Kadambari Premachi jaadu Part 11 th in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाची जादू भाग -११ वा

Featured Books
Categories
Share

कादंबरी - प्रेमाची जादू भाग -११ वा

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग- ११ वा

------------------------------------------------------------------------

यशच्या आई हॉलमधून बाहेर पाहत होत्या , गेट उघडून आत येणार्या मधुराकडे त्यांची नजर

गेली .ही मुलगी अगदी साधी आहे हे तिच्याकडे पाहूनच त्यांना कळत होते,

आत आलेल्या मधुराच्या हातातल्या परडीत ..खाली बागेतून वेचून आणलेली फुले होती .

आजीने तिचे स्वागत करीत म्हटले ..

ये मधुरा ये , तुझे स्वागत आहे आमच्या घरात .

सगळ्यांकडे पाहत आजोबा म्हणाले ..

मला ही वाटले की- आपण ही आपल्या एका पाहुण्याला बोलवावे ,आपला रविवार सुटीचा दिवस

छान नवे विषय आणि नव्या गप्पा करण्यात जाईल .

आणि माझ्या मनात आले की -..ही मधुरा आली म्हणजे

अंजलीलासुद्धा एक छानसी ज्युनियर फ्रेंड मिळेल .

या दोघींची मैत्री छान जमेल असा माझा अंदाज आहे ,

बघू या ..माझा अंदाज किती पर्सेंट खरा ठरतो ते ..!

मधुरा गेटमधून आत आली . बाहेरच्या बागेतली फुले पाहून तिथेच थांबली . समोर झाडांना पाणी

देत असलेले माळीकाका दिसले . ती त्यंच्याजवळ जाऊन उभी राहत म्हणाली ..

काका , ओळखले का मला ?

तिच्याकडे पाहत ते म्हणाले –

पोरी ..मी एकदा ज्या माणसाला पाहतो ..त्याला नेहमी लक्षात ठेवतो ..विसरत नाही ..

मधुराने पुन्हा प्रश्न केला – मग, सांगा बरे मी कोण ?

पोरी , तू किनई ..आमच्या आजी-आजोबांच्या गावाकडची पोरगी हायेस .

तीन –चार महिन्यापूर्वी त्यांच्या सोबतच तू आली या शहरात ,

यशने तुला तुझ्या पावण्याच्या घरी सोडले ..बरुबर ना ?

मधुरा त्यांना म्हणाली -मानलं काका तुम्हाला ..

पक्की आठवण आहे तुमची . एकदा पाहिलं मला आणि लक्षात ठेवलं .

माळीकाकांनी तिला विचारले ..

आज कसे काय येनं झालं म्हणायचं ? माळीकाकांनी तिला विचारले ..

अहो ..गावाकडून आल्यापासून आमची भेट नाही , ना आजी आजोबा माझ्याकडे आले ,ना मी

इकडे आले , सगळा वेळ कोलेजात जातो.

आणि तुमचे यश साहेब ..त्यांच्या तर मी लक्षात पण नाही राहिले ..

परवा भेट झाली ..तेव्हा मीच आठवण करून दिली ..तेव्हा लक्षात आले त्यांच्या ,

त्यादिवशी त्यांच्या सोबत खूप सुंदर मैडम होत्या ,एकदम भारी कारमध्ये होत्या.

हे ऐकून माळीकाका म्हणाले ..

पोरी ..त्याच बाईसाहेब आज सकाळपासून आल्यात या घरात ,वाहिनिसाहेबांनी बोलवलंय त्यांना .

मधुरा हे ऐकून म्हणाली -

मग मीच आजी-आजोबांना फोन केला आणि आमचे बोलणे झाले , तेव्हा आजोबा म्हणाले ,

आज रविवार आहे, तू दुपारी ये ,आपण सगळे मिळून जेवण करू या.

म्हणून आले बघा काका ..!

बेस केलाय की हे, मोठ्या माणसांनी बोलावलं ,तवा यायलाच पाहिजे.

मधुरा त्यांना म्हणाली-

माळीकाका – अबोलीची फुलं नेऊ का घरात , आजी, यशच्या आई –काकू ,आणि अंजलीवाहिनी

यांच्यासाठी बोलत बोलत छान गजरे करते . मला माहिती आहे ..आजींना आणि काकूंना अबोलीचे

गजरे खूप आवडतात .

हे ऐकून माळीकाका म्हणाले – आपल्या माणसाना काय आवडते हे लक्षात ठेवून वागणे ,तसे करणे

हे तुला माहिती आहे , बरे वाटले बघ पोरी ..!

तुला अहो, तुम्ही ,बाईसाहेब असे काही न बोलता ..ए पोरी ,असे अरे तुरे केल त्याबद्दल

मला माफ कर बरे का , जरा चुकलोच मी ,

मधुरा म्हणाली – काका ,अहो असे काही मनात सुद्धा आणू नका तुमच्या .

मी आहेच तुमच्या पोरीसारखी , खुशाल म्हणत जा मला..ए पोरी ..!

मालीकाकांनी परडी भरून अबोलीची फुले टाकीत म्हटले ..

पुढच्यावेळी आलीस म्हणजे –

मोगर्याचा गजरा कर बरे का , आवडतो या सगळ्यांना .

पोरी ..येत जा या घरात नेहमी नेहमी .

हो काका येईन की , आजी-आजोबा काय, हे घर आणि ही माणसे परकी नाहीत माझ्यासाठी ..

*****

---२----

यशचे बाबा म्हणाले –

अम्माआजी – गम्मत बघा की –

एकच दिवशी ,एकाच वेळी ..एक नव्हे तर एकदम दोन पाहुण्या आल्यात आपल्या घरी ,

मला वाटते असे पहिल्यांदा घडत आहे आपल्या घरात .

त्यवर अम्माआज्जी म्हणाल्या –

अरे ,ही तर फक्त सुरुवात झाली आहे आज ..या पुढे खूप काही नवे घडणार आहे आपल्या घरात .

आजीच्या प्रत्येक शब्दाकडे मोनिकाचे फार बारीक लक्ष आहे असे अंजलीवहिनींना जाणवले आणि

का कुणास ठाऊक ,

आजीचे हे शब्द ऐकून मोनिका सावध झाली आहे असे “अंजलीवहिनींना वाटून गेले ..

मोनिकाशी झालेल्या पहिल्या भेटीपासून .

अंजलीवाहिनीना मोनिकाच्या हेतूबद्दलच शंका येत होती. यशचे स्थळ तिला मावशीने का सुचवले असेल ?

आणि या मुलीने ही गोष्ट इतकी मनावर कशी काय घेतली ?

या प्रश्नाचा भुंगा ..अंजलीच्या मनाला सतावत होता .

या मोनिकाच्या मनात आणि डोक्यात नक्कीच काही वेगळे आहे ..आणि ती तिच्या त्या प्लैनप्रमाणे

अगदी स्टेप बाय स्टेप वागते आहे .असे सारखे वाटते आहे.

आणि तिला आपण मदत करू ..तिच्या प्लैनमध्ये सहभागी असुत “ हे तर तिने जणू गृहीत धरले आहे.

आज तरी हा फक्त अंदाज आहे आपला , इतके सहजा सहजी कळणार नाही या मोनिकाच्या मनातले.

मोनिका स्मार्टच नाही ,तर अतिशय चलाख आहे .

आणि आपला यश .. मोनिकाच्या जाळ्यात फसेल असे आजतरी वाटत नाहीये ..

पण, याची खात्री देता येणार नाही..कारण..

मोनिका – तिच्या सुंदर असण्याच्या ,आकर्षक आणि मोहक तारुण्याच्या जादू –अस्त्राने यशला

आपल्या मोहक जाळ्यात अडकवू शकते , तिच्यासारख्या मुलीला हे करणे सहज शक्य आहे ,

कारण ती राहते त्या वातवरणात ..फ्री –लाईफस्टाईल मध्ये “ स्त्री –पुरुष अगदी मोकळ्या मनाने

एकमेकांच्या निकट सहवासाचा आनंद घेतात “,यात काही गैर आहे “असे न वाटणारे हे जग आहे.

या गोष्टी आपल्या नजरेस ..कंपनी इव्हेंट्स मध्ये सर्रास पडतात . अशा ठिकाणी ..शारीरिक

जवळीक नको तितके साधली जाते ,खुपदा तर ती अशी साधू दिली आते ..

कारण इथे आलेल्या प्रत्येकाला यातून पुढे खूप काही साधायचे असते “..

अंजलीवाहिनी मनाशी विचार करू लागल्या –

आपल्या मनात मोनिकाच्या हेतू बद्दल शंका आहे , याची हवा सुद्धा मोनिकाला लागता कामा नये

. तिच्याशी तिच्याच पद्धतीने ..म्हणजे ..गोडी-गुलाबीने आणि हुशारीने वागत राहायचे .

********

३.

*****

मधुरा हॉलमध्ये आली ,आजीनी तिला आत येण्यास खुणावले , मग मधुरा डायनिंग- टेबल जवळ येऊन

उभी राहिली . आजी आणि यशच्या आईच्या मध्ये रिकामी खुर्ची ठेवीत ..अंजलीवाहिनी म्हणाल्या ..

बस मधुरा -!

खुर्चीत बसत मधुरा म्हणाली – वाहिनी ,तुम्ही तर आज पहिल्यांदा मला पाहता आहात ,भेटता आहात ,

तरी तुम्ही अगदी सहजतेने मला नावासहित बोलता आहात , कसे काय हो ?

वाहिनी म्हणाल्या – अगदी सोप्पे आहे मधुरा –

आजी-आजोबानी आवर्जून बोलवले आहे तुला ,आणि आजोबांनी तुला आजचे निमंत्रण दिले ,हे आजींनी

मला सांगतांना हे “कुणाला सांगायचे नाही “असे बजावले होते .

आणि गेट मधून तू आलेली पाहून ..आजी बोलून गेल्या ..

आली की मधुरा ..!

आई-बाबा तर तुला ओळखणारे आहेतच . आता राहिलो आम्ही दोघे ..मी आणि सुधीर ,तुला न पाहणारे .

कारण ..यश आजी-आजोबांना घेण्यास स्टेशनवर आला ,त्याच दिवशी भेट झाली तुमची .

म्हणजे तो देखील अनोळखी नाहीये .

वहिनींचे हे बोलणे ऐकून ..मधुर हसत म्हणाली ..

अहो वाहिनी , तुम्ही नुसत्या नवा वरून ओळखले मला ..

पण, हे महाशय , तुमचे दीर ..यश ..

ते तर पार विसरून गेले होते ..त्यांच्या लक्षात सुद्धा नव्हते ..की

या मुलीला आपण तिच्या दीदीच्या घरी नेऊन सोडलेले आहे .

आता तुम्हीच बघा .थोडा वेळ तरी मी यांच्या सोबत होते .तरी काय झालं शेवटी ?

मी दोन दिवसापूर्वी यांच्या शो-रूम समोरून जात होते , तो समोर उभे दिसलेले पाहून ..

मी थांबले ..पण..काही उपयोग नाही..

यशने मला अजिबात ओळखले नाही ..मग, मला आठवण करून द्यावी लागली ..

आणि योगायोग ..म्हणजे ..

आता आपल्या सोबत आहेत त्या मैडम देखील त्यादिवशी होत्या, त्या कार मध्ये बसून बाहेर

उभ्या असलेल्या यश बरोबर बोलत होत्या .

मधुरचे बोलणे ऐकून घेत ..यश म्हाणाला ..

मधुरा – मी परत एकदा सॉरी म्हणतो , आता या पुढे अशी चूक नाही होणार .

इतका वेळ सगळा सीन गप्पपणे पहात असलेली मोनिका म्हाणाली –

अरे यश , तुला एका साधारण मुलीला ओळखता आले नाहीये , त्यात इतके गिल्टी फील होण्या सारखे काय आहे ?

सोडून दे तो विषय ,आणि हे तुझे असे पुन्हा पुन्हा सॉरी म्हणणे पाहणे मला नाही आवडणार .

मोनिकाच्या बोलण्यातला हा खोचक आगाउपणा कुणालच आवडला नाही “

ही गोष्ट मोनिकाच्या नजरेने लगेच टिपली . आणि मोठ्या हुशारीने ती म्हणाली ..

मधुरा – माझ्या बोलण्याचा हेतू तुझा अपमान करण्याचा नाहीये . “साधारण .मीन्स ओर्डीनरी “असे नको अर्थ घेऊ .

साधरणपणे एकदाच भेटलेल्या माणसांना आपण लक्षात नाही ठेवू शकत “ त्यामुळे यश तुला ओळखू शकला नसेल “असा अर्थ घे न तू .

आणि , त्यावेळी यश माझ्याशी ..या मोनिकाशी बोलत होता ..

साहजिकच ..इतर कुणी समोर आले तरी ..त्यचे लक्ष त्याकडे जाणे कसे शक्य असेल ?

तुला हा प्रश्न पडायला हवा होता ...!

आता सुद्धा मला पाहून ..तुला त्या दिवशीच्या प्रश्नाचे उत्तर आज नक्कीच मिळेल .

मोनिकाच्या आवाजातील मग्रुरी आणि फाजील आत्मविश्वास ..यश सहित कुणालाच आवडला नाही.

अंजली वाहिनी म्हणाल्या –

मोनिका – तुला गेस्ट म्हणून मी बोलावले आहे , यशने नाही , मी सुचवले म्हणून तो हो म्हणालाय.

आज तू -मी बोलावलेली एक पाहुणी आहेस ,तशीच ही मधुरा .आजोबांनी बोलावलेली

पाहुणी आहे. या घरातील माणसांना असा भेदभाव करण्याची सवय नाहीये.

सो, मोकळ्या मनाने तू इथे सगळ्या सोबत रहावेस ..आनंद घ्यावास हे उत्तम.

मोनिका म्हणाली – अहो वाहिनी , तुम्ही उगाच हायपर नको होऊ , मी ठीक आहे .

आणि इथे येण्याचे मी ठरवले आहे, म्हणजे ..तो उद्देश अधुरा कसा सोडेन.

मधुरा आली ,येऊ द्या, मला काही फरक पडत नाही ,

अंजली वाहिनी आणि सगळेच विचारात पडले ..

आजोबा तर आजींना म्हणाले –

का हो – मधुराला बोलवून मी चूक तर नाही ना केली ?

आता दिवसभर .काय काय होणार कुणास ठाऊक ?

आज्जी म्हणाल्या. चूक झाली आहे, असे मला वाटते आहे पण

करणार काय ?जे होईल ते पहावे ...

आता दिवसभर .काय काय होणार कुणास ठाऊक ?

----------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या पुढील भागात

भाग – १२ वा लवकरच येतो आहे ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------