आज गोकुळाष्टमी मी या निमित्ताने सर्वांनाच कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा कृष्ण म्हटलं की अगदी माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न सगळीकडे कसा कृष्ण वातावरण आहे भाद्रपद महिन्याच्या अष्टमी तिथीला भगवान बाल कृष्णा चा जन्मदिवस साजरा केला जातो व त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आज आज आपण गोकुळाष्टमी च्या निमित्ताने कृष्ण जन्माची कथा पाहणार आहोत तर उद्याच्या भागात गोपाळकाला.. सगळ्यांनाच परिचित व माहिती असलेली कथा मी माझ्या शब्दात मांडणार आहे..
कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच कृष्णाष्टमी . ..किव्वा गोकुळाषटमी... यांचे महत्व काही वेगळे आहे, असं कळतं देवाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात तोच हा दिवस.. यादिवशी साक्ष त परब्रम्ह परमेश्वराने पृथ्वीवर अवतार धारण केला .अनेक राक्षस सचा उद्धार करून,यांच्या बाललीला,कृष्णलीला प्रचंड गाजलेल्या.. घराघरात उत्साहाचे वातावरण असते... भगवंतांनी वसुदेव आणि माता देवकी यांच्या पोटी जन्म घेतला...
मथुरेत उग्रसेन नावाचं राजा राज्य करीत होता.. त्याचा पुत्र कंसचे आपल्या बहिणी वर खूप प्रेम होते.. आपली बहीण विवाहयोग्य झाल्यावर त्यांनी तिचा विवाह आपला परम मित्र वसुदेव यांच्याशी निश्चीत केला.. कंसाची बहिण देवकी च विवाह कंसाचा परममित्र वसुदेव यांच्याशी झाल्यानंतर त्यांची पाठवण करत असताना आकाशात आकाशवाणी झाली.".की हे कंसा, ज्या प्रेमाने आपल्या बहिणीची पाठवणी करत आहे; त्याच बहिणीच्या उदरी जन्म घेतलेल्या आठव्या बाळाच्या हातात तुझे मरण आहे ..तो तुझा वध करील ."..असे ऐकताच कंसाने रागाने देवकीला मारण्यासाठी तलवार घेवून धावला.. तेव्हा वसुदेव पुढे आला व म्हणाला की "हे प्रिय मित्र, ही एक स्त्री आहे ..तिच्या हाती शस्त्र ही नाही ..अशा या स्त्रीला जर तू मारले तर लोक तुलाच नावे ठेवतील.. एका भावाने बहिणीची हत्या केली, असेही लांचान तुझ्यावर लावती ल...तुझी लाडकी बहीण आहे, तिचा यात काय दोष तिच्या पोटी जन्म घेतलेल्या बाळ तुझा वध करणार आहे ना !!!तर मी वसुदेव तुला वचन देतो की, मी माझे आठवी बाळ,माझे अपत्य तुला आणून देईल, मी तुलाच समर्पित करीन.. पण आमच्यावर दया कर..".
कंस म्हणाला" ठीक आहे. तुझ्या वचनावर विश्वास ठेवून मी हिला सोडतो आहे".. आणि असे म्हणून त्याने वसुदेव आणि देवकीला बेड्या घातल्या.. आणि तुरूंगात पाठवले ....
कंसाचा अत्याचार वाढतच होता . देवकी माता गर्भवती झाल्या त्यांना पहिले पूत्र झाल्यानंतर वसुदेवांनी आपल्या वचनाप्रमाणे कंसा कडे घेऊन गेले.. पण कौसा म्हणाला," त्या निरागस बाळाचा काय दोन हा तर माझा भाचा आहे.. पहिलाच!!!! माझा शत्रू तर आठवा आहे ..तेव्हा त्याला परत घेऊन जा .."वसुदेव पुन्हा तुरुंगात देवकिकडे आपल्या बाळाला घेऊन गेले..
आता सर्व देवतांना प्रश्न पडला की कौनसा तर खूप दयावान झाला आहे ..हा असाच राहिला तर त्याचे पुण्य वाढेल व पापाचे क्षय होईल!!! तर मग भगवंत कसे जन्म घेतील ??म्हणून त्यांनी नारदाला कंसाची बुद्धिभ्रष्ट करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले..
"नारायण, नारायण, नारायण "कीर्तन करत करत नारद फिरत आला आणि कंसाला सांगितले देवकीला बाळ झाले आहे ..पण तो म्हणाला" हो मला माहिती आहे.. तेव्हा च तर त्याचा प्रथम पुत्र आहे ना.. तो माझे काही करू शकणार नाही,. त्यानचा आठव पुत्र हवा आहे, तोपर्यंत त्यांची संतती त्यांनाच राहू दे..".नारद म्हणाले की "आठ वा नंबर केव्हाही येऊ शकतो !!उलट विचार केला तर पहिल्या क्रमांकाचा आठवा क्रमांक होऊ शकतो किंवा असेच उलट सुलट गणित केल्यास कोणताही क्रमांक आठवा येऊ शकतोस तेव्हा तू जागा हो ...असे म्हणत नारद निघून गेले..
कसं विचार करत धावतच तुरुंगात आला... व नुकत्याच जन्मलेल्या बाळाला देवकी कडून हिसकाऊन घेतले ..वासुदेव आणि देवकी रडू लागले.. कौन सा चे पाय धरुन देवकी म्हणाली "भाऊ या छोट्या जिवाचा काय दोष?? मला मातृत्वाचा लाभ झाला आहे.. त्याचे सुख मला लाभले नाही.. याला अभय दे!!वसुदेव ते म्हणाले" हे परम मित्रा मी माझे वचनबद्ध आहे.. पण या पुत्राचा खरच दोष नाही.. आठवा पुत्र मी नक्की तुलाच समर्पित करील!!!"
पन कसं म्हणाला" मला विष्णू मला माहिती आहे ,तो काही माया करून अवश्य जन्म घेईल, तेव्हा मी कोणतीही शंका ठेवू इच्छित नाही !!"असे म्हणून त्याने त्या इवल्याशा बाळाला दाहीदिशा गरगर फिरत जवळ असलेल्या दगडावर येऊन जोरात आपटले ते बाळ तत्क्षणी मरण पावले... असे करता करता सहा पूत्रचा वध केला असतो... आता सात नंबरचा गर्भ देवकीच्या पोटी वसलेला आहे.... भगवंतांनी जगन माता महामाया देवीला सांगून देवकीच्या पोटी चा गररभ हा रोहिणी मातेच्या पोटी दिला आणि त्यांना बळीराम हा पुत्र प्राप्त झाला.
भगवंताची लीला तर आगाध आहे.. त्यांच्या लिले मध्ये ते असेच पराक्रम करत असतात.. इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे त्यांचे विशेष गुणच होते नाही का!!!!
बळीराम यांचे प्राकट्य झाल्यानंतर आता देवकी माता ने आठव्यांदा गर्भ धारण केला होता आणि गर्भावस्थित त्यांच्या संपूर्ण शरीराला एक प्रकारचे तेज आले होते.. संपूर्ण कारागृहांमध्ये तेजच पसरलेली होती.. भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथीला सर्व देवतांनी भगवंताची स्तुती गायन चालू होते... अति रम्य वातावरणात भगवंताच्या जन्माची वेळ झाली होती.. दशदिशा प्रसन्न झाल्या होत्या... कालचक्र थांबले होते. ग्रह नक्षत्र शांत झाले गंधर्व गायन करु लागले.. अप्सरा नाचू लागल्या ..रात्री सुद्धा कमळ फुलून आले होते.., सर्व पशुपक्षी आनंदाने नाचू लागली.. कोकिळा गाण करू लागल्या!!! मोर नाचू लागली..!! सर्व सर्वजण भगवंताच्या येण्याची वाट पाहू लागली !!त्यांच्या आगमनाची आतुरतेने गाई वासरे हंबरून वाट पाहतात !!
तेव्हा भाद्रपद अष्टमीच्या रात्री ठीक बारा वाजता भगवान बाल कृष्ण यांचा जन्म कारागृहात झाला.. !!ऋषी गुणी गान करतायेत.. स्वर्गातून देव पुष्पांचा वर्षाव करत आहेत.. सगळीकडे आनंदी आनंद आहे..
भगवंतांनी देव की मातेला चतुर्भुज अवतारात दर्शन दिली आणि त्यांना मातेचे स्थान देऊन पुन्हा आपले बाल रूप घेऊन त्यांच्या मांडीवर खेळू लागली... वसुदेव आणि देवकी कृतार्थ झाले.. भगवंताचे दर्शन घेऊन धन्य धन्य झाले.. वसुदेव आणि देवकी च्या हातातील बेड्या तूठून पडल्या ..कारागृहाचे दरवाजे खुले झाली.. आणि पहारेकरी झोपी गेली.
वसुदेव महाराज देवकिला म्हणाले, की या बाळाला सुरक्षित ठिकाणी नेले पाहिजे ..अन्यथा कौनसा आला तर याचाही प्राण घेईल!!! आपले सातही पुत्र असेच हिसकाऊन घेतलेल्या देवकी मातेला रडू आले पण आपल्या आसर्वांना तेथेच थांबत त्यांनी बाळकृष्णाला वसुदेव महाराजांकडे एका टोपलीमध्ये दिली.. आता नुकतेच जन्मलेले या बाळाला वसुदेव महाराज टोपलीमध्ये कृष्णाला घेऊन कारागृहाच्या बाहेर पडतात आणि गोकुळामध्ये असलेले नंद बाबा यांच्याकडे घेऊन चालले आहे ..
तिकडे यशोदा माता ही गर्भवती असल्यामुळे त्यांच्या पोटी योग मायाने गर्भ धारण केला होता... व तेथे त्यांना कन्यारत्न प्राप्त झाली होती.. वसुदेव महाराज यमुना नदी पार करत असताना आपल्या भगवंताचे दर्शन घेण्यासाठी यमुना नदी उफाळून वर आली होती.. आकाशातून पावसाच्या सरी बरसत होत्या.. बालकृष्णाचे पदस्पर्श करण्यासाठी सगळेच वातावरण बदलली होती ..हळूहळू वसुदेव महाराजांच्या छातीपर्यंत पाणी आले.. आता पाणी वाढतच चालली होती.. तरीही वसुदेव महाराज निष्ठेने यमुना नदी पार करण्याचा प्रयत्न करीत होती.. तेव्हा बालकृष्ण यांनी टोपलीतून हळूच आपला पाय बाहेर काढून यमुना नदीला दर्शन दिले.. तेव्हा नदीचा पूर कमी झाला.. वरून पाऊस चालू असल्यामुळे साक्षात महासरपानी त्यांच्या टोपली वर अच्छादिले होते ..नंद बाबांच्या घरी सर्वजण गाढ झोपेत असताना वसुदेव महाराजांनी टोपलीतील बालकृष्ण यशोदा मातेच्या कक्षात ठेवले व तेथे असलेली योग माया आपल्या सोबत घेऊन ते पुन्हा कारागृहात परतले...
थोड्यावेळाने पहारेकरी जागी झाले पाहतात तर देवकी जवळ एक बाळ खेळते आहे.. दोघांच्या हातात बेड्या आहे.. पहारेकरी धावत जाऊन कौन सा ला ही बातमी देतात.. तेव्हा कौंस स्वतः आपल्या मरददात्याला मरण देण्यासाठी कारागृहात येतो आणि देवकीच्या हातातील ते बाळ उचलून घेतो... वसुदेव आणि देवकी पुन्हा त्यांना विनवणी करतात," की जे विधत्याने लिहिलेले आहे ते तर कोणीही टाळू शकत नाही... तेव्हा तू हा निष्फळ प्रयत्न सोडून दे !!"मात्र त्यांचे न ऐकताच आपल्या हातातील बाळाला मरण देण्यासाठी दाही दिशा ला गोल गोल फिरवत आपटणार इतक्यातच योगमाया त्याच्या हातात घेऊन निसटुन वरती आकाशात फेकली जाते!!!..
तेव्हाच आकाशवाणी होते," अरे मूर्ख कौनसा ,ज्याची एवढे आतुरतेने वाट पाहत होता ,तो एव्हाना सुरक्षित असून त्याने धरतीवर जन्म घेतला आहे !!!!....तुझा मृत्यू अटळ आहे!!!" असे म्हणून आकाशवाणी लुप्त होते... कंस मात्र खूप घाबरलेला असतो...
इकडे गोकुळात मात्र गोपी गोपी ना, सख्यांना सर्व जणांना समजते की नंद बाबांच्या घरी इतक्या वर्षानंतर पुत्ररत्न प्राप्त झाले आहे.. तेव्हा संपूर्ण गोकुळात जन्मोत्सव साजरा केला जातो ...सगळी नगरे सजवली जातात... सगळ्या गाई वासरा नाही आनंदित होऊन सजवले जाते ..सगळीकडे आनंदी आनंद होतो ...अशाप्रकारे बालकृष्ण वसुदेव देवकी मातेच्या पोटी जन्म घेऊनही यशोदा आणि नंद बाबांच्या घरी त्यांचा पुत्र म्हणून राहत असतो...
नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की..
जय हो गोपाल की जय यशोदा लाल की...
हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की...
गोकुल मे आनंद भयो जय नंदलाल की..
ब्रज मी आनंद भयो जय कन्हैया लाल की...
भक्त के आनंदकंद जय यशोदा लाल की...
गाईया चऱ्याने आये जय पशुपाल की..
अशाप्रकारे बाळकृष्ण आता गोकुळात वाढतो.. त्यांनी अनेक लीला केल्या आहेत... त्यांचे लीला अगम्य आहेत,, मी पुढील भागात टाकणार आहे.. तेव्हा तुम्हाला कथा कशी वाटली ,ते आवर्जून मला कमेंट करून हक्कने नक्की कळवा... काही चुकले असल्यास माफ करा.. तुमच्या आमच्या मधील