Vibhajan - 13 in Marathi Moral Stories by Ankush Shingade books and stories PDF | विभाजन - 13

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

विभाजन - 13

विभाजन

(कादंबरी)

(13)

युसूफ नेता बनला खरा. त्याचं जीवन सुखी झालं खरं. पण त्याच्याहीसमोर प्रश्न होता. तो म्हणजे नेहमीनेहमी या देशावर होणा-या पाकिस्तानच्या सतत आक्रमणाचा, पाकिस्तान नेहमी नेहमी या भारतावर गोळीबार करीत होता. भारताला मिटविण्याच्या धमक्याही देत होता. कधी परमाणू बाँब टाकू असंही बोलत होता. युसूफ देशाचा नेता असला तरी या पाकिस्तानच्या अशा वागण्यानं परेशान होता.

देशात ठिकठिकाणी बाँबस्फोट होत असत. त्याचे सुत्रधार हे पाकश्रेत्रात लपून बसत असत. ते सुत्रधार स्वतः त्याची कबूली देत असत. पण पाकिस्तान सरकार नेहमी खोटं बोलत असे. ते नेहमी म्हणत असे की आम्ही कुणालाही लपवलेलं नाही. अशाप्रकारचं खोटं बोलणं, त्यातच पाकिस्तानचं असं वागणं ही गोष्ट देशात कुणालाही पटत नव्हती. ते विभाजनच मुळात व्हायला नको होते. असं प्रत्येकाला वाटत होतं. त्याचप्रमाणे आपण युद्ध करुन पूर्णतः पाकिस्तानलाच जगाच्या नकाशावरुन नष्ट करावं असंही देशातील नागरीकांना वाटत होतं. दरवर्षी काश्मीर प्रश्न चिघळत होता.

देशातील सरकारे बदलत होती. देशात कधी सिख दंगे व्हायचे तर कधी कोणत्या स्वरुपाचे दंगे. सगळे दंगे निवळता निवळता देश आजही विकासाच्या क्षेत्रात पुढे जात होता.

भारत जेव्हा स्वतंत्र्य झाला. तेव्हा या भारताजवळ काहीही नव्हतं. सगळं इंग्रजांनी लुटून नेलं होतं. उरलं सुरलं पाकिस्तानही. देशीसमोर दारिद्र्याची स्थिती होती. देशातील जनतेचं पोट कसं भरावं असा प्रश्न देशातील तमाम नेत्यांना सतावत होता. त्यातच निर्वासीतांचे प्रश्नही होते. हैदराबाद, जुनागढ, गोवा, काश्मीर या संस्थानांचे प्रश्न.

पंडीत जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र्य भारताचे पहिले प्रधानमंत्री होते. तर सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले गृहमंत्री होते. त्या दोघांसमोरही मोठमोठे प्रश्नच नाही तर आव्हान उभे होते. त्यांना देशातील नागरिकांच्या पालनपोषणाचाच प्रश्न नाही तर निर्वासीतांचेही प्रश्न सोडवायचे होते. कारण या निर्वासीत न झालेल्या राज्यात भारत पाकिस्तान दंग्यासारखेच निर्वासनासाठी दंगे होत. त्यात बरेचसे लोकं निरपराध असले तरी मारले जात होते.

पंडीत जवाहरलाल नेहरुंच्या हाती जसा देश आला, तसा या देशाचा विकास करण्यासाठी त्यांनी पहिली पंचवार्षीक योजना आखली. त्यांनी या पहिल्या पंचवार्षीक योजनेत शेतीवर जास्त भर दिला. त्यातच योजना कार्यान्वीत केल्या. व्यापारालाही चालना दिली.

अशा आतापर्यंत बारा पंचवार्षीक योजना राबविण्यात आल्या. या सातही पंचवार्षीक योजनेत सर्वात प्रथम स्थान शेतीला देण्यात आलं. त्यानंतर उद्योगांना प्राधान्य मिळालं. यामुळं की काय देश विकासाच्या क्षेत्रात पुढे येवू लागला. देशाची भरभराट होवू लागली. युसूफ तेव्हा लहान होता. त्याला राजकारण समजत नव्हतं. नेता बनून देशाचा विकास करता येतो. हे त्याला कळत नव्हतं.

जसजसा युसूफ शिकत होता. तसतसं त्याला पंचवार्षीक योजनांची माहिती होवू लागली. त्याचबरोबर देशाची भरभराट करण्यासाठी देशाने कृषी बरोबरच व उद्योगाबरोबरच शिक्षणा सोबतच कुटंबनियोजनालाही जास्त प्राधान्य द्यावं असं त्याला वाटू लागलं. तो लोकांना कुटूंबनियोजनाबाबत माहिती देवू लागला. पण लोकं ऐकतील तेव्हा ना. तो काही नेता नव्हता की लोकं त्याचं ऐकतील.

लोकं त्याचं ऐकत नव्हते. ते लोकं त्याची खिल्ली उडवीत असत. तसा तो विचार करायचा. या लोकांना समजंवायचं कसं? त्याला प्रश्न पडायचा. शेवटी विचार करता करता त्याला एक कल्पना सुचली. ती म्हणजे आपलं जर म्हणणं यांना पटायला हवं यासाठी वर्तमानपत्रात लिहायची गरज आहे. कारण भारतीय स्वातंत्र्याचा त्यानं अभ्यास केला होता. जनमत जागृत करण्यासाठी तमाम भारतीय लोकांनी आपली स्वतःची वर्तमानपत्र काढली होती. त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली होती.

युसूफ थोडासा मोठा झाला. त्याचबरोबर तो आता लेख लिहू लागला. ते बरेचसे लेख देशाच्या विकासासंबंधातील असायचे. तेव्हा या देशाच्या विकासासंबंधातील बरेचसे लेख तो वर्तमानपत्रात छापण्यासाठी पाठवायचा. काही लेख निश्चीतच छापून यायचे. तर काही लेख छापूनच येत नव्हते. पण जे लेख छापून यायचे. त्या लेखानंही काही लोकांवर फरक पडत नव्हता. शेवटी त्यानं विचार केला की या गोष्टीनं फरक पडत नाही. लोकं नेत्यांचं ऐकतात. शेवटी त्यानं नेता बनण्याचं ठरवलं.

इंग्रज देश सोडून गेले होते. येथील अर्थव्यवस्था खुळखुळी झाली होती. अशा या अर्थव्यवस्थेला जाग्यावर आणण्यासाठी पंचवार्षीक योजना राबविण्यात आल्या.

ह्या पंचवार्षीक योजना म्हणजे काय?हे भारताला रशियाकडून शिकता आले. रशियाने प्रथमच म्हणजे १९२८ मध्ये आपल्या देशात जोसेफ स्टँलिनच्या नेतृत्वात पंचवार्षीक योजना राबवली होती. त्यात त्या देशाचा विकास झाला. तेच अंगीकारुन पंडीत नेहरुंनी १९५१ ला पंचवार्षीक योजनेला सुरुवात केली.

पहिली पंचवार्षीक योजना पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी ८ डिसेंबर १९५१ मध्ये भारताला पहिली पंचवार्षीक योजना दिली. यामध्ये सिंचन व्यवस्था आणि धरण व्यवस्थोसह कृषीला जास्त प्राधान्य देण्यात आले.

दुसरी पंचवार्षीक योजना पाच सालानंतर म्हणजे १९५६ ला सुरु केली आहे. या योजनेत कृषी सोबतच औद्योगिक क्षेत्र विकासावर भर देण्यात आला. ही योजना. १९६१ पर्यंत चालली. त्यानंतर तिसरी पंचवार्षीक योजना राबविण्यात आली. तिचा कालावधी १९६१ ते १९६६ होता. या तिस-या योजनेत कृषी वर तर भर देण्यात आला. त्याचबरोबर गव्हाच्या उत्पादनात देशाला अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. पण याच काळात देशावर चीनचं आक्रमण थोपलं गेलं. त्यामुळं साहजिकच अर्थव्यवस्था डगमगली. त्यानंतर रक्षा उद्योगाला प्राधान्य दिल्याशिवाय पर्याय उरला नव्हता. त्यातच १९६५--६६ ला भारत पाकिस्तानचं युद्ध झालं. मग धरण बांधकामावर या काळात लक्ष दिलं गेलं. पण प्राथमिक गरजेवर दुर्लक्ष केलं गेलं. त्यातच सीमेंटच्या उत्पादनावर भर देण्यासोबतच उर्वरक यंत्र ही बनविण्यात आले. यातच या योजनेत ग्रामीण भागात प्राथमिक शाळा बनविण्यात आल्या. पंचायत निवडणूका सुरु करण्यात आल्या. शिक्षा बोर्डाची उभारणी केली गेली. त्यानंतर चौथी पंचवार्षीक योजना आली. ही योजना १९६९ ते १९७४ या काळासाठी होती. या योजनेवेळी इंदिरा गांधीचं सरकार होतं. या योजनेत प्रामुख्यानं १४ प्रमुख बँकांना राष्ट्रीय कृत करण्यात आले. याच काळात हरितक्रांती झाली. याच काळात गरीबी हटाओ चा नारा देण्यात आला.

पाचवी पंचवार्षीक योजना तनाव, रोजगार, गरीबी उन्मूलन आणि न्याय यावर आधारीत होती. यातही कृषी व आत्मनिर्भरतेवर जोर देण्यात आला. याचा काळ १९७८ पर्यंतच राहिला. कारण त्यानंतर आलेल्या मोरारजी देसाई सरकारनं या योजनेला अस्वीकृत केलं. त्यानंतर सहावी योजना आली. तिचा काळ १९८० ते १९८५ होता. या योजनेनुसार आर्थीक उदारीकरण करण्यात आलं. त्यानंतर सातवी योजना आली. या योजनेचा काळ १९८५ ते १९९० होता. या योजनेत उद्योगाच्या उत्पादकतेत सुधारणा करण्यावर भर देण्यात आला. तसेच धान्य उत्पादन व रोजगार निर्मीतीवर भर देण्यात आला. त्यानंतर आठवी पंचवार्षीक योजना आली. ह्या योजनेचा काळ १९९२ ते १९९७ ठरविण्यात आला. या योजनेत मुक्त व्यापाराला जास्त प्राधान्य देण्यात आले. त्याचबरोबर उद्योगाचं आधुनिकीकरण यावर भर देण्यात आला यातच जनसंख्या वृद्धीवर नियंत्रण करण्यावर भर देण्यात आला.

नववी पंचवार्षीक योजना आली. तिचा कालीवधी १९९७ ते २००२ निर्धारीत करण्यात आला. या योजनेत औद्योगिकरणावर जास्त भर देण्यात आला. पूर्ण प्रमाणात रोजगार, गरीबी कमी करण्यासाठी घरच्या घरी उद्योग करणे अर्थात कुटीरोद्योगाला प्राधान्य देण्यात आले. याचबरोबर देशातील लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावं म्हणून पेयजल योजना, प्रार्थमिक स्वास्थ योजना, परीवहन योजना, महिला सशक्तीकरण योजना ह्या सर्व योजना या काळात करण्यात आल्या. त्यानंतर दहावी पंचवार्षीक योजना राबविण्यात आली. या योजनेचा कार्यकाल २००२ ते २००७ होता. या योजनेतही कुटीर उद्योगांना जास्त प्राधान्य देण्यात आले. गुणपत्तापुर्ण रोजगारावर भर देण्यात आला. शाळेत शिकण्याचे वय निर्धारीत करण्यात आले. महिला नोकरीलाही ५० टक्के प्राधान्य देण्यात आले.

अकरावी पंचवार्षीक योजना. ह्या योजनेचा कार्यकाल २००७ ते २०१२ होता. यात कृषी, उद्योग, कुटीर उद्योगाला वाढविण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर बारावी पंचवार्षीक योजना राबविण्यात आली. या योजनेचा कार्यकाल २०१२ ते २०१७ होता. या योजनेनुसार आर्थीक विकास दर ८. १ करण्यात आला. म्हणजे विकास दरात कमतरता करण्यात आली. कारण २००८ ला देशावर आर्थीक संकट आलं होतं. त्यावर हा उपाय असं तज्ञांचं मत होतं.

भारतात या बारा पंचवार्षीक योजना राबविण्यात आल्या. त्या देशाचा विकास करण्यासाठी. इंग्रज भारत जेव्हा सोडून गेले. त्यावेळी येथील अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. पण या पंचवार्षीक योजना राबवून देश आज महाशक्ती बनण्याची स्वप्न पाहात होता.

देश विकासाच्या पाय-या हळूहळू चढत होता. त्यातच युसूफचं कुटूंब नियोजन. युसूफ वर्तमानपत्रात लेख लिहून सा-या लोकांमध्ये लोकसंख्येबाबत जनजागृती करीत होता. पण लोकं त्या जनजागृतीला दाद न देतांना पाहून युसूफच्या मनात नेता बनण्याची कल्पना आली. तिसरी पंचवार्षीक योजना तयार करण्यात आली होती. या योजनेनुसार गावात व गाव परीसरात विकास करण्यासाठी पंचायत निवडणुकांची आखणी करण्यात आली होती. त्यानुसार युसूफलाही वाटलं की आपणही आपलं भाग्य आजमवावं. आपणही निवडणुकीच्या रिंगणात उभं राहावं. तशी युसूफची ओळख सामाजीक कामं करीत असतांना पंचक्रोशीत झाली होतीच. त्याला थोडा त्याच्या वडीलांच्या कर्तृत्वाचाही हातभार लागला. त्याच्या वडीलांनी १९४२ ला तोडलेल्या तारांची माहीती पंचक्रोशीत होती. त्यामुळं देशभक्ताची मुलं म्हणून लोकं युसूफ आणि झरीनाकडं पाहात असत. नव्हे तर देशभक्ताची मुलं म्हणून लोकं त्यांना मदतही करीत असत. त्यातच युसूफचं समाजासाठी झटणं...... पोटतिडकीनं लेख लिहिणं........ तसेच लोकांना कोणत्याही कामात मदत करणं आवडत होतं.

१९६६ ला पंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या. त्यात युसूफ आपलं नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीला उभा झाला. तसा त्याचा प्रचार गावातील लोकांनी त्याचं कार्य पाहून विनामुल्य केला. कारण त्यावेळी फक्त लोकं माणूस पाहात असत. दारु आणि पैसे पाहात नसत. अशातच या पंचायतीच्या निवडणुकीचं मतदान पार पडलं. मग निकाल लागला व युसूफ पंचक्रोशीत भरघोष मतानं निवडून आला.

युसूफ पंचायतीच्या निवडणुकीत निवडून आला खरा. पण दिल्ली आताही पुष्कळ दूर होती. त्यातच त्याला वाटणारं कुटूंबनियोजन आजच कोणी ऐकून घेणारं नव्हतं. त्यासाठी संसदेत त्याचे खडे बोल गुंजायला हवे होते.

युसूफ पंचायतीत जरी निवडून आला असला तरी त्याची ओळख फक्त तहसील पातळीवर झाली होती. तसं त्याला मतप्रदर्शनही करता येत नव्हतं. कारण तो काही मोठा नेता नव्हता. शिवाय त्याच्या पाठीमागं कोणत्याही पक्षाचा वरदहस्त नव्हता. कारण तो निर्दलीय निवडून आला होता.

युसूफनं पंचायतीच्या निवडणुकीला उभे राहून त्यानं आपले राजकारणात पाय रोवले. हळूहळू त्याची पायाभरणी केली. तसेच त्याचे कार्य पाहून पुढे काँग्रेसनं त्याला आपल्या पक्षात घेतले. पुढे पंचायत निवडणुकीसोबतच तो आमदारकीची निवडणुक लढला. पुढे याच आमदारकीच्या केलेल्या कार्यातून तो खासदार बनला व संसद भवनात पोहोचला. आता मात्र त्याला खासदार बनल्यानं संसद भवनात बोलता येवू शकणार होतं. नव्हे तर आता आपलं मत मांडताही येवू शकणार होतं.