Krushnacha paalna in Marathi Spiritual Stories by Archana Rahul Mate Patil books and stories PDF | कृष्णाचा पाळणा

Featured Books
Categories
Share

कृष्णाचा पाळणा





गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सगळ्यांना पाळणा ऐकायला आवडतो.. पण हा कृष्ण जन्माचा पाळणा सगळ्यांनाच येतो ,असे नाही!! तर मग आता मोबाईल आहे, यु ट्यूब आहे किंवा इतर काही साधने आहे.. त्याद्वारे आपण हा पाळणा ऐकत असतो ..पण खरंच !!जुन्या बाया अति सुंदर आवाजात वेगवेगळे पाळण्या द्वारे कृष्णाच्या लोभसवाण्या रूपाचे वर्णन करत असतात ..कधी कधी ते पाळणे खूप जुन्या रूढी परंपरेपासून असतात, तर काही नवीनही. असाच एक पाळणा मी पुढे टाकणार आहे, जो तुम्हाला आज रात्री कृष्णाच्या जन्मवेलेस म्हणायला कामी येऊ शकतो....

पहिल्या दिवशी जन्मले बाळ..
कळस सोन्याचा देते डहाळ..
कृष्ण जन्मला कंसाचा काळ..
जो बाळा जो जो रे जो..

दुसऱ्या दिवशी दुसरा रंग ..
रूप असावळे गोरसे रंग..
जसा झळकतो आरशाचा भिंग ..
जो बाळा जो जो रे जो..

तिसऱ्या दिवशी आनंद मोठा..
सीता सावित्री बायांनो उठा..
खारीक खोबरं साखर वाटा ..
जो बाळा जो जो रे जो..

चवथ्या दिवशी बोलली बाळी ..
अनुसया ने वाजविली टाळी..
कृष्ण जन्मला यमुना स्थळी ..
जो बाळा जो जो रे जो..

पाचव्या दिवशी सटवी चा वेढा..
लिंबू नारळ फोडा देवीला फोडा..
तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा..
जो बाळा जो जो रे जो..

सहाव्या दिवशी कलीचा मारा..
राधा कृष्णाला घालिती वारा..
चला यशोदा अपुल्या घरा..
जो बाळा जो जो रे जो..

सातव्या दिवशी सटवी चा महाल..
तेथे सोनेरी मंडप लाल..
यशोदा मांडीवर कृष्ण हा डौल..
जो बाळा जो जो रे जो..

आठव्या दिवशी आठवी चा थाट ..
बोलल्या गवळणी तीनशे साठ..
श्रीकृष्णाची पाहता ती वाट..
जो बाळा जो जो रे जो..

नवव्या दिवशी नवतीचा फंद ..
तान्ह्या बाळाचा घेतला छंद..
वासुदेवाचा सोडवावा बंद..
जो बाळा जो जो रे जो..

दहाव्या दिवशी दहावीची राती..
तेहतीस कोटी देव मिळवून येती..
उतरुन टाकिती माणिकमोती ..
जो बाळा जो जो रे जो..

अकराव्या दिवशी नारद हो बोले..
देवा तुम्ही किती हो झोपले..
मधुरा नगरीत देवकीचे हाल..
जो बाळा जो जो रे जो..

बाराव्या दिवशी बाराचं नारी ..
पाळणा बांधीला यशोदा घरी..
त्याला लाविली रेशमी दोरी ..
जो बाळा जो जो रे जो..

तेराव्या दिवशी बोलली बाळी..
बाई कृष्ण जन्मला यमुना स्थळी..
गवळणी संगे लावितो खळी ..
जो बाळा जो जो रे जो..

चौदाव्या दिवशी तोफा गर्जती..
शंकर पार्वती नंदीवर येती..
बाळाच्या डोळ्यात काजळ घालीती ..
जो बाळा जो जो रे जो..

पंधराव्या दिवशी नोबत वाजे..
श्रीकृष्णाला घालिती साज..
यशोदा मातेला आनंद आज..
जो बाळा जो जो रे जो..

16 व्या दिवशी सोहळा केला ..
गुरुमहाराज विद्या बोलला..
श्रीकृष्णाचा पाळणा गायला ..
जो बाळा जो जो रे जो..

हा पाळणा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. ✍️✍️💞ARCHU💞..
नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय हो गोपाल की हाती घोडा पालखी.. यशोदा लाल की..
ब्रजभूमी आनंद भयो जय कन्हैया लाल की.. गोकुल मी आनंद भयो जय कन्हैया लाल की.. नंद घराणे आनंद भयो जय कन्हैया लाल की..
गोपीने के संघ रस रचि..जय कन्हैया लाल की..
...
....
...
बाजे बन्सी नाचे मोर नटवर नागर नंदकिशोर नटवर नागर नंदा कशोर सावलिया का चोर
.....तुम्हारा घटमा विराज अता श्रीनाथजी यमुना जी श्री महाप्रभुजी....

अष्टमीच्या दिवशी ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले कुणी म्हणे गोपाल कुणी म्हणे कृष्णा ग कान्हाला नावे किती खेळू चला.. रंग उधळू चला रास खेळू चला आज कान्हाचा गोपाळ काला आनंदी आनंद झाला.. त्याच्या बाळकृष्णाच्या इनानी घराघरात आनंद होत असतो आणि या निमित्ताने आपल्या घराला ही एक कृष्णमय वातावरण प्राप्त झालेले असते नाही का..असेच कृष्ण माय वातावरणात कृष्णमय कृष्ण दंग होऊन राहा आणि पुन्हा एकदा गोकुळाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..✍️✍️💞Archu💞