही नसतीस ना माझ्या आयुष्यात ..त्यामुळे ते गोड बोलणं असच राहू दे🤪# सारांश

📱हा पण आता जर कुणी प्रपोज केला नि त्यावर तू उत्तर दिलेस तर बघच !! मग सांगते तुला😡 # नित्या

📱 प्रेयसीला ईर्षा होतेय🤭 मज्जा !! काही खर नाहीये बाबा माझा आताच आणि समझा लग्न झालं तर काय होईल काय माहिती ..? # सारांश

📱 मग तर कुणाचा मॅसेज पण तुला आलेला मला आवडणार नाही ..# नित्या

📱🤭🤭🤭🤭# सारांश

📱असा काय हसतोस ? # नित्या

📱काही नाही ..# सारांश

📱ए सारांश तू खरच माझ्याशी लग्न करणार आहेस ? # नित्या

📱 हो मग फक्त तुझा होकार हवाय ..आहे का तुझा होकार ..चल मग करू लग्न ..# सारांश

📱🙂 माहीत नाही ..पण तू हे म्हणालास एकूणच बर वाटल ..बर सारांश सर ..आपण रात्रभर बोलत बसलो तरी कमीच वाटत ..चला उद्या ऑफिस आहे ना तुमचं ..लवकर पडा बर !! # नित्या

📱ए नित्या नको ना जाऊस !! थोडा वेळ तरी थांब !! # सारांश

📱अजिबात नाही ..दिवसभर काम करतोस नि आता जास्त जागतोस ..अशाने तब्येत खराब होईल तुझी !! आणि तू जीव आहेस माझा ..तुझी काळजी आहे मला चल झोप ..लव्ह यु ..#नित्या

📱लव्ह यु टू ..😘😘 गुड नाईट

नित्यानेही त्याला विश केलं आणि झोपी गेली ..

सारांशच्या येण्याने नित्याच आयुष्य फार बदललं होत..ती हसायला लागली होती..जरी तिने त्याला तिच्याबद्दल स्वप्न पाहायला मनाई केली होती तरी ती मात्र त्याच्या स्वप्नात रममान राहत असे ..तिने स्वतःच एक वेगळं जग उभं केलं होतं ..त्यात फक्त तो आणि ती होती ..सारांश नित्यापासून जवळपास चारशे किमी दूर राहत होता पण मनाने त्यांच्यात कधीच अंतर येत नव्हतं उलट ते इतरांपासून स्वतःच एक नवीन जग तयार करण्यात व्यस्त होते .सारांशबद्दल सतत विचार करणे , तो ऑनलाइन यावा म्हणून त्याची सतत वाट पाहणे नित्याला फार आवडत होत ..नित्याने ह्याच गोष्टी आपल्या पार्टनरमध्ये कायम शोधल्या होत्या पण लग्नानंतर त्यातलं अस काहीच घडलं नव्हतं परंतु सारांश आला नि ती ते सर्व काही जगू लागली ..सारांश आपल्याशी लग्न करायला तयार आहे हे ऐकून तिला फार आनंद झाला होता आणि तिलाही तेच हवं होतं पण ती विवाहित आहे , तिला मुलगी आहे आणि अजूनही तिचा घटस्फोट झाला नाहींये हे आठवल्यावर तिला बेचैन व्हायचं आणि आपण सारांशवर कायम ओझं बनून राहू या विचाराने ती मनातून दुःखी व्हायची म्हणून की काय ती त्याला लग्नाबद्दल विचारत नसे ..पण ती आनंदी होती ...सारांश सोबत असताना जणू ती सर्व काही विसरून गेली होती ..घरात सर्वच असल्याने तिला सहसा त्याच्याशी कॉलवर बोलता येत नसे त्यामुळे कुठल्या ना कुठल्या तर्हेने ती संधी शोधून त्याच्याशी बोलत होती .तिला त्या लपून छपून बोलण्यात आणखीच मज्जा यायची ..सारांशही तिला फक्त मनातून आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होता ..

आणखी दोन - तिने महिने गेले ..नित्याच्या घराकडे गणपती बसले होते ..घरात फक्त शुभम आणि ती होती ..तिला बाहेर कार्यक्रमात जायला खूप मज्जा येत असे ..म्हणून ती छान तयार होऊन बाहेर निघाली होती ..शुभमला बाहेर यायला वेळ असल्याची संधी बघत तिने सारांशला कॉल केला ..समोरून फोन उचलत तो म्हणाला , " बापरे !! आज चक्क आपला कॉल ..नाही तर मला कितीतरी वेळ सांगावं लागत कॉल कर म्हणण्यासाठी ..काही खास आहे का आज ? "

नित्या त्याच्यावर हसत म्हणाली , " इच्छा तर माझीही असते पण नाही जमत काय करू ..आज भैय्या घरात आहे आणि मी बाहेर आलेय गणपती बघायला म्हणून म्हटलं कॉल करावं .."

थोडा उदास होत तो म्हणाला , " म्हणजे तो नाहीये म्हणून कॉल केलास तर !! "

नित्या त्याच्यावर हसत म्हणाली ," ए नौटंकी चूप !! ये दर्शन घ्यायला जोड्याने दर्शन घेऊ .."

सारांश तीच बोलणं ऐकून सिरीयस होत म्हणाला , " पण एक प्रॉब्लेम आहे ? "

ती विचार करत म्हणाली , " कसला रे प्रॉब्लेम ? "

आणि तो हसत म्हणाला , " गणेशाचे दर्शन घेण्यापूर्वी आधी तुमचे तर दर्शन द्या ..किती दिवसापासून मागे लागलोय फोटो सेंड कर म्हणून तर ऐकत पण नाहीस .."

ती हसत म्हणाली ," अस होय ! तर काय झालं ये दर्शन घ्यायला मग घे स्वतःच बघून !! "

तो जरा रागावत म्हणाला , " हो राहू दे ..फोटो तर सेंड करत नाही आणि म्हणे ये भेटायला ..मी नाही येणार कधीच .."

ती त्याला चिडवत म्हणाली , " नक्की नाही येणार का ? की भेटायला की धावत येशील .."

आणि तो खजील होत म्हणाला , " नाही यायचं मला .."

ती त्याच्यावर पून्हा हसत म्हणाली , " अरेरे ! रुसलास की किती मस्त दिसतो ना !! बर आज फोटो ठेवते मी माझ्या प्रोफाइलवर बघून घे झालं !! पण मी थोडी मोटू आहे हा तेव्हा बघून घाबरू नकोस .."

तो तिच्यावर नाराज होत म्हणाला , " तू फोटो सेंड करायचं काम कर फक्त..मोठी आलीस मोटू म्हणणारी आणि तू जशीही असलीस तशीच मान्य आहे ..चेहरा पाहून प्रेम बदलणार त्यातला मी नाही .."

तिला कळून चुकलं तो तिच्यावर रागावला आहे आणि त्याचा राग शांत करत ती म्हणाली , " सॉरी रे !! पण जे आहे तेच आधीच सांगून द्यावं म्हटलं बाकी काही नाही ..आणि हो देते तुला फोटो आज घरी गेल्यावर ..आता तरी हस ना !! प्लिज माझ्यासाठी .."

तो किंचित हसत म्हणाला , " ठीक आहे पण यापुढे अस काही बोलू नको ..मला नाही आवडत .."

ती हळूच हसत म्हणाली , " बर बाबा चूक झाली ..सॉरी ..कान पकडू का ? "

तो तिच्यावर हसत म्हणाला , " नको त्याची गरज नाहीये ..जा आधी दर्शन घे मग फोटो सेंड कर आठवणीने ..मी जेवण करून घेतो .बाय "

ती थोडी रुसत म्हणाली , " बर कर जेवण ..बोलू रात्री .बाय "

नित्या आणि शुभमच जेवण आज बाहेरच होत त्यामुळे दर्शन घेऊन घरी परत यायला त्यांना बराच वेळ लागला होता ..तर इकडे सारांश तिची आतुरतेने वाट पाहत होता ..त्याने कितीतरी वेळ तिची प्रोफाइल चेक केली होती पण त्याला तिचा फोटो दिसला नव्हता ..तो पाहत जायचा नि पुन्हा फोटो न दिसल्याने शांत बसायचा ..सुमारे तासभर तो असच करत होता ..त्याने पुन्हा एकदा प्रोफाइल चेक केली तेव्हा तिचा फोटो त्यावर होता ..त्याने क्षणाचाही विलंब न करता फोटो झुम केला नि तिचा पहिला फोटो पाहू लागला ..अगदी काळी सावळी तरीही चेहऱ्यावर तेज असणारी नित्या चेहऱ्यानेही त्याला भावली होती ..तिचे शांत आणि काळे डोळे त्याला तिच्याकडे आकर्षित करत होते तर फोटोमध्ये ती समुद्रात समोर हाताने पाण्याचा वर्षाव आपल्या भौय्यावर करत होती ...त्या क्षणात ती आणखीच लहान बनली होती आणि सगराप्रति असलेल तीच प्रेम त्याला आधीच माहीत होतं ..तिच्या फोटोत तो हरवलाच होता की वरून तिचा मॅसेज आला

📱 आहे ना मी मोटू ?

तो तिच्या शब्दांवर क्षणभर हसला आणि म्हणाला

📱 अगर बोलती तसविरे तो केहता उनसे
तुमहें चाहा तो देखकर नही
पर देखा एक बार जो तुमको
तो चाहत और बढने लगी ।।

तुलाच वाटत तस ..मला तर फार सुंदर वाटत आहेस ..सुदृढ असन ह्याला मोटू थोडी म्हणतात आणि तस पण मोटू असतीही तरी मला काही फरक पडला नसता ..माझं प्रेम तर नक्कीच कमी झालं नसत ..

📱हो पण जोडी कशी दिसली असती आपली ...एक मोटू आणि दुसरा बारीक🤭🤭

📱तुझको धुंडा है अकसर मैने
एक तसविर मे बंद पंछि की तरहँ
आज देखा तो जाना है
खूबसुरती रंगो मे नही सादगी मे होती है

म्हणू दे मग ..मला नाही फरक पडत जगाचा ..जशीही आहेस माझी आहेस ..कळलं ..तू भेट एकदा मग सांगतो तुला ..# सारांश

📱 कुणीतरी म्हणाल होत की मी भेटणारच नाही कधीच # नित्या

📱ते रागात म्हणलो होतो पण आता भेटायचं आहे एकदा ..# सारांश

📱खरच मलाही ओढ लागली आहे तुझ्या भेटीची ..केव्हा होईल रे आपली भेट की होणारच नाही ..# नित्या

📱इंतजार है ऊस लमहें का
जिस्मे कैद होणा चाहता हु
बंदिशे होगी जमाणे की जरूर
फिर भी तेरा होणा चाहता हु .

होईल भेट नक्कीच बघच तू आणि ती भेट आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय भेट असेल ...तुला आवडेल मला भेटायला ? # सारांश

📱फक्त आवडणार नाही ..मी वाट पाहत आहे त्या क्षणांची ..तुला एकदा डोळे भरून पाहण्याची आणि त्याच डोळ्यात कायम साठवून ठेवण्याची ..

कशी असेल रे आपली भेट ?

इक इजाजत दे आज
के एक दिन हो तेरी बाहो मे
दुनिया को भुलकर सनम
चलना चाहता हु तुझं संग राहो मे ..

क्रमशः ...