भाग १
जन्म आणि मृत्यू या मध्ये जर कोणती गोष्ट आपल्या हातात असते तर ती म्हणजे संगत. आपले आई वडील आपले नातेवाईक इव्हन आपला lifepartner हा देखील वरून ठरवून आलेला असतो. या सगळ्या मध्ये जर कोणी अचानक केव्हा ठरवून भेटत असेल तर ते मित्र. कारण मैत्री हे एक असं नातं आहे जे कधी कोणत्या अपेक्षा किंवा कारणांनी होत नसते. ती होते आणि कायम आपल्या सोबत असते.
माझ्या एवढ्या मोठ्या लाईन्स वरून हे तर समजल असेल कि आपण एका छानश्या मैत्री वर बोलणार आहोत.
सायली खूप सुंदर कोणीही मोहून जाईल अशी. खूप कमी वयात जबाबदारी ची जाणीव झालेली. Education पूर्ण करता करता जॉब करणारी. तशी ती कॉलेज मध्ये फारशी दिसायची नाही पण फायनल इयर असल्या मुले तिला कॉलेज compulsory.......
आज कॉलेज चा पहिला दिवस छानसा Jean Top & High ponytail घालून सायली कॉलेज ला आली. कलासरूम मध्ये एन्ट्री करताना एक जोरात धक्का तिला बसला... आधीच उशीर झाला असल्या मुले तिने लक्ष ना देता. कलासरूम मध्ये जाऊन बसली. तिची फर्स्ट इयर पासून ची फ्रेइन्ड निशा आधीच आलेली दिसली , सो पटकन जात तिला hii केल. जोरात धक्का लागल्या मुले तिचा हाथ दुखत होता पण त्याकडे लक्ष ना देता lecture ऐकण्याचा प्रयत्न करत होती . आणि ह्या तिच्या सर्व गोष्टी रोहित खूप शांत पणे पाहत होता. कारण कुठून तरी त्याला तिच्या या अवस्थेच वाईट वाटत होत. त्याच्या चुकी मुले तिला लागला होत. जो तिला जोरात धडकला तो रोहित बरका. रोहित कॉलेज मधला फर्स्ट रँक स्टुडन्ट, टीचर्स चा लाडका...... आणि कॉलेज च्या मुलींचा प्राण. प्रत्येक मुलगी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची पण रोहित मात्र आपल्या कामाशी काम ठेवणारा.
Lecture संपले प्रोफेसर बाहेर गेल्यावर रोहित पटकन सायली कडे जातो आणि तिला सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करतो ....... पण निशा रोहित ला पाहून सायली ला बाजूला करते आणि स्वतःच गप्पा मारायला सुरुवात करते. या सगळ्यात सायली कधी गायब होते हे रोहित ला समजत नाही. तो दात खात तिथून library मध्ये निघून जातो .
रोहित ला आज खूप वाईट वाटत होत पण काहीच करता येत नव्हत. आणि हिथे आपली सायली सगळं विसरून ऑफिस मध्ये आली होती. तिने आपल्या कामाला सुरुवात पण केली होती.
रोहित दुसऱ्या दिवसाची वाट पाहत असतो. तसा रोहित फार कमी मिसळायचा सगळ्यांसोबत पण का कुणास ठाऊक सायली विषयी त्याला आपले पणा जाणवला होता maybe तो guilty feel करत होता. दुसरा दिवस उजाडला रोहित लवकर कॉलेज मध्ये आला जेणेकरून प्रोफेसर यायच्या आधी तो सायली ला सॉरी म्हणेल. पण तस झालाच नाही. सायली पुढचे २ दिवस कॉलेज ला आलीच नाही. तो हाच विचार करत होता फायनल इयर lecture compulsory तरीही अस कोणी इर्रेस्पॉन्सिबल कस असू शकत.
इथे सायली मात्र कधी तिच्या हाथातला प्रोजेक्ट complet होतो आणि कॉलेज ला जाते असा तिला झाला होत.
कारण नोट्स कोण्ही देणार नाहीत friendship च्या नावा खाली खूप काही बोलतील पण ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस मात्र कारण रेडी असत.
या दोन दिवसात कॉलेज मध्ये खूप काही झाला असत. पण जे झाल त्यात मात्र रोहित खूप खुश असतो. त्याला फक्त घाई होती ती सायली च्या येण्याची ती कधी येते आणि तो तिच्याशी बोलतो अस त्याला झाल असत. सायली ला मात्र या सगळ्याची काहीच कल्पना नसते.
बघूया मग पुढे काय होईल…….
Bye Stay safe