आपण किती loyal आणि किती real आहोत , याला कोणाच्याही certificate ची गरज नसावी,
फक्त कुठलही कर्म करताना आपण परमेश्वराच्या cctv च्या निगराणी खाली आहोत, हे लक्षात ठेवल की झाल......आणि का असावी कोणाच्या certificate ची गरज
आपल्या अंतर्मनाला आणि त्या परमेश्वराला माहिती असतच आपण किती खरे आणि किती खोटे आहोत ते..।
कानांनी जे ऐकलेल असत.. ते खर असेलच अस नाही ना..।
उडत्या खबरींवरुन कानांवर विश्वास ठेवण्यापेक्षा डोळ्यांवर विश्वास ठेवलेला कधीही चांगलाच...।
मग आपण कोणाबरोबर कितीही चांगल वागून सुद्धा कोणी आपल्याला काय समजून घ्याव...। चांगल की वाईट हे आपण नाही ठरवू शकत. लोक त्यांच्या सोयीनुसारच अर्थ लावणार आणि वागणार....
शेवटी ईतकच की जर आपण खरे आहोत तर कोणाला सिद्ध करून देण्याची गरजच काय....। वेळेवर सगळ सिद्ध होतच असत.....।
आयुष्याच्या शेवटापर्यंत माणसाला नुसत्या फक्त आपल्या अशा म्हणवणाऱ्या नाही तर आपले असल्याची जाणीव आपल्या कृतीतून वागण्यातून.. करुन देणारी ....आपली माणसे.... कायम आपल्या सान्निध्यात असावीत...अस वाटत असत..
माणसाच्या आयुष्याच्या उत्तरार्धात ही भावना अधिक च गडद होत जाते..।
मग काही म्हणतात की.., आपण जितक चांगल वागू तितका लोक फायदा घेतात..। व्यक्ती परतत्वे मतमतांतरे असू शकतात.
तर त्यांच्या साठी एक सांगता येईल की आपण फक्त चांगलच वागण्याच कर्तव्य निभावू शकतो.., पण कोणाकडून तितकीच अपेक्षा नाही ठेवू शकत..।
आपण काय करतो, दुसर्याला judge करतो, समोरचा कसा चुकीचा वागतोय, किंवा समोरच्याचे आपल्या विषयीचे विचार चांगले नसतीलच, उदा.- जर/तर चे , किंवा असेल/नसेल
असले निरर्थक विचार करुन समोरच्याची प्रतिमा आपण आपल्या मनात करुन घेत असतो..
पण हे झाले आपले विचार ..
पण मग समोरचा तुमच्यासारखा संकुचित विचारांचा जर नाहीये..। तर का म्हणून तुम्ही समोरच्याला तुम्ही तुमच्या कल्पोकल्पित विचारांनी Judge कराव..।
कधीच कोणाच्या स्वभावाबद्दल एक काही तरी मत
तयार करुन घेऊ नका, कि त्या व्यक्ती चा स्वभाव
असाच आहे किंवा तसाच आहे,..
आहे त्यापेक्षा सुद्धा जास्त ,तुमच्या बद्दल त्या व्यक्ती चा
स्वभाव चांगला असु शकतो...
जो कदाचित तुम्हाला वाचताच आला नसेल...
माणसाने आपल जीवन हे फक्त एका भाडेकरू सारख आहे , हे लक्षात घेतल की, मग राग, द्वेष, या सारख्या भावना तिथेच नष्ट होतात, मग इतर कोणी कसही वागत असेल तरीही..।
doesn't Matter..।
कुठल्याही नात्यात माणूस दुसऱ्याला loyalty चा आरसा दाखवताना स्वतः मात्र त्या आरशात बघायच विसरतो .
खरतर नात्यात समज-गैरसमज वाद-विवाद होतच असतात, लोक मग कोणीही घ्या त्यात आपण स्वतः सुद्धा येतो, कारण आपण म्हणतो लोक असे आहेत लोक तसे आहेत ,पण इतरांसाठी पण आपण एक लोक म्हणूनच असतो, हे लक्षात घ्यायला हवे, आपण सरळ दुसर्याला दोष देऊन मोकळे होतो, काही नात्यांत कधी स्वतः साठी तर कधी कुटुंबातील आपल्या माणसांची बाजू घेऊन आणि दुसऱ्याची योग्यता काढून मोकळे पण होतो, पण कोणी हे कधीच मान्य करत नाही की आपल नाही तर, कमीतकमी आपल्या माणसांच पण काहीतरी चुकलेल असू शकेल,
दुसऱ्याकडे दोषाचे एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे असतात हे मात्र प्रत्येकजण सोयीस्कररीत्या विसरतो .
नात्यांची गुंफण इतकी घट्ट विणलेली असावी, की कुणाच्याही सांगण्यावरुन त्यात अविश्वासाची, गैरसमजाची दरी निर्माण ना व्हावी,
काही नाती जन्मजात मिळाली असतात, ती रक्ताची नाती, आणि काही आपल्या दैनंदिन जीवनात ओळखीतून, स्वभावगुण जुळल्यामुळे होणारी मैत्रीपूर्ण संबंधाची नाती असतात, शेवटी नाते कुठलेही असो, त्यात विश्वास हवा, एकमेकांना समजून घेण्याची व्रुत्ती हवी, तीच नाती सदैव फुलतात आणि बहरतात ज्या नात्यांमध्ये माझ-तुझ, परकेपपणाची भावना अस काही नसतं, नात्यांमध्ये माझ म्हणून नाही, आपल म्हणून जगता आल पाहिजे अशा नात्यांना कधीच तडा जात नाही .