Touch - Unique Features (Part 23) in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 23 )

Featured Books
Categories
Share

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 23 )





पाया है बडी मिन्नतो के बाद
तो रखना चाहता हु तुझको संभालके
दुनिया की हम को अब फिकर नही
मै तो जिना चाहता हु तेरा साथ जी भरके ..

एक सुंदर भावना दोघांच्याही मनात होती पण ते प्रेमच होत की नाही हे त्यांना माहीत नव्हतं ..त्यांची शंकाही रास्त होती कारण दोघांनीही एकमेकांना कधी पाहिलं नव्हतं ..नित्याने फक्त सारांशचा फोटो पाहिला होता त्याव्यतिरिक्त तिला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं ..कधी कधी तिला त्याच्यासोबत बोलताना भीती वाटत असे पण हळूहळू त्याने तीच मन जिंकून घेतल होत आणि त्याच्यावर तिचा पूर्ण विश्वास बसला होता ..ते आता रोजच एकमेकांशी बोलत असत ..

आज दुपारची वेळ नित्या आपलं काम आवरून बसली होती तेवढयात त्याचा मॅसेज आला ..

📱 हाय डिअर आहेस का ?

नित्याने मॅसेज पाहताच उत्तर दिले

📱 हो रे आताच आले बघ !! ..फार कंटाळा येतो रे काम करायला ..पण काय करणार करावे तर लागतातच ..शेवटी मुलीचा जन्म आहे माझा काम न करता भागणार कस ?

📱 हो ते तर आहेच स्त्रियांच्या नशीबाचा तो एक भागच बनला आहे त्यात आता इच्छा असूनही कुणीच बदल करु शकत नाही ।...बर आणखी काय चाललं आहे मग ?# सारांश

📱 काही खास नाही ..बर एक ना सारांश आपण खूप दिवस झाले एकमेकांशी बोलतो आहे ..पण तू आपल्याबद्दल काही सांगितलं नाहीस ..सांग ना काहीतरी तुझ्याबद्दल ? # नित्या

📱बोल काय सांगू ? # सारांश

📱घरी कोण आहेत , तू काय करतोस सर्वच सांग ?

📱 हमम ऐक ...माझ्या घरी फक्त दोन लोक आहेत एक मी आणि दुसरी आई ..बाबा लहान असतानाच वारले ..त्यानंतर आईनेच मला लहानाच मोठं केलं ..तिने माझ्यासाठी सर्व काही सहन केलं पण कधीही त्रास होऊ दिला नाही ..तिने मला पदवीपर्यंत शिक्षण घेऊ दिलं ..त्यानंतर तिची तब्येत तिला साथ देत नव्हती म्हणून मग मीच शिक्षण सोडून नौकरी करायला सुरुवात केली ..सुरुवातीला 7 हजार मिळायचे आता ते वाढून 15 हजार झाले आहेत ..घरी सर्व काही ठीक आहे पण पुढे शिक्षण घेण्याची इच्छा मात्र तशीच राहिली ..बस इतकं छोटस जग माझ..आम्ही दोघांनीच सजवलेलं ..ना कुणाकडून अपेक्षा ना आणखी काहीं # सारांश

📱 आणि लिखाणाचा छंद कसा लागला ? # नित्या

📱कॉलेजला असताना विविध स्पर्धा मध्ये भाग घ्यायचो आणि त्यात बक्षीस मिळवली ..मला वाचायची फार आवड त्यामुळे सतत वाचत असायचो ..त्यात ज्ञानातही भर पडायची आणि कॉलेजमध्ये नावही व्हायचं ..खर तर कॉलेजला असताना माझे फार मित्र नव्हते म्हणून मी एकटा राहायचो मग त्याच भावना मी कवितांमधून मांडू लागलो ..कॉलेज संपलं पण एकाकीपणा नाही संपला तेव्हा तोच एकाकीपणा घालवायला लिखाण करतो ..माझा वेळ तर जातोच पण इतरांनाही काहीतरी नवीन शिकायला मिळत तेवढच काय ते समाधान # सारांश

📱आणि लग्न का केलंस नाही ? # नित्या

📱अटॅचमेन्ट !..भीती वाटत होती कुणाशी जुळण्याची ..त्यामुळे आयुष्यात कुणाला येऊच दिलं नाही पण आता वाटत आहे की ती व्यक्ती आयुष्यात आली आहे फक्त तिला मनातलं सांगायचं उरलं आहे मग करेलही लग्न...#सारांश

📱तृप्ती ना रे ती मुलगी ? # नित्या

सारांशने काहीच उत्तर दिलं नाही आणि तीच बोलणं तोडत म्हणाला

📱 माझ्याबद्दल सर्व माहिती केलंस आता स्वतःबद्दल सांग ..

📱माझं काही खास नाही ..माझं आयुष्य एकट्याच्या भोवती फिरत ..बस मी एकटीच आहे माझ्या जगात..आपले म्हणावे असे भरपूर आहेत पण प्रत्यक्षात सोबत कुणीच नाही त्यामुळे एकटीच जगत असते ..पण त्याच दुःख नाहीये ..एकट राहण्यात पण मज्जा आहे ..नाती ओळखता येतात.. # नित्या

📱बरेच कटू अनुभव आलेलें दिसत आहे तुला ..तस पण अनुभव जीवनाचा भाग आहे त्यातून शिकायला मिळत आणि त्या चुका होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची असते ..तुला राग येणार नसेल तर सांगशील , तुला आईवडील कुणीच नाहीत ? #सारांश

📱सारांश प्लिज आपण यावर नको बोलूया का ? # नित्या

📱 का पण ? मी काही चुकीच बोललो का ? # सारांश

📱काही चुकीच नाही बोलला पण नको ते प्लिज ..ते सोड मी एक गंमत सांगते तुला , जसा तू प्रतिक्रिया वाचून मला मॅसेज केलास ना तसाच मला एक मुलाने सरळ प्रपोज केला प्रतिक्रिया वाचून ..तो मला सरळ लग्नाची मागणी घालतोय ..? # नित्या

📱बर !!...मग काय उत्तर दिलंस तू ? # सारांश

📱 अजून विचार केला नाही रे पण बघू !! पण भारी आहे त्याच बोलणं , दिसतो पण हॅन्डसम ..काहीच दिवस झाले बोलून पण खरंच खूप भारी वाटत त्याच्याशी बोलून ..अस वाटत माझं सर्व जग बदललं तो आल्यापासून आणि मी नकळत त्याच्याकडे खेचल्या जाते ....# नित्या

📱बर बर ! बर एक ना नित्या मला जरा काम आहे नंतर बोलू बाय ..

सारांश त्याच्याबद्दल एकूण चिडून गेला होता तर तो चिडला म्हणून नित्या मनात खुश झाली होती ..सदैव तृप्तीच्या नावाने चिडवणारा तो आज स्वतः अस वागेल याचा तिला विश्वासच बसत नव्हता ..तिलाही फार मज्जा येत होती ..त्याच्याशी बोलून तीही झोपी गेलीे ..उठली तेव्हा मोबाइल बघितला नि त्याचा मॅसेज आला नव्हता म्हणून रात्रीच्या स्वयंपाकाला लागली ..आज तिचा चेहरा जास्तच खुलला होता आणि आजहि आपण त्याला याच गोष्टींवरून चिडवायच असा निर्धार पक्का करून ती आपले काम पटापट आवरत होती ..तिने काम आवरले आणि जेवण करून पुन्हा बेडवर पडली ..तिने मोबाइल हातात घेतला पण त्याचा मॅसेज आला नव्हता हे पाहून तिनेच त्याला मॅसेज केला

📱 यार सारांश किती भारी बोलतो तो !! मी तर फॅनच झाली बघ त्याची ..अगदी त्याच्या शब्दात हरवून जावस वाटत ..जादू आहे त्याच्या शब्दात ..मला तर विचार येतो तो आधी माझ्या आयुषयात का आला नाही ..त्याच्याच विचाराने सकाळ होते आणि रात्रीही तोच विचारात असतो ..त्याचेच शब्द आठवणीत असतात आणि तोच कायम समोर दिसतो ..सारांश इज धीस अ लव्ह ? व्हॉट अ ग्रेट फिलिंग यार ईट इज !! ..आय एम जस्ट क्रेजी फॉर हीम .."

📱दुसरा विषय नाही आहे का तुझ्याकडे 😠😠? जेव्हा पाहिलं तेव्हा त्याच्याबद्दल बोलता असते ..एवढाच तो आवडतो तर त्याला सांग , मला का सांगत आहेस हे सर्व आणि तुला त्याच्याबद्दल बोलायच असेल तर नको बोलू माझ्याशी ..# सारांश

📱का रे ? त्याच्यावर बोलण्यात काय चुकीच आहे ? मी तर तुला मित्र मानून सांगत होते सर्व ..तू तर उगाच चिडत आहेस माझ्यावर ..एक मित्र या नात्याने मी तुला एवढं पण सांगू शकत नाही का ? # नित्या

📱नित्या तू काहीही शेअर कर मला आवडेल पण यावर नको बोलूया प्लिज मला नाही आवडत..का ते नाही माहिती पण नाही आवडत मला तू त्याच्याबद्दल बोललेल..# सारांश

📱का पण ? त्याच्याबद्दलच बोललेले का आवडत नाही ..काहीतरी स्पेसिफिक कारण तर असेल ना मग मला कळायला हवं ना ते ? # नित्या

📱तुला कळत नाहीत का ग एकदा सांगितलेलं ..नाही म्हणजे नाही आणि असा हट्ट करू नको ..बस आता हा विषय इथेच थांबवं ? # सारांश

📱 नाही कळत मला काहीच ..बस ऐकायचं आहे मला कारण आणि त्याशिवाय मी जाणारही नाही..# नित्या

📱ऐकायचं आहे ना तर मग एक ..तुझ्याशी बोलता बोलता केव्हा तुझा झालो ते मलाच कळले नाही ..डॅमईट आय लव्ह यु ..ती मुलगी तृप्ती नाही तू आहेस .जिने रात्रीची झोप उडवली , जिने माझ्या स्वप्नाना नवी वाट दिली , जिने मला माझंच राहू दिले नाही ती तू आहेस ..नित्या आय लव्ह यु सो मच ..#सारांश

त्याच उत्तर एकूण नित्या शांत झाली होती .तिलाही त्याच उत्तराची अपेक्षा होती ..तिला त्याचे हे शब्द एकूण खूप आनंद झाला होता ..पण आता तिची गंमत तिच्यावरच उलटली ..ती त्याला धड हो देखील म्हणू शकत नव्हती की त्याला साफ नाकारसुद्धा देऊ शकत नव्हती ..तिची स्थिती अगदीच गुंतागुंतीची झाली होती ..क्षणभर तिने स्वतःला सावरलं आणि नंतर म्हणाली ,

📱सारांश गंमत नको करू , मला हे तुझं अस वागणं अजिबात आवडलं नाही ..वाटलं नव्हतं तू मैत्रीला प्रेम समजून बसशील तेव्हा ही गंमत इथेच थांबव ?

📱तुला खरच वाटत आहे मी गंमत करतोय अस !!.मला सदैव अटॅचमेन्टची भीती होती म्हणून कुणाला आयुष्यात येऊ दिलं नाही ..पण तू नकळत आयुष्यात आलीस आणि माझं जग बदललं ..तुला मी कधीच पाहिलं नाही पण तुझ्याबद्दल मी स्वप्न पाहू लागलो आहे ..सुरुवातीला वाटायचं हे आकर्षण आहे कारण ज्या व्यक्तीला पाहिलं नाही , भेटलो नाही त्या व्यक्तीवर क्षणात प्रेम कस होऊ शकत ..भरपूर विचार केला तेव्हा जाणवलं प्रेम व्हायला क्षण देखील पुरेसा असतो ...ते कसल प्रेम जे वय , सुंदरता , रंग , रूप , जात , धर्म पाहुन करतात खर प्रेम तर मनात असत आणि मी कदाचित त्यातच गुंतलोय ..खूप खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर ..आणि तू मैत्री मानली असलीस तरी माझ्याकडून नकळत प्रेम झालय तुझ्यावर ..प्रेम ठरवून तर होत नाही ना !! तसच मलाही झालं आणि तुला मिळविण्याची इच्छा नाहीये फक्त मनातलं सांगायचं होत म्हणून बोलून गेलो ..आणि खर सांगू प्रेम मैत्रीतूनच होत असत ..खर प्रेम करणं केव्हापासून चुकीच झालं ते सांग ना ?...."

नित्याला जे नको होतं तेच झालं ..नित्या ज्या गोष्टीपासून सतत पळत होती तीच गोष्ट त्याच्याकडूज ऐकायला मिळाली ..तिला किती आनंद झाला होता हे तिलाच माहिती पण त्याला स्वतात गुंतवून ठेवण तिला योग्य वाटत नव्हतं म्हणून नाईलाजाने ती म्हणाली ..

📱 हे चुकीच आहे सारांश ..प्रेम करणं चुकीच नाही पण चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करण मात्र चुकीच आहे ..तुला माझ्याबद्दल काही माहिती नाही म्हणून असा बोलत आहेस ..जेव्हा कळेल ना तर सोडून जाशील सर्वात आधी ..सो सोड हे सर्व ..मूव्ह ऑन कर तेच बर आहे..चूक केलीस तू प्रेम करून ?

📱प्रेम करणं चुकीच कस आहे ? ती तर सर्वोत्तम भावना आहे ..ती नवचैतन्य देते , तेच तर सौंदर्य आहे ..त्यानेच संपूर्ण जग चालत ..प्रेम नाही तर जीवन जगण्यात अर्थ तरी काय आणि तू हे ठरवू शकत नाहीस मला आपल्याबद्दल काहीही न सांगता की मी तुला सोडून देईल ..एकदा सांगून बघ मग ठरव # सारांश

📱तू आपल्या गोड शब्दात मला फसवू नकोस सारांश त्यामुळे माझं उत्तर बदलणार नाही .. प्रेम करणं चुकीच नाही सारांश .. माझ्यावर प्रेम करणं चुकीच आहे ..माझ्यावर प्रेम करून तू जगतली सर्वात मोठी चूक करत आहेस त्यामुळे हे प्रेम वगैरे माझ्यासाठी नाहीच ..मुळात मला प्रेम करण्याचा अधिकारच नाही ..

📱म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला स्पष्ट बोल ?तुला प्रेम करण्याचा अधिकार नाही की तुला मी आवडत नाही ...मला तुझा नकार एकूण वाईट वाटणार नाही ..#सारांश

📱 अस काही नाही रे पण नाही करू शकत मी प्रेम ..प्लिज आपण यावर नको बोलूया ..मला त्रास होतोय या सर्वाचा ..# नित्या

📱 नित्या तुला मी आवडत नसेल तर सरळ सांग बहाणे नको करू ..# सारांश

📱तुला जे समजायचं ते समज पण मला नाही बोलायच या विषयावर ..तुला याव्यतिरिक्त बोलायच असेल तर बोल नाही तर ..# नित्या

📱नाही तर काय नित्या ? # सारांश

📱 नाही तर मला तुज्याशी कायमच बोलणं बंद कराव लागेल ..# नित्या

📱बर ठीक आहे नको देऊ उत्तर ..मला मिळालं माझं उत्तर ..काळजी नको करू माझा तुला आता कसलाही त्रास होणार नाही आणि तुला दुखावल त्यासाठी माफ कर ..बाय शक्य झालं तर बोलू कधी..

सारांशच्या डोळ्यात अश्रू होते ..आणि नित्याच्याही ..सारांशला जितका त्रास होत होता त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तिला त्रास होत होता फक्त त्याच कारण ती त्याला सांगू शकत नव्हती कारण त्याने जर तिचा भूतकाळ एकला असता तर कदाचित ती त्याच्याशी कधी नजर मिळवू शकली नसती म्हणून तो दुखावला हे माहिती असतानाही ती काहीच बोलली नाही ..

अजब आहे हे प्रेम ..नित्याच्या मनात प्रेम असूनही ती फक्त भूतकाळ मनात आठवून त्याला तिच्या मनातलं सांगू शकली नव्हती आणि सारांश तीच प्रेम डिजर्व करत असतानाही त्याला हवं ते उत्तर मिळालं नव्हतं ..नियतीही क्रूरपणे वागली .जे खर प्रेम करतात त्यांच्यात दुरावा निर्माण करते आणि अफेर करणाऱ्यांचे लोंढेच्या लोंढे समाजात वावरताना दिसतात ..परंतु भीती हीच होती की तिचा नकार त्यांना किती दूर नेऊन सोडतो की कदाचित एकमेकांप्रति असलेली काळजी त्यांना आणखी जवळ घेऊन येते ..

त्या रात्री दोघेही झोपले नव्हते ..आईला काहीही कळू नये म्हणून सारांश बाहेर येऊन बसला ..बाहेर चांदणे पडले होते ..त्यांना पाहत तो म्हणाला ..

कुछ तो रही होगी
मुखमेही खामीया
वरणा युही तुटता तारा
हर किसींको खुशीया नही देता..

त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि हृदयात न संपणाऱ्या वेदना ..

क्रमशः ...