माझ्या माहेरच लॉकडाऊन घर भाग दोन
घरच्या छतामधून सूर्याची कोवळी किरणे हलकीशी घरात आलेली असतात, आणि त्यात येणाऱ्या पक्षांचा किल्बिलाटचा’ आवाज त्याच्या आवाजाने तर “ चला उठा सकाळ झाली आणि नव्या कामाला लागा” असाच संदेश ते आपल्या आवाजातून देत असतील. आणि त्यातच आरशात बघून समिधा टिकली लावत होती. आणि थोडे केस निट करत होती. एक दीर्घ श्वास सोडला आणि स्वताला पाहिलं ,” आज तर काही तरी नवीन होऊ दे पक्ष्यच्या म्हणण्यानुसार”. खिडकीतून बाहेर पाहिल आणि सूर्याला वंदन करून सामिधाची स्वारी थेट किचनमध्ये गेली. सामिधाची आई पोळ्या करत होती. मस्त गरमा गरम पोळ्याचा वास सुटला होता हॉल पर्यंत आणि पोटात कावळे सुध्धा ओरडायला लागले होते .
समिधा पाठून आईला बिलगली ,”शुभ सकाळ आई”
“शुभ सकाळ समु काय मग आज काय आहे प्लन” सामिधाची आई.
“आज.... आज... आज काय नाही ग (चहाच पातेल gas वर ठेऊन समिधा बोलत होती ) आई आज बघू काय होतंय ते आज येणार आहे म्हणतात कोणती तरी कंपनी आज लागू दे नंबर”
समिधा थोड टेन्सन मध्ये बोलत होती
चेहऱ्यावरचे हावभाव खूप काही सांगत होते आई ला पण तिला धीर द्यावा म्हणून सामिधाची आई बोलते ,” चला आता कामाला लागा मग हा चहा घे आणि मस्त गरम गरम पोळी खा, म्हणजे पोट भरल कि कस कामाला उस्तुकता येते ”
आईने दिलेला चहा हातात घेऊन डायनिंग टेबलवर गेली आणि न्याहारी करत होती , मध्येच मोबईल वर आजच्या अभ्यासच वाचत होती म्हणजे रीविझीन पण होईल पोटात गोळा येत होता, पण नाष्टा पण करयचा होता म्हणजे तेवढी ताकद पण राहील ह्यासाठी.
“मला पण चहा हवाय आता देशील काय ?” बाबांच्या आवाजाने समिधा भानावर आली.
“हो आणतेच थांबा जरा” सामिधाची आई
“समिधा काय करतेस?” सामिधाचे बाबा
“काय नाही बाबा आजची तयारी करतेय “ समिधा हातातला घास पडत बोलत होती
“अग काय करतेस सावकाश खा की , ताण आलेला दिसतोय कि काय समिधा काय टेन्सन आल कि काय ?” समिधा चे बाबा
“अहो तिने नोकरी च टेन्सन घेतलय म्हणून तिला घाबरायला झालय “ सामिधाची आई स्वयंपाक घरातून चहा आणत बोलत होती.
“बेटा अस काय करतोस कशाला टेन्सन घेतेस? “सामिधाचे बाबा
चहाचा कप ठेवत समिधा ,”बाबा मी खूप मेहनत घेतलीय ओ आता मला नाही मागे जायचं आणि आता माझ सिलेक्शन होयला हव म्हणूनच पोटात गोळा आलाय बाकी काही नाही आहे “
“ओह अस काय , अग होईल कि तू होशील select you are my child, be brave आणि आज मी तुला तुझ्या कॉलेज ला सोडणार आहे चालेल ना..??”
समिधाच टेन्सन पपांच्या बोलण्याने कुठेच्या कुठे पळाल होत खुश होऊन ,” हो बाबा चालेल कि “
देवाच्या समोर हात जोडून प्रार्थना केली आणि कॉलेजला जायची तयारी करायला आत गेली .
तेव्हा सामिधाचे आई-बाबा dining टेबलवर होते.
सामिधाची आई ,” अहो ऐकलात का , समिधाला खूप टेन्सन आलाय ओ “
सामिधाचे बाबा ,” हो मला कळल ते , आणि select नाही झाली तरी मला काही promblem नाही आहे ग, फक्त तिला आवडेल तो जोब मिळावा म्हणजे तिला पण बर वाटेल आणि आपल्याला पण नाही तरी तिच्या सुखात आपल सुख आहे ना”
“समिधा ए समिधा अग चल कुठे आहेस ? वेळ नाही काय होत तुला “
आले आले बाबा चला आता जाऊया
आई ला मिठी मारून समिधा गाडी वर बसते आणि निघते.
कॉलेज जवळ जेव्हा दोघ येतात तेव्हा सामिधाचे बाबा समिधा ला ,” बाळा एक सांगतो मी तुला प्रत्येकवेळी आपल्याला जे पाहिजे ते मिळेल अस नाही आहे त्यामुळे तू हि मुलाखत एन्जॉय कर”
समिधा ,” हो बाबा नक्की Thank you so much”
बाबा,” चल आता तू जा आणि घरी येताना सावकाश ये हां”
समिधा जाताना तिच्या मैत्रिणी पण तिला भेटतात आणि तिने पुढे जाताना मागे वळून बघते तर बाबा अजून गेलेले नसतात ते तिला लांबून बाय बाय करतात आणि ऑल दि बेस्ट अस देतात.
सामिधाच्या चेहर्यावर एक समाधानच सुख असत कि आपण जर प्रयत्न केले आणि त्यात फेल झालो तर आपल्याला आपल्या कुटुंबाची साथ आहे अस फक्त नशीबवान मुलीला हे कुटुंब मिळत.
आता खरी परीक्षा असते ती आजच्या मुलाखत ची मुलाखतीच्या आधी एक परीक्षा असते ती ५० मार्क्सची असते . त्यात गणित, कॉम्पुटर, बुद्धिमत्ता, इंग्लिश ह्या विषयांची परीक्षा असते. आणि समिधाच इंग्लिश थोड कच्च असल्याने तिला थोड टेन्सन आलेल.
समिधा प्रक्टीकॅल रूम मध्ये गेली आणि तिला काय कराव सुचत नव्हत. आज तिचा जीवन मरणाचा प्रश्न असल्या सारखा वाटत होता , पण तिला बाबांचे शब्द आठवतात कि,” कीहीहि झाल तरी आपल्या डोक्याला मनस्ताप करून नाही घ्यायचा.” बस फक्त थंड डोक्याने तिने पुढे स्क्रीन वर असलेल्या प्रश्नावर लक्ष दिले आणि तिला गणित चे प्रश्न पाहिल्यावर थोड हायस वाटल आणि आता तिने प्रश्न उत्तर करायला सुरुवात केली.
तिचा स्पीड बघता तिच्या शेजारचा मुलगा तिला खुणावत होता कि,” मला ह्या प्रश्नच उत्तर सांग plz” समिधा ला त्या मुलाचा इतका राग आलेला कि आता त्याला कस इग्नोर करायचं हां प्रश्न होता? कारण काहीही झाल तरी आपला ३ वर्षाचा मित्र होता आणि आहे शुभम.
शुभम एकदम हुशार मुलगा. कोडींग मध्ये तर त्याच हातच असायचा. त्याला बसल्या बसल्या मस्त कोडींग करायचा. पण त्याला परीक्षा ,पेपर द्यायचा कंटाळा यायचा. आणि म्हणूनच आज तो समिधा ला खूप सतवत होता.कारण त्याला माहिती होत कि आपण किती पण सतवल तरी आपल्याला हि प्रश्नाची उत्तर सांगणार . तो जेव्हा जेव्हा तिला विचारच तेव्हा तेव्हा कोणी ना कोणी सर किंवा मडम समोर यायचे आणि त्यांना वॉर्निंग देऊन जायचे तरी पण शुभम ऐकत नव्हता. आता अस झालेलं सामिधला आता “दोस्ती कियी है तो निभाना पडेगा” अस काही तरी झाल होत तीच. मग ती पण त्याला खूप मदत करत होती हे एका सर नी पाहिलं आणि तिला आणि त्याला ५ मिनिट बाहेर ठेवलं अश्या प्रकाराने समिधा ला शुभम चा राग आला कारण तिला हे आवडलं नव्हत, आता तिचा वेळ पण वाया गेला होता. त्यात खूप प्रश्न सोडवायचे होते. तिच्या डोळ्यात पाणी आल हे बघून शुभम ला वाईट वाटल आता आपण किती पण समजवण्याचा प्रयत्न केला तरी हि ऐकणार नाही त्यामुळे आता आपण शांत बसून च तिला रडू द्यायचं.
५ मिनिटांनी जेव्हा समिधा आणि शुभम ला बोलावलं ते आत गेले. आणि खुर्चीत बसल्यावर तिने खूप जबरदस्त खुन्नस शुभम ला दिली खुन्नस देताना तिचे डोळे लाल झालेले . ह्याचा अर्थ म्हणजे आता तू माझ्या वाटेला जाऊ नकोस नाही तर खर नाही.
शुभम गप गुमाने त्याच्या स्क्रीन वर बघत होता.त्यातच माध्येच तो सामिधाकडे बघत होता . समिधा रागावली तरी किती चं दिसते. किती मन लाऊन ती तिचा पेपर सोडवतेय. आता ती रागवली आहे तर काही तरी कराव लागणार आहे . ती न बोलल्याशिवाय मी नाही राहू शकत. ह्या मध्ये दोघांचे पेपर देऊन झाले.
आता बघू समिधा ह्या मुलाखतीत select होतेय काय ? आणि ती शुभम ला आता माफ करू शकेल काय ?
( आता पाहूया आपण पुढच्या भागात
मनापासून खूप धन्यवाद तुम्ही माझी कथा वाचल्या बद्दल
कथेमध्ये लिहलेले काही तुमच्या आयुष्यातिल मिळत जुळत असेल तर तो निवळ योगायोग समजावा.
जर तुम्हाला ह्या कथेचा भाग आवडला असेल तर मला जरूर कळवा माझा इमेल आयडी आहे : prevailpratilipi93@gmail.com
आणि माझ्या Instagram पेजला तुम्ही नक्की फोल्लो करा : _marathmola_andaj
तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर नक्की share करा,like kara, comment करा
माझ्या अजून असे नव नवीन कथा येत राहतील आणि त्या सोबत नव नवीन कल्पना घेऊन
धन्यवाद)