kadambari Premaachi jaadu Part 9 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - ९ वा

Featured Books
  • तमस ज्योति - 51

    प्रकरण - ५१मेरे मम्मी पापा अब हमारे साथ अहमदाबाद में रहने आ...

  • Lash ki Surat

    रात के करीब 12 बजे होंगे उस रात ठण्ड भी अपने चरम पर थी स्ट्र...

  • साथिया - 118

    अक्षत घर आया और तो देखा  हॉल  में ही साधना और अरविंद बैठे हु...

  • तीन दोस्त ( ट्रेलर)

    आपके सामने प्रस्तुत करने जा रहे हैं हम एक नया उपन्यास जिसका...

  • फाइल

    फाइल   "भोला ओ भोला", पता नहीं ये भोला कहाँ मर गया। भोला......

Categories
Share

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - ९ वा

कादंबरी –प्रेमाची जादू

भाग -९ वा

-------------------------------------------------------

१.

----------------------

यशच्या घरची सकाळ , शनिवार दिवस ..अंजलीवहिनी आणि सुधीरभाऊ या दोघांच्या सुट्टीचा

दिवस , ,त्यामुळे नेहमीप्रमाणे घराच्या इन - चार्ज अंजली वाहिनी .

नाश्त्यासाठी सगळे एकत्र आले म्हणजे गेल्या आठवडाभरात काय झाले ? आणि पुढच्या आठवड्यात

काय काय करायचे ? या कौटुंबिक चर्चेत हर एक जण सहभागी होऊन ..अपडेट देत असे, त्यामुळे

सगळ्यांना झालेल्या आणि होणार्या गोष्टींची कल्पना असायची , या पद्धतीमुळे ..या सगळ्यांत एक उत्तम

असा संवाद होता .एखादी गोष्ट ..मग ती कोणतीही असो ..ती सगळ्यांना माहिती असते . त्यामुळे ..

“मला काय माहिती नाही ..अशी उत्तरे देण्याची वेळ कुणावर येत नाही “.

आजही नाश्ता रेडी होता , खमंग पदार्थ आणि सोबत खुसखुशीत गप्पा ..मस्त मैफिल जमली आहे

असेच वातवरण होते.

अंजलीवहिनी ..laptop उघडून बसल्या , ते आज्जी आणि यशच्या आईच्या मधोमध बसून .

आणि सगळ्याकडे पाहत त्या म्हणाल्या ..

आम्ही मागच्या आठवड्यात ..एका लोकप्रिय विवाह मंडळात यशचे नाव नोंदवले आहे..

तर आता आपण सगळे मिळून पाहू या ..

काही इंटरेस्ट आलेत का ?,

कोण कोण उत्सुक आहे आपल्या यशच्या स्थळासाठी ?

यश सोडून ..सगळ्यांनी टाळ्या वाजवत ..संमती दिली

यशचे प्रोफाईल समोर आल्यावर ..अंजलीवाहिनी आणि यशच्या आई ,दोघींनी ते पाहून

यशला म्हटले ..

अरे वा.. आपल्या संशोधन मोहिमेस सुरुवात छान झाली आहे . तब्बल दहा मुलींनी

इंटरेस्ट दाखवला आहे.

काही न बोलता ..यश त्या दोघींच्याकडे पाहत होता ..

यावर आज्जी म्हणाल्या ..

असे गप्प बसून तुझी सुटका नाहीये यश , तुला सुद्धा ..या आलेल्या इंटरेस्टला प्रतिसाद

द्यावा लागणार आहे.

त्यासाठी या स्थळांशी ..मुलींच्या आई-बाबांशी ..आता अंजलीला किंवा तुझ्या आईला संपर्क

करू दे ..मग, पुढचे ठरवू या ,

यश ,आता मुलगी पाहण्याचा कार्यक्रम सुरु झाला पाहिजे ,

आम्हाला आता फार उत्सुक्ताला लागून राहिली आहे

आजींचे बोलणे ऐकून घेत यश म्हणाला ..

आजी ..तुम्हा कुणाच्याच बोलण्याला मी आता थांबवणार नाहीये ..

तुम्ही ठरवा , मग मला सांगा ..मी त्याप्रमाणे करीन, आता झाला समाधान ?

यशचे बोलणे ऐकून अंजलीवहिनी आजींना म्हणाली ..

आज्जी ..तुमचा नातू तुम्ही आल्यापासून फारच बाळबोध –बाळासारखे वागतो आहे असे नाही वाटत का ?

यशची बाजू घेत ..आजोबा म्हणाले ..

अंजली ..यशच काय, तू आणि सुधीर ..तिघेही वडीलधार्या माणसांच्या शब्दांचा मान राखता

याचे खूप समाधान वाटत असते आम्हाला .

सुधीरभाऊने त्याची भावना बोलून दाखवत म्हटले -

हो आजोबा –तुम्हाला आनंद होतोय ना ..अजून काही नको आम्हाला .

बरे ते राहू द्या , मी काय म्हणते ते ऐका – असे बोलत अंजलवहिनी सांगू लागली ..

इंटरेस्ट दाखवलेल्या ..या मुलींपैकी ..एक मुलगी ..सगळ्यात फास्ट निघाली बघा ..

मोनिका ..नाव आहे तिचे ..तिने तर कमाल केलीय ..

यशने त्याचा इंटरेस्ट कळवण्याच्या अगोदर ..ही मुलगी ..दोन दिवसांपूर्वी ..यशला त्याच्या

ऑफिस मध्ये जाऊन भेटून सुद्धा आलीय .

माझ्या मैत्रिणीची भाची आहे ही मोनिका ..

तिचे आईबाबा ..बिझिनेस कम्युनिटी मधले बडे प्रस्थ आहे.. आणि ही मोनिका ..स्वतहा तिच्या

मालकीच्या ऑफिसची सर्वे-सर्वा आहे.

तिनेच मला फोन करून ..तिच्याबद्दल सांगितले आणि यशला भेटून आले, हे पण सांगितले आहे.

अंजलीवाहिनी म्हणाली ..तिच्या आलेल्या इंटरेस्टला यश ने रीस्पोंस देण्यास काहीच हरकत नाही

असे मला वाटते ..

आणि येत्या रविवारी ..म्हणजे उद्या ती आपल्या घरी ..माझी गेस्ट म्हणून येणार आहे..

तिला दिवसभर आपल्या राहून पहायचे आहे .

काय यश ..करू का तिला फोन ?

यश म्हणाला –वाहिनी ,हो करा तिला फोन

हो ..ही मोनिका आली होती माझ्या ऑफिस मध्ये .छान बोलणे झाले आमच्यात ..

मी पण म्हणलो ..एकदा आमच्या घरी येऊन पहा ..मग ठरवू आपण पुढे भेटायचे की नाही.

वाहिनी तू सांग तिला ..उद्या येण्यास काही हरकत नाहीये.

यशचे बोलणे ऐकून ..आजी म्हणाल्या ..

यश -अरे वा ..खूपच स्मार्त झालायस की तू तर ..

उद्या पहिली मुलगी पाहणार आम्ही , ..आपल्याकडे पाहुनी म्हणून येते आहे .

यशची आई म्हणाली ..

अंजली – तुलाच करायचे आहे सगळे म्यानेज.

हो आई.. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका

अंजलीने प्रोमीस केलेले पाहून ..आजोबा म्हणाले ..

एक शंका येते आहे मला

बोलून दाखवू ..का ?

माझ्यावर चिडायचे नाही ..कबूल असेल तर ..बोलतो ,,

आजी म्हणाल्या ..वाटलेच मला ..आम्ही ठरवलेले तुम्हाला सरळ सरळ कसे काय ओके ओके वाटते आहे ,

पण, नाही ..तुमच्या शंका ..शिन्क्ल्याच मध्ये .

यशची आई म्हणाली ..

अहो आजी –असे नाही ..या गोष्टी करतांना ..अगदी सर्व बाजूंनी विचार करायला हवा ..गोष्टी

पुढे गेल्या तर ..मग कसे थांबावे ..पंचाईत होते आपलीच.

सुधीरभाऊ म्हणाला – आजोबा , तुम्ही अगदी संकोच न करता तुमच्या मनातला दाऊट बोलून टाका .

यशचे बाबा म्हणाले ..

आपल्यातील प्रेत्येकाने आपल्याला वाटणाऱ्या गोष्टी बोलून दाख्व्याच्या कि नाही ? असा विचारच करू नये .

यालाच तर साधक-बाधक चर्चा म्हणतात

आजीबाई म्हणाल्या –

अरे देवा – एक शंका ..त्यावर किती मोठी चर्चा ..सांगून टाका बरे ..काय आले आहे तुमच्या मनात..

आजोबा बोलू लागले –

हे पहा मंडळी – ही मोनिका की कोण..

हिने ..यशचे स्थळ या साईटवर जाऊन पाहिले ,इज ओके ,

अंजलीने या मोनिकाच्या मावशीला यशच्या स्थळाबद्दल सुचवले आहे .ते पण ठीकच आहे .

या मावशींनी मोनिकाला यशच्या स्थळाचा विचार करावा असा आग्रह धरला असेल म्हणून मोनिका

डायरेक्ट यशला भेटायला आणि बोलायलाच गेली .

आपल्यापेक्षा अतिशय श्रीमंत असलेलेली मोनिका .तिच्यासाठी यशचा विचार कसा काय करते ?

याचे मला जरा आश्चर्य वाटले ..बाकी नाही ...

तुम्हाला सगळ्यांना यात काही वावगे वाटत नसेल तर ..गो अहेड ...!

सगळ्यांनी मिळून ..आजोबांना म्हटले.. असे काही नसेल हो ..

आपली फ्यामिली ..कुणाही मुलीला आवडण्यासारखी आहे, यश आवडावा असाच आहे .

तुम्ही उगीचच शंका नका काढीत बसू ..

येऊ द्या उद्या मोनिकाला .

एकमताने मोनिकाला उद्या येण्यासाठी फोन करावा असे ठरले.

------

२.

यश त्याच्या ऑफिसला आला ..कामावर कोण कोण आले , कोण नाही आले हे पाहून घेतले

आणि स्वतः सहित प्रत्येकाला कामाला लावीत यश कामात गढून गेला .

दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली . सगळ्या सोबत ..टिफिन खाणे सुरु झाले ..

त्याच वेळी ..मोबाईल रिंग वाजली ..

मोनिकाचा कॉल होता ..

हाय यश , ऐक ना रे , आता अंजलीवहिनींचा फोन येऊन गेला

त्यांनी उद्या सकाळी ..नाश्त्याला ये आणि मग ..संध्याकाळचा चहा घेऊनच जा ..तो पर्यंत

आमच्या सहवासात असणार आहेस तू..असे सांगितले आहे मला .

येऊ ना रे यश ?

मोनिकाच्या आवाजात अशी काही जादू होती ..की तिने ज्या अंदाजात विचारले ..तो गोडवा

ऐकूनच ..हो ये ना मोनिका ..

असे यशच्या तोंडून आपोआपच निघून गेले .

इकडे मोनिकाच्या चेहेर्यावर स्मित उमटले ..

गोली..निशाने पर लगी है ..तिची खात्री पटली .

यश ..मी कशी आलेली पाहायला आवडेल तुला ?

ड्रेस की जीन –कुर्ता , की अजून काही ?

यश म्हणाला –

मोनिका – घरात आजी-आजोबा आहेत, म्हणून तू सिम्पल यायला हवी ,

पण..तुला साडीत अवघडून गेल्या सारखे वाटेल ..असा माझा अंदाज आहे..

तू ड्रेस घालून यावे . जीन –कुर्ता असुदे तुझ्या बैगमध्ये ,काही सांगता येत नाही ..इझ्झी

वाटावे म्हणून .आमच्या घरातील महिला मंडळ तुला सांगू शकतात .

यशचे शब्द मोनिकाला सुखावणारे होते ..

यस डियर .

.मोनिकाला पाहून तू तर खुश होशीलच ..पण घरातली सगळी माझ्या देखण्या

रुपाकडे पाहतच राहतील ..बघच तू ..

बाय यश..भेटू उद्या

मोनिकाने फोन कट केला ...

-----------------------------------------------------------------

३.

------------------------------------------------------------

मधुराला आज फारच कंटाळा आलेला होता . ताईकडे येऊन आता ती बर्यापैकी सेटल झाली होती ..

ताईच्या घरात ..जीजू , ताईची दोन मुले , आणि सासू -सासरे –म्हणजे सहा माणसे ..त्यात आता आपल्या

येण्याने तिच्या कामात भर पडली आहे... सुटीच्या दिवशी ताई आणि जीजुंचे लोकलचे नातेवाईक येतात ,

किंवा त्याना यांच्याकडे जायचे असे ..अशा वेळी ..ताईला वाटे ..मधुराला सोडून आम्हीच मजा करतो ,

कधी कधी जीजुंचे आई-बाबा पण कुणाकडे तरी ..जात ..

घरात एकट्या मधुराला नको वाटे .

आई-बाबांची खूप आठवण येई ..तिथे कोलोनीत किती छान ..कधी कुणाकडे हक्काने जाऊन बसता येत होते .

.कधी एकटेपणा अनुभवला नव्हता ..इथे मात्र यापुढे नेहमीच असे एकटे –एकटे राहावे लागणार आहे.

मधुराचे एमबीएचे कोलेज ,त्याच्या वेळा ..टू-व्हीलरवर जाणे ..या गोष्टी फारशा कठीण वाटत नव्हत्या .

म्हणतात ना ..

पाण्यात ढकलून दिले की ..हात –पाय मारावे लागतात ..तसे झाले आहे .

तिने ताईला मनातली गोष्ट बोलून दाखवली ..

ताई ..तू आणि तुझ्या फमिली रुटीन मध्ये नाही म्हटले तरी माझ्यामुळे खूप फरक पडतो

हे दिसते आहे मला ..

मी कोलेजच्या होस्टेलवर तर नाही ..पण, माझ्या क्लास मधल्या मुली राहतात ..त्या होस्टेलवर राहिले

तर काय हरकत आहे ?

मला ही मोकळे वाटेल ..आणि तुला ही वाटायला नको दरवेळी ..मधुराला सोडून ..मी कसे जाऊ ?

जीजूंना समजल्यावर ..ते म्हणाले ..

मधुराची पोजिशन आपण समजून घेण्यात सगळ्यांचे भले आहे ..उलट

कोण काय म्हणेल ? या भीतीने ..मधुराला बळजबरीने आपल्या सोबत राहा असे केले तर..

त्याला काही अर्थ नाही..

सगळ्यांचा विचार होऊन ..पुढच्या महिन्या पासून मधुरा ..तिच्या मैत्रिणींच्या सोबत ..

ताईच्या घराजवळ असलेल्या लेडीज होस्टेलमध्ये शिफ्ट होणार ..हे ठरले .

हे आठवताच मधुराला जरा बरे वाटले ..निदान सोबत असणार्या मैत्रीणच्या बरोबर आपल्याला

एकटे एकटे नाही वाटणार . हा बदल नक्कीच छान असणार आहे आपल्या साठी.

आणि अचानक ..तिला आपण ज्यांच्या सोबत या शहरात आलोत त्या आजो-आजोबांची आठवण

झाली ..

त्या म्हणत असतील ..आम्ही म्हातारे ..नाही जमत बाहेर पडणे ..पण..या मधुराला काय प्रोब्लेम आहे ?

करायचा फोन आणि यायचे आजी-आजोबाना भेटायला ..

तिने आजींना फोन लावला ..

आजी- मी मधुरा ..कशा आहात तुम्ही ?

संध्याकाळच्या वेळी आजी-आजोबा दोघे ही बागेत बसलेले होते .

मधुराचा आवाज ऐकून आज्जी खोट्या खोट्या रागवत म्हणाल्या ..

आली का आमची आठवण ? मला वाटले विसरून गेली ही पोरगी .

मधुरा म्हणाली ..आजी ,उद्या रविवार ..मला सुट्टी आहे ..येउका तुमच्याशी बोलायला ?

तिचा प्रश्न ऐकून आजी विचारात पडल्या ..त्यांना गप्प झालेले पाहून .

आजोबां म्हणाले -

काय म्हणते आहे मधुरा ..उत्तर द्याना तिला ..

आजी हळू आवाजात म्हणाल्या ..

आहो , मधुरा ,उद्या येऊ का विचारते आहे ..कसे सांगू तिला ..

आपल्याकडे ती मोनिका येणार आहे ना ..यशला भेटण्यासाठी ..

आजोबांना काय वाटले कुणास ठाऊक ..आजींच्या हातातील फोन घेत म्हणाले .

हेल्लो मधुरा – मी आजोबा बोलतोय ..

येऊ का असे परक्या सारखे काय विचारतेस ..

तू ये उद्या ..बारा –साडेबाराला ये..आमच्या सोबत जेवण कर, मस्त गप्पा मार.

काय , येशील ना ?

मधुरा म्हणाली ..

काय हो आजोबा ..तुम्हाला आणि आज्जीला .मी नाही ,असे कसे म्हणेन . येते मी नक्की.

हे ऐकून आज्जींनी आपल्या कपाळवर हात मारून घेत आजोबाकडे पाहत म्हटले ..

अहो, हे काय करत आहात ..तुम्ही ...कशाला या साध्या मुलीला .त्या हाय-फाय मोनिका समोर

आणताय ..काय आहे तुमच्या डोक्यात ..कधी कळाले नाही मला..तर आज काय कळणार .

आजोबा म्हणाले ..कळेल हळू हळू ..धीर धारा .

---------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात

भाग -१० वा लवकरच येतो आहे .

----------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------