novhel - premaachi jaadu Part 8 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाची जादू भाग -८ वा

Featured Books
  • तमस ज्योति - 51

    प्रकरण - ५१मेरे मम्मी पापा अब हमारे साथ अहमदाबाद में रहने आ...

  • Lash ki Surat

    रात के करीब 12 बजे होंगे उस रात ठण्ड भी अपने चरम पर थी स्ट्र...

  • साथिया - 118

    अक्षत घर आया और तो देखा  हॉल  में ही साधना और अरविंद बैठे हु...

  • तीन दोस्त ( ट्रेलर)

    आपके सामने प्रस्तुत करने जा रहे हैं हम एक नया उपन्यास जिसका...

  • फाइल

    फाइल   "भोला ओ भोला", पता नहीं ये भोला कहाँ मर गया। भोला......

Categories
Share

कादंबरी - प्रेमाची जादू भाग -८ वा

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग – ८ वा

----------------------------------------------

यशच्या शो-रूम पासून निघालेली मोनिका सरळ तिच्या ऑफिसमध्ये पोंचली . टेबलवरची कामे

तिच्याच येण्याची वाट पाहत होती .समोरचा लेपटोप सुरु करीत तिने स्क्रीनवर आलेले मेल पाहिले ,

अगदी तातडीने त्यावर काही करायची गरज नाहीये, हे जाणवून ती खुर्चीत आरामशीरपणे विसावली ,

डोक्यात आणि मनात मात्र आजच्या दिवसाची झालेली छान सुरुवात घोळत आहे, हे तिला जाणवत होते.

अंजलीवहिनीनी तिच्या मावशीला हे यशचे स्थळ सुचवले ..आणि मावशीने दम दिला ..

म्हणून नाईलाजाने आपण तयार झालोत ..पण, आता यशला भेटून आल्यावर असे वाटते आहे

“यार , सोचा था हमने , उतना तो बुरा नही है.. यश का प्रपोजल ..!

दम है इस बंदे मे...! “,

विचार करूनच ,सावकाशीने निर्णय घ्यावा लागेल यशच्या बाबतीत .

मोनिकाच्या मनात विचार सुरूच होते ..

प्रत्यक्ष्य भेटीने खूपच फरक पडत असतो हे खरेच आहे , कारण समोरच्या व्यक्तीबद्दल आपण जे पूर्व- अंदाज करून जातो ,

आणि समक्ष भेटीत जे काही होते ,

त्याचा परिणाम आपले अंदाज बदलून जाण्यात होतो.

मावशीने अगदी बरोबर हेच समजावून सांगितले होते ..

खरेच यार , ही मोठी माणसे अनुभवी असतात ..हे कबुल करावेच लागते,

त्यांच्या या सांगण्याला “ ते काही पण सांगतात “,असे उडवून लावता येत नाही .

सकाळच्या भेटीची उजळणी ..मोनिकाचे मन पुन्हा पुन्हा करीत होते..

आज आपली यशची भेट झाली , त्याच्याशी बोलणे होत असतांना दोघांनी पण शब्दांच्या देवाण-घेवाणीतून एकमेकांच्या स्वभावाबद्दल जाणवून दिले ,

attitude बद्दल सांगून झाले.एक मात्र नक्की की ,त्याला भेटण्या अगोदर आपण जो अंदाज केला ,तो बराचसा चुकलाच आहे, असे मोनिकाला वाटत होते.

तिच्या मनात विचार येत होते –

हा माणूस -वाटतो तसा आणि दिसतो तसा नाहीये . याला दुनियादारीचा चांगलाच अनुभव आहे त्याचे वर्क- फील्ड ही आहेच त्याला पूरक ,

सगळ्या लेव्हलची माणसे, सगळ्या क्लासची माणसे “याची रेगुलर कस्टमर आहेत .

यशला भेटणारी ,बोलणारी माणसे याच्या वागण्या-बोलण्यावर खुश आहेत “याच्या कामाचे स्वरूप..लोकांचे बंद पडलेले काम पुन्हा सुरु करून देणे “

लोकांसाठी खूप महत्वाचे . गरजेच्या वेळी योग्य मदत करणारा

मित्र आणि माणूस म्हणून यश फेमस आहे “ या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही.

दोन-चाकी असो किंवा चार-चाकी असो, गाडी बंद पडली की..सगळी कामे जिथल्या तिथे “अशी पोजिशन होऊन जाते .

अशा वेळी ..यशकडे वाहन आणून टाकले की ..आपली गाडी रुळावर येणार “,हा जो विश्वास या माणसाने मिळवला आहे,

खरेच ग्रेट अचीव्हमेंट आहे यशची ही.

आजच्या पहिल्या प्रायमरी लेव्हलच्या परीक्षेत तर यश पास झाला आहे “ हे मोनिकाला मनोमन मान्य करावे लागले.

त्याची फमिली , या फैमिलीतील सगळ्यांनाच सोशल सर्कल मध्ये असणारे मनाचे स्थान ,

हे लक्षात घेतले तर .. “ग्यारेज मालाक “ ही इमेज .आपल्या मनात आहे ती पुसून कशी जाईल ?

त्यासाठी हा प्रश्न सोडवायला लागेल.

मोनिका स्वताच्याl ife–style बद्दल विचार करू लागली ..तेव्हा तिला जाणवले की ..

आपल्या फैमिलीच्या तुलनेत यश आणि त्याची फैमिली जरा लो-ग्रेड आहे ..असे सगळ्यांचे मत होईल ,

आपल्या मम्मी –आणि पप्पा कॉर्पोरेट वर्ल्ड मधले ..फेमस पर्सन , सिटी लाईफ , मिडल –क्लास लाईफ

त्यांनी ना कधी पाहिली ना कधी अनुभवली ..

खरे तर ..यश “या माणसाचे स्थळ ..आपल्यासाठी योग्य नाहीच आहे. पण..मम्मी आणि पपांच्या

फ्युचर लाईफ चा विचार करायचा झाला तर ..मला आमच्या पेक्षा हायप्रोफाईल मुलाचा विचार

करण्यापेक्षा ..या लो- प्रोफाईलवाल्या यशचा विचार करणे जास्त सोपे वाटते आहे ..

कारण..पापा आणि मम्मीच्या सगळ्या संपत्तीची , उद्योगाची मीच एकमेव वारसदार आहे.

ना मला भाऊ आहे –ना बहिण “, आई-बाबांची एकुलती एक अपत्य आहे ही मोनिका .

देखन रूपं, बुद्धिमत्ता , कर्तत्व , आणि ही वारसा म्हणून मिळणारी प्रचंड लक्ष्मी.

कुणा ही मुलाला ..माझा पत्नी म्हणून स्वीकार करणे ..म्हणजे ..नशीब उजळून घेण्यासारखे आहे.

याबद्दल ही एकदा मावशीने आपले बौद्धिक घेतले आहे..

ती म्हणाली –

मोनिका –तुमच्या मनाने मी तर अगदी सामन्य –साधारण परिवार असलेली बाई आहे.

पण, माझ्या मोठ्या बहिणीने –म्हणजे तुझ्या आईने तिच्या या गरीब धाकट्या बहिणीवरची माया

पातळ केलेली नाही.–

तुझे श्रीमंत –गर्विष्ठ बाबा .मोठ्या नाखुशीने आमच्याकडे येतात , पण,

ताईच्या समोर ..न बोलता गप्प बसून रहात ,जसे आम्ही कुणी त्यांचे कुणीच नाहीत.

मोनिका – या गोष्टी न बदलणार्या आहेत. तुला या मावशीची ओढ आहे ..प्रेम आहे, ही गोष्ट

तुझ्या आईला आवडते , आणि बाबांना आवडत नाही.यवर उपाय नाही.

आता तू तुझ्या स्वताच्या लग्नाचा विचार करायला हवा आहे.आताच्या काळात ही तुझे हे वय जास्तच

आहे “असे म्हणेन मी.

तुझ्या सगळ्या परिस्थितीचा विचार करता ...

मला असे सुचाव्यचे आहे की ..तू तुझ्यासाठी मुलगा तर चांगला ,सुस्वभावी ,पारिवारिक वातावरणात

राहून मोठा झालेला शोधावास , आणि पैश्याने तो तुझ्यापेक्षा कमी असावा ..

असा मुलगा ..तुझ्यासारख्या मुलीला सहजा सहजी नाही “म्हणू शकणार नाही.

आणि तुझ्या मनात तुला आवडलेल्या मुलाने ..”घरजावई “ होण्यासाठी तुला होकार द्यावा ..

या होकारा साठी मात्र तुला खूप जास्त प्रयत्न करावे लागतील .कारण मुलांच्या मनात ..त्याच्या परिवारात

आत्म्सामान “ वगरे काही जागे झाले तर ..तुझी त्याला नवरा आणि घर- जावाई “ करून घेण्याची

आयडीया ..पूर्ण होण्यात अडचणी येऊ शकतात .

मोनिकाच्या विचारांची गाडी येथे येऊन थांबली ..

ती म्हणाली खरेच आहे ..की हे..

आपण आपल्या मनातली ही इच्छा आणि लग्नाच्या हेतु मागचा हा उद्देश इतक्यात नाही सांगायचा ,

तो पद्धतशीर लपवून ठेवीत हा गेम खेळायचा .

आपल्याला ज्या वेळी वाटेल ..की आपली शिकार ,हे सावज .आपल्या प्रेमाच्या जाळ्यात पुरते

अडकून गेले आहे , आपल्या शिवाय ..त्याच्या मनात इतर काही नाही ..फक्त आणि फक्त मोनिका ,

तिच्या तालावर डोलणारा हवा आहे ..या मोनिकाला .

आणि स्वतःला जे हवे ते मिळवणे ..मोनिकाला आवडते .

त्यासाठी यशला आपली भुरळ पडली पाहिजे , त्याला आपल्या प्रेमात धुंद केले पाहिजे ,

हा “प्रेमाचा खेळ –खेळावा लागणार ..

कारण यश आणि त्याची फैमिली ..आपल्यासाठी अगदी योग्य आहे.

साधे-सरळ आणि प्रेमळ माणसे ..

स्वतःच्या कल्पनेवर मोनिका खुश होऊन गेली ..

कारण “यश “नावाच्या मुलाच्या मनावर आपल्या प्रेमाची जादू करण्यात या मोनिकाला अपयश

येउच शकत नाही ..

या मोनिकात ..काही ही कमी नाही..

मोनिकाला वाटत होते की-

पहिल्या भेटीत यशला आपण आवडलो नाही “ ?

असे तर अजिबात वाटत नाही ..

उलट ..त्याचा हात हातात घेतल्यावर ..त्याच्या नजरेत जे सुखद भाव दिसले ..त्यावरून तर

आपल्या सुंदरतेची जादू त्याच्या मनावर नक्कीच झाली आहे .

त्याच्याकडून होकार मिळवायचा असेल तर ..आपल्या प्रेमाची जादू “ दाखवावी लागेल .

त्यासाठी आपणच त्याच्या प्रेमात पडू ..मग आपोआपच ..तो ही या मोनिकाच्या प्रेमाच्या जादुई जाळ्यात

सापडेलच की.

मोनिकाने लगेच ..अंजलीवहिनींना कॉल लावला ..

बहुदा त्या काम संपवून घरी निघण्याच्या तयारीत असतील ..तरी

त्या नक्कीच बोलतील आपल्याशी.

पलीकडून आवाज आला ..मी मिसेस अंजली ..

हेल्लो ..भाभी नमस्ते ..

तुम्ही तुमच्या ज्या मैत्रिणीला ..तिच्या भाचीसाठी तुमच्या दिराचे ..यशचे

स्थळ सुचवलेत ..त्या मावशीची भाची ...बोलते आहे ..

मी मोनिका ..

मी यशचे प्रोफाईल पाहिले ,सगळी माहिती वाचली ..आणि मावशीने सांगितल्या प्रमाणे आज सकाळी

मी यशच्या शो-रूम मध्ये जाऊन ..त्याला भेटून ,बोलून आले..

पहिली भेट ..फर्स्ट इम्प्रेशन ..इज गुड ,असेच म्हणेन मी.

तुम्ही माझे फोटो पाहिलेत ..पण.अजून मला समक्ष नाही पाहिलेत ..

जेव्हा आपण सामोरा समोर येउत ..त्यावेळी मला पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल ..

ही देखणी ..सुंदर .. मुलगी .आमच्या घरात नक्कीच शोभेल.

पलीकडून बोलणार्या अंजली वाहिनी म्हणाल्या ..

मोनिका – छान वाटले ..माझ्या सूचनेचा तुझ्या मावशीने विचार केला ,आणि

तुला पण थांक्यू की. तुझ्या सारख्या मुलीने मावशीचे ऐकले ..

आता एक काम करा तुम्ही दोघांनी ..एकमेकांना जाणून घेण्यासाठी ..भेटत रहा ,

आणि हो , येत्या रविवारी ..तू सकाळी आमच्या घरी ये , माझी गेस्ट म्हणून..

दिवसभर आमच्या परिवारात राहून बघ ..

तू म्हणलीस ना .

तुझ्या सारख्या सुंदर मुलीला पाहून .मी इम्प्रेस होईल ..

मोनिका असे होईल सुद्धा ..कारण तू खूपच सुंदर आहेस तर ..तुला पाहून मोहित होणारच ,

पण, एक सांगते ..

लक्षात असू दे..पुढे उपयोगी पडतील माझे शब्द ..

मोनिका – तू पण मला पाहून नक्कीच म्हणशील ..

अंजलीभाबी खूपच चार्मिंग आहेत ..

पण.एक गोष्ट सांगते ..

आमच्याकडे येणारा प्रत्येकजन म्हणतो -

या परिवारात ..सगळेच मेबर .आकर्षक आहे सुरेख आहेत ....

त्यापेक्षा यांची मनाची ,विचारांची सुन्देरता अधिक आहे ..त्यामुळे आम्ही

जास्तच सुंदर दिसतो मोनिका .

अंजलीवहिनींचे शब्द ऐकून ..मोनिका मनातून चांगलीच चपापुन गेली ..

अरे बाप रे ..हा असा विचार तर आपण केलेलाच नाही ..

या अंजलीवहिनींना सगळ्यात अगोदर आपल्या टीममध्ये घ्यावे लागणार ..नाहीत तर

यश “चा खेळ जीकणे आवघड गोष्ट आहे..

याची जाणीव अंजली वहिनींच्या या तेज आणि धारदार बोलण्याने करून दिली आहे.

बाय करण्या अगोदर ती म्हणाली ..

यशला बोलून घेते मी .आणि तुम्हाला अपडेट देते ..

तो पण आजच्या भेटीत मला म्हणाला ..

तू घरी येऊन सगळ्यांना भेट म्हणजे कल्पना येईल .

भाबी , मी येत्या शनिवारी फोन करते तुम्हाला .

मग,रविवारी सकाळीच येते दिवसभरासाठी नक्की ..!

तुम्ही फक्त ..यशला राजी करा ..

दिवसभर त्याचा सहवास घडावा ,तरच मला त्याच्या बद्दल जाणून घेता येईल .

हो मोनिका , तू ये तर ..बाकी काळजी नको करू ..

यस ,थांक्यू अंजली.वाहिनी

बाय ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग -९ वा ,लवकरच येतो आहे.

--------------------------------------------------------------

कादंबरी - प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------