Guntata Hruday He - 4 in Marathi Love Stories by preeti sawant dalvi books and stories PDF | गुंतता हृदय हे !! (भाग ४)

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

गुंतता हृदय हे !! (भाग ४)

आर्या हसत हसतच समीर जवळ आली..

इतक्यात तिला आठवले की, समीरला तिला काहीतरी सांगायचे होते..

ती लगेच म्हणाली, "अरे समीर तू काहीतरी सांगणार होतास. बोल काय बोलायचंय."

तो बोलणारच होता की, आर्याच्या फोनची मेसेज टोन वाजली..तिने पाहिले तर अनिशचा मेसेज होता. त्याने तिला भेटायची वेळ आणि ठिकाणाचे नाव मेसेज केले होते..

त्याने भेटायची वेळ ५ वाजताची दिली होती.

आर्याने घड्याळाकडे बघितले तर ३ वाजत होते..म्हणजे आर्याकडे फक्त २ तासच होते..तयार व्हायला..

ती लगेच शेखरजवळ गेली व तिने शेखरला विनंती केली की, तिला एका महत्वाच्या कामामुळे आताच घरी जावे लागणार म्हणून..शेखरने एकवार समीरकडे पाहिले..तर समीरने मान हलवून हो असा इशारा केला..मग काय, शेखरने आर्याला हो म्हंटले.

मग आर्याने पर्स उचलली आणि ती घरी जायला निघणार..इतक्यात तिला काहीतरी आठवले म्हणून ती परत आली आणि समीरच्या समोर उभी राहिली व म्हणाली,"सो, सॉरी यार, आपण उद्या बोललं तर चालेल तुला, प्लीज, मला खूप अर्जेन्ट काम आहे. उद्या नक्की बोलू.. बाय!!"

समीरने आर्याकडे बघून स्मित हास्य केले आणि मानेने हो म्हटले..

आर्या थोड्याच वेळात घरी पोहोचली..आर्याला लवकर घरी आलेलं पाहून तिची आई सुद्धा थोडी आश्चर्यचकित झाली..कारण महत्वाचं कारण असल्याशिवाय आर्या कधीच लवकर घरी येत नसे आणि सुट्टी ही घेत नसे..ती तिचे काम चोख करत असे..नेहमीच!!

जोशी काकू म्हणजेच आर्याची आई आर्याला म्हणाल्या, "अग आर्या, आज लवकर कशी आलीस? कुठे बाहेर जायचंय काय?"

आर्या उत्तरली,"हो आई. मला थोडं ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचंय..मी येईन तासाभरात परत.."

(थोड्यावेळानंतर..)

"अगं अगं, काय हवय तुला मला सांग. मी देते काढून. ही मुलगी ना..सगळ्या कपड्यांच्या घड्या विस्कटून टाकल्या. आर्या हे सगळे कोण उचलणार..किती तो पसारा केलायेस.." काकू म्हणाल्या.

"आई बस ना आता, निदान आज तरी नको ना..मी आवरेन आल्यावर रूम..आता प्लीज तू शांत राहा..कटकट नको करुस" आर्या म्हणाली आणि घरातून लवकर सटकली..

जोशी काकूंची बडबड सुरूच होती..

जशा सगळ्यांच्याच आई करतात😁

असो, आर्या ५ मिनीट आधीच कॉफी शॉपमध्ये पोहोचली.. पण पाहते तर काय???

अनिश आधीच तिथे बसलेला तिला दिसला..

अनिशने ही आर्याला पाहिले आणि बघतच राहिला.. आर्याच्या बाबतीतही तसचं काहीतरी झालं..

अनिशने ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती व डोळ्यांवर ग्लेअर लावला होता..

आणि आर्याने पिंकीश कलरचा चुडीदार, एका हातात बंगल्स आणि दुसऱ्या हातात घड्याळ घातले होते..केस मोकळे सोडले होते आणि कानात झुमके आणि कपाळावर डायमंड टिकली लावली होती व ओठांवर मॅचिंग लिपस्टिक..

वाह!! ती इतकी सुंदर दिसत होती की, बघणारे बघतच राहतील..मग अनिशच काय झालं असेल..तुम्ही विचारच करा ना!!

दोघांनीही एकमेकांना ग्रीट केले आणि दोघे बसले...दोघेही एकमेकांकडे नजर चोरून बघत होते..बोलायला कशी आणि काय सुरुवात करावी असे दोघांच्याही मनाला वाटत असावे.

मग काय अनिशनेच पुढाकार घेतला आणि २ कॉफी ऑर्डर केल्या..

आज त्याची नजर आर्यावरून हटतच नव्हती..

त्याला असं वाटतं होते, आज वेळ इथेच थांबावी आणि त्याने आर्याला असच बघत राहावे.

इतक्यात आर्या बोलली, "अनिश तुला काही बोलायचे होते का?"

"अ..म्..हो..म्हणजे तू ठीक आहेस की नाही हे..म्हणजे नाही.." अनिश बोलता बोलता थांबला..

त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलणार तर वेटर कॉफी घेऊन आला..

आर्या अनिश काय बोलतोय याची वाट पाहत होती..

वेटर निघून गेल्यावर अनिश उठून आर्या जवळ आला आणि तिच्या समोर गुडघ्यांवर बसून त्याने चक्क तिला लग्नाची मागणी घातली..

आर्याला हे सगळं स्वप्नचं वाटत होतं..तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं..अनिशला ही आर्याच्या मनाची अवस्था समजत होती. कारण त्याला ही वाटले नव्हते की, तो आज आर्याला मागणी घालेल ती पण लग्नाची..तो उठला त्याने खुर्ची सरकवली आणि आर्याचा हात हातात घेतला..

आर्या काही बोलणारच होती. पण त्याआधी अनिश म्हणाला, "आर्या ह्या माझ्या मनातल्या भावना आहेत..तुझा जो काही निर्णय असेल मला तो मान्य असेल..मला नाही माहीत हे कसे झाले पण झाले..तुला माझा राग आला असेल तर मला माफ कर पण..."

आर्याने अनिशच्या तोंडावर हाथ ठेवला आणि म्हणाली, "बस, आता काही नको बोलूस..मला सुद्धा हेच ऐकायचे होते..मला ही तू खूप आवडतोस अनिश..अगदी पहिल्या दिवसापासून..जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिले होते..I love you अनिश"

बाहेर खूप पाऊस पडत होता आणि कॉफी शॉप मध्ये गाणं सुरू होतं..

🎶🎶मी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो🎶🎶🎶
नाही कळले कधी, जीव वेडावला🎶🎶
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी, धुंद हूरहुर ही श्वास गंधावला🎶🎶
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी…..🎶🎶🎶

मी तुला तू मला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो सावरू लागलो🎶🎶🎶🎶🎶
नाही कळले कधी, नाही कळले कधी🎶🎶🎶

आज आर्या गुणगुणतच घरी आली....

ती खूपच खुश होती..तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आली होती..

आज रात्री जेवताना ही आर्याच लक्ष कुठेतरी दुसरीकडेच होतं..

तिने भराभर जेवण आटपलं आणि तिच्या खोलीत झोपायला गेली..

तिने लागलीच फोन चेक केला तर अनिशचा मेसेज होता.. "जेवलीस का?"

आर्याने सुद्धा रिप्लाय दिला आणि मग रात्रभर दोघेही मेसेजने बोलत होते.

अनिशने फोन ही केला होता पण आर्याला सध्या तरी घरी कळू द्यायचे नव्हते. म्हणून तिने घरी नीट सांगेपर्यंत रात्री फक्त मेसेजने बोलायचे असे ठरविले. अनिशने ही आर्याला समजून घेतले..

"गुड मॉर्निंग मुंबई!!"

मी आहे तुमचा सर्वांचा आवडता RJ अमेय.

तुमच्या सर्वांचे स्वागत आहे "गुंतता हृदय हे!!" च्या आजच्या ब्रँड न्यू एपिसोड मध्ये.

हुश्श!! तुमचं किती प्रेम आहे हो माझ्यावर..मला भेटण्यासाठी तुम्ही इतक्या कथा पाठवल्यात..

Woww..amazing!! मी खूप खूप आभारी आहे तुमचा..

असो, ह्या प्रतियोगीतेचे विजेते कोण आहेत..हे मी तूम्हाला लवकरच सांगेन..आणि त्या भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे मला भेटण्याची संधी..
(टाळ्यांच्या कडकडाटाचा आवाज येतो)

सो guys, प्रेम हे सगळेच करतात, पण जे अनुभवतात त्यांची बातच और आहे..तो स्पर्श, तो सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो..प्रत्येक लहानसहान गोष्टींवरून त्याची/तिची आठवण होते आणि नकळत ओठांवर हे शब्द येतात..

🎶🎶जीव दंगला, गुंगला, रंगला असा,
पिरमाची आस तू🎶🎶जीव लागला,
लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू🎶🎶
पैलतीरा नेशील, साथ मला देशील,
काळीज माझं तू🎶🎶सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू🎶🎶
जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू

🎶🎶चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल
सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू
खुळं आभाळ ढगाळ, त्याला रुढींचा इटाळ
माझ्या लाख सजणा ही कांकणाची तोड माळ तू
खुळं काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण
तुझ्या पायावर माखेल माझ्या जन्माचं गोंदण🎶🎶
जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू🎶🎶

आर्या बेडवर लोळतच रेडिओ वरचे गाणे ऐकत होती..

"किती छान गाणं होतं..मिस यु अनिश💕" आर्या म्हणाली.

इतक्यात मेसेजची बीप वाजली..

"गुड मॉर्निंग my love"

आर्याची ही सगळ्यात रोमँटिक सकाळ होती..

तिने ही रिप्लाय केला व काही वेळ अनिशसोबत chat केला.

इतके रोमँटिक गाणं ऐकल्यावर तुम्हीच विचार करा ना काय चाट केला असेल तो😁

इतक्यात तिचं घड्याळाकडे लक्ष गेले मग तिने शेवटचा मेसेज सेंड केला की, ऑफिसला निघाल्यावर तुला कॉल करते म्हणून आणि ती ऑफिसला जायच्या तयारीला लागली..

स्निग्धाचा आजही काहीच पत्ता नव्हता..ती फोन सुद्धा उचलत नव्हती..म्हणजे आजपण ऑफिसला येण्याचे चान्सेस कमीच होते..

आर्याने अनिशला फोन केला आणि बोलतबोलत ती कधी ऑफिसला पोहोचली तिला तिचे कळलेच नाही..

क्रमश:

(ही कथा आवडल्यास तिला लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.)

@preetisawantdalvi