कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन
भाग – २८ वा
-----------------------------------------------------------
१.
हॉस्पिटलमध्ये अविनाश जळगावकर काकांची भेट आणि त्यांनी सांगितलेली बातमी ऐकून
अनुशाला खूपच आनंद झाला होता . त्याच आनंदात ती घरी आली , आणि तिने लगेच
रंजनादीदीला फोन लावला .
हेल्लो दीदी ..अनुषा बोलते आहे , वेळ आहे ना ?
बोलायचे आहे .सांगायचे आहे तुम्हाला ..
अनुशाच्या आवाजातील अधीरता दीदीला जाणवली ..आणि अंदाज आला
काही तरी महत्वाचे आणि छान असेच सांगायची घाई या मुलीला झाली आहे..!
हो अनुषा ..वेळ आहे मला..तू बोल ..
दीदी..तशी तर ही बातमी सिरीयस आहे ..पण..याचा नंतरचा भाग खूप आनंदाचा आहे..
दीदी म्हणाल्या ..अनुषा ,उगीच टेन्शन नको वाढवू बाई ..!
काय ते पटापट सांगून टाक एकदा .
अनुषा सांगू लागली ..
गेल्या पंधरा दिवसापूर्वी ..देशमुख सरांना स्ट्रोक “आला ..आणि त्यांना हॉस्पिटल मध्ये admit
करावे लागले .
घरून ऑफिसला निघातंना हा त्रास झाला ..हे बरेच झाले म्हणयचे .
घरच्या ऑफिस मधला स्टाफ आणि सिक्युरिटी यांनी लगेच कार मध्ये टाकून सरांना हॉस्पिटल मध्ये
आणले अगदी वेळेवर treetment सुरु झाली म्हणून ,संभाव्य धोका टाळता आलाय.
डॉक्टर म्हणाले -
यांना बीपी नाही, शुगर नाही ..हार्ट रिलेटेड काही त्रास नाही ..हे नशीब .
म्हणूनच स्ट्रोक आला नि थोडा दणका देऊन गेला,यावरच निभावले असेच म्हणायचे .
सरांच्या शरीराच्या उजव्या बाजूला देमेज करून गेलाय . रिकव्हरी होत राहील .
परिस्थिती खूप चांगली नक्की होईल ..
अनुशाला मध्येच थांबवीत ..दीदी म्हणाल्या ..
अनुषा ..हे सगळे अपडेट मला रोज मिळत आहेत ..आणि ..
आम्ही दोघे ही ..दोन-तीन वेळा येऊन गेलोत ,पण, रात्रीच्या वेळी ..बाबांना झोप लागल्यावर .
आई आणि अभिजितने ही गोष्ट कुणालाही सांगितली नाहीये ..
अगदी तुला सुद्धा ..!
कारण अभिजित आणि तुझे नाते , आपल्यात निर्माण झालेले नाते .याबद्दल आईला माहिती नाहीये ,
आणि बाबंना तर नाहीच नाही.
सॉरी-अनुषा , तुला वाईट वाटेल आमच्या अशा वागण्याचे ,कदाचित अभिजीतचा राग ही येईल तुला ..
पण, वास्तव परिस्थिती लक्षात घेता ..आपल्याला अशीच लपवा –छपवी करीत राहावे लागणार आहे.
अनुषा म्हणाली –
यस दीदी ..अशा गोष्टींचे मला कधीच काही वावगे वाटणार नाही , मी रागावणार नाही, आणि रुसणार- फुगणार तर
नाहीच .तुम्ही अगदी निश्चिंत राहावे.
दीदी म्हणाल्या –
अनुषा – कशी ग इतकी समजदार मुलगी झालीस तू ?
खूप समाधान वाटते मला तुझ्याशी बोलून.
अनुषा म्हणाली –
दीदी, मी एक ठरवले आहे ..आपल्यावर प्रेम कारणार्या माणसांवर कधीही रागाव्यचे नाही ,त्यांच्यावर
कधी नाराज व्हायचे नाही ..आणि समजा –
कधी वाईट वाटले ..तर .त्यातून गैरसमज होऊ द्यायचा नाही ..ते जास्त नुकसान करणारे आहे ,
हे मी आता शिकत आले आहे दीदी.
प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ दिला की..आपोआपच काय ते कळतेच की आपल्याला .
--------------------------------------------------------------------------------------------------------------
२.
दीदी -आता जे सांगते आहे ..ते तर तुम्हाला नक्कीच माहिती नाहीये ..
कारण ही गोष्ट ..मला आणि अभिजित ..दोघांना एकाच वेळी .आज समजली आहे .
दीदी –आज संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी हॉस्पिटलमध्ये अभिजित ला भेटायला गेले होते .
तशी तर मी अजून देशमुखसरांच्या रूम मध्ये गेलेली नाही ..
बाहेरच्या बाहेर मी आणि अभिजित भेटतो ..बोलतो ..बस.
पण,आज हॉस्पिटलच्या रिसेप्शन हॉलमध्ये ..माझी भेट अविनाश जळगावकरकाकांशी झाली ,
अभिजित त्यांना पाहून माझ्यापासून दूर अंतरावर खिडकीत उभा होता .
पण त्यांनी अभिजीतला बोलावून घेत माझी ओळख करून दिली .
मग, आम्ही खाली कॅन्टीन मध्ये जाऊन बोलत बसलो ..
तेव्हा जळगावकरकाका मला म्हणाले ..
अनुषा ..
तुझ्या कॉलेजचा कार्यक्रम ..देशमुख सर आणि मी दोघांनी लाइव्ह पाहिला , हे तुला दुसरे दिवशी
ऑफिसात सांगायचे होते ..पण त्या सकाळीच देशमुख सरांना स्ट्रोक आला ..आणि हे सुरु झाले
त्यात तुला सांगणे राहून गेले ..
हे ऐकून दीदी म्हणाल्या ..
काय सांगते आहेस अनुषा ..बाप रे ..!
बाबांनी आम्हाला लाइव्ह कार्यक्रमात पाहिले ..ऐकले ..!
काय म्हणाले ते ?ऐकायचे राहून गेले की ..!
अनुषा म्हणाली ..
नाही दीदी ,असे काही नाही झालेले ,
देशमुखसरंनी - तुम्हाला आणि जीजूंना पहिल्यांदा पाहिले , तुमच्या बोलण्यातून त्यांना तुमच्या भावना
कळाल्या ,त्या नक्कीच त्यांच्या मना पर्यंत पोन्च्ल्यात ..
म्हणून ते कार्यक्रम पाहून झाल्यावर म्हणाले ..
अविनाश – आयुष्यभर मी एकच केले आहे रे ,
गोष्टी नको तितक्या ताणून धरल्यात रे ..,माझ्या माणसांना दुखावले ,गमावून बसलोय त्यांना .
पण मला आता बदलायचे आहे ..याला उशीर नको करायला ..
या अनुशाची मदत घेईन मी ..माझ्या माणसांच्या जवळ जाण्यासाठी.
तिला हे सुचले आहे ,म्हणजे मी सांगेल तसे करणे तिला नक्कीच जमेल .
बघा ना दीदी ..सगळं काही मी ठरवले आहे तसेच होते आहे
पण, माझेच लक खराब ,त्याला काय करणार .
सरांना अचानक हा त्रास झालाय ..!
दीदी म्हणाल्या –
अनुषा – हे तर खूपच आनंददायक सांगितलेस . आम्हा दोघांना एकत्र पाहून बाबांना आनंद झाला .
माझ्या मनावरचे खूप मोठे ओझे हलके झाले आहे आज.
अनुषा ..यु आर ग्रेट ..अनोखी जादुगार आहेस आमच्यासाठी ..
तुझ्यामुळे .माझ्या बाबंना जाणीव तर झालीय..की
प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..!
आपण वाट पाहू या .काही दिवस.
हो दीदी ..
भेटू पुन्हा बाय , गुड नाईट दीदी
अनुशाने फोन कट केला ..
------------------
३.
सकाळी साडे दहा वाजले, आणि अधीर झालेल्या मनाने ..अनुषा हॉस्पिटलमध्ये पोंचली .
बाहेर हॉल मध्ये बसून अभिजित आणि जळगावकर या दोघांची वाट पाहत होती .
देशमुख सरांची तब्येत सुधारते आहे ..हे पाहून ..सगळ्यांची काळजी तशी कमीच झाली होती .
सकाळचा राउंड झालेला होता . अभिजित आणि त्याची आई ..दोघे ही रूम मध्ये होते .
थोड्यावेळात येतो “अभिजितने अनुशाला तसा मेसेज केला ,म्हणून ती निवांत बसून राहिली .
अकरा वाजता ..अविनाश जळगावकर काका ..आले ..त्यांच्या हातात ..देशमुख सरांचा laptop
होता , ऑफिसच्या चाव्या होत्या .. हे घेऊन यावे ,असे त्यांना कालच सांगितले होते .
अनुशाला आलेली पाहत ..ते म्हणाले ..
अनुषा , आत चल माझ्या सोबत , आज तू भेटावेस सरांना असे मला वाटते .
आत अभिजित आहे, आमच्या वहिनीसाहेब आहेत ..त्यांना बरे वाटेल ..तुला भेटून .
जळगावकर काकांचे बोलणे ऐकून अनुषा मनात म्हणाली ..
काका ..काकुना काय वाटेल माहिती नाही , देशमुखसर तर आता पेशंट आहेत ,
मला पाहून अभिजीतला नक्कीच आनंद होईल .
जळगावकर काकांच्या पाठोपाठ ..अनुशाला आत आलेली पाहून अभिजीतला आश्चर्य वाटले .
त्याला झालेला आनंद त्याने चेहेर्यावर दिसू दिलेला नाहीये ..
त्याचा हा अनोळखीपणा दाखवण्याचा
खटाटोप पाहून अनुशाच्या चेहेर्यावर मिस्कील हसू उमटलेले आहे..हे अभिजितने पाहिले.
सकाळचा चहा , गोळ्या आणि औषध डोस घेऊन झाले होते ..
उजव्या बाजूवर जास्त ताण नको म्हणून
डाव्या बाजूला सरकवून देशमुखसाहेबांना थोडे उठवून भिंतीला टेकवून बसवले होते.
हा त्रास सोडला तर, त्यांचा चेहेरा फ्रेश वाटत होता , नजर देखील ओळख देणारी वाटत होती ,
थोडक्यात त्यांच्या स्मरण शक्तीला काही ही इजा पोन्च्लेली नाही “ हे निदान डॉक्टरानी सांगितले
होते .
मात्र ..त्यांचे बोलणे ..,ते मात्र अस्पष्ट ,आणि तोतरेपानाचे असणार ..त्यामुळे ..हा होणारा
त्रास सहन करण्यावाचून पर्याय नाहीये “,
डॉक्टर ज्या वेळी हे सांगत होते ..त्यावर देशमुख साहेबांनी ..मान डोलवित सगळ्या सुचना मान्य
करतो .असे .डॉक्टरांना डाव्या हाताने शेक –हेंड करीत सांगितले .
जळगावकर आलेले पाहून देशमुख सरांना छान वाटले ..आणि त्याच वेळी आत येत असलेली अनुषा
दिसली ..ते पाहून त्यांनी आपला दावा हात उंचावत ..ये ये ....असे खुणावत खुर्चीकडे बोट दाखवत
बसण्यास सांगितले .
जळगावकर म्हणाले –
साहेब ..मीच म्हणालो अनुशाला ..तू ये भेटायला ..साहेबांना बरे वाटेल.
आपल्या हाताने थम्स-अप करीत ..देशमुख सर जणू म्हणाले ..छान केलेत तुम्ही .
जळगावकरांनी बैग, laptop, आणि ऑफिस चाव्या ..सरांच्या समोर ठेवल्या ,आणि ते समोरच्या
खुर्चीवर बसले.
देशमुखसरांनी ..अभिजीतला जवळ येऊन बसण्यास खुणावले ..
अभिजित त्यांच्याजवळ येऊन बसला ..
जळगावकर सर, अभिजितची आई , समोर बसलेली अनुषा .त्या दोघांच्याकडे पाहत होते .
देशमुखसरांनी ..ऑफिस laptop ,आपली स्वतःची बैग, आणि चाव्या ..
अभिजीतच्या हातात देत.. दोन्ही हात जोडून ..त्याच्याकडे पाहिले ..त्यांचे डोळे पाणवलेले आहेत
असेच सर्वांना दिसत होते .
जणू त्यांना म्हणायचे होते ..
पोरा ..आता तूच सांभाळ हे सगळे .. माझा भरवसा नाही.
कठोर मनाच्या बाबांच्या डोळ्यात पाणी पाहून ..क्षणभर अभिजित कावरा –बावरा होऊन गेला .
त्याने आपल्या बाबाकडे पाहिले –
जळगावकर काका अभिजीतला म्हणाले –
बेटा – हीच योग्य वेळ आहे , वडिलांचा भार हलका करण्याची , त्यांचा वारसा सांभाळण्याची
जबबदारी तुझीच तर आहे.
आता पर्यंत काय झाले ? का झाले ? त्याचा विचार करण्याची ही वेळ नाही.
देशमुखचा पी.ए., एक मित्र , त्यांच्या उपकाराखाली दाबून गेलेला एक गरजू ..तुझा काका
काही ही समज ,
पण, तुझे बाबा आज तुझ्यावर जे सोपवत आहेत ..त्याचा मोठ्या मनाने स्वीकार कर.
अभिजित यातच सगळ्यांचे भले आहे.
कधी नव्हे ते..अभिजीतची आई ..पुढे होऊन ..बाप-लेकांच्या जवळ उभी राहिली ..
देशमुख सरांच्या हाताला आधार देत ..सगळ्या वस्तू ..अभिजीतच्या हाती देण्यास मदत केली .
हे पाहून जळगावकरांना त्यांच्या डोळ्यातले आनंदाचे अश्रू लपवणे जमलेच नाही.
देशमुख सरांच्या जवळ जात ते म्हणाले ..
साहेब ..मी म्हणतो न तुम्हाला नेहमी ..
देव दयाळू आहे..!
यावर देशमुख साहेबांनी ..समोर उभ्या असलेल्या अनुशाकडे बोट दाखवले ..
जणू ते म्हणत होते ..
ही देवी आहे माझ्या साठी ..
------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी पुढच्या भागात
भाग -२९ वा लवकरच येतो आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन
ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.
९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------