Imperfection Perfection ....? in Marathi Women Focused by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | अपूर्णत्वास पूर्णत्व....?

Featured Books
Categories
Share

अपूर्णत्वास पूर्णत्व....?

शैलजा एकटी बसली असता....... तिच्या मनात विचार आले......🙄 ते विचार होते....... तिने बघितलेल्या एका छोट्या पण, तितक्याच महत्वाच्या स्वप्ना बद्दल...... जे की, अजूनही पूर्ण झालेले नव्हते.....😒 जरी, ते स्वप्न लहान असले..... तरी, तिला ते पूर्ण झाले तरच, आपले जीवन सार्थक होईल असेच वाटत होते.....😣 पण, कुटुंबाच्या जबाबदारीतून ती कधीच सुटू शकली नव्हती...... तिचं संयुक्त कुटुंब...... सासू - सासरे, दिर - भासरे, जावा, पुतणे....... त्यामुळे, तिला स्वतःविषयी विचार करण्याचा वेळ मिळालाच नाही....... किंवा अस म्हणा ना तिने, त्याबाबतीत कधी विचारच केला नाही........ कारणही तेच..... माहेरून तिला सांगण्यात आले की, आता तुझं सासर हेच, तुझं घर असेल आणि त्यांना खुश करणं हेच तुझं स्वप्न....... म्हणून, तिला वाटले की, आपलं स्वप्न आता विसरून, जे काही पुढे वाढून ठेवलंय, तेच😓 आपण करूया..... म्हणजे, आपल्या माहेरची आणि सासरची दोन्ही मंडळी खुश..... पण, खरंच अस असतं का हो...!!!🥴

शैलजा सगळ्याच कामात अगदीच चतराईची........😎 कधीच कुणाला उलट उत्तर तर काय, पण कुणाकडे डोळे मोठे करून बघितले तरी नव्हते तिने...... ती चांगलीच उच्चशिक्षित म्हणून, तिला उद्धटपणे वागणे हे तिच्या शिक्षित असण्याला अपमानित करण्यासारखे वाटायचे आणि म्हणूनच, ती शांत स्वभावाने सगळं सहन करायची...... पण, आपण शांत असलो की, पुढच्या व्यक्तीला ती पर्वणी वाटते आणि मग त्याच्या तोंडाला जी खालच्या पातळीची भाषा आली... तो बोलत असतो...... शैलजाच्या बाबतीत काहीच वेगळं नव्हत..... सासू वेगळे टोमणे मरायची..... कारण, अजून तरी तिच्या पदरी देवाने मुल दिलं नव्हत..... लग्नाला दोन वर्षे झालेली आणि शैलजा अजून फक्त चोवीस वय वर्षे असलेली..... नवरा तर नवराच होता..... सतत चिडचिड आणि शिवीगाळ..... कधी प्रेमाचे दोन बोल नाही....... ना कधी कुठे बाहेर फिरणे...... पण, आपली शैलजा कधीच प्रतिक्रियात्मक उत्तरली नव्हती.....☝️😊 तिला वाटायचे, कधीतरी हे सर्व बदलेल आणि मला माझं स्वप्न पूर्ण करण्याची संधी चालून येईल..... पण, कस असतं ना....... ती संधी कधीच चालून येत नसते..... तुम्हालाच त्या संधीला ओढून आणायचं असतं आणि स्वतःच्या नावी करायचं असतं..... तर, शैलजा विचारच करत असायची..... दिवसभर घरचे काम केल्यावरही सासूचे टोमणे आणि रात्री नवऱ्याचे शरीरसुख पुरवणे... इतकेच काय ते, तिचे काम असायचे...... "स्त्री ही एक उपभोगाची वस्तूच असते व तिने तितकेच केले पाहिजे" हेच विचार, किंबहुना किळलेले विचार (🤬☝️) आज एकविसाव्या शतकातही अस्तित्वात असणे!!.... यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते..... नाही का??!!!🥴🥴😓

वैदिक काळात स्त्रियांना राजकारण, समाजकारण ह्या सर्व बाबतीत हक्क, स्वातंत्र्य देण्यात आले होते..... मात्र काळ जसजसा पुढे गेला स्त्रियांची स्थिती बिकट होत गेली..... आणि आज एकविसाव्या शतकात.... जेव्हा, गरज आहे आपला समाज पुढारण्याची, समाजात स्त्रियांना योग्य प्रवाहात, भेदभाव न करता, त्यांचा सहभाग नोंदवून घेण्याची..... तेव्हा मात्र, समाज मागे सरसावतो..... का? तर, स्त्रिया कमकुवत आहेत म्हणून..... छे!!!🙏☝️ स्त्रियांनी जर ठरवलं ना........ तर, त्या कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत..... अगदी फायर फायटर सुद्धा महिलांनी होऊन दाखवलंय........ त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे, पूर्ण देशात कुठेही महिलांना फायर सर्व्हिसेसमध्ये प्रवेश नव्हता....... मात्र नागपूरच्या(😎😎), हर्षिनी कान्हेकर या देशातील पहिल्या महिला अग्निशमन अधिकारी झाल्या आणि त्यांनी समाजापुढे एक आदर्श उभारला......☝️🙏







त्या म्हणतात.....

“For anything to happen, you need to first dream it and follow it with all your heart and hardwork. It doesn’t matter what atmosphere or surroundings you have got, you need to find a way to pursue your passion.”

"काहीही घडण्यासाठी, आपण प्रथम स्वप्न पाहण्याची आणि आपल्या मनापासून आणि कठोर परिश्रमांनी त्याचे अनुसरण करण्याची आवश्यकता आहे. आपणास कोणते वातावरण किंवा सभोवतालचे वातावरण आहे हे महत्त्वाचे नसून, आपल्याला आपल्या उत्कटतेचा पाठपुरावा करण्याचा मार्ग शोधण्याची गरज आहे."

☝️☝️🙏

तर, या आणि अश्या कित्येक स्त्रियांनी जरी, समाजात स्वतःला सिद्ध केले असले..... तरीही, आज त्याच पुढारी समाजात, शैलजा सारखी एक सामान्य स्त्री स्वतःचे एक छोटे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाट बघतेय!!! यापेक्षा मोठी शोकांतिका कुठली असूच शकत नाही.....!😣😣

तर, शैलजा एका सामान्य कुटुंबात जरी वाढली असली..... तरी, तिच्या माहेरी एक प्रगल्भ विचारसरणी नांदत होती...... बाबा हे एक शिक्षक आणि त्यामुळे त्यांनी शैलजावर अगदीच सुशिक्षित संस्कार केले...... शाळेत असताना ती प्रथम तर असायचीच....... पण, दुसरीकडे महाविद्यालयीन शिक्षण घेताना ती इतर क्षेत्रात सुद्धा मागे नव्हती....... वक्तृत्व, निबंधलेखन, शुध्दलेखन, वाद - विवाद, क्रीडा, कला..... इत्यादी सर्व क्षेत्रात अव्वल नसली तरीही स्पर्धक म्हणून नाव नोंदवणे विसरायची नाही.....(तसही तुम्ही उत्तीर्ण होण्यापेक्षा प्रयत्न करणे कधीही चांगले..... एक सकारात्मक भाव असतो तो, आपण त्यात सहभागी असण्याचा...☝️) अशी आपली शैलजा..... हळूहळू दिवस जात होते...... शैलजा आधी पेक्षा अधिकच सुंदर आणि अंगकाठीने कुणाच्याही नजरेतून न सुटणारी अशी दिसू लागली.... गावातील काही मंडळींची नजर तिच्यावर असे..... पण, तिचं लक्ष त्यांच्याकडे नसायचे.... ती त्यांना दुर्लक्ष करून आपले काम करत राहायची.....☝️☝️

एकदा गावातील एका मुलाने शैलजाचा पाठलाग केला...... ती कॉलेज मधून परतत होती....... कॉलेजची बस गावच्या छोट्या आंबेनळी बस स्टँडवर थांबायची तिथून घरचा रस्ता काहीच अंतरावर..... म्हणून, शैलजा एकटीच निघायची..... मैत्रिणी जास्त तिला आवडत नसतं......(नसलेल्याच बऱ्या....☝️ कारण, उच्च विचार असणाऱ्यांची मैत्री ही कुणाशीच जास्त वेळ टिकत नसते) त्यामुळे सोबत कुणीच नसे..... रोजचा ओळखीचा रस्ता त्यामुळे ती निघाली...... काहीच अंतरावर, तिला तिच्या मागे कुणी असल्याचे भासले........ तिने मागे वळून बघितले........ तो, गावचा श्रीराम सानेंचा मुलगा राजेश होता......

शैलजा : "माझ्या मागे का येतोय..... मी तुझी गावच्या सरपंच साहेबांकडं कंप्लेंट केली ना की, तुला कळेल...😠"

राजेश : "मी कुठ तवा तुझ्या पाठी येतोय...... मी माझ्या रस्त्यानी जातूया..... तूच पुढं पुढं येतीस माझ्या........ हू पुढं.... 🥴🥴 जाऊदे मला....."

आणि तो तिला धक्का देऊन एक किळसवाणा स्पर्श करून, चेहऱ्यावर एक गलिच्छ हसू आणून निघून जातो.......(🤬)

शैलजा : "ये...... बैला...... तुला आई - बहिणी नाहीत का?...... जा तिकडं म्हसनात जाऊन मरशील बघ.....🤬"

ती बोट एकमेकांत गुंतवते आणि कटाकटा मोडून शिवीगाळ करत पुढे जाते...... राजेश पुढं जाऊन थांबलेला असतो.... हे बघून तिच्या काळजात धस😥 होते..... मात्र, ती हातात रस्त्या कडेला पडलेली काठी उचलून, पुढे जाते...... तिचा तो अवतार बघून तो बस स्टँडकडे परत वळतो...... ती गावाकडे भराभर निघून जाते..... घरी पोहचते...... तिला धाप लागलेली असते..... आई तिला पाणी देते...... आईला सगळं सांगाव...... अस ठरवून, ती आईला सर्व सांगून टाकते..... मात्र आई पोरीची बदनामी नको म्हणून, गपच बसण्याचा सल्ला देऊन, शांत रहायला सांगते...... (☝️ गुन्हेगारीस वाव...😓)

दुसऱ्या दिवशी, परत राजेश तिचा पाठलाग करतो....... आज मात्र ती पूर्ण तयारीनिशी आलेली असते...... बॅगमध्ये एक छोटा चाकू आणि हातात लोखंडी स्केल.......🔪📏 राजेश मागे येताना तिला भासतो...... आणि तिला स्पर्श करणार तोच ती त्याच्या हातावर लोखंडी स्केल ने वार करते...... तसाच तो, जमिनीवर धाडकन पडतो...... तो विव्हळत असतो...... कारण, स्केल जोरदार बसलेली असते...... तो रागातच उठून, तिच्या वर धाऊन जातो..... ती गावच्या दिशेने एकदम वेगात पळत सुटते..... आणि ग्रामसभा भरणाऱ्या एका झाडाच्या ओट्यावर जाऊन, उभी राहते, पूर्ण गाव गोळा करते...... सरपंचासहित गावातील मोठी - थोर मंडळी तिथे काहीच वेळात जमतात....... सगळ्यांची कुजबुज सुरु असता..... ती बोलायला सुरुवात करते.....

शैलजा : "हा राजेश साने..... कालपासून माझ्या मागे लागलाय..... काल मला त्याने नको त्या ठिकाणी स्पर्श केला आणि मी घरी सांगितल्यावर, त्याकडे आईने माझी बदनामी नको म्हणून दुर्लक्ष केलं..... आज माझ्यासोबत हे घडलं मी शांत आहे...... पण, हा उद्या जर, कुणा दुसऱ्याच्या पोरीची छेड काढेल...... तर, कधीपर्यंत आपलं ग्राम असच शांत बसून तमाशा बघेल.....?? आजच काय तो निकाल लागायला हवा.....🤬☝️"

मंडळी : "हो.....हो..... आजच काय तो निकाल लावा..... सरपंच साहेब....🤬"

साने : "माफ करा गावकऱ्यांनो....... माझ्या मुलासनी, मी शिक्षा करतो हवं तर.... पण, गावाने अम्हासनी वाळीत टाकले तर आमचा वाली कोण असेल...... माफी असावी...🙏😓😓"

सरपंच : "पोरी शांत हो...... बसून घ्या सगळ्यांनी..... आजच काय ते ठरेल..... पोराने, पोरीची छेड काढली...... त्याची त्याला माफी मागावी लागेल..... आणि परत हा अस वागणार नाही याची गावासमोर कबुली द्यावी लागेल...... आणि जर, का परत त्याने तसं काही केलंच...... तर, गावासमोर नागडं करून, धिंड काढण्याची प्रथा आपल्याला आपल्या गावात, नव्यानेच सुरू करावी लागेल.....☝️पण, सध्या तरी, यावर मला काहीही बोलायचे नाही.... राजेश माफी माग.....🤬☝️"

राजेश : "ताई चुकी झाली माफ कर मला...... याउपर मी तुलाच काय तर कुठल्याही पोरीला डोळा वर करूनही बघणार नाही..... सरपंच साहेब, मला गावात काम न्हाय..... बाहेर काम शोधाया जातु....😒 तर, तेबि मिळत न्हाय...... डोक्याचं पार भुग झालया...... काय करावं काय बी समजत न्हाय......😣😣😣"

सरपंच : "मी तुला गावात पहरेदार म्हणून ठेवीन.... पण, तू प्रामाणिक राहून काम करशील याची काय ग्यारंटी..??🥴"

राजेश : "नाही सरपंच साहेब..... मी आज पासनं समद्या पोरिस्नी भैन मानतू...... कुणाबी कडं मीच काय कुणीच वाकड्या नजरनं बघितला...... तवा हा राजेश हाय आण तो हाय.....🤬☝️"

आतापर्यंत स्वतः महिलांची छेड काढणारा राजेश, हाताला काम मिळाल्याने गावातील मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणारा एक कर्तव्यदक्ष पहरेदार झाला होता....... असच असतं..... ज्या गावात हाताला सगळ्यांना काम मिळतं त्या गावात गुन्हेगारीचे प्रमाण नगण्य असते...... देशाच्या बाबतीतही तेच...... हाताला काम मिळालं की, गुन्हेगारी प्रवृत्ती जन्म घेत नाही....☝️(हाच एकमेव उपाय असही मी म्हणत नाहीये...☝️✍️)

आता राजेश शैलजाला ताई म्हणू लागला आणि कधी एकटी असली की, तिला सुखरूप घरी आणून सोडू लागला..... तिच्या संरक्षणाची जबाबदारीच त्याने घेतली होती......😎

असेच दिवस जात होते...... शैलजाचे कॉलेजही पूर्ण झाले होते..... तिचे एम. कॉम. पर्यंतचे शिक्षण जिल्ह्यातून पूर्ण झाल्याने.....तिला आता नेट परीक्षा पास करून चांगल्या कॉलेजमध्ये प्रोफेसर पदी रुजू व्हायचे होते..... मात्र हेच तिचे छोटे स्वप्न आठवून आज ती निराश होत होती...... कारण, कॉलेज नंतर लगेच तिच्यासाठी शहरातून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचे स्थळ सांगून आले होते...... पगार चांगला ८०,०००/- प्रती महिना असल्याने घरच्यांनी शैलजाचे मत, एक न ऐकता लग्न लावून दिले...... (जरी, बाबा शिक्षक असले तरी, समाजापुढे कुणाचीच चालत नसते असं मानून कितीतरी होतकरू मुलींचा सामाजिक बळी दिला जातो.... निंदनीय....😓☝️.) आता शैलजा लग्न होऊन सासरी आली...... इथ मात्र शिक्षित घराणे असून देखील तिची हेळसांड होत असे...... (शिक्षितांची अशिक्षितता....☝️😓)

जरी, आपल्या देशात, व्यक्तींच्या मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्यास शिक्षेची तरतूद असली...... तरीही, स्त्रियांबाबत ती लागू होताना दिसत नाही.... त्यांना दिवस - रात्र राबवून घेतलं जातं...... पण, त्या कामाचा मोबदला काही मिळत नसतो..... आणि म्हणून, त्यांची किंमतही नसतेच..... असो..☝️😓 (इथे एकेरी उल्लेख नसून व्ययक्तिक मत असल्याची नोंद, असू द्यावी...☝️😓)

तर, मग शैलजा लागली आपल्या सासरच्या लोकांच्या निःशुल्क सेवेत...... बिन पगारी फुल्ल अधिकारी.......

सासूचे रोजचे तेच टोमणे....... आणि सगळ्यांचं आवरून देत पर्यंत तिचा पूर्ण दिवस कामात जाई..... सगळी कामं हीलाच एकटीला करावी लागत असत..... कारण, ती गावातली एक साधी - सरळ सून होती...... "तिला काय समजतं?" असा तिच्या सासरच्या लोकांचा समज होता...
(🤬🤬सुशिक्षित लोकांची, अशिक्षित मानसिकता🤬🤬)

एके दिवशी, तिचा नवरा खूप पिऊन आला...... लग्नाआधी कुठलंही व्यसन असल्याचे.... त्यांनी सांगितले नसल्यामुळेच, शैलजाला तिथे देण्यात आले होते..... पण, आता तिला नव - नवीन दृश्य बघायला मिळत होते..... त्या रात्री त्याने शेलजाच्या शरीराचा हवा तसा छळ करून घेतला..... आणि स्वतः कुंभकर्ण सारखा झोपी गेला...... (🤬🤬🤬🤬)

त्या रात्री शैलजाला स्वतः एक स्त्री असण्याची लाज वाटू लागली होती.....

शैलजा : "मी तीच शैलजा...... जिने राजेशला त्याच्या कृत्याची शिक्षा केली होती....."

असे विचार तिच्या मनात येत होते........कारण, आज नवऱ्याने तिच्यावर "वैवाहिक बलात्कार" केला होता..... आणि ती हतबल होती..... स्वतःच्या अवस्थेपुढे...(🤬🤬🤬🤬)

हो, वैवाहिक बलात्कारच होता तो........🤬 ज्याची कुठेच वाच्यता होताना दिसत नाही...... का? तर लग्न करून स्त्रियांचे शरीर पुरुषांची मालमत्ता बनते...... स्त्रियांना लग्नानंतर नकार देण्याचा अधिकारही नसतो........ आणि शैलजाच्या बाबतीत जे घडलं..... ते, कितीतरी अबोल स्त्रियांसोबत घडतच असतं........😓☝️ (सगळ्याच पुरुषांना दोष दिला नाहीये....... नोंद असावी..☝️😓)

शैलजा सुद्धा याच विचारात असताना तिचं लक्ष तिच्या मंगळसूत्र असलेल्या गळ्याकडे जातं......

शैलजा : "का?.... का? मी इतकी मजबूर झाले....😣😒 की, एका या मंगळसूत्र सारख्या माळेपुढे काहीही सहन करतेय..... का? मी माझ्या शरीराचे लचके माझी इच्छा नसताना दुसऱ्या कुणाला तोडू देतेय..... का? मी हे सगळं सहन करतेय...... याच गळ्यात मला माझं प्रोफेसर पदाच आय कार्ड हवं होतं....... आणि आज त्याठिकाणी काय? तर, हे मंगळसूत्र!! ज्याची लाज फक्त मी राखते..... इतरांसाठी मी फक्त एक उपभोगाची वस्तू आहे......😓😓 नकोय मला ही लाईफ...... आजच मी या घरातून या माणसांमधून निघून, स्वतःचा मार्ग स्वतः निवडेल....😎☝️...... हो..... यात मला काहीच चुकीचे वाटत नाही....... आणि का मी या लोकांसाठी माझी अख्खी लाईफ वेस्ट करू....... जेव्हा माझ्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे....... उठ..... उठ..... शैला..... तुला तुझ्यासाठी जगायचे आहे...... उठ..... इथून पुढची लढाई तुझी एकटीची असेल..... आणि तो प्रवास तुला स्वीकारून पुढे जावेच लागेल......उठ.....✨"

ती उठून बॅग भरते आणि कॅब करून बस स्टॉपवर जाऊन थांबते...... रात्रीची वेळ असते...... बस स्टॉप शेजारी काही माणसं बसून, तिलाच बघत असतात...... तिला भीती तर वाटतेच.... पण, ती भीती, तिच्या चेहऱ्यावर दिसू देत नाही....... तिला जाणवत कुणी तरी तीच्याचकडे येतोय...... ती बॅगेतून तीची लोखंडी स्केल........ जी आजही, स्वतःच्या संरक्षणासाठी सोबत ठेवत असते........... काढून त्याला मारणार तेवढ्यात तो तिचा हात पकडुन...........

@@@ : "ताई तू....... इतक्या रात्री एकटी इथे...??🤨"

शैलजा : "राजेश तू.....😲😲😲....इथे?? कसा??"

राजेश : "ताई घरी चल....... माझी बायको आणि मुलगी वाट बघत असतील...... चल ताई..... सगळ घरी जाऊन बोलू......"

तो कॅब बुक करतो...... आणि तिला स्वतःच्या घरी घेऊन येतो...... त्याच प्रशस्त घर बघून शैला शॉक होते...... कारण, त्याची परिस्थिती आधी खूपच बेताची असते..... इतक्या लवकर ह्याने प्रगती केली..... म्हणून, ती मनातून खूप खुश असते......🤗

तिला पाणी देऊन राजेश आणि त्याची बायको आरती शैलाच्या शेजारी बसतात.....

राजेश : "ताई...... ही आरती...... टॅक्स असिस्टंट आहे..... एकदा काही गुंडांनी हिला त्रास दिला....... मी तिला त्यांच्या तावडीतून वाचवून, सुखरूप तिला तिच्या बाबांकडे हॉस्पिटलमध्ये सोपवले..... तेव्हा तिचे बाबा खूप जास्त आजारी होते...... आणि त्यावेळी त्यांच्या प्रॉपर्टीचा कुणीच हिस्सेदार नव्हता त्यामुळे, त्यांनी मला योग्य समजून आरतीचा जोडीदार निवडून स्वतः देवाला प्रिय झाले.....😒 त्यानंतर, आम्ही लग्न केलं आणि मी पुढचं शिक्षण घेऊन आज एक बिझनेसमन आहे..... ताई तू जर त्यादिवशी मला सरळ मार्ग नसता दाखवला..... तर, आज मी इथे नसतो..... मला कळलं की, तू इथच कुठ रहायला आहेस.... तुला गरज पडेल म्हणून, मी इथेच एक फ्लॅट घेतला........ आणि आज नशिबाने तुझी भेट झाली...... देवाचे आभार मानतो.....🙏. पण, ताई तू इतक्या रात्री एकटीच...... गळ्यात तुझ्या काहीच कसे नाही? भाऊजी नाहीत का सोबत? की काही प्रॉब्लेम आहे....?? मला सांग ताई मी काय मदत करू शकतो.....??"

शैलजा रडते...... आणि रडत - रडत सगळ सांगून टाकते...... राजेश आणि आरतीला तिची अवस्था बघवत नाही..... तिला ते स्वतःच्या घरी राहून, अभ्यास करून प्रोफेसर बन अस सांगतात....... पण, आधी तिला नवऱ्याकडून घटस्फोट घे अस सांगतात...... घटस्फोट घेण्यात खूप प्रॉब्लेम्स येतात.... पण, शेवटी राजेशच्या ओळखीचा वकील सगळ कायद्याने पार पाडून देतो....... आता शैलजाचा एकटीचा प्रवास सुरू होतो.......

नेट परीक्षेचा अभ्यास करण्यात तिला थोडी अडचण येते....... कारण, इतक्या वर्षांच्या गॅप नंतर ती, हे सर्व करत असते..... पण, आता हे तिचं फक्त एक स्वप्न न रहाता जिद्द बनलेली असल्याने, ती पूर्ण मेहनतीने स्वतःला त्यात झोकून देते......☝️

काही महिन्यांच्या प्रयत्नानंतर तिच्या मेहनतीची कसोटी लागणार असते...... आज तिची नेटची परीक्षा असते..... ती पूर्ण उत्साहाने परीक्षेला जाते...... पेपर अतिशय धैर्याने, न गोंधळता ती सोडवते...... घरी येते..... महिन्याभरात तिचा निकाल लागतो..... सुदैवाने तो सकारात्मक असतो...😎☝️

काहीच दिवसांनी ती एका नामवंत विद्यालयात असिस्टंट प्रोफेसर पदासाठी अप्लाय करते..... तिथून तिचा पुढचा प्रवास सुरू होतो...... नंतर ती पी. एच. डी. करून एका नामवंत विद्यालयात प्रोफेसर या पदावर रुजू होते...... आणि आज तिचे जे अपूर्ण स्वप्न आहे ते पूर्ण झालेले बघून ती सुखावते......🤗 वाटतं जस तिने, तिला जे नेहमीच हवं होतं ते मिळवलंय.......😊

मित्रांनो...... आपले स्वप्न हे आपले असू द्या..... आणि त्यासाठी मग तुम्हाला समाजाने आखून दिलेल्या ज्या मर्यादा आहेत त्यांना तोडून बाहेर पडावे लागले तरी, बेहत्तर.....☝️ काय असतं ना...... जोपर्यंत, तुम्ही स्वतःसाठी उभे रहात नाही..... हा समाज, तुम्हाला फक्त एक सामान्य मनुष्य समजत असतो.... जो मनुष्य, त्या समाजाच्या मते, वैचारिक पांगळा आहे...... काही लोकांचा छंदच नसतो आणि म्हणून, ते इतरांना छंद जोपासण्यााठी प्रेरित करत नाहीत..... किंबहुना दुसऱ्यांनी तसं काहीही केलेलं त्यांच्या डोळ्यात खुपतं......(🤬🤬)

आज शैलजा एका अश्या पदावर रुजू आहे..... जिथे तिला कुणालाही उत्तर देण्याची गरज नाही...... रस्त्यात काटे असतात...... हे जरी खरं असलं...... तरी, ते काटे बाजूला सारत, तुम्ही त्यातून वाट कशी काढता हे महत्त्वाचं.....☝️

रास्तो मे काटे बेहद थे,
जख्म देने वाले भी कम न थे....
रास्तो मे काटे बेहद थे,
जख्म देने वाले भी कम न थे....
मगर, उन कांटो को, कांटो की ही तरह
उखाड फेकने वाले, हम भी कुछ कम न थे.....🙏☝️


❣️ खुशी ढोके ❣️


कंसातील अधोरेखित भाग, माझ्या व्यक्तिगत विचारांना धरून असल्याने, वाचकांनी त्यावर स्वतःचे प्रतीक्रियात्मक भाव, समिक्षेत नोंदवू नये, हीच आर्त हाक.......


बाकी सगळे काळजी घ्या, सुरक्षित रहा हीच निस्वार्थ देवाचारणी प्रार्थना......


🙏☝️😘❣️😘☝️🙏