premaavin vyarth he jivan Part 29 th in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 29 वा

Featured Books
Categories
Share

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 29 वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

भाग- २९ वा

--------------------------------------------------------------

जळगावकरकाका , आणि अनुषा ..तिघे ही देशमुख सरांना बाय करून बाहेर पडले . अभिजित

म्हणाला ..मी खाली जाऊन येतो ..त्या दोघांना बाय करतो

आणि येतांना काही औषधी लिहून दिलीत ती पण घेऊन येतो .

तो पर्यंत अभिजितची आई आणि देशमुख सर दोघेच रूम मध्ये असणार होते .

वर्षानु -वर्षे सोबत राहून देखील ते एकमेकांचे सोबती होऊ शकलेले नव्हते .

..अभिजित , अनुषा आणि जळगावकरकाकांच्या पाठोपाठ बाहेर आला .

खाली कॅन्टीन मध्ये तिघेही बसले ..तेव्हा ..अभिजित म्हणाला ..

जळगावकरकाका ..माझ्यासाठी तुम्ही फक्त माझ्या बाबांचे पी.ए. , त्यांच्या ऑफिसातले सर्वात जुने

सहकारी आणि मित्र .यापेक्षा तुम्ही आमच्या परिवारातील एक मेंबर वाटत आला आहात , त्याच

रिस्पेक्टने आताही मी तुमच्याशी मोठ्या विश्वासाने एक खास गुपित शेअर करणार आहे..

ज्याबद्दल .आता पर्यंत कुणाला काही माहिती नाही आणि याबद्दल अंदाज सुद्धा नाही.

जळगावकर काका म्हणाले ..

अभिजित तू अगदी मोकळेपणाने तुझे गुपित माझ्याजवळ व्यक्त कर ..मी प्रोमीस करतो ..

हे गुपित ..कायम गुपित राहील ..

thanks काका !.. असे म्हणून अभिजित सांगू लागला ..

एक वर्षापासून -

अनुषा आणि मी ..एकमेकांचे मित्र आहोत ..आमचे मैत्रीचे नाते .आता .प्रेमाचे नाते झाले आहे ..

आम्ही मित्र झालोत हे खरे , त्याअगोदर माझ्याबद्दल अनुशाला काही माहिती नव्हती.

पण

जेव्हा तिला कळाले की..

मी सागर देशमुख यांचा मुलगा आहे ..त्यावेळी मला वाटले ,हे समजल्यावर

अनुषा माझ्याशी मैत्रीचे नाते सुरु नाही ठेवणार.

पण,तसे झाले नाही , मी कुणाचा कोण आहे ..?

या गोष्टीला तिने काही महत्व दिले नाही .

आमचे सोशल लाईफ ,सोशल ग्रुप आणि त्यातील कार्य आणि त्यामुळे झालेली आमची मैत्री

या गोष्टी तिला महत्वाच्या वाटणार्या आहेत असे सांगत तिने आमची मैत्री सुरु ठेवली ,मग

आमच्या भेटीने आणि सहवासाने मैत्रीत प्रेम फुलून आले ..

मी तिला ..आपल्या फमिलीबद्दल सांगितले ..ती सगळी कहाणी ऐकून ..

अनुषा म्हणाली ..

अभिजित ..तुझ्या घराचे ..नाव ..”प्रेमालय “आहे ,पण, यातली माणसे प्रेमाला पारखी झालीत ,

तू मला परवानगी दिलीस तर..मी तुझ्या घरातील निघून गेलेले प्रेम ..सन्मानाने परत आणू शकते ,

त्यासाठी ..मी जसे करीन,जे करीन ..ते तू फक्त पाहत राहायचे .

.आणि यात सगळ्यात “आपले नाते “ कुणाला कळू द्यायचे नाही

ही अट पाळणार असशील तरच ..मी सगळ्या गोष्टी प्लैन करून त्या जुळवून आणील ,

यासाठी तू फक्त हो म्हणायचे ,आणि मला सोबत करायची .

आणि काका ..अनुशाला मी तिच्या मनातल्या गोष्टी मनाप्रमाणे करण्यास संमती दिली .

सगळ काही ठीक चालले होते ..आणि मध्येच बाबांना हा त्रास झाला ..आता यामुळे .ठरवलेल्या गोष्टी

हातून निसटून जातील की काय ?

अशी भीती आमच्या मनात आहे..

अविनाशकाकांनी शांतपणे अभिजीतची कहाणी ऐकून घेत म्हणाले ..

अभिजित .. अनुषा आणि तुझे नाते ..आज कळाले मला ,

खरे सांगतो ..खूप खूप आनंद झालाय मला ..!

******

२.

अनुषा ..तुझे प्रयत्न आणि त्यामागचा हेतू शंभर टक्के सक्सेसफुल होणार

यापुढे तुमच्या या कार्यात माझा ही सहभाग असणार आहे.

अभिजित साठीच नव्हे तर ..देशमुख परिवारासाठी तुझ्यासारखी मुलगी सर्वार्थाने योग्य

आहे “, .

तुझ्या कल्पकतेचे कौतुक करावे तितके कमीच आहे. देशमुखसरांचे लाईफ स्टोरी प्रोजेक्ट “

करण्याचे तू ठरवलेस “, माझ्या मते ,तुझा हा निर्णय आणि त्यासाठी तू ज्या स्टेप ठरवलंल्या

त्या एकदम अचूक आहेत . ग्रेट ...!

माझ्यासमोर रोज असणारी ..अनुषा ..आणि आता समोर असणारी ..अभिजितची अनुषा ..

तुझी ही दोन्ही रूपं पाहून मी खूपच इम्प्रेस झालो आहे .

देशमुखपरिवारात ..तुझा अधिकृत प्रवेश अगदी सोपा कसा होईल ..? याचा तुम्ही विचार करणे

सोडून द्या , ती जबाबदारी माझी .

अविनाशकाकांचे शब्द ऐकून ..अनुशाचे मन इतक्या आवेगाने भरून आले की ..डोळ्यात येणारे

आनंदाचे अश्रू तिने थांबवले नाही ..

आणि भारावलेल्या स्वरात ती म्हणाली ..

काका ..तुम्ही खूप मोठ्या मनाचे व्यक्ती आहेत , आम्ही या गोष्टी लपवून छपवून केल्यात ,

तुम्हाला विश्वासात न घेता ..मी एकेक गोष्ट करीत राहिले ..

पण..तुम्ही एकदाही संशयाने माझ्याकडे पाहिले नाही.

यावर जळगावकरकाका अनुशाला सांगू लागले –

मी अगदी मनापासून सांगतोय ..ते ऐका ..

अभिजित .. अनुशाने ज्या गोष्टी सुरु केल्या ..त्याला देशमुख साहेब इतका छान प्रतिसाद देऊ लागले

की ..मला वाटायचे .. ही अनुषा तर..आपल्या मनात ज्या गोष्टी व्हायला हव्या आहेत “असे वाटते “,

अगदी त्याच गोष्टी ..ही मुलगी ..इतके परिश्रम घेऊन करते आहे “

तर तिला आपण विरोध करणे चुकीचे ठरेल , या भावनेतून ..मी अनुशाला एक प्रकारे अव्यक्त असा

पाठींबा देत ,तिला सपोर्ट करू लागलो .

कारण ..देशमुख ही व्यक्ती ..माझे मित्र अधिक आणि साहेब कमी अशीस्थिती आहे ..

या माणसाच्या भवती गैरसमजाचे धुके आहे..त्याला बऱ्यांच अंशी हा माणूस स्वतहा जबाबदार आहे,

आणि त्यात भर पडली आहे ती..परिस्थितीने .

त्यामुळे देशमुखसारख्या माणसात असलेला- एक छान माणूस “नव्याने कुणी घडवीत असेल तर ,असे करू

शकणारी व्यक्ती नक्कीच मोठी मनकवडी –जादुगार असावी .

अभिजित ..अनुषा अगदी अशीच आहे.. म्हणूनच तिच्या प्रेमासाठी ती हे दिव्य करण्यास तयार झाली.

तिने ज्या आपलेपणाने हे काम हाती घेतलेले आहे, आणि त्यात आतापार्य्नात जे जे घडून आले आहे ,

त्यावरून तर मी खात्रीने सांगू शकतो की ..

ज्या दिवशी आम्ही अनुशाचा कॉलेजमधील कार्यक्रम पाहिला ..त्या नंतर देशमुखसाहेब अगदी

मनापासून बदलण्यास तयार झाले आहेत ,हे मी सांगू शकतो

त्यामुळे ..अनुशाने सुरु ठेवलेले प्रयत्न मध्येच सोडून न देता ..आता या बदलेल्या परिस्थितीत जे

उपयुक्त आहे तसे करावे , माझ्या मते ..ही परिस्थिती अनुशाला अधिक अनुकूल आहे.

अभिजीतला ..जळगावकरकाकांच्या शब्दाने खूपच धीर आला .

अनुषा म्हणाली –

काका तुमच्या सपोर्ट मुळे माझ्या अंगात आता शंभर हत्तीचे बळ संचरले आहे. मी नव्याने पुढला

प्लेन करते आणि मग आपण सगळे मिळून त्या प्रमाणे करू या.

जळगावकर काकांनी अभिजित आणि अनुशाला बेस्ट लक दिले ,आणि बाय करीत ते ऑफिसला गेले .

********

स्पेशल रूम मध्ये केव्हापासून देशमुखसर आणि अभिजीतची आई, दोघेच बसले होते ..

खिडकीजवळ खुर्ची होती ..त्यावर बसून अभिजीतची आई बाहेरचे जग बघत बसली होती ..पण,

मनात विचार चालू होते ..ते सध्या तिच्या या जगात सुरु असलेल्या घटनांची .

अनुशाच्या कॉलेजात झालेल्या कार्यक्रमात .असे काय घडले ? की ज्यामुळे ..हा कठोर मनाचा

देशमुख नावाचा माणूस विरघळतो आहे , असे आपल्या जाणवते आहे .

पण, याबद्दल कुणाला कसे विचारावे ?

आज आलेली मुलगी ..अनुषा ..जी देशमुख यांच्या आयुष्याची सक्सेस स्टोरीचे प्रोजेक्ट करते

आहे , तिलाच विचारावे ..की

पोरी ..तू काय केलेस ..कळू तरी दे मला ..

आता ते दोघे येतील तेव्हा ..तिच्या बरोबर बाहेर बसूनच विचारल्या शिवाय काही कळणार नाही.

आज विचारलेच पाहिजे ..

देशमुख सरंनी अभिजीतच्या आईला ..आवाज दिला ..आणि

पाणी हवे ..असे हाताने खुणावले ..

सरिता ..खुर्चीतून उठत त्यांच्याकडे येत होती ..तेव्हा देशमुख ..आपल्या अधू पायाच्या बायकोकडे

पाहत होते ..

इतके वर्ष ..अधू बायकोला ते कधीच चांगले बोलत नव्हते ..

घालून पाडून बोलून ..तिच्या मनाला वेदना झालेल्या पाहण्यात ,डोळ्यात आलेले पाणी पाहण्यात

त्यांनी ..सासर्याने फसवले या गुन्हायची तिला शिक्षा देण्यात आनंद मानला .

पण.आता कसे ?

स्ट्रोक “मुळे देशमुखांना असा काही दणका बसला ..की उजवी बाजू ..केवळ अधूच नाही ..तर ..

पांगली ..निर्जीव होऊन गेली होती ..त्यात कधी ,किती आणि कशी सुधारणा होईल ?

या विचारासरशी ..देशमुख मनातून हादरून जात होते ..

सरिताने पत्नी म्हणून वागतांना कधीच काही चुकी केली नव्हती ..पण, देशमुखांना बायकोची

कोणतीच गोष्ट कधीच बरोबर दिसत नव्हती ,बरोबर वाटली नव्हती ..

किती तरी वर्ष झालीत ..सरिता.. देशमुखसरांच्या कडून होणारा मानसिक छळ सहन करीत होती .

या क्षणी ..ते दिवस..ते क्षण देशमुखांच्या नजरे समोरून सिनेमाच्या सीन सारखी पटापट येऊन गेली .

मनातल्या मनात ..देशमुख खजील झाले , आपण अमानुषपणे वागत आलोत ..आणि ..

हीच अधू – बायको ..कर्तव्यबुद्धीने आणि प्रेमाने काळजीने ..आपले करीत आहे .

पाणी पितांना .देशमुखांना ग्लास धरता येत नव्हता .आणि तो निसटून खाली पडला ,, तोंडातून

पाणी ,अंगावर आले..

सरिताने ते सगळे पाणी ..रुमालाने पुसले , चेहेरा कोरडा करीत ..त्यांना नीट टेकवून बसवले .

काही न बोलता निमुटपणे काम करणाऱ्या बायकोला .

.देशमुखसरांचे अस्पष्ट आवाजातले शब्द ऐकू आले ..

तसे तिने त्यांच्याकडे पाहिले ..

तिला ,इथे जवळ बस...! असे खुणावत होते ..

ती जवळ येऊन बसल्यावर -ते म्हणाले ..

सरिता ..तुझा छळ केला ..त्याची शिक्षा ..मिळाली बघ मला ..

तरी तू काही न बोलता .करते आहेस ..

माफ करशील मला सरिता ?

नवर्याच्या तोंडून ..अस्पष्ट ..तोतऱ्या शब्दातले सरिता ..नाव ऐकून ..

सरिताला आनंद झाला ..पण..त्यापेक्षा त्याच्यातील ..खडूस नवरा ..आज पहिल्यांदा नाही दिसला ..

हा आनंद जास्त होता.

सरिता ..अभिजित आणि अनुषा कधी रूम मध्ये येतात याची आतुरतेने वाट पाहत होती ..

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या पुढच्या भागात ..

भाग – ३० वा लवकरच येतो आहे ..

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------