my lockdown house - 1 in Marathi Fiction Stories by PrevailArtist books and stories PDF | माझ्या माहेरच लॉकडाऊन घर - 1

Featured Books
Categories
Share

माझ्या माहेरच लॉकडाऊन घर - 1

माझ्या माहेरच लॉकडाऊन घर भाग एक

आज वातावरण खूप ढगाळ दिसत होत, अस वाटत होत कि आता मुसळधार पाऊस पडेल.

मनात कोणती तरी भीती सलत होती कि ,” आज काही तरी वाईट घडणार आहे, ह्या विचारात असताना सिया एकदा आकाशा कडे बघते आणि देवाला प्रार्थना करते कि ,” देवा काही चुकल माकल असेल तर माफ कर पण आता काही वाईट नको होऊ दे कारण आता तास सामर्थ्य नाही आहे”. “अंगात बळ असेलही पण मनाच्या बळाच काय ते जर साथ देत नसेल तर मी परिस्थितीशी कसा सामना करू”. ह्या विचारात तिने आपली खोली साफ करायला घेतली, म्हणजेच तेवढच कामात मन रमेल असल्याने.


पण आता आपण जरा समिधा ला हक मारुया बघूया काही काम आहे का अस पण किती वेळ रिकाम रिकाम बसून राहणार बर नाही ना वाटत . म्हणून सिया समिधा ला हाक मारते.



समिधा स्वयंपाक घरात पोहे करत होती. आज तिला खूप बरं वाटत होतं , तिच्या मते ह्या वातावरणात एक वेगळी मज्जा असते त्यामुळे तिला हे वातावरण खूप आवडायचं .वरच्या खोलीमधून समिधाच्या नणंदे चा म्हणजेच सियाचा आवाज आला," समिधा अग काय करतेस? ".

समिधा कांदा चिरताना थांबली आणि डोळ्याच्या बुबुळ च्या डाव्या कोपऱ्यातुन पाहत होती. एक दीर्घ श्वास घेतला आणि हॉल मध्ये गेली. "काय ताई काय झालं?"

ताई : ," अग नाही म्हटलं काय करतेस? मला बसून बसून कंटाळा आलाय ग... काही काम असेल तर सांग कि म्हणजे तेवढाच माझा हातभार लागेल आणि आई-बाबा काय करत्यात ग त्यांचा पण सकाळ पासून काही आवाज नाही ? "





समिधा:" ताई आता किती दिवस राहिलेत फक्त दहा दिवस तर राहिलेत मग भेटा ना तुमच्या आईला आणि बाबांना "



सिया," तरीपण ग मला नाही आवडत आहे ते एकट राहण आईला तरी बोलावं नाही तर बाबांना "

समिधा," अहो ताई कशाला अस करत्यात तुम्ही , एकतर कोणी अचानक भरारी पथक आलं तर आम्हाला पण त्रास होईल. माहितीय ना खूप कोरोना च मोठं संकट आलाय उगाच कशाला रिस्क घ्यायची आणि आई बाबा दोघे पण देवळात गेलेत , आता आपल्या घरावर संकट अजून नको येऊ दे म्हणून गेलेत".



(आई बाबा आणि देवळात कधी नाही जात एकत्र खरतर त्यांचं पटतंय कुठे एकमेकांसोबत सतत नुसते भांडत असतात हा विचार करताना सिया ला हसायला आल ,पण ते गेले असतील आपल्या साठीच ना.)

थोडा विचार करून सिया समिधा ला विचारते, " अग पण देऊळ तर बंद आहेत ना ?मग हे कसे गेले आणि पाऊस पण येणार आहे ग मग तू कस काय पाठवलस त्यांना "?



समिधा थोडी रागात येऊन, "ताई अहो देऊळ बंद आहेत हे माहितीय पण देवळाचा आवर नाही ना, ते बाहेरूनच नमस्कार करून येणार आहे आणि तस पण थोडा फेरफटका पण होईल, आणि पाऊस आहे ते मला माहितीय पण तुम्हाला माहितीय ना तुमचे बाबा म्हणजे माझे सासरे किती हट्टी आहेत ते गेले आईना घेऊन प्रायवेट रिक्षा करून गेलेत आणि ते परत त्याच रिक्षानेच येणार आहेत त्यामुळे त्याची काळजी करू नका “, आता मी जाऊ का..? मला खूप काम आहेत ओ अजून जेवण होयचं”.



सिया गडबडून "हां हां चालेल" ,सिया पुढे हे बोलणार ऐक ना ते आल्यावर तरी मला बोलायचं ग असं बोलणार पण समिधाला अजून राग येईल म्हणून ती काही न बोलता, टेबलावर असलेली गृहशोभिका घेतली ,बेडवर बसून वाचायला घेतली.



थोड्या वेळाने सिया वाचत असताना तिला पोहेचा वास आला आणि बघते तर दारात समिधा पोहे आणि चहा घेऊन उभी होती. समिधा हसत हसत आत आली. ट्रे टेबलावर ठेवत ,"ताई बघा कसे झालेत पोहे आणि चहा, आणि तुमचं खाऊन झालं की हाक नक्की मारा , "

सिया केविलवाणी हळू आवाजात," समिधा " अशी हाक मारते.

"काय ताई काय हवंय काय" समिधा

सिया," आं... समिधा आई बाबा आले काय ग?"



समिधा हसुन ,"अहो ते कधीच आलेत तुम्हाला नाही माहिती काय?"



सिया कपाळावर आठ्या आणत, चिंतेने बोलते , "काय कधी मला नाही कळलं ग कधी आले ते"



समिधा,"अहो कधीच आले ते, तुम्हाला दोघे हाक मारून मारून थकले ते त्यांना वाटलं तुम्ही झोपलात की काय. म्हणून मग ते त्यांच्या खोलीत जाऊन झोपले"



सिया: "अग खरच नाही ऐकायला आला मला आवाज, मी जागीच आहे ग,



समिधा थोड्या रागात येऊन बोलते ," अहो मग मी काय करणार सांगा ना त्यांचा आवाज तुमच्या पर्यंत पोचला नाही ते , आं एका प्रश्नार्थक नजरेने सिया बोलत होती."

सिया तिला अस रागवताना पाहून थोडी घाबरली होती , " हां बर बर जाऊदे नाही ऐकायला आल मला ,



समिधा आता बाहेर निघणार तेवढ्यात सिया हलकश्या आवाजात ," समिधा अग काही काम लागल तर सांग मला पण बसून बसून कंटाळा येतो म्हणून "



समिधा ," अरे बापरे खरच तुम्हाला काम हवय( थोड मिश्कील्ने हसत ) काही नको तुम्ही फक्त आराम करा बस उद्या ह्यांना कळाल तर मला ओरडतील, आई बोलतील मग त्या पेक्षा नकोच "

चला आता, मी जाते कपडे धुवायचे आहेत ना तुमचे असतील तर द्या मग ते द्या आणि मी जाते" .



"अ....आ... हां पण मी धुतले आहेत ग ते फक्त वाळत घालायचे आहेत ते मी घालते आणि आता ह्या वेळी नको कपडे तरी मी करते म्हणजे मला पण तेवढ काम बर ग "सिया



"अच्छा ठीक आहे , अजून काही लागल तर सांगा म्हणजे मी देईन आणून " समिधा



हां चालेल , सिया



"आता पोहे आणि चहा पण थंड झाला असेल " बघा जरा
सिया नाष्टा च्या इथे जाते आणि बघते तर नाष्टा गरम असतो . समिधाकडे एकदा बघून तिच्यासोबत हसते आणि खायला घेते.

समिधा हे बघून ती पायऱ्या खाली उतरायला लागते आणि स्वताच्या कामाला सुरुवात करते.



सिया इथे नास्था करायला सुरुवात करते पण ,सियाला इथे काही केल्या गोड लागत नसत आपले आई-बाबा नि हाक मारली आणि आपल्याला ऐकायला का नाही आली..?? अस कस झाल ..?? समिधा काही लपवत तर नसेल ना. नाही ती का अशी करेल आणि का ..??



अचानक भांडी चा जोरात आवाज येतो, तेवढ्यात सिया दचकते. भानावर येते

आणि अचानक तिला आईच्या हाकेचा आवाज येतो , "सिया बाळा कशी आहेस ?"



सिया धडपडत बाहेर जाते तेवढ्यात तिला आठवत , आता आपण नाही जाऊ शकत बाहेर आधीच ह्या कोरोनामुळे आपण कोणाला त्रास नको द्यायला. म्हणून ती नाही बाहेर जात.

“ आई अग कुठे होतीस आणि मी किती वेळ तुझी वाट पाहिली काय करतेस ? कशी आहेस? आणि मला तू हाक मारलीस काय ? आई अग काहीतरी बोल ना....“



खूप मोठ्याने हसायचा आवाज येतो तेव्हा सिया ला हे विचित्र वाटत , कि आई अशी काय हसते आणि बोलत का नाही आहे. सियाच मन धडधडायला लागत , ती डोळ्याच्या कोपर्यामधून बघते तर तिला असा भास होतो कोणीतरी आपल्या जवळ येतंय , ती आवंढा गिळते ,ती बाजूला बघते तर तिथे कोणी नसत . सियाला खूप दरदरून घाम आलेला असतो ,हृदयाचे ठोके पण वाढायला लागतात ती बाहेर यायचं धाडस करते, आणि पुढे बघते तर समिधा असते.

समिधा अशी अचानक रुमच्या बाहेर बघून सियाचा जीव खूप धडधडायला लागतो म्हणजे जो हसण्याचा आवाज होतो समिधा चा होता.

(मनापासून खूप धन्यवाद माझी कथा वाचल्या बद्दल

कथेमध्ये लिहलेले काही तुमच्या आयुष्यातिल मिळत जुळत असेल तर तो निवळ योगायोग समजावा.

जर तुम्हाला ह्या कथेचा भाग आवडला असेल तर मला जरूर कळवा माझा इमेल आयडी आहे : prevailpratilipi93@gmail.com

आणि माझ्या Instagram पेजला तुम्ही नक्की फोल्लो करा : _marathmola_andaj
तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर नक्की share करा,like kara, comment करा
माझ्या अजून असे नव नवीन कथा येत राहतील आणि त्या सोबत नव नवीन कल्पना घेऊन

धन्यवाद)