ना दुवाओ का असर है
ना है गीडगीडाने का फायदा
तकलिफे अब जिंदगी बन गयी
फिर क्यो रखे कोई इरादा ...
बाबांच्या जळत्या चितेकडे नित्या पाहत म्हणाली , " बाबा नक्की दोष कुणाचा ? ..त्या पुरुषाचा जो एका मुलीला जन्म घालताना तिच्याबद्दल कुठलाही विचार करत नाही की त्या मुलीचा जी आपल्या वडिलांचा शब्द आयुष्यभर पाळते ..दोष नक्की कुणाचा ? जो वडील आपल्या आनंदासाठी मुलीला जन्माला घालतो की त्या मुलीचा जी आयुष्यभर पुरुषांच्या चार भिंतीत कैद होऊन जीवन जगते ..दोष कुणाचा ? त्या नवऱ्याचा जो घाणेरडे आरोप लावून एका मुलीला रात्रीला घराबाहेर काढतो , त्या वडिलांचा जे आपल्या मुलीने बाहेर जाऊन नौकरी करू नये म्हणून कागदपत्र जाळतो की त्या मुलीचा जीच्याकडे सहारा नसताना आपल्या पालन पोशनसाठी आपल्याच वडिलांना संपत्तीचा फक्त काही भाग मागू इच्छिते ..तुम्हीच सांगा नक्की दोष कुणाचा ? आणि या सर्वात माझं स्थान नक्की कुठे आहे ? वडिलांची आज्ञा पाळणारी मुलगी की नवऱ्याची संपत्ती की आयुष्यभर आपल्या लोकांसाठी झटणारी मोलकरीण ?.. ..बाबा आयुष्यंभर तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं नाही माझ्याकडे सतत कानाडोळा करत आला आहात ..तेव्हाही मी काहीच बोलले नाही आणि बोलले तरीही निर्लज बनून जगत राहिलात तेव्हा आता कस काय मुलीच्या बोलण्याच इतकं वाईट मानलं की सरळ जग सोडून गेलात ..तेही माझ्या कपाळावर खुनी हा शिक्का लावून ..जर मुलीची आयुष्यभराची कमाई जाळून टाकताना तुम्हाला त्रास झाला नाही तर मी फक्त माझ्या हक्काच काही मागितलं तेव्हा तुम्हाला इतका त्रास झाला की माझ्या नावावर कलंक देऊन निघून गेलात ..इतरांना काय बोलू म्हणा त्यांनी तर मला कधीच स्वतःच मानलं नाही पण मी तर तुमचं रक्त होते ना मग तरीही इतकं क्रूर वागलात माझ्याशी ..तुमचीही काय तक्रार करू जिवंत असताना समजून घेतलं नाहीत तर आता तरी काय म्हणू पण धन्यवाद बाबा माझ्या नावावर तुमच्या जाण्याचा ठप्पा दिल्या त्याबद्दल ...आयुष्यभर लक्षात राहील माझ्या .."
नित्या बाबांशी बोलतच होती की मागून शुभम ( मावशीचा मुलगा ) आला आणि तिथे खूप वेळ गेला असल्याने तो तिला सोबत घेऊन परत आला ..शुभम तिला चाळीत सोडणार होता पण नित्यानेच नकार दिल्याने तो तिला चाळीसमोर ड्रॉप करून निघून गेला ..
नित्याला आधीच खूप मोठा धक्का लागला होता त्यात आणखी एक धक्का तिची समोर वाट पाहत होता ..ती चाळीत पोहोचलीच होती की इन्स्पेक्टर साहेब म्हणाले , " तुम्हीच नित्या का ? "
नित्याने फक्त मान हलविली ..पुढच्याच क्षणी साहेब आपला आवाज कणखर करत म्हणाले , " तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल ..आम्ही तुमच्या वडिलांच्या मृत्यूची चौकशी केली त्यात तुमच्या घरच्यांनी स्टेटमेंट दिलं की घरात काही दिवसापासून तुमच्यामुळे वाद सुरू होते बहुदा म्हणूनच त्यांनी आत्महत्या केली असावी तेव्हा त्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत .."
नित्याला कधी वाटलंच नव्हतं की तिच्या आयुष्यात हादेखील दिवस येईल ..तिने मागे वळून पाहिलं तर कुणीही तिला थांबविण्याचा प्रयत्न केला नाही एवढ काय आजोबांनी देखील पोलिसांना थांबविल नव्हतं ..नित्याला त्यात काहीच नवीन वाटलं नव्हतं ..तिने मागे बघून चेहऱ्यावर मंद स्मित आणलं आणि पोलिसांना सोपवून त्यांच्यासोबत जाऊ लागली .."
तिला पोलीस खाली नेऊ लागले ..ही घटना हळूहळू संपूर्ण चाळीत वाऱ्यासारखी पसरली आणि सर्व खाली धावत आले ..साहेब तिला गाडीत टाकणार तेवढ्यात मागून निमसरकर काका म्हणाले , " साहेब घरच्यांनी नित्यावर चुकीचा आरोप लावला आहे ..त्यांच्या घरात भांडण तर कायमच असतात आणि त्यांना नित्या आवडत नव्हती म्हणून बहुतेक त्यांनी नित्याला मृत्यूच कारण मानलं ..आम्ही त्यांच्या जवळच राहतो त्यामुळे आम्ही खात्रीने सांगू शकतो की नित्याची यात काहीही चूक नाही ..तुम्हाला हवं असल्यास आम्ही सर्व लोक स्टेटमेंट देतो .."
निमसरकर काकांनी स्टेटमेंट दिल्यावर जवळपास सर्वच लोकांनी स्टेटमेंट दिली आणि पोलिस नित्याला घेऊन गेले नाही ..नित्याच्या हातातली हतकडी काढली आणि नित्या निमसरकर काकांच्या मिठीत जाऊन रडू लागली ..त्यांनी तिला आवरलं आणि आपल्या घरात घेऊन गेले ..नित्याने अंघोळ केली आणि एकटीच त्यांच्या घरी बसून होती ..शेजाऱ्यांनी नित्याच्या घरच्यांचा संपूर्ण स्वयंपाक बनविला होता पण नित्याला आज घरात जायची इच्छा होत नव्हती ..निमसरकर काकांनी स्वयंपाक आवरताच नित्याला बोलाविले पण नित्या भूक नाहीये म्हणून नकार देऊ लागली ..काकांनी ताट जवळ घेत तिला भरविले होते ..त्याक्षणी तिच्या डोळ्यात पाणी होत ..कारण आपल्या म्हणणाऱ्या लोकांनी तिला आपलं कधीच मानलं नव्हतं तर तिच्या चांगल्या स्वभावाने आज तिला चाळीतल्या लोकांनी पोलिस स्टेशनला जाण्यापासून वाचविल होत ..
राखट शेरविण्याचा कार्यक्रम असो की तिसरा दिवस घरच्यांनी नित्याला कोणत्याच कार्यक्रमात सहभागी करून घेतलं नव्हतं आणि तिनेही सहभाग घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण आपल्यामुळेच बाबांचा जीव गेलाय हे तिच्या मनात घट्ट झालं होतं ..नित्या फक्त एक कोपरा पकडून बसून राहत असे ..ना तिला जेवणाच भान होत , ना जगण्याच ..ती दिवस मोजतच जीवन जगत होती ..जीवन कसलं मृत्यूच होत ते ..आपल्याच लोकांनी आपल्याला दिलेलं भयानक वास्तव..अस जीवन ज्यात ती सर्वाना नकोशी झाली होती आणि कदाचित ती स्वतःलाही नकोशी झाली होती ..रोज तिला बाबांचा तो दोरीला लटकलेला मृतदेह आठवायचा आणि ती झोपेतून उठायची ..तिला या सर्वातून सुटका हवी होती ..पण अशा स्थितीत तिला घर सोडून जाण्याची इच्छाही नव्हती ..नित्या आता फक्त घरातल्या एका कोपऱ्यात पडून असे ..तेच तीच जीवन बनत चालल होत ..बाबा जाऊन 10 दिवस झाले होते ..नित्या एकटीच घरात झोपून होती ..काहीच क्षणात तिला जाणवलं की एक हात आपल्या छातीवर येऊन हलतोय ..लक्षात येताच ती जागी झाली तर समोर मामा ( सावत्र ) होते ..ती त्यांना दूर ढकलत म्हणाली , " मामा माझ्यासोबत कुणी नाही म्हणून मी हतबल आहे अस समजू नका की नवऱ्याने म्हटलं म्हणून चारित्र्यहीन आहे अस समजू नका ..आज मी ओरडून सर्वाना काहीही सांगितलं तरी ते ऐकणार नाहीत म्हणून आज सोडतेय तुम्हाला ..आज ही चूक केली तर केली पुन्हा जर अशी चूक केली तर हात कापून फेकेन ..आधार नाहीये म्हणून हवं तसं करू शकता अस समजत असाल तर याद राखा "
नित्याचे शब्द एकूण मामा पाय आपटत घरी निघून गेले पण त्याक्षणी तिला कळून चुकलं होत की या जगात आता आपलं म्हणाव अस कुणी नाही .जणू हे जग लांडग्यांनी भरलं आहे ..जे आपल्याच घरात असत पण वेळ आल्यावरच बाहेर येतात त्यांना फक्त भूक दिसते दुसर काहीच नाही ..या घराणे तिला नको तितके दुःख दिले होते तेव्हा आता हे घर तिने कायमच सोडण्याचा निर्णय घेतला ..
दुसऱ्या दिवशी तिने शुभमला बोलावून घेतले ..तिने त्याला तिच्या राहण्याची हॉस्टेलमध्ये अरेंजमेंट करायला सांगितली पण त्याने साफ नकार देत आपल्या घरी घेऊन जातोय अस सांगितलं ..तिच्या चेहऱ्यावरून त्याला कळून चुकलं होत की काहीतरी नक्की झालंय पण विचारून देखील नित्याने त्याला काही सांगितलं नाही ..शेवटी तिने ते घर कायमच सोडायचा निर्णय घेतला आणि खाली जाऊ लागली ..चाळीपासून काही अंतरावर गेल्यावर तिने परत घराकडे लक्ष दिले.डोळ्यात अश्रू होते आणि त्याच नजरेत बाबांचं फासावर लटकलेला मृतदेह ..आणि मनात घट्ट बसलेली गोष्ट बाबा फक्त माझ्यामुळे गेले "
नित्या विचारात इतकी हरवली होती की तिला ते प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसू लागलं आणि ती जोरात ओरडली , " बाबा " ...
तिच्या आवाजाने रूम मध्ये झोपलेला सारांश लगेच उठला ..त्याने लाइट लावले आणि नित्याकडे बघू लागला ..नित्या फारच घाबरली होती आणि सारांश म्हणाला , " काय झालं नित्या इतकं का घाबरली आहेस ? "
नित्या एक शब्द देखील बोलली नाही आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली ..किती तरी वेळ ती त्याला घट्ट पकडून होती ..त्याने तिच्या चेहऱ्यावरचा घाम पुसून घेतला आणि पाणी घेण्यासाठी तिला सोडवू लागला पण ती त्याला काही सोडेना ..शेवटी त्याने हात लांब करून ग्लास घेतला आणि तिला पाणी पाजू लागला .नित्याने पाणी पिले आणि पुन्हा त्याला घट्ट मिठी मारून बसली ..सारांशदेखील तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करू लागला ..काही क्षणात नित्या शांत झाली ..तिला शांत झालेलं पाहून तो म्हणाला , " आता सांग काय झालं बर , काही स्वप्न वगैरे पडलं का ? "
नित्या हळुवार आवाजात म्हणाली , " हो तसच काही ..काही कटू आठवणी जागा झाल्या आणि सर्व काही समोर घडत आहे असच वाटलं .."
तो तिच्या हातावर हात ठेवत पुन्हा म्हणाला , " आता ठीक आहेस ना ? "
तिने मान हालवून ठीक आहे असं सांगितलं पण तो गमतीत म्हणाला , " ठीक आहेस ते बर पण आता तू झोपत नाहीस तोपर्यंत मी झोपणार नाही ..उगाच मधात ओरडलीस आणि आवाजाने बेडवरून पडलो तर .."
त्याच्या बोलण्याने नित्याचा गंभीर चेहऱ्यावर हसू आले ..त्यानेही तिला नीट झोपविले आणि तिच्याकडे पाहू लागला ..ती त्याला घट्ट चिकटून झोपली होती ..त्याने म्हटल्याप्रमाणे तो खरच जागा आहे की नाही हे पाहायला तिने चेहरा वर केला नि तो खरच डोळे मोठे करून तिला पाहू लागला ..तिनेही एक शब्द न बोलता आपलें डोळे मिटले ..तिला झोप लागत नव्हती पण सारांशने झोपावं म्हणून ती डोळे मिटून तशीच पडली ..सुमारे 15 मिनिटांनी तिने डोळे उघडले तेव्हा सारांशचा घोरण्याचा आवाज येऊ लागला ..ती त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून गालावर हसू आणत म्हणाली , " माझा वेडोबा ग बाई !! आयुष्यात कोणतं पुण्य केलं होतं की हा आला माहीत नाही पण आला नि आयुष्यच बदललं ...पण याचा वेडेपणा परवडत नाही बघ ..केव्हा काय करेल काही अंदाज नाही ..कोणत्या हॉस्पिटलमधून पळून आला काय माहिती .."
चेहऱ्यावर सुंदर हसून आणत ती त्याच्या कुशीत शिरली आणि पुन्हा एकदा आठवणींच्या कप्प्यात शिरली ..
---------
नित्याने घर सोडल्याच्या 7 वर्षानंतर
" टीचर टीचर हा भूषण बघा ना माझ्या गर्लफ्रेंडवर लाइन मारतोय ..मी ह्याला नाही सोडणार हा ..तुम्ही समजावून सांगा ह्याला नाही तर मी ह्याला सोडणार नाही हा ", 5 वर्षाचा सुयश म्हणाला ..
समोर फडयावर लिहीत असलेली नित्या त्याच्याकडे वळून पाहू लागली ..आता तिच्यात फारच फरक जाणवत होता ..आधी बारीक असलेली नित्या थोडी हेल्दी झाली होती ..तिचे भुरभुर उडणारे केस तिने पार्लर मध्ये जाऊन सरळ करून घेतले होते .एक वेगळीच मिठास तिच्या हसू मध्ये होती ..तीच मिठास चेहऱ्यावर आणत म्हणाली , " अरेरे पण सुयश तुझी गर्लफ्रेंड कोण आहे ते तरी कळू दे आम्हाला .."
सुयश प्रगतीकडे बोट दाखवत म्हणाला , " ही काय टीचर ..प्रगतीच तर माझी gf आहे .."
सर्व प्रगतीकडे पाहू लागले आणि प्रगतीने लाजून आपल्या चेहऱ्यावर हात ठेवला ..ती आपल्या बोटांच्या गॅप मधून समोर पाहणार तर तिच्या अगदी समोर नित्या येत म्हणाली , " काय ग प्रगती हा खर बोलतोय का ? लबाड कुठली !!."
प्रगतीने लाजून आपले उत्तर कळविले ..इकडे सुयश म्हणाला , " टीचर सांगा हा त्याला प्रगतीला त्रास द्यायचा नाही .."
नित्या सुयशचे गाल ओढत म्हणाली , " हो रे बाबा मी सांगते त्याला ..आता तो नाही देणार त्रास तुझ्या गर्लफ्रेंडला ..आता तरी हस ना !! "
ती सुयशला गुदगुल्या लावत होती आणि प्रगती त्याला पाहून हसत होती ..तितक्यात कुणीतरी सांगितलंं की सायंकाळचे सहा वाजले आणि सर्वच नित्याची परवानगी न घेता बाहेर पळाले ..नित्या कितीतरी वेळ त्यांना पाहतच होती ..
ती त्यांच्यात हरवली होती की शुभम तिच्या जवळ येत म्हणाला , " काय ताई , गेली तुझी चिल्लर पार्टी .."
आणि नित्या हसत म्हणाली , " चिल्लर पार्टी कसली रे महाचालूं आहेत ते ..या वयात त्यांना गर्लफ्रेंड / बॉयफ्रेंड आहेत उद्या जाऊन काय दिवे लावतील काय माहीत .."
आज खूप दिवसांनी शुभमने नित्याला इतकं मनमोकळेपणाने हसताना पाहिले होते ..काही क्षण तो तिच्याकडे पाहत होता..काही क्षणात तिचा हात धरून त्याने तिला बेडवर बसविले आणि स्वतः जमिनीवर बसत म्हणाला , " एक ना ताई तुला काही सांगायचं आहे ? "
नित्या त्याची खेचत म्हणाली , " हेच ना की तुझं वर्षावर प्रेम आहे .."
नित्याला कस माहिती म्हणून तो बुचकाळ्यात पडला होता आणि न राहवता त्याने विचारलं , " ताई मी तर तुला काही सांगितलं नाही मग तुला कस कळलं ? "
नित्या त्याचे केस विखरवत म्हणाली , " बेटा मैं भी तेरी दीदी हु ..बहोत जमाना देखा है हमने ..दिसत रे तुमच्या डोळ्यात त्यामुळे ते कुणालाही सहज कळेल .."
तो आपली बत्तीसी दाखवत होता आणि नित्या त्याला आणखीच चिडवू लागली ..तो तिला हसू नको म्हणून सांगत होता पण ती त्याच काही एकत नव्हती ..तिला बघून तोही हसू लागला ..हसता - हसता शुभमने मान खाली टाकली ..नित्याच्या ते लक्षात आलं आणि ती म्हणाली , " काय रे रागावला आहेस का माझ्यावर मी तर गंमत करत होते ..बर घे सॉरी आता कान पण पकडते .."
तो तिचे हात कानावरून खाली घेत म्हणाला , "नाही रागावलो पण एक प्रॉब्लेम आहे ग ? "
नित्या गोंधळत , " आता कसला प्रॉब्लेम ? "
आणि शुभम शांतपणे म्हणाला , " दीदी ती मला एका वर्षाने मोठी आहे .."
नित्या त्याच्यावर आता जोराने हसू लागली होती पण त्याचा चेहरा कोमेजला हे पाहून ती म्हणाली , " काय फरक पडतो शुभम !! प्रेम व्यक्तीचया मनावर होत ना की आणखी कशावर..प्रेमात वय , रंग , जात , धर्म ह्याला महत्त्व नसते आणि ते पाहून जर करत असू तर ते प्रेम नसत ..प्रेमात फक्त दोन समजूतदार व्यक्ती असने आवश्यक असतात जे कायम एकमेकाना समजून घेतील आणि कधीही एकमेकांची साथ सोडणार नाहीत ..मला ते प्रेम तुमच्या दोघात दिसत ..आणि शुभम मला प्रॉमिस कर की तू तिला कधी एकट सोडणार नाही..बाकी मला वहिनी आवडली बर का ? "
नित्याच्या बोलण्याने त्याला धीर मिळाला ..नित्या एकमेव व्यक्ती होती जी त्याच्या आयुष्यात खास होती ..तो आपल्या प्रत्येक निर्णयात तिला नक्कीच सामील करून घ्यायचा ..ताईने परवानगी दिल्यावर तो हसत हसत बाहेर गेला तर त्याला जाताना पाहून नित्या खुश झाली ..
आज सर्व बाहेरून जेवून येणार होते हे तिला माहीत होतं म्हणून बाजूला असलेलं पुस्तक खोलून ती वाचू लागली ..त्याच्या पहिल्या पाणावरच्या पहिल्या ओळी होत्या
" जिंदगी मे जो बित गया उसे वक्त के साथ भूल जाओ ..शायद वक्त ने आपके लिये कुछ खास सोचा होगा वरणा आप सब कुछ सेहकर आज यु जिंदा ना होते .."
नित्याने पहिली ओळ वाचली आणि आपसूकच तिच्या तोंडून शब्द आले , " हाउ स्टुपिड ..कहा से आते है ये लोग ..जरा ढंग का कुछ लिखा करो ..क्यूकी दर्द सेहणे के बाद और बचा ही क्या है जिने मे ..हम तो वही रेह गयी दर्द भरी रातो मे"
ती पुन्हा स्वतःच स्वतःला म्हणाली , " ओ माय गॉड नित्या तू तो शायर बन गयी .."
आज गेल्या कित्येक वर्षानंतर ती इतकी मनमोकळी हसली होती पण नित्याला माहीत नव्हतं की ती ज्या ओळींवर हसत होती त्याच स्वप्नमय ओळी तीच आयुष्य बनणार होत्या ..
हर दर्द की अपनी एक कहाणी है
सूनने को लगती सुहानी है
न सोचते ही जुड जाते है तार किसीं के दिलं से
मोहब्बत की दर्द ही तो निशाणी है
क्रमशः ...