कादंबरी – जिवलगा
भाग -४४ वा
---------------------------------------
नेहा ,सोनिया आणि अनिता ..रोजच्या प्रमाणे ऑफिसला आलेल्या होत्या ,सोबत यायचे
आणि सोबत जायचे असे रुटीन ठरलेले , हेमूच्या ऑफिसमध्ये ट्रान्स्फर झाल्यापासून
तिघींची लंचला पण भेट होत नसे , त्यामुळे वेळ मिळेल त्या प्रमाणे लंच घेऊन
पुन्हा डेस्कवर जाणे सोयीचे वाटू लागले होते .
आजच्या लंचसाठी सोनिया आणि अनिता दोघीच होत्या ,लंच टेबलवर डबे उघडून सुरु
करतांना ..सोनियाच्या फोनची रिंग वाजली ..
हे ओफिस्वाले लंच सुद्धा शांतपणे खाऊ देत नाहीत ...!
असे म्हणत तिने फोन हातात घेतला
स्क्रीनवर मधुरिमादिदीचा नम्बर दिसत होता ..
अनिता म्हणाली ..
सोनिया ..काय असेल matter ? दीदीने फोन केलाय ?
बोलू तर दे अगोदर, कळलेच की...
असे म्हणून सोनियाने हेल्लो करीत म्हटले ..
बोला दीदी ..लंच -रूम मध्येच आहोत .मी आणि अनिता ,
दीदी म्हणाल्या – नेहा का बरे नाही आली लंच ला ? ठीक आहे ना सगळं ?
सोनिया सांगू लागली –
अहो दीदी , आता जरा बदल झालाय , आम्ही दोघीच असतो लंचला
नेहा खाली येऊ शकत नाही .
तिच्या कलीग्स बरोबर ,ती तिच्या फ्लोअरवरच लंच घेते ,गेल्या काही दिवसापासून .
का हो दीदी ? काही विशेष ?आज फोन करण्याचे कारण ?
दीदी म्हणाल्या ..
सोनिया ..तू अगोदर फोन स्पीकरवर ठेव ..
म्हणजे ..अनिता पण ऐकेल ..मी काय सांगते आहे ते ..
आणि हे एक सिक्रेट मिशन आहे ..
तुम्हा दोघींना हे सक्सेसफुल करायचे आहे.
नेहाला हे काही म्हणजे काही सांगायचे नाही.
आणि या दोन-तीन दिवसात ..हेमू देखील तुमच्या घरात येणार नाही ..
बाहेरूनच तो तुम्हा दोघींना मेसेज करील ,त्या प्रमाणे तुम्ही करायचे .
सोनिया आणि अनिताची उत्सुकता खूपच वाढली होती ..
त्या दोघी म्हणाल्या ..इतकं खास सिक्रेट ? आणि ते ही आमचा सहभाग असलेलं !
सांगा दीदी ..सांगा ..
सोनिया ..आणि अनिता ..नीट ऐका आता –
शनीवार –रविवार ..म्हणजे तुमचा सर्वांचे सुटीचे दिवस .तसेच सोमवार ..जिला जमेल
तिने सुट्टी घ्या ..आणि घरी थांबा ..
उद्या आहे शुक्रवार ..
उद्या रात्री ..९ वाजेपर्यंत .. तुमच्याकडे ..सोमवार रात्रीपर्यंत ..माझे पाहुणे मुक्कामास
येत आहेत ..त्यांचा पाहुणचार ..आणि सगळी व्यवस्था करण्याची जबादारी तुमच्या दोघींच्या
मदतीने ..नेहाने पार पडायची आहे..
हे पाहुणे कुणाचे कोण आहेत ..हे तिला माहिती होऊ द्यायचे नाहीये ..ही झाली एक गोष्ट ..
आता त्या पेक्षा जास्त महत्वाची ..दुसरी गोष्ट ..लक्षात ठेवा ,
जी अजिबात कळू द्यायची नाही ..
की ..
अनिता आणि सोनिया सोबत रहाणारी ..नेहा .. कोण आहे ?
सोनिया म्हणाली –
दीदी ..इतका सस्पेन्स ? का हो ? स्पष्ट सांगा बरे समजावून ..
दीदी म्हणाल्या – मला वाटलेच ,तुम्ही पोरी . खरी गोष्ट ऐकल्यावरच तुमचे
समाधान होणार ..
हा सगळा सस्पेन्स ..असा आहे की ..
उद्या रात्री तुमच्याकडे येणारे पाहुणे .. माझे पाहुणे आहेत ..ते बाकी काही सांगणार नाहीत ..
आणि तुम्ही दोघी माझ्या मैत्रिणी आहेत ..म्हणून घरच्यासारखे ते तुमच्याकडे थांबण्यास तयार
आहेत ..असे दाखवतील ,सांगतील .
अनिता म्हणाली – अहो दीदी , तुमचे पाहुणे आहेत , मग त्यात असा सस्पेन्स कशासाठी ?
अनिता – हे माझे पाहुणे ..साधे सुधे नाहीत ..ते आहेत
हेमुचे आई आणि बाबा ...,
सोमवारी दुपारी माझ्या मुंबईच्या एक संस्थेत त्यांचा सत्कार आयोजित केलाय ..
त्यासाठी ते आले आहेत .. हा सगळा प्लेन असा करावा लागला आहे . त्याचा
उद्देश एकच आहे तो म्हणजे ..
या दोन-तीन दिवसाच्या तुमच्याकडील मुक्कामात ....त्यांना त्यांची ..भावी –सुनबाई ..आपली –
वेडाबाई –नेहा ,
त्यांच्या लाडक्या हेमूसाठी योग्य आहे याची खात्री पटावी .
त्याचे आई-बाबा ..गावी परत गेल्यवर ..मी त्यांना पुन्हा फोन करून सांगेल ..
त्यावेळी ..सांगेल आणि विचारेल ..
कशी वाटली नेहा ? तुमच्या हेमुसाठी .
दिदीचा प्लैन ऐकून ..अनिता आणि सोनिया ..दोघींना हसूच आले ..
दोघी म्हणाल्या दीदी , म्हणजे हा वीक –एंड धमालीचा आहे म्हणा की ,
या नेहा कडून आता आम्ही चांगलीच सेवा करून घेतो ,बघाच तुम्ही .
ठीक आहे मग ..लागा तयारीला .. ऑपरेशन नेहा ..!
मी वेळोवेळी ..हेमुला आणि तुम्हाला पुढे काय करायचे मेसेज करीत राहील ..
कारान कॉल केला तर ..संशय येईल .
चलो बाय ....!
दिदिंशी बोलणे झाले, लंच झाला ..चला लागा कामाला ..
असे म्हणत सोनिया आणि अनिता पुन्हा आपापल्या सेक्शनला गेल्या .
***********
२.
हेमूच्या गावी ..सगळं निवांत चालू होतं ,शाळेला सुट्ट्या चालू होत्या , नाही म्हणयला ऑफिसची
काम चालायची , काम करणारे येऊन बसत , त्यवर लक्ष ठेवायचे हेच काम हेमूच्या बाबांचे होते.
इथली लोकल कार्यकारिणी ..नव्या आणि उत्साही तरुण कार्यकर्त्यांची होती .
मधुरिमा आणि रणधीर आता भले ही परदेशात असले तरी , इकडे त्यांचे नेटवर्क खूप मोठे आणि
सक्रीय होते . हेमूच्या आई-बाबांच्या निगराणीखाली चालू असलेली दुर्गम भागातली ही संस्था आणिशाळा
त्यातला एक छोटसा उपक्रम होता .
एका अर्थाने .या संस्थेचे प्रमुख ट्रस्टी म्हणून ,कार्यकारी अध्यक्षी म्हणून हेमुचे बाबा काम पाहत .
कधी काळी ..शिक्षक म्हणून ,नंतर हेड-मास्तर त्यांनी काम केले ..त्यांच्याच काळात ही संस्था ,आणि कार्य नाव्ज्ली जाऊ लागली .
मधुरिमा दीदी आणि रणधीर दोघांनी मग या दोघांच्या हवाली ही संस्था करीत म्हटले .या पुढे .इथेच असणार
आहात तुम्ही .
आणि मधुरिमा -रणधीर हेमुला मुंबईला घेऊन गेले .
.आता हाच मुलगा ..एक मोठ्या संस्थेतला महत्वाचा -हर हुन्नरी असा अधिकारी
होऊन काम करीत होता .
संध्याकाळच्या वेळी त्यांना मधुरिमाने फोन केला ..
हेमूच्या बाबांनी फोन घेत म्हटले ..
बोल दीदी ,कस काय केला आज ,फोन ?
दो दिवसापूर्वीच मी रणधीरला गेल्या तीन-महिन्यांचा
रिपोर्ट पाठवलाय , तुला तर माहिती आहे ..मी वेळेवर –काम करणारा माणूस आहे “,
दीदी म्हणाली –
अहो काका ..तुमच्या कार्याचा गौरव म्हणूनच तर करतोय अम्ही .
त्यासाठीच तुम्हाला उद्या सकाळी निघायचे आहे ..मुंबईला ..
सोमवारी तुमचा सत्कार आहे तिथे ..आमच्या एक संस्थेत ..
राज्यभरातील उत्कृष्ट समाज-कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सपत्नीक ..सत्कार करीत आहोत ,
या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला ..समाज-सेवा –रत्न “ हा गौरव –पुरस्कार “प्रदान करणार आहोत.
तुम्ही सकळच्या एक्स्प्रेसने निघून ..रात्री ..पोहचाल ,
हेमू तुम्हाला घेण्यास येईल .. पण तुम्हाला ..माझ्या मैत्रिणींच्या घरी माझे पाहुणे म्हणून थांबायचे
आहे .
त्या दोन-तीन दिवसात ..हेमुचे तुम्ही आई-बाबा आहात “हे तिथे राहणाऱ्या कुणालच सांगायचे नाही.
आणि हेमू देखील तिथे तुम्हाला भेटायला येणार नाही.
माझ्या मैत्रिणी ..तुमची सगळी व्यवस्था पाहतील , काळजी घेतील .
सोमवारी रात्री ..हेमू तुम्हाला स्टेशनवर भेटेल .ट्रेन निघण्य अगोदर .
मंगळवारी तुम्ही गावाकडे पोन्च्लात की..
मग आपण सविस्तर बोलू ..तुमच्या ट्रीपबद्दल.
आता फक्त ..मी सांगितले तेच आणि तसेच करायचे .
राहील न लक्षात ?
हेमुचे बाबा म्हणाले –
दीदी – तू सांगितले ..तसे झाले नाही ..असे अजून तरी झाले नाही .
तू नको काळजी करू . आम्ही तुझ्या मैत्रिणीकडे त्यांचे पाहुणे म्हणून राहु,
त्यावेळी ..आवश्यक तेव्हढे बोलू. आणि तुझ्या मैत्रिणी ..सोनिया आणि अनिता
सांगतील तसे करू.
काका , तुम्ही दोघे -सकाळी ट्रेनमध्ये बसलात की ..
मेसेज द्या ..मला हेमुला ,आणि सोनिया ,अनिताला
या दोन्ही मुलींचे नंबर पाठवलेत , मेसेज चेक करा आणि लगेच सेव्ह करा .
प्रवसात आवश्यक असलेले कागद-पत्र , तुमच्या दोघांची ओळख -पत्र हे सगळं आठवणीने घ्या .
ऑफिसमध्ये स्टाफ असेल आता या वेळी सुद्धा ..
त्यांना मी सोमवारच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेचा फोटो पाठवलाय , त्यामुळे त्यांना माहिती आहे,
की तुम्ही ..तुमच्या सत्कार –समारंभासाठी जाता आहात.
ठीक आहे मग,
बाय , काळजी घ्या . असे म्हणून दिदींनी फोन कट केला .
फोन झाल्यवर त्यांनी हेमूच्या आईला अचानक ठरलेल्या ट्रीपबद्दल सांगितले
आणि म्हणाले ..चला ..आपल्या सकाळच्या ट्रेनने निघायचे आहे. हेमू ने तिकिटे पाठवली आहेत,
बघा आताच आलीत मोबाईल मध्ये
खूप दिवसांनी ..पोराकडे जाण्यास मिळते आहे याचा आनंद वाटत होता .
नुकताच येऊन गेला की हेमू , तेव्हा काहीच कल्पना नव्हती ..की. लगेच भेट होईल .
दोघे गप्पा करीत ..उद्याच्या प्रवासाची तयारी करू लागले ..
************
नेहाच्या गावी .. घरी एका मोठ्या उत्सवाची तयारी चालू होती . दरवर्षी आजोबांच्या श्रीगुरूंची
पुण्यतिथी साजरी होते , त्यादिवशी ..वकीलसाहेबांच्या घरी .शहरातील महत्वाच्या व्यक्तींना
प्रसाद –भोजनासाठी निमंत्रण दिले जाते . आणि येणारे मोठ्या आदराने या भोजन्साठी
येतात . यावर्षीच्या प्रसाद-भोजनास कुणा-कुणाला निमंत्रण द्यायचे ..याची यादी करणे चालू होते.
नेहाचे आजी-आजोबा , आई-बाबा , भूषणदादू , वाड्यात रहात असलेले काकांचे परिवार
असे १५-२० जण मोठ्या ओसरीवर बसून कार्यक्रमाची चर्चा करीत होते .
चांगली दोनशे –तीनशे माणसे असायची पंगतीला ,म्हणजे मोठाच कार्यक्रम .
नेहाच्या घरी सगळ्यांना शिस्तीत कामे करण्याची सवय होती , त्यामुळे वकील-साहेबांच्या घरचा
कार्यक्रम म्हणजे उत्तम “असे कौतुक आलेला माणूस करीत असतो.
नेहाचे बाबा – मोठे वकील साहेब सर्वांना म्हणाले ..
आपण पूर्ण फामिलीला निमंत्रण देतो , पण, या सगळ्या आपल्या घरगुती नात्यातील ,
परिचयाच्या असतात .
नोकरदार व्यक्तींना ..आपण एकट्याला बोलावतो .. पण, मला वाटते ..आपण यंदा अपवाद
म्हणून .. बँक मनेजर देसाईसाहेबाना सह-परिवार बोलवावे , याचे कारण पण आहे ..
गेली तीन वर्षे ..या बँकेने आपल्याला खूप कामे दिलीत , सध्या आपल्या भूषणच्या हातावर सगळ्यात
जास्त लोन –कोर्ट केसेस या बँकेच्या आहेत.
आणि आता तीन वर्षे पूर्ण होतील त्यांना या शाखेत ..एप्रिल –नंतर त्यांची बदली होईल ..
शेवटची दोन वर्षे राहिलीत त्यांच्या नोकरीची ..बहुतेक ते त्यंच्या नेटिव्ह प्लेस ला जातील .
त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की ..
देसाईसाहेबंना ..सह-परिवार भोजन –आमंत्रण द्यावे.
नेहाच्या बाबांच्या या सूचनेला सगळ्यांनी एकमताने होकार देत म्हटले ..
उद्या स्वतहा आजोबा आणि आजी ..
देसाई साहेबांना भोजन –निमंत्रण देतील .
हे ऐकून ..नेहाचे आजोबा ..म्हणले ..
उद्या कशाला ..आतच ,लगेच देऊ या निमंत्रण ,
फोन करायला उशीर बिशीर नको .
भूषण .. मनेजर साहेबांना फोन लावून दे बरे ! .आजोबांनी फर्मावले ..
भूषणने फोन लावला ..रिंग वाजली तसे त्याने फोन आजोबांच्या जवळ दिला ..
आजोबांनी .नमस्कार करीत ..देसाई साहेबांना निमंत्रण देत येण्याब्द्द्लचा आग्रह केला .
उत्तर देत देसाई साहेब म्हणाले –
बाप रे ..तुम्ही स्वतः फोन करून निम्त्र्ण दिलेत ,आमचा बहुमान केलात बापूसाहेब तुम्ही.
खरे सांगायचे झाले तर ..
तुमच्याकडे येण्याचा मी विचार करीतच होतो ,आणि योगयोग बघा ..तुमचाच फोन आला.
प्रसादास आम्ही सह-परिवार येतो आहोत .
बरे एक विचारतो ,की -
उद्या सकाळी तुम्हाला बोलण्यासाठी येऊ शकतो का ..
सकाळी ९ वाजता येऊ का ?
कामाचे स्वरूप खाजगी आहे.. बापूसाहेब ..
मोठे वकीलसाहेब आणि तुम्ही दोघेच असावेत आपण बोलतांना .
बापूसाहेब म्हणाले ..
देसाई साहेब ..अजिबात संकोच करू नका , उद्या सकाळी चहा –
फराळ साठीच यावे आणि तुमच्या मनात काय जे असेल ते बोला .
आजोबांनी फोन ठेवला आणि नेहाच्या बाबांना म्हणाले ..
उद्या सकाळी देसाईसाहेब आपल्याशी काही खाजगी विषयावर बोलण्यासाठी येतोय “असे म्हणत होते,
मी या म्हटले .
आपण दोघे सकाळी बैठकीत तयार राहून वाट पाहू या .
नेहाची आई आणि इतर मंडळी- विचारात पडली ..
मनेजर साहेब ..खाजगी काम घेऊन येत आहेत ,काय प्रोब्लेम असेल बरे ?
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी वाचू या पुढील भागात
भाग – ४५ वा लवकरच येतो आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी – जिवलगा
ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.
९८५०१७७३४२
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------