विभाजन
(कादंबरी)
(16)
आम्ही भारतीय आहो असं मानत आणि म्हणत आम्ही देशात राहतो. काश्मीरला आम्ही आमच्या देशाची शान समजतो. नव्हे तर त्या काश्मीरला आम्ही आमच्या नकाशातही दाखवतो. तसेच त्या ठिकाणी असलेल्या अमरनाथ गुफेत प्रकट होणा-या शिवलिंगाचे अर्थात बर्फानी बाबाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हिंदू भावीक जातात. नव्हे तर त्या ठिकाणी लावलेल्या दुकानातील माल घेवून त्या काश्मीरच्या लोकांना जगवतो. तिथे सेना ठेवून त्या सेनेच्या मदतीने पाकिस्तानात दडलेल्या आतंकवाद्याकडून आम्ही त्या काश्मीरच्या लोकांची सुरक्षा करतो. बदल्यात आम्हाला काय मिळतं?
काश्मीर ही घाटी आहे. अत्यंत बर्फाच्छादीत प्रदेश. उन्हाळ्यातच काही दिवस थोडं गरमपणा. बाकी वर्षभर थंड वातावरण. तेवढंच रमणीयही. याच काश्मीरला भारताचा स्वर्गही म्हणतात. अशा या भागाला स्वर्ग संबोधून आमच्या भारतातील ब-याच भागातील पर्यटक तिथे फिरायला जातात. मनसोक्त आनंद घेवून मोकळे होतात. दरवर्षी यात्रेलाही इथली मंडळी जातात. तिही मनसोक्त आनंद घेवून मोकळे होतात. याच यात्रेदरम्यान तेथील स्थानिक रहिवासी दुकान लावतात काही लोकं पर्यटक म्हणूनही जातात, नव्हे तर याच दुकानाच्या भरवशावर संबंधीत भारतातील नागरीकांना लुटून पैसा कमवितात. तो एवढा पैसा येतो की आलेल्या पैशातून वर्षभर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. तसेच आनंदानं जीवन जगायला मिळतं. समजा आम्ही काश्मीरला गेलोच नाही तर... ...
आज काश्मीर धगधगत आहे. आपल्याच माणसांना तेथील लोकं छळतात. त्यांचे रक्षणार्थ पाठवलेल्या सैनिकांना ते छळतात. त्यांना दगडधोंडे मारतात. हेल्मेटने मारतात. नव्हे तर त्यांचं सुरक्षाकवचही मागतात. त्यांना शिव्या देतात. प्रसंगी हत्याही. आज कितीतरी भारतीय जवान शहीद झालेले आहेत. युद्धावर लढता लढता वीरमरण आल्यास ठीक आहे. पण असं भाकड मरणं सैनिकांनाही आवडत नाही. तरीही ते मरण पत्करावं लागतं. याला जबाबदार सरकारचं धोरण. काय आमच्या सैन्यात ताकद उरलेली नाही काय? काश्मीरच्या या फितूर लोकांशी लढण्याची? आहे आमच्यात ताकद. पण आमचं सरकार ती सैनिकांची ताकद चालू देत नाहीत. ऐमचे सैनिक युद्धात शेकडो सैनिकांशी लढू शकतात. मग या काश्मीरच्या स्थानिक लोकांशी का बरे नाही लढणार! जे की यांना दगडधोंडे मारतात. अश्लिल शिव्या देतात. काय आमच्या सैनिकांना मायबहिण नाहीत काय? आहेत, पण सरकारसाठी रागाचा आवंढा गिळून ते चूप बसतात. एका गुलामीचं जीवन जगतात. ज्याप्रमाणे पिंज-यातील वाघ केवळ चाबकानं घाबरुन विदुषकाच्या आदेशानुसार क्लुप्त्या करतो. तीच अवस्था आमच्या सरकारनं आमच्या भारतीय जवानांची केलेली आहे.
आज काश्मीर भारताचा भाग जरी असला तरी तेथे पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागत आहे. खुद्द मिलिटरीवर हमले होत आहेत. भारत माता की जय म्हणायला विरोध होतो आहे. काही ठिकाणी खुलेआम पाकिस्तानचे झेंडे फहरत आहेत. तर काही ठिकाणी भारताचे झेंडे जाळल्या जात आहेत. याच भारतात राहून. भारताचा माल खावून. खरं तर अशा भारतातच राहून भारतविरोधी नारे देणा-या वा वागणा-या वा आमच्या सैनिकांचा अपमान करणा-या माणसांवर देशद्रोहाचा खटला न चालवता थेट भारतातून हाकलूनच दिले पाहिजे आणि सांगितले पाहिजे की बाबांनो, कुठेही जा. पण आमच्या भारतात राहणा-या नागरीकांना सुरक्षीत आणि मौजेत राहू द्या. पण आम्ही तसे न करता सर्वधर्मसमभाव म्हणत, तसेच देशात सर्वांनाच स्वतंत्र्यपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे म्हणत त्या तमाम लोकांवर कारवाही न करता त्यांना मोकळे सोडतो. याचाच परीपाक की ते आमचाच माल खावून आमच्याच डोक्यावर बसत आहेत.
खरंच आज काश्मीरवर बहिष्कारच घालावं लागतं काही दिवसासाठी असं वाटत आहे. कारण आम्ही एवढी मदत करीत असतांनाही तेथील जनता आम्हाला मदत करीत नाही. सहकार्य करीत नाही. व्यतिरीक्त स्वतःला भारतीय मानत नाही. म्हणून बहिष्कार हा त्यावर रामबाण उपाय. मग पाहू पाकिस्तान त्यांना किती मदत करतोय ते. त्यांना कळून तर चुकेल बाहेरचं जग आणि आपले भाऊबंद. आज आपल्या घरातीलच एखाद्या बिघडलेल्या सदस्यावर हा उपाय केल्यावर तो सुधारतो मग हा तर काश्मीर आहे. कधी अशी कठोर पावलंही उचलायलाच हवी. तसेच सेनेलाही स्पष्ट आदेश असावेत की बिल्कुल त्यांना त्यांनी मदत करु नये. कारण तेथील जनता या आमच्याच सैनिकांचा अपमान करते. मात्र एक विशेष की सीमा रेषा एवढी कडक नियंत्रणात असावी की शेजारील कोणत्याच देशाकडून रसद येता कामा नये. खरंच कोंडी केल्याशिवाय काश्मीरमधील काही महाभाग सुधारणार नाही. मात्र कोंडी का करीत आहोत. त्याचे कारण आधीच सांगून द्यावे. बहिष्कार टाकण्यापुर्वी त्यांना काही दिवस तरी सुधारण्याची संधी द्यावी.
युसूफ धर्मानं मुसलमान जरी असला तरी त्याचं मातृभूमीचं प्रेम वाखाणण्याजोगं होतं. पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र जरी असलं तरी युसूफला त्याचा गवगवा नव्हता. तो तर भारतविरोधी वागणा-या मुस्लिमांचा राग करीत होता.
काही मुस्लिम देशात राहून पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असले तरी काही मुस्लिम खरंच युसूफच्याच स्वभावाचे होते. त्यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास त्यांना भारत देशाबद्दल मनातून प्रेम होतं. आत्मीयताही होती. तिच आत्मीयता युसूफप्रमाणेच त्यांच्या कृतीतून दिसत होती. तर काही मुस्लिम मनात एक व ओठावर एक याही स्वभावाचे होते.
काश्मीरबाबत नेहमी नेहमी वाद होत होता. नेहमी गोळीबार व हल्ले होत. एकदा भारतावर याच काश्मीर वादातून असाच पुलवामा हल्ला झाला होता. तेव्हा युसूफनं पाकिस्तानला एक खुलं पत्र लिहिलं. त्यात लिहिलं होतं की माझ्या भारताला कमजोर समजू नका. नाहीतर आम्ही तुम्हाला पूर्णतः मिटवून टाकू. जसे आम्ही शांततेत आहो. तसे आम्हाला राहू द्या. नाहीतर आम्ही जर भडकलो तर उद्या तुम्हाला आम्ही जगाच्या नकाशावरुन मिटवूनच टाकू. भारत पाकिस्तान एक करु. जेणेकरुन सिंधू नदी भारतातून वाहायला लागेल व नाथूरामची रक्षा आम्हाला त्या नदीत विसर्जीत करता येईल. तुम्ही आमच्या भारताला कमजोर समजू नका.
पुलवामा हल्ल्यात आमच्या भारताचे चाळीस जवान शहीद झाल्यानंतर अवघ्या बाराव्या दिवशी तेरवी साजरी करीत आम्ही तुम्हाला ठोस प्रत्युत्तर दिले. नव्हे तर तुम्हाला धडाही शिकविला. त्यानंतर तुम्ही चिडले. खरं तर चिडायला नको होते. कारण हा हल्ला तुमच्या विरोधात नव्हता. तर तो आतंकवाद्यांविरोधात होता. यात जैशच्या तिन चौक्या उध्वस्त केल्या होत्या.
भारत माझा देश आहे. असे आम्ही मानतो. या भारताचे स्वातंत्र अबाधित राहावे यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न ही करतो. मग या भारताच्या स्वातंत्र्यावर कोणी गदा आणण्याचा साधा प्रयत्न जरी कोणी केला तर त्याला आम्ही सोडणार कसे? खरं तर यात आमच्या देशाच्या पंतप्रधानाची प्रशंसा जेवढी करावी तेवढी कमीच आहे. कारण ते देशाचे नेतृत्व करतात. तसंच भारतीय वायुसेनेचंही अभिनंदन. कारण खरी कामगीरी त्यांनीच केली. जीवावर उदार होवून.
आम्ही आतंकवाद्यांना मारलं. आतंकवादाचा बिमोड करण्यासाठी आमचं हे पाऊल. आमचे चाळीस च्या बदल्यात तुमचे नाही तुमच्या सरहद्दीतील तिनशे. मग परत तुम्हीही त्यावर विचार न करता त्याला प्रत्युत्तर द्यायला तयार. तेही बदल्याच्या भावनेने पेटून. तुम्ही आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ भारताच्या पुछ सह पाच ठिकाणावर अंदाधुंद गोळीबारास तयार. शिवाय आम्ही भारताला न सांगता रात्री अपरात्री भारतात कुठंही हमला करु. अशी धमकीही दिली. तेही दुस-या देशातील साधनं वापरुन. अमेरीकेने गरीब देश म्हणून दानात दिलेल्या विमानाचा वापर आमच्या भारतावर हमला करतांना केला. यातील कित्येक विमानाला खदेडून टाकले भारताने. तुम्ही तर अणुबाँबची धमकी देता. पण तुम्ही लक्षात ठेवायला हवे की तुमच्या एका अणुबाँबच्या बदल्यात आम्ही किती अणुबाँब टाकू. याचा तुम्ही विचारही केलेला नसेल. असो, पण यासाठी कित्येक गावं खाली करावी लागली भारताला. नुकसान सामान्य लोकांचंच झालं तुमच्यामुळे.
आजही जो भाग धगधगतो. तो काश्मीर आमचा आहे. आम्ही भारताचे आहो. मग या देशात विविध धर्म, पंथ, जाती का असेना. ते स्वतःला भारतीय मानतात. या देशावर संकट आलंच तर सगळे एक होवून प्रत्युत्तरास तयार होतात. अगदी तसंच झालं. रात्री झालेल्या आक्रमनानं आम्ही सतर्क होत परीणामास तयार झालो. हे देशावरचं संकटच.
तमाम वायुसेनेचे या देशातील तमाम हिंदूच नाही तर मुस्लीमांसह वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांनी स्वागत केलं. अन् का करणार नाही. कारण तेही स्वतः भारतात राहात असल्याने भारताला आपलं समजतात. खरंच अशा या भारताबद्दल आम्हाला अभिमान आहे.
तुम्ही हे ही लक्षात घ्यावे की तुमचा देश आमच्यासमोर इवलासा देश आहे. शिवाय सैनिक आणि शस्रानेही भारत तुमच्यापेक्षा कितीतरी पुढे आहे. तरीही तुम्ही आम्हाला डिवचता. या भारताला चिडवण्याची चूक करता. भारताला बरबाद करण्याची भाषा करता. खरं तर आम्ही अहिंसावादी आहो हे माहीत असूनही.
आज जगाला शांतीची गरज आहे. जगाला युद्ध नको आहे. शांती हवी आहे. कुणाचाही विनाकारण बळी जायला नको. सामान्यांचा तर नकोच नको. हं काश्मीरच्या जनतेनं आंदोलन जरुर करावं. पण शांततेच्या मार्गाने. कारण क्रांतीच्या मार्गाने आंदोलन केल्यास वा तुमच्या देशातून आलेल्या आतंकवाद्यांशी हातमिळवणी करुन आंदोलन केल्यास ते बंड किंवा तो आतंकवादीपणा भारत चिरडून टाकायला मागेपुढे पाहणार नाही. मग देशातील अंतर्गत आपलेच लोकं असतील तरी. कारण राज्याला धोका फितुरांपासूनच असतो. असे आमच्या शिवरायांनी आम्हाला सांगीतले आहे.
क्रांती ही चांगली गोष्ट नाही. देशाला स्वातंत्र्य क्रांतीनं मिळालेलं नाही. क्रांतीनं १८५७ चा उठाव ध्वस्त केला गेला. नव्हे तर याच क्रांतीतून देश एकत्र आला नाही. देशाला एकत्र आणण्यासाठी महात्मा गांधींना अहिंसेची काश धरावी लागली, हे तुम्हीे विसरु नये. अहो ज्या जिनाला तुम्ही मानताय ना. ते जिनाच महात्मा गांधींना सर्वश्रेष्ठ मानायचे हे तुम्हीे लक्षात घ्यायला हवे. भारताने जर क्रांतीचा मार्ग धरला असता तर भारत कधीच स्वतंत्र्य झाला नसता. ना पाकिस्तान ही बनला असता. हे तुम्ही चांगले लक्षात घ्यावे. कारण इंग्रजांजवळ अत्याधुनीक शस्रास्रे होती. जी आज आमच्या भारताजवळ आहे. तुम्ही जी बदल्याची भावना धरुन आक्रमणाला प्रत्युत्तर देवू पाहताय ना. ते बरोबर नाही. कारण भारत आज सर्वच गोष्टीत कुठेही मागे नाही. या तुमच्या क्रांती विचाराने फुकटचा वाद विकोपाला जाईल हे लक्षात घ्या. अहो भारताचं ह्रृदय विशाल आहे. आमच्यात तुम्हाला माफ करण्याची ताकद आहे. पाकिस्तान हा आपलाच एक लहान भाऊ आहे असे ते मानतात. त्यानुसार आम्ही चालतो. वागतो. तुम्हाला मिळवून नेतो. हवी ती मदतही करतो आणि बरेचदा केलेलीही आहे. तुम्हाला काश्मीरचा एक भाग आम्ही जिंकूनही दान दिलेला आहे हे लक्षात घ्या. मग असे असतांना तुम्ही आमच्या ताब्यातील काश्मीरवर हमला का करता? आम्हाला खुश राहू द्या. तुम्हीही खुश राहा. आपण भाऊ भाऊ आहोत हे लक्षात घ्या. अन् हेही लक्षात घ्या की जर का तुम्ही आम्हाला शांततेने राहू दिले नाही. तर तोही दिवस दूर नाही की भारत प्रत्युत्तरात तुम्हाला संपूर्ण मिटवून टाकेल. तुम्हाला मिटविण्याचीही ताकद आमच्यात आहे. हे लक्षात घ्या अन् एक आवर्जून लक्षात घ्या. माझा भारत कमजोर नाही. भारताला कधीच कमजोर समजू नका. असं ते पाकिस्तानला पत्र होतं