To spy
भाग २
विराटच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. खरंतर ही केस मिसिंग पेक्षा किडनॅपिंगची असण्याचीच जास्त शक्यता वाटत होती. एवढ्या मोठ्या माणसाला काय कमी शत्रू असतील का ? पण कोण..?
' ओह शीट.' त्याने कपाळावर थाप मरून घेतली.
मगाशी निधीला 'या' शक्यतेची कल्पना देऊन महिपतरावांचे कुणाशी शत्रुत्व, किंवा इतक्यात कुणाशी मोठ्ठ भांडण वैगेरे झाल होत का असं विचारायला हव होत.
'का नाही विचारलं आपण ?'
' मान्य आहे ती आधी जरा घाबरली असती, पण ही केवळ एक शक्यता आहे. आपण समजावलं असतं तर समजली असती ती. ती ब्रेव्ह आहे. आणि तिला विश्वास आहे की आपण तिच्या वडिलांना लवकरच शोधून काढू. भावनेच्या भरात मोठी चूक केली आपण.'
' काय करावं ? परत जाऊन विचाराव का ? तसंही फार काही लांब नाही आलोय आपण ?'
' पण नको. आता ती कामात बिझी असेल. उद्या रविवार आहे. उद्या सकाळी माझ्या घरी ये. असा मॅसेज करतो.'
त्याने गाडी थांबवून खिशातून मोबाईल काढून निधीला मॅसेज केला. - उद्या सकाळी अकरा वाजता माझ्या घरी ये. काही प्रश्न विचारायचे आहेत. त्याने मॅसेज sent केला. इतक्यात त्यालाच मॅसेज आला.- पोलिस स्टेशन मध्ये ये. वाचून त्याच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी उमटली. फोन खिशात ठेवून त्याने पोलिस स्टेशनच्या दिशेने गाडी वळवली.
सिनियर इन्स्पेक्टर करण समोरची फाईल पाहत होता. एकीकडे तो कुणाचीतरी वाटही बघत होता. करण शिंदे. वय ३२ वर्षे. स्मार्ट आणि डॅशिंग व्यक्तिमत्व. फारच कमी वयात आणि वेळात त्याने पोलिस खात्यात 'अत्यंत प्रामाणिक आणि इंटेलिजंट पोलिस ऑफिसर' अशी स्वत:ची ओळख बनवली होती.
"येऊ का सर ?" करणने मान वर करून पाहिलं. समोर विराट मिष्कीलपणे हसत उभा होता. त्याला पाहून करणच्या चेहऱ्यावर स्मित आलं.
" अरे वीर, ये बस." समोरच्या खुर्चीकडे हात करत तो म्हणाला. विराट त्यावर बसला.
खरंतर करण आणि विराट कॉलेजपासूनचे खूप चांगले मित्र. करण वीरपेक्षा तीन वर्षांने मोठा. पण या गोष्टीचा त्यांच्या मैत्रीत काही फरक पडला नाही. विराटला आई-वडीलांशिवाय वीर असं म्हणणारा फक्त करण होता. आणि आता निधी.
" अरे काल तुझ्या निधीने देशमुख साहेब हरवल्याची तक्रार केली होती म्हणे."
" हो आणि तु मात्र चुकीचे वागलास तिच्याशी. म्हणून मला सांगितलय आता तिने. आता तिच्या ऑफिस कडूनच येतोय."
" मी ? नाही रे. तेव्हा मी बाहेर गेलो होतो. जगताप यांनी सांगितले मला. जगताप पण ना. तक्रार घेऊन येणाऱ्यांशी फार बेफिकीरपणे वागतात. पण बरंच झालं. आता अनायासे तु केसमध्ये involve झाला आहेस तर, देशमुख साहेबांना शोधण्यात मदतच होईल. बरं, देशमुखांच कुणाशी काही भांडण ? कुणी शत्रू ? निधीला कुणावर संशय ? नाही म्हणजे ही किडनॅपिंगच असेल अस नाही. पण शक्यता नाकारता येत नाही." करणच मत विराटशी मिळतजुळत होत.
"नाही रे, मोठीच चूक केली मी. ती घाबरली असती म्हणून मी असे काही नाही विचारलं ?
" हे बघ वीर, मी तुझ्यावर चिडत नाहीये. पण आपल्या सारख्यांना भावनिक होऊन नाही चालत."
" हो मला माझी चूक कळलीये. मी परतताना तिला मॅसेज केलाय कि उद्या माझ्या घरी ये काही प्रश्न विचारायचे आहेत."
" हो. हे बरं केलंस. मीही येतो उद्या तुझ्या घरी. म्हणजे मलाही चौकशी करता येईल.मगच तपासाला सुरुवात करू."
"हो."
थोडावेळ बोलून विराट पोलिस स्टेशनमधून बाहेर पडला. आणि आपल्या घरी निघाला.
रविवारी सकाळी ११.१५ वाजता
विराटच्या घरी त्याच्या बेडरूममध्ये बेडवर निधी, आणि तिच्या दोन्ही बाजूला थोड्या अंतरावर समोरासमोर खुर्च्या ठेवून विराट आणि करण बसले होते. निधी तिच्या व्यवसायात जेवढी हुशार होती तेवढीच दिसायला अतिशय देखणी होती. गोलाकार चेहरा, गोरापान रंग, पाणीदार डोळे, सरळ चाफेकळी नाक, काळेभोर केस. आज तिने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. त्यात ती अजून सुंदर दिसत होती. विराटच्या आई किचनमध्ये त्या तिघांसठी नाश्ता बनवत होत्या. काल रात्रीच त्या तुळजापूरहून देवदर्शन करून आलेल्या होत्या.करणने बोलायला सुरुवात केली-
क्रमशः