Vibhajan - 11 in Marathi Moral Stories by Ankush Shingade books and stories PDF | विभाजन - 11

Featured Books
Categories
Share

विभाजन - 11

विभाजन

(कादंबरी)

(11)

फ्रेंच वसाहतीची समस्या होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही चंद्रनगर, पुद्दुचेरी, कारिकल, माहे व यानम या प्रदेशावर फान्सचे आधिपत्य होते. तेथील रहिवासी भारतीय भारतात सामील होण्यास उत्सुक होते. ते प्रदेश भारताचे घटक असल्यामुळे ते भारताच्या स्वाधीन करावे अशी मागणी भारत सरकारने केली.

फान्सने १९४९ साली चंद्रनगर मध्ये सार्वमत घेतले. तेथील जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला. चंद्रनगर भारताच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर भारतातील उत्तर प्रदेश सरकारच्या हाती सोपवले.

गोव्याची सुद्धा समस्या होती. पोर्तुगालने मात्र आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश भारताच्या स्वाधीन करण्यास नकार दिला. तो प्रदेश मिळविण्यासाठी भारतीयांना लढा द्यावा लागला. या लढ्यात टी बी कुन्हा आघाडीवर होते. त्यांनी सरकार विरुद्ध जनतेत जागृती घडवून आणण्याचे कार्य केले. त्यांनी काँग्रेस समितीची स्थापना केली. पुढे १९४५ मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोवा युथ लीग ही संघटना मुंबईत स्थापन केली. १९४० मध्ये त्यांनी गोव्यात जाऊन भाषण बंदीचा हुकूम मोडला. त्याबद्दल डॉक्टर कुन्हांना आठ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. इस १९४६ मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा सुरू केला. त्यांनी बंदी हुकूम मोडून गोव्यात मडगाव येथे भाषण केले. त्याबद्दल त्यांना पोर्तुगीज सरकारने हद्दपार केले. याच सुमारात गुजरात मधील दादरा आणि नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमंतक दलाची उभारणी करण्यात आली. दोन ऑगस्ट १९५४ रोजी या दलाच्या तरुणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा आणि नगर-हवेली चा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला. या हल्ल्यात विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर आदींनी भाग घेतला होता. १९५४ मध्ये गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली. या समितीने महाराष्ट्रातून सत्याग्रहींच्या अनेक तुकडया गोव्यात पाठवल्या. त्यात ना ग गोरे, सेनापती बापट, पीटर अल्वारिस, महादेवशास्त्री जोशी व त्यांच्या पत्नी सुधाताई इत्यादींचा सहभाग होता. मोहन रानडे हे गोवा मुक्ती आंदोलनातील एक धडाडीचे नेते होते. सत्याग्रही वर पोर्तुगीज सत्तेने अमर्याद जुलूम अत्याचार केले. त्यामुळे भारतातील जनमत अधिक प्रक्षुब्ध झाले.

गोव्यातील स्वातंत्र्यलढ्याने उग्र स्वरूप धारण केले. भारत सरकार पोर्तुगीज सरकारशी सामोपचाराने वाटाघाटी करत होते. मात्र त्याला दाद मिळत नव्हती. शेवटी भारत सरकारने नाईलाजाने लष्करी बळाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. १९६१ डिसेंबर मध्ये भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला. अल्पावधीतच पोर्तुगीज लष्कराने १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीज यांच्या वर्चस्वापासून मुक्त झाला. भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णता उच्चाटन झाले. त्यामुळं भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची खऱ्या अर्थाने परिपूर्ती झाली होती.

भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत आपरेशन ब्लू स्टार म्हणजे स्वातंत्र्याला तडा देणारी गोष्ट होती. भारतात सिख संप्रदाय राहात होता. तो संप्रदाय सुद्धा आपल्या अस्तित्वासाठी लढत असून खलिस्तानची मागणी करीत होता.

पंजाब जेव्हा स्थापन झालं. तेव्हा पंजाबमध्ये सिख पंथाचे लोकं जास्त होते. त्या सिख पंथीयांसोबत इतरही धर्माची लोकं राहात होते. मात्र या सिखांना वाटत होते की जर या भागात राहणारे हिंदू धर्माचे लोकं जर वाढले, तर उद्या आपल्याला या ठिकाणी राहतांना त्रास होईल. सगळं हिंदू धर्मातील लोकांना मिळेल. म्हणून त्यांची खलिस्तानची मागणी. पंजाबमध्ये हिंदू बहुसंख्यांक जर झाले तर सिखांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळणार नाही असं सिखांना वाटत होतं.

पंजाबमध्ये अस्तित्वात असलेला अकाली दल, या दलाला काटछाट देण्यासाठी जनरल सिंह भिंडरावाले ला पुढे आणलं गेलं. हळूहळू भिंडरावाले ची जादू या भागात निर्माण झाली. त्यानं बेरोजगार सिखांची फौज तयार केली. मग काय ही फौज हिंदू च्या विरुद्ध कारवाई करतांना हिंसकतेवर उतरले. त्यानंतर हिंदूंनी जबाब देने सुरु करताच यात वेगळा रंग भरला गेला. मग परिस्थिती गंभीर झाली व त्यानंतर एकाच्या नंतर एकाची हत्या असं सत्र सुरु झालं. यात भिंडरावाले चा हात जरी असला तरी त्याच्या वाढत्या प्रभावानं पंजाब पोलिस त्याला अटक करु शकत नव्हते. एक वेळा अटक केली गेली. पण काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानं त्याच्यावरील आरोप हटवले व त्याची निर्दोष सुटका झाली.

भिंडरावाले ला सरकारने अकाली दलाला नेस्तनाबूत करण्यासाठी हवा दिली असली तरी आता तो सरकारवरही भारी झाला होता. त्यानं पंजाबमधून दिल्ली किंवा इतर भागाला पुरविण्यात येणा-या गव्हाला रोक लावली होती. त्यामुळं तर त्याचा बिमोड करणं आवश्यक होतं. ७ जून १९८४ ला भिंडरावालेला आपरेशन ब्लू स्टार च्या दरम्यान मारुन टाकलं गेलं. या कारवाहीत ८३ सैनिक शहीद झाले. तर ४९२ आतंकी व श्रद्धालू मारल्या गेले. कारण भिंडरावाले स्वर्ण मंदीरात लपला होता.

खलिस्तान हा प्रदेश पश्चिमी भारत व पूर्व पाकिस्तान चा काही भाग मिळवून बनविण्याचं स्वप्न उराशी बाळगून खलिस्तानच्या मागणीसाठी सिख लढत होते. तसेच जे लाहोर आज पाकिस्तानात आहे. ते लाहोर खलिस्तानची राजधानी बनवावे असं खलिस्तान मागणारी मंडळी मानत होती. कारण लाहोर हे सिख साम्राज्याचं असं शहर होतं. जे शहर महाराणा रणजीत सिंह यानं स्थापित केलं होतं. ज्या लाहोरमध्ये बरेच बर्ष महाराणा रणजीत सिंहच्या वंशजांनी राज केला होता.

खलिस्तानची मागणी करणारे आंदोलनकारी पाकिस्तान मधील पंजाब प्रदेश मागत होते. पाकिस्तानमधील बलुचिस्तान, सिंध तर भारतातील हरियाणा, हिमाचलप्रदेश तसेच जम्मू काश्मीर तसेच राजस्थानातील काही भाग मिळून खलिस्तान बनविण्याची स्वप्न पाहात होते.

खलिस्तान आंदोलनाची सुरुवात सुबा आंदोलनातून झाली होती. भाषेच्या आधारावर आमचंही पाकिस्तान सारखं वेगळं राष्ट्र असावं असं पंजाबवासीय सिखांना वाटत होतं. त्यातूनच अकाली दलाचा जन्म झाला. त्यातच अकाली दलाने लवकरच लोकप्रियता हासील केली. पुढे भाषेच्या आधारावर १९६६ मध्ये पंजाब, हरयाणा व केंद्रशासीत प्रदेश चंदीगढ बनलं. परंतू या पंजाबातील सिखवासीयांना राज्य हवं नव्हतं. त्यांना राष्ट्र हवं होतं. त्याच राष्ट्र निर्मीतीसाठी येथील काही स्थानिक नेत्यांनी खलिस्तान हवंच यासाठी आंदोलन करणं सुरु केलं. मग काय १९८० ला या आंदोलनाने जास्त जोर पकडला. मग परत ह्या आंदोलनाने हिंसक वळण घेणं सुरु केलं. त्यातच भिंडरावाला याने या आंदोलनाला आधार दिला.

१९८० ते १९८४ च्या दरम्यान पंजाबमध्ये आतंकी हिस्यांनी जोरदार उडी घेतली. त्यातच १९८३ ला डी आय जी टकवाल यांची हत्या स्वर्णमंदीर परीसरात झाली. त्यानंतर भिंडरावाला याने या आंदोलनाला अंजाम देण्यासाठी सुवर्णमंदीराला आपला निशाणा बनवले. त्यातच त्याने या मंदीराला स्वतःसाठी किल्ला बनवले.

भिंडरावाला चे आंदोलन म्हणजे तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी साठी डोकेदुखी ठरत असतांना मग इंदिरा गांधी ने काही विकल्प शोधले. परंतू तिला काही विकल्प सापडेनासे झाले. मग काय स्वर्णमंदीरात लपलेल्या भिंडरावाल्याला बाहेर कसे काढावे हा प्रश्न इंदिरा गांधी ला पडल्यावर ती त्या दिशेने पावले उचलू लागली. मग त्यातच ऑपरेशन सनडाऊन बनवल्या गेलं. २०० कमांडोजला प्रशिक्षण दिलं गेलं. परंतू हे ऑपरेशन सनडाऊन लोकांना जास्त नुकसानदायक वाटत असल्यानं ते फोल झालं. त्यानंतर ऑपरेशन ब्लू स्टार ची योजना आखली गेली. या ऑपरेशन ब्लू स्टार अंतर्गत पंजाबमध्ये १ ते ३ जुन १९८४ ला रेल्वे, रस्ते व एअर ट्रान्सफोर्ट सर्वीस बंद केली गेली. सुवर्णमंदीरातील वीज व पाणी सप्लाई बंद केली गेली. त्यातच ६ जुन १९८४ ला या सुवर्णमंदीरावरच भीषण गोळीबारी झाली. त्यात भिंडरावाला मारल्या गेला.

भिंडरावाल्याच्या मृत्यूनं खलिस्तानची मागणी संपली नाही. नाही ते आंदोलन संपलं. ही घटना इंदिरा गांधी ने करुन घेतली. म्हणून इंदिरा गांधी ची हत्या त्याच वर्षी चार महिण्यानंतर ३१ अॉक्टोंबर १९८४ ला करण्यात आली.

भिंडरावाल्याची हत्या इंदिरा गांधी ची हत्या झाली. म्हणून हे आंदोलन बंद झाले असे नाही. तर २३ जुन १९८५ ला सिखांनी एअर इंडीयीचं विमान पाडलं. त्यात ३२९ लोकं मरण पावले. यात आरोपींनी भिंडरावाल्याच्या वधाचा बदला घेतला असं स्पष्ट सांगीतलं. त्यातच १० अॉगष्ट १९८६ ला पुर्व आर्मी चीफ जनरल ए एस वैद्य याचीही दोन बाईकस्वारानं हत्या केली. कारण त्यानं ऑपरेशन ब्लू स्टार चं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर ३१ अॉगस्ट १९९५ ला पंजाबच्या सिव्हील सचिवालयाजवळ माजी मुख्यमंत्री बेअंत सिंगाची हत्या झाली.

भारतात केवळ हिंदू मुसलमान हेच प्रमुख धर्म नव्हते. तर बौद्ध आणि सिख हेही धर्म होते. त्यांनाही वाटत होतं की त्यांचं वेगळं असं राष्ट्र बनावं. त्यांचीही संख्या त्या त्या भागात जास्त होती. त्यातून झालेली खलिस्तानची मागणी. परंतू जर अशाच प्रकारच्या प्रत्येकांच्या मागण्या पुर्ण केल्यास भारत एकसंध राहणार नाही असं भारताला वाटत असल्यानं भारत खलिस्तानला हवा कशी देणार. शिवाय खलिस्तान देणे म्हणजे त्या ठिकाणी परत भारत पाकिस्तान घडवणे होईल अशी भीती भारत सरकारला तसेच कुणालाही वाटल्याखेरीज राहणार नाही. कारण भारत पाकिस्तान निर्मीती वेळी भयंकर रक्तपात घडला होता. त्याचबरोबर दुसरी भीती ही देखील सतावत आहे की या भारतात इतरही विविध धर्माचे लोकं राहतात. मग प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या मागणीनुसार जर असेच वेगळे राष्ट्र दिले तर भारत संघराज्य तरी राहील काय? त्यापेक्षा ते संघ राज्य बनण्याऐवजी संस्थानंच बरी होती की ज्या संस्थानात राजेरजवाड्याची गुलामगीरी होती.

शेकडो वर्षापासून गुलामीत खितपडत असलेल्या जनतेला भारतीय स्वातंत्र्याच्या निमित्याने स्वातंत्र्य मिळून भारतीय सामान्य जनतेची या अनेक वर्षापासूनच्या गुलामगीरीतून मुक्तता झाली. हाच आनंद त्रिकालबाधीत टिकविण्यासाठी सार्वभौमत्व आलं. त्यामुळं खलिस्तानच नाही तर इतरही राष्ट्र बनविणे शक्य नाही. त्यातच खलिस्तानची मागणी कितीही जोर पकडत असली तरी ती पुर्ण करता येणे सरकारला शक्य नव्हते. म्हणूनच की काय १९८४ ला इंदिरा गांधींना ऑपरेशन ब्लू स्टार चे पाऊल उचलावे लागले. ते जरी खलिस्तानची मागणी करणा-या आंदोलनकारींना मान्य नसले तरीही... ...

हैदराबाद, जुनागढ, काश्मीर व गोव्याचा मुक्तीलढा सुरु होता. प्रत्येक संस्थानासमोर प्रश्न होता की कोणामध्ये सामील व्हायचं. भारत की पाकिस्तान. त्यानुसार तेथील लोकं पावले उचलत होते. तर काही राजेही पावले उचलत होते. काही लोकं मात्र स्वतःच स्थलांतर करीत होते. काही भीतीनं स्थलांतर करीत होते तर काही स्वखुशीनंही स्थलांतर करीत होते. आपली मालमत्ता, गुरंढोरं सगळं सोडून.

वर्गीकरण झालं होतं. लार्ड माऊंटबैटनच्या म्हणण्यानुसार जागेचं वाटप झालं होतं. पण पैशाचं काय?पाकिस्तान म्हणत होतं की आमच्या वाट्याला येणारा पैसाही द्यावा. पैशाचीही वाटणी व्हावी.

हिंदू महासभेचं म्हणणं होतं की हे पैसे पाकिस्तानला द्यायचे कसे? त्यांचं भारतावर काहीएक ऋण नाही. तेव्हा पैसे कशाचे द्यायचे? शिवाय पाकिस्तान आमची मागणी होती काय?त्यांनी तर आमची इच्छा नसतांना पाकिस्तान मागतला. मग आपण पाकिस्तान दिला ना. त्यांना पाकिस्तान मिळाला ना. मग पैसे द्यायला नको. त्यातच हिंसा भडकायला लागल्या. शेवटी नाईलाजानं म. गांधींनी पंचावन कोटी रुपये पाकिस्तानला देवू केले. लहान भाऊ समजून.

म. गांधींचे पाकिस्तानला पैसे देणे. इथल्या तमाम भारतीयांना पटणारी गोष्ट वाटत नव्हती. लहान भाऊ म्हणून त्याचं कसंही वागणं ही न पटणारी गोष्ट होती. शिवाय पंचावन कोटी द्यायचे कबूल केल्यानं काही दंगा क्षमणार नव्हता. जसा पैशाच्या नादानं पाकिस्ताननं दंगा भडकवला होता. तसा येथील पैसा जात असल्यानं हिंदूंनीही दंगा भडकवला होता. त्यातच निरपराध लोकं मरण पावल्यानं व ते डोळ्यानं पाहणं अवघड वाटत असल्यानं हिंदू डोळे लावून बसू शकत नव्हते. त्यातच म गांधींचा काही लोकांना राग आला.