I She and Shimla - 1 in Marathi Fiction Stories by Ajay Shelke books and stories PDF | मी ती आणि शिमला - 1

Featured Books
Categories
Share

मी ती आणि शिमला - 1

महेश, केतन, मी, स्वराली आणि मानसी तसे लहानपापासूनच एकत्र आहोत एका अर्थे लांगोटी यार. चाळी पासून ते शाळे पर्यंत आणि कॉलेज पासून ते जॉब पर्यंत आम्ही सोबतच आहोत. महेश आत्ता पेट्रोकिमिकल इंजिनियर असून दिव-दमण ला कामाला असतो. केतन आणि मानसी आयटी क्षेत्रात असून एकाच आयटी पार्क मध्ये कामाला आहेत. तर मी आणि स्वराली न्युरो सर्जन. कोणी कितीही कामात व्यस्त असो नसो शनिवारी रात्री आठला ठरलेल्या कॅफे मध्ये भेटायचं म्हणजे भेटायचंच.
महेश कधी याचा तर तर कधी नाही कारण जॉब साठी त्याने त्याच सर्व घर बस्ता दिव दमणला हलवल होत. पण मी, केतन, मानसी आणि स्वराली भेटायचो म्हणजे भेटायचो. म काय गप्पा मजा मस्ती मग खानपिण होयच. मग लेट नाईट फिरण, पार्ट्या होत असे कामाचा ताण पण कमी आणि मित्रांसोबत वेळ सुद्धा व्यतीत होत होता. असच एका शनिवारी भेटल्यावर सर्व सोबत असताना मी विषय काढला की जाऊया का सर्वजण विक हॉलिडेला? माझ हे बोलून होत नाही की महेश बोलला "अरे चला रे खरंच कामाचा वैताग आला आहे मला मस्त सुट्टी भेटेल आणि शांती पण आणि तेवढच फिरू पण किती दिवस झाले ज्युनिअर कॉलेज च्या कॉलेज ट्रेक नंतर कुठे गेलोच नाही आपण कुठे. मी तर रेडी आहे तुझ काय मत आहे केत्या" विचार करून केतन बोलला "अरे यायला काही नाही आमची कंपनी हरामखोर आहे रे सुट्टीच देत नाही साला काय ग बरोबर ना मानसी आपला बॉस कसा आहे सांग जरा ह्यांना" "होना यार असला बॉस ना आपल्या दुष्मानाला सुद्धा भेटू नाही मी लास्ट विक मध्ये गावी जाण्यासाठी ३ दिवसाची सुट्टी मागितली तर सरळ सरळ नाही बोलला यार तरी ठीक आहे काही सांगून करू अरेंज पण जायचं कुठे?" अस मानसी ने विचारल. मी आणि स्वाराली एकसाथ बोललो "शिमला !" बोलतो की नाही ते लगेच महेेेश म्हणाला "तुमचं आधीच ठरलं आहे वाटत नक्की प्लॅन काय आहे ?" "अरे अस काहीच नाही रे बाबा तू उगीच काही पोकळ अंदाज लावू नको समजलास" अस महेशच बोलून होत नाही की स्वरा बोलली. होय नाही होय नाही करून शेवटी ठरल तर शिमलाच. सुट्टी आणि प्लॅनिंगसाठी एक महिना ठरला. मी आणि स्वरा आधी खूप वेळा सर्जरी नंतर ब्रेक मध्ये यावर बोलायचो. महेश आणि केतनला माहित होत की मला स्वरा लहानपणा पासूनच आवडत होती पण दोस्ती खातर ते कधी स्वराला बोलले नाही की ना मला कधी फोर्स केला. स्वरा बिंदास टाईप ची होती रोज रात्री लास्ट सर्जरी नंतर क्लब पार्ट्या आणि मुलानं सोबत बिंदास फिरणं वगैर. आत्ता आम्ही लहानाचे मोठे सोबत झालो सर्वांना सर्वांचे कांड लफडी मॅटर माहित होते पण मॅटर आणि लफडी ह्यात स्वरा सर्वांच्या पुढे होती ती मुलांप्रमाेच मारामारी मॅटर करायची एव्हाना अजून कधी कधी होतात. शाळेत नाही पण कॉलेजला १२वी ला कोणी संकेत नावाचा तीचा बॉयफ्रेंड होता पण फार काळ चाललं नाही त्याचं पण स्वरा सीरियस होती त्याच्यावर मात्र तीच्या असा स्वभावा मुळे त्याने हिला सोडल होत. त्या दुःखात आम्ही सर्व होतो तिच्या सोबत खास करून मी कारण मला ती आवडत होती.असो शेवटी एका शनिवारी भेटल्यावर शिमल्याचा प्लॅन फिक्स झाला. तारीख, वेळ, काळ, जाणं, वगैर. ठरल तर की पुढच्या रविवारी जायचं ते थेट त्याच्या पुढच्या रविवारी रात्री यायचं. गाडी ने जायचं ठरल होत गाडी चालवणार मी आणि गाडी पण माझीच मी आधी स्वरालीला घेणार नंतर केतन मानसी आणि शेवटी महेशला. तो दिवस शेवटी उजाडला मी सकाळी ६.३० ला स्वराली घेतलं आणि केतन मानसीला घेऊन महेशला घ्याला निघालो पण त्याच्या घरी जात असताना त्याचा फोन आला की त्याचे मामा वारल्या मुळे त्याला गावी अर्जंट जाव लागत आहे. केतन ने त्याला ४ शिव्या देऊन त्याचा फोन ठेवला आणि आत्ता मी, स्वराली, केतन आणि मानसी शिमल्याला रवाना होऊ लागलो....

क्रमशः