विभाजन
(कादंबरी)
(15)
युसूफ काश्मीर बाबत विचार करीत असतांना त्याला अचानक तो शाळेत वाचन केलेला काश्मीरचा इतिहास आठवला. तसा त्याला विचार आला. काश्मीर मुद्दा हा वादाचाच मुद्दा आहे. नेहमी तिथे रक्त सांडत असतं. सर्वात पहिलं रक्त रणजीत सिंगच्या रुपानं सांडलं ह्याला इतिहास साक्षी आहे. त्यानंतर शर्माचं रक्त. आम्ही काश्मीर जिंकलो होतो. पण तो जिंकलेला भाग आम्ही दिलखुलासपणे सोडून दिला. याचं कारणही तसंच होतं. आमच्या तत्कालीन नेत्यांना वाटत होतं की जर का हा भाग घेतला तर ती आमच्यासाठी डोकेदुखी ठरेल. तो भाग आम्ही आम्हाला डोकेदुखी ठरेल म्हणून सोडून दिला. त्यातच आमचं चुकलं. याचं कारण असं की तो भाग आम्ही सोडल्यानं त्या भागावर पाकिस्ताननं कब्जा मारला व तो पाकव्याप्त काश्मीर बनला.
विद्यमान अवस्थेत काश्मीरचे चार तुकडे पडले. एक पाकव्याप्त काश्मीर, दुसरा भारताच्या वाट्याला आलेला काश्मीर, तिसरा आझाद काश्मीर आणि चौथा आमच्याकडील चीनने बळकावलेला काश्मीर.
हिन्दी चीनी भाई भाई म्हणत अतिशय गोडगोड बोलून भारतात व्यापार करण्यासाठी आलेल्या चीन्यांनी १९६२ ला जो आमच्यावर हल्ला केला. त्यात आमच्या सैनिकांचे होणारे हाल पाहून १९६६ ला आम्ही ताश्कंद करार केला. त्यानुसार आम्ही हाच काश्मीरचा भाग चीनला दिला आणि युद्ध थांबलं. तरीही आम्ही सुधारलो नाही. आम्ही आजही चीनला त्यांचा माल आमच्या भारतात विकण्याची परवानगी दिलीच आहे. तोही १९६२ नुसार अतिशय गोड गोड बोलून आमच्या भारतात येवून माल तर विकतोच. पण तिकडे पाकिस्तान सोबत मिळून मिसळून वागून कुरघोडी करतोच. पण हे आमच्या भारतातील सामान्य लोकांच्या लक्षात येत असलं तरी आमच्या नेत्यांच्या लक्षात येत नाही.
१९६२ च्या आणि १९४८ च्या लढाईतून खुप नुकसान झालं. १९४८ ला भारतीय सैन्याने उरीपर्यंत धडक मारुनही त्या सैन्याला परत बोलावल्यानं तसेच तो भाग पाकिस्तान साठी तसाच सोडल्यानं आता त्याच भागातून चीननं पाकिस्तानात तसेच पुढे सौदी अरेबिया आणि इतर राष्ट्रांशी व्यापार करण्यासाठी तेथूनच रस्ते बनवले. त्यामुळे चीनचा फायदाच झाला असल्यानं तो कुरघोडी करेल नाही तर काय? कदाचित तो भाग जर भारतीय अधिपत्याखाली असता तर... ... .
भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळी नेपाळही भारतात विलीन होण्यासाठी उत्सूक होता. पण का कुणास ठाऊक... ... या नेपाळला विलीन केलं गेलं नाही. कदाचित त्यावेळी नेत्यांनाही काही आगामी संकट दिसलं असेल. जे पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसलं. कदाचित नेपाळ जर भारतात विलीन झालं असतं. तर ते काटक असल्यानं आज भारताची किती मोठी ताकद असती. हे आम्ही विसरु शकत नाही. ज्या इंग्रजांचं सगळ्या जगावर राज्य होतं. त्या इंग्रजांना नेपाळला गुलाम बनवता आलं नाही.
काश्मीर विलीनीकरणाची बाब लक्षात घेता १८ जुनला जेव्हा लार्ड माऊटबँटन काश्मीर ला गेले. तेव्हा तेथे राज्य करणा-या हरीसिंगला विलीनीकरणाचे महत्व समजावून सांगितले. पण राजे हरिसींगानी नकार देत त्यांचं म्हणणं धुडकावून लावलं. त्यावर ब्लडीफुल म्हणत लार्ड माऊँटबँटन काश्मीरमधून २३ जुनला निघून आले. त्यांना वाईट वाटलं. पण तरीही जनमत घ्यावं अशी त्यांनी इच्छा प्रदर्शित केली होती.
काश्मीरचा इतिहास हा आधीपासूनच रक्तरंजीत राहीलेला आहे. या काश्मीरवर पाकिस्तानात अधिवास करणा-या टोळ्या नेहमी आक्रमण करायच्या. त्यांचं नाव कबाली. ह्या कबाली नावाच्या टोळ्यांना भडकवून पाकिस्तानने १९४८ लाही आक्रमण केलं. त्यावेळी महाराजाचा सेनापती राजेंद्रसिंहाची हत्या झाली. पुढे आपलाही जीव जाईल या उद्देशाने हरीसींग भारताच्या आश्रयाला आला. भारताने मदत करावी हा उद्देश होता. भारतानेही मदत केली. पण एक अट होती की काश्मीरचं भारतात विलीनीकरण करावं. त्या जाहीरनाम्यावर हरीसींगच्या सह्याही झाल्या. त्यानुसार सरदार पटेल हे गृहमंत्री असल्याने त्यांनी सैन्यही पाठवलं. खरं तर युद्धात काहीही होवो. तो खटला युनोत टाकायची गरज नव्हतीच. युद्ध सुरु असतांना तो खटला युनोत दाखल करण्यात आला आणि युनोतील न्यायाधीशानं आदेश दिला. 'जैसे थे' नेमकं आमचं तिथंच चुकलं. पाकव्याप्त काश्मीर तर त्यांना मिळालं. आम्हाला आमचा भागही मिळाला. पण आजही काश्मीर धगधगतो आहे. युनोत अजूनही काश्मीर वाद सुरुच आहे. आमचे सैनिक वारंवार शहीद होतात. पुर्वी कबाली टोळ्या या काश्मीरवर आक्रमण करायच्या. आज आतंकवादी आक्रमण करतात. काश्मीरची जनता जीव मुठीत घेवून आपले जीवन जगत आहे. रोजचा थरार. रोजच बंदुकीचे आवाज. खरंच कंटाळा येणार नाही तर काय?भारताचे आश्रीत राहूनही तेच हाल. यापेक्षा स्वतंत्र्य असलेलं बरं.
आमच्या भारतानं या भागात खुप सुखसोयी केलेल्या आहेत. पण सुखसोयीनं काही पोट भरत नाही. शांती देखील हवी आहे जगण्याला. ती शांती आज काश्मीरमध्ये नाही. भारतीय सैनिकांवर काश्मीरी जनतेने विश्वास ठेवतो म्हटलं तर तेही तेच करतात. अन् आतंकवाद्यांवर विश्वास ठेवतो म्हटलं तर तेही तेच करतात. कोणाच्या बाजूनं बोलायचं. इकडली बाजू घेतो म्हटल्यास आतंकवादी मारतील. तिकडली बाजू घेतो म्हटल्यास भारत सरकार पेचात पाडेल. मौन बाळगतो म्हटल्यास दोघेही जगू देत नाही. ही स्थिती प्रत्येक काश्मीर नागरीकांच्या मनात आहे.
पाकिस्तानचा विचार केल्यास त्या ठिकाणी बुरखा पद्धत. नागरीक महिलांना मशीनच समजतात. कुटूंबनियोजन न करता मुलं पैदा करण्याचा जणू विडाच उचलला आहे पाकिस्तानने असे वाटायला लागते. शिवाय शिक्षणाला जास्त महत्व नसल्याने अंधविश्वास जास्त. मग अशा अज्ञानी लोकांना सतत भीती दाखवली जाते की भारत आपल्यावर आक्रमण करणार आहे. भारत आक्रमण करीत नसला तरीही. ह्याच विष पसरविण्याने पाकिस्तान मधील प्रत्येक नागरीक भारताचा राग करीत आहे. हेच हाल काश्मीर मध्येही आहेत. माझ्या दृष्टिकोणातून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी भारतात कुटूंबनियोजन राबविलं. भारतात बहुतःश हिंदू तसेच इतर धर्मीयांनी कुटूंबनियोजन केलं. पण मुस्लीमांनी!
सन दोन हजार अकराच्या जनगणनेचा अभ्यास केल्यास तुलनेत हिंदूंची संख्या चार टक्के घटली. तर मुस्लीमांची संख्या पाच टक्के वाढली. काय गरज आहे संख्या वाढविण्याची?
आम्ही भारतात राहात असून भारत माझा देश आहे हे मानण्याची आज गरज असतांना आमच्या भारतातीलच लोकांचे हे दुटप्पी धोरणही काश्मीरच्या वादाला कारणीभूत आहे. कधीकधी असे वाटते की तिनशे सत्तरवी कलम काश्मीरसाठी लावली कोणी? कशाला लावली? ज्या भारतात राहून आम्ही काश्मीरची जागा घेवू शकत नाही. त्याच काश्मीरमध्ये रोहियोंना अधिवासाचं स्वातंत्र्य मिळतं. ते काश्मीरवालेही पाकिस्तानच्या मुलांशी विवाह करतात नव्हे तर त्या काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या विवाहीत मुलांना राहायला बोलावतात. नागरीकत्वही मिळतं. खरंच त्या पाकिस्तान मधून भारतात राहायला आलेला व्यक्ती भारतीय विचारांचा राहील काय?नाही राहणार. तो भारतीय विचारांचा राहणार नाही. तो भारत माता की जय म्हणणार नाही. तसेच भारतीय ध्वजाचा सन्मान करणार नाही. भारतीय झेंडे जाळेल. पाकिस्तान जिंदाबाद म्हणेल. इथल्या माणसांना भडकवेल आणि आम्ही भारतवासीही त्या गोष्टीच्या परिणामाचा विचार न करता आम्हीही त्यांच्या हो ला हो मिरवीत पाकिस्तान जिंदाबाद म्हणतोच.
समस्त भारतवासीयांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जो भारत आम्हाला राहायला जागा देतो. आमच्या पोटाचं पालनपोषण करतो. आमच्या भावना जपतो. त्या भारताबद्दल असं का करतो आम्ही? अहो या देशावर आम्ही प्रेम करायला हवं. या देशाला आपले समजायला हवं. खरंच आम्हाला खुप मोठा आनंद वाटेल.
भारतानेही या काश्मीरी जनतेला आपले समजावे. रोजचे बंदूकीचे बार बरे नाहीत. तत्सम काही बंधनकारक कायदे तयार करावेत. कोणीही असो. कुटूंब नियोजन आणि विवाह करायचाच असेल तर तो भारतीय नागरीकच असावा. विदेशी नकोच आणि ज्याला विदेशी विवाह करायचा असेल तर त्याने भारतीय नागरीकत्व सोडावं. देशात जर राहायचंच असेल तर देशातील नियम पाळावेच लागेल हे बंधन असावेच. मग कोणी पाकिस्तान जिंदाबाद म्हणणार नाही. मग कोणी भारतीय ध्वज जाळणार नाही. समजा जाळलाच तर कडक कारवाही करावी. त्यांना वेळ पडल्यास कारण स्पष्ट होताच दयामाया न दाखवता देश निकाला देण्याची गरज आहे. जो याच देशात राहून याच देशाचं खावून पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल किंवा पाकिस्तानचा ध्वज फहरवत असेल. त्यालाही पाकिस्तानात पाठवावं. कारण ते जर भारतात राहात असेल तर त्यांनी देशाचे नियम पाळायलाच हवे. त्यासाठी युनो अंतरराष्ट्रीय न्यायालयही काही करु शकणार नाही. कारण ज्यावेळी १९४८ ला उरी सीमे पर्यंत आमचे सैन्य पोहोचले होते. तेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा मान ठेवत आम्ही आमचे सैन्य परत बोलावले. मग एवढे वेळा पाकिस्ताननं आमच्यावर आक्रमण करतं. आमचे सैनिक शहीद होतात. यावर युनोनं काही भुमिका घेवू नये काय? पण ते घेत नसल्यानं पाकिस्तान शिरजोर बनून आमच्या भारतात आतंकवादी पाठवतात आहे आणि मी नाही त्या गावचा म्हणत आपली बाजू सुरक्षीत ठेवतात आहे. हे आमच्या युनोला समजत नाही काय? समजते पण ते न्यायालय बघ्याची भुमिका घेत पाकिस्तान कडून निकाल दिल्यास भारताला राग आणि भारताकडून निकाल दिल्यास पाकिस्तानला राग. निकाल द्यायचा तर कोणाकडून. असा प्रश्न सतत युनोच्याही मनात असेल. पण महत्वपूर्ण गोष्ट ही की आमचे सैनिक शहीद होतात त्याचं काय? आमचे काश्मीरी लोक मरतात. कुणावर अत्याचार होतो त्याचं काय? खरंच युनोच यावर तोडगा काढू शकते. पण ते काढत नसल्याने याबाबतीत कोणताही तोडगा आम्ही काढतो जरी म्हटलं तरी काढू शकत नाही. कारण त्या तोडग्याला अांतरराष्ट्रीय न्यायालयाच्या रुपानं मर्यादा आहेत.
महत्वाचं म्हणजे पुष्कळ झाला रक्तपात. आता आम्हाला अमन पाहिजे. खरंच अमन द्या हो आम्हाला. हे प्रत्येक काश्मीरी नागरीकांचं म्हणणं आहे. यावर त्वरीत तोडगा न निघाल्यास भारतातील हे आश्रीत काश्मीरी लोक उठाव करुन पुर्ण स्वातंत्र्याची मागणी करतील. तेव्हा वेळ गेलेली असेल.
आमच्याजवळ आजही वेळ आहे. आम्हाला लवकर निर्णय घ्यायचा आहे. काश्मीरात कोणत्या ना कोणत्या रुपाने हिंसा भडकत आहे. तेथे जननसंख्येवर मर्यादा नाहीत. प्रत्येक घरातून एक व्यक्ती घुसखोरी करायला लागला आहे. रोजगारीची समस्या असल्याने व तरुणांना रोजगार नसल्याने पुष्कळ वेळ येथील तरुणांजवळ आहे. याचाच फायदा ते आतंकवादी घेतात. त्यांना आश्वासन देतात. त्यांना अल्प गोष्टीत भरपूर पैसा देतात नव्हे तर त्यांचा घुसखोर म्हणून वापर करुन घेतात. त्यांनाच पाकिस्तान जिंदाबाद म्हणायला लावतात. भारताचे झेंडहीे जाळायला लावतात नव्हे तर आतंकवादी बनायलाही भाग पाडतात. हेच आतंकवादी याच काश्मीरात येवून या लोकांच्या घरी राहात असतील यात शंका नाही. तेव्हा या काश्मीरात जर अमन ठेवायचे असेल तर या काश्मीरी तरुणांना तसेच आमचे सैनिक तसेच सर्व काश्मीरी नागरीकांना विचारात ठेवून त्यांच्याशी परामर्श करुन हवं तर त्या युवकांसाठी तिथे उद्योग निर्माण करुन त्यांच्या मनामधील तिरस्काराची भावना काढावी लागेल. तेव्हाच तिथे शांती प्रस्थापित होईल.
आज काश्मीरी नागरीकांना शांतीची गरज आहे. खुप झाले बंदुकीचे आवाज. खुप झाले बलत्कार अन् खुप झाले अत्याचार. त्यांना आता ते अंगवळणी पडलंय. आता त्यांना त्या गोळ्यांची भीती वाटत नाही. कारण ते रोजचंच आहे. पण भारतासाठी ती फार चिंतनीय बाब आहे. आज विशेषतः राजकारण सोडून आपल्या भारताचा एक घटक म्हणून काश्मीरकडे पाहण्याची गरज आहे. त्या स्थळी शांतता निर्माण करण्याची गरज आहे. नव्हे तर त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. तसेच भारतीय सैनिकांनाही थोडे तरी अधिकार द्यावेत. जेणेकरुन त्यांनाही कोणी मारणार नाही. त्यांची विटंबना करणार नाही. काश्मीरवाल्यांनीही भारत माझा माझा देशच नाही तर आमचा देश आहे हे समजून वागावे. जेणेकरुन भारताचं अखंडत्व टिकेल आणि भारताला बलशाली बनविता येईल. तोडग्याला मर्यादा येवू देवू नये.