This is a prayer! in Marathi Women Focused by राहुल पिसाळ (रांच) books and stories PDF | हीच एक प्रार्थना!

Featured Books
  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

  • आखेट महल - 7

    छ:शंभूसिंह के साथ गौरांबर उस दिन उसके गाँव में क्या आया, उसक...

  • Nafrat e Ishq - Part 7

    तीन दिन बीत चुके थे, लेकिन मनोज और आदित्य की चोटों की कसक अब...

Categories
Share

हीच एक प्रार्थना!

*हीच एक प्रार्थना!🙏*
तो कधीच न लवकर उठणारा आज लवकर उठून बसला होता कुणास ठाऊक त्याच्या आईलाही गोष्ट नवल करणारीच होती.कारण या बाळाला (अहो तुम्ही विचाराल बाळ कोणाला म्हणत आहे तर प्रत्येक मुल आईसाठी लहानच असतं) असो बस्स झालं!आईचं पुराण किती गायलं तरी कमीच की!!!

आई वाटत होता हा तसा आज कसा लवकर उठला कारण आज तर तसा शनिवार सुद्धा नाही!आणि अरेरे...!मी तर विसरलेच की,"आता तर मुलांच्या शाळा सुद्धा बंद आहेत!". तरी पण हा कसा लवकर उठला आणि आज तर लवकर याच तास सुद्धा नव्हता.कारण आज महात्म्याची जयंती असल्याने सुट्टी जाहीर झाली होती!

अहो , आजकालच्या शाळेत हा नवीन गोष्ट बघायला मिळतात!काय तर आज म्हणे 'हॉली डे' कारण विचारले तर म्हणतात कसे,"ते कोण गं??? ज्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य व्हावा म्हणुन तो कसला तो!!! सत्याग्रह केला म्हणे!".
हे ऐकल्यानंतर आईला एका गोष्टीच बरं वाटलं की, मुलाला निदान 'सत्याग्रह' हा शब्द तर माहीत आहे!
नाहीतर आजची मुले गांधीजींना एकेरी धाव,हाकेशिवाय बोलतच नाही.त्यांचा तरी काय दोष काय म्हणायचा!!!
आम्हीच कुठेतरी कमी पडलो आमचा तो सुवर्ण इतिहास त्यांना माहित करुन देण्यासाठी नव्हे का!
असो हा असा एकाच मुद्द्यावर चर्चा करायला खुप वेळ लागेल हो !चला माझ्या वरणाच्या दाळींनी वाटत भाताच्या कुंडात उड्डी मारली वाटते!😃😃😃
अहो काय ते विचारताय?
अहो कुकरने शिट्टी मारली !!😃 चला मी जाते किचनमध्ये ! तोपर्यंत आमच्या बाळाला जरा बघा बरं का!

बाळ तसाच झोपेतून उठून, संपूर्ण अंथरूणाची घड्डी घालून !तसाच आपली संपूर्ण दिनचर्या उरकून तसाच देवघरात गेला! मला त्याचं थोड आश्चर्य वाटलं कारण हा तोच मुलगा आहे .जो देवाला कधीच हात पण नीट जोडत नव्हता.आणि बरं खुपचं आठवण झालीच तर गणपतीच्या वेळी मोदक मिळावा म्हणुन शेवटपर्यंत एक डोळा उघडून का होईना संपूर्ण आरती तोंडपाठ करून घोकायचा!आणि शेवटी राहिलेले सर्व मोदक हा एकटाच फस्त करायचा.त्यामुळे देव आणि याचा संबंध फक्त कोणीही मध्यस्ती न करता आपली हक्काची गोष्ट सहजतेने मिळावी . यासाठी केलेला संघर्ष एवढंच काही तरी त्याचं वर्णन करता येईल!

तो तसाच देवघराकडे गेला.कारण प्रत्येकवेळी नाष्टासाठी अडून असलेलं बाळ आज गुण्यागोविंदाने आज कसं काय होतं कुणास ठाऊक!तो देवासमोर गेला आणि त्या देवासमोर ताजे टवटवीत चिनी गुलाबाची फुले ठेवली.पुजाऱ्यांनसारखा त्याच्या मनात एखाद्याला भ्रष्टाचार करावा असा मुळीच उद्देश नव्हता! त्याने त्या देवाच्या प्रतिमेभोवती एक आगरबत्ती लावली.त्याचा सुगंध संपूर्ण घरातच दरवळत होता.मन कसं एकदा प्रसन्न झाले.एवढ्या लहान कोवळ्या मुलाची इतकी कोमल, निस्वार्थी भावना तो कोणाजवळ मागत आहे त्याला का सहज ऐकू जाऊ नये!
आणि ते आपले डोळे घट्ट मिटले होते.तो कोणाशी तर एकांतात मनाशीच हितगुज करत असावा.त्याच्या त्या कोमल पापणीतून एकदम काही अश्रू सहज बाहेर आले आणि त्या निरागस गालावरून जाता जाता हनुवटीवरून सहज त्या खालील फरशीवर सहज टिपले गेले.अन् माझ्या छातीत चर्रचर्र झालं.कारण एवढ्याशा निष्पाप मनाला नक्की काय टोचल असलं??? असा सारखा प्रश्न माझ्या मनात आला.पण मला त्याची एकाग्रहता तोडायची नव्हती आणि आजच्या तरुण पिढीवर होणाऱ्या आरोपाची खिल्ली या द्वारे उडवायची होती!कारण आजची मुलं सुद्धा संवेदनशील आहेत!

मी त्याच्याजवळ गेले.त्याला माहीत होतं की,आईनं हे नक्की पाहील असणार!आणि मला तसाच बिलगून राहिला!तसा मला तो लहान असतानाच असा बिलगला होता आणि मोबाईल आणि टिव्ही पासून मुक्त होऊन एक हुंदाडलेल एक वासरू आपल्या कळपातल्या आईला ओळखून खुप दिवसांनी असं आज बिलगल होत.त्याला शांत करुन मी त्याला विचारले आजच्या या पूजा ,आणि तुला आलेलं रडू आणि खास म्हणजे तू कशाची प्रार्थना करत होता???

मला त्याच्या उत्तराची उत्कटता होती आणि तो म्हटला,"अगं,आई!!ते बघ ना! टिव्हीवर त्या ताईला कसं मारलं हे दाखवत होते!आई सारखे ते बलात्कार हा शब्द वापरत होते मला त्याचा नीटसा अर्थ माहीत नाही पण त्यांच्या बोलण्यावरून ते काहीतरी भयानक, अमानुषता आणि खुप अशी क्रूरता वाटली!आणि त्या ताईला तरी आपण नाही गं वाचवू शकलो.पण तिच्या झालेल्या गोष्टीला दुःख म्हणुन मी त्या देवाला म्हटलं त्या ताईला वर तरी सुखात ठेवशील ना?इथे तिच्या घरच्यांना सुद्धा भेटू देत नाहीत.आणि अशी वेळ कुणावरच येऊ नये अशी तू काहीतरी करशील ना? प्रत्येक दिदी , ताईला लढण्याचं बळ देशील ना!"

एवढ्या त्याच्या संवेदनशील प्रश्नांनी मन खुप रक्त बंबाळ झाले होते.तशाच जड पायांनी मी स्वयंपाक घराकडे चालले होते!

त्याच्या त्या प्रार्थनेसंगे माझीही एक प्रार्थना हात जोडून करत होते.देव आहे का माहीत नाही पण अशा कृत्यांना विरोध करण्याचं बळ मी माझ्या मुलींमध्ये, बहीणी मध्ये, संपूर्ण स्त्री वर्गामध्ये निर्माण करू इच्छिते!🙏हीच एक प्रार्थना!!!🙏🙏🙏
लेखक:- ©राहुल पिसाळ ( रांच)