15
...
...
...
...
...
..
...
...
..
सुमेध म्हणतो खरं तर पिल्लू मला असा विचारायचं होतं कि तू इतके दिवस असा नक्की काय विचार करत होतीस
आणि असा काय ए ज्याचा तुला एवढा त्रास होत होता
म्हणजे जर तू होकार देणार होतीस तर असा काय ए ज्याने तुला तुझा निर्णय क्लिअर करता येत नव्हता.... 🙄🙄
सानू म्हणते सुमेध मला माहित होतं कि हा प्रश्न तुला नक्की पडेल आणि तू मला विचारशील च कि मी असा काय विचार करत होते.....
सानू यार सांग ना मग........ सुमेध म्हणाला...
सानू म्हणाली हो सांगते ऐक......
त्याच काय ए ना येडू लग्न म्हणजे साधी गोष्ट नाही ए ना रे
किंवा ही एखादी शर्यत पण नाही ए कि कोणीतरी सांगतंय म्हणून आपण फक्त पळत राहायचं....
आणि अर्ध्यातच थांबलो तर लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल....
आपण सगळे याचा च विचार करतो
पण आपण त्या दोन व्यक्ती च मन कधीच समजून नाही घेत कि का त्यानी हा निर्णय घेतला....
सानू तू म्हणालीस ते बरोबर आहे पण तू तर माझी नेहमी काळजी घेते तुला काही सांगावं लागत नाही तुला बरोबर समजत...... सुमेध म्हणाला
सानू म्हणाली.... सुमेध इथेच आपण चुकतो मैत्री आणि लग्न ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी ए
मैत्रीत कोणतीच कंमिटमेन्ट नसते सुमेध
आपण फक्त आपल्या मित्राला वाईट काळात बघू शकत नाही म्हणून आपण नेहमी त्याचा सोबत असतो
तुला आठवत बाबा नेहमी म्हणतात
मित्र आनंदात असेल तर आमंत्रण शिवाय जाऊ नये
पण,
मित्र दुःखात असेल तर निमंत्रणाची वाट बघू नये
पण लग्नात तसा नसता लग्न करतानाच आपण आपल्या जोडीदाराला कंमिटमेन्ट देतो त्याला आयुष्य भर सोबत देण्याची
आणि येडू तुला माहिती ए का
मैत्रीत आपण कंमिटमेन्ट करत नाही पण वेळ आली निभावून सगळं नेतो
पण ते निभावून न्यायचं कि नाही याची चॉईस आपल्याकडे असते
लग्नात तस नसता
आपल्याला इथे कंमिटमेन्ट ही करावी लागते आणि निभावून पण न्यावं लागत
आणि इथे आपल्याकडे चॉईस नसते इथे आपल्यावर जबाबदारी असते...
आणि चॉईस म्हणून करण आणि जबाबदारी म्हणून करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहे
आणि जबाबदारी म्हणून करणं हे खूप कमी लोकांना जमत
सुमेध असा म्हणतात प्रेम असला कि सगळं बरोबर होतं
पण प्रेमानी पोट भरत नाही
जर आपण समोरच्या व्यक्ती ला समजूनच घेऊ नाही शकत तर आपल्या प्रेमाला काहीच अर्थ नाही
आणि या सगळ्या गोष्टी करायला समोरच्याला समजून घ्यायला, सगळ्या परिस्थिती मधे त्याच्या सोबत असणं, आणि जबाबदारी म्हणून सगळं निभावून नेणं या साठी आधी आपण आपल्या मनाची तयारी करायला हवी
नात्यामध्ये जस प्रेम गरजेचे आहे त्या पेक्षा विश्वास, आणि समजूतदार पणा जास्त महत्वाचं आहे...
त्या नंतर मी विचार केला कि मग love marriage better कि arrange marriage......
तर याच उत्तर मला नाही मिळालं
कारणं बघ ना आपल्या कडे तर दोन्ही उदाहरणं आहेत
एक आपली सावी जीनी लव्ह मॅरिज केला
खरं प्रेम केला होतं ना रे तिनी मग का तिला हे दिवस बघावे लागले
आणि दुसरी कडे आपला अभि त्यानी तर घरच्यांची इच्छा म्हणून arrange मॅरिज केला ना मग त्याची काय चूक झाली ज्याची त्याला ही शिक्षा मिळाली
कारणं माहिती ए तुला
कारण ह्या दोघांनी चुकीच्या माणसांवर प्रेम करून त्यांच्या सोबत आयुष्य भराची स्वप्न पहिली पण असा म्हणायचं बाप्पा नि त्यांना वेळीच मार्ग दाखवला
सावी आणि अभि या दोघांची अवस्था पहिली होती मी सुमेध माणूस जवळ जवळ संपतो रे, हरतो परिस्थिती पुढे, आणि त्यातून त्याला बाहेर काढण खूप अवघड असत
आणि अशी वेळ आपल्या दोघांपैकी कोणावर ही येऊ नये हीच इच्छा होती......
आणि तुला माहिती ए का वेळ आली ना कि आपल कोणावर कितीही प्रेम असुदे आपल्याला आपली चूक कधीच दिसत नाही नेहमी समोरचा चुकीचा वाटतो
या जगात ती एकच गोष्ट ए जी माणसाला कधीच दिसत नाही किंवा जाणवत नाही ती म्हणजे स्वतःची चूक
........
....
...
त्या नंतर मी विचार केला कि मी तुला एवढे वर्ष ओळखते तरी तुझ्या शी लग्न करायच्या आधी माझी ही हालत आहे
जर मी एक महिना आधी भेटलेल्या व्यक्ती शी लग्नाचा निर्णय घेतला तर काय होईल तो चूक कि बरोबर मला नाही माहित
पण ज्या माणसाच्या भूतकाळा बद्दल आपल्याला काहीच माहित नाही ज्याला आपण नीट ओळखत नाही फक्त एका महिन्याच्या ओळखी वर त्याचा शी लग्न करण्या पेक्षा ज्याला मी खूप चांगला ओळखते आणि जो मला ओळखतोत्याच्याशी लग्न करणं हे केव्हाही योग्य असेल ना
आणि अजून एक गोष्ट म्हणजे मला माझ्या निर्णयामुळे कोणाला हर्ट करायचं नव्हता पण त्या आधी माझ्या निर्णयावर मी स्वतः खुश आहे कि नाही हे माझ्या साठी म्हत्वाचं होतं
त्या नंतर मला अभि नि पण काही गोष्टी मला समजून सांगितल्या आणि मला त्या पटल्या सुद्धा
म्हणून मग मी विचार केला कि ठीके कदाचित माझा तुझ्याशि लग्न करायचा निर्णय योग्य असेल
आणि काही झालं तर बाप्पा आहेच....
आणि मग मी ही सगळी PhD झाल्यावर लग्नाला होकार दिला....
सुमेध फक्त सुन्न होऊन सानू काय बोलते ते ऐकत होता
😲😳😲😳😲😳😲😳😲😳😲😳
सानू नि त्याचा समोर चुटकी वाजवली आणि तो भानावर आला
सानू म्हणाली काय झालं येडू बोल ना काहीतरी
सुमेध म्हणाला यार सानू तू खरंच ग्रेट ए ग तू एवढा सगळा विचार केला असेल असा मला स्वप्नात पण वाटलं नाही
सानू यार किती छान बोलते तू फक्त ऐकत राहावं वाटतं
आणि तू कधी पासून असं मोठ्या लोकांसारखा विचार करायला लागलीस
सानू म्हणाली असा काही नाही पण कोणताही निर्णय घ्यायचा आधी माणसानी नीट विचार करावा म्हणजे पश्चताप करण्याची वेळ येत नाही
आणि तुला माहिती ए का आपला कधी कधी चुकलेला निर्णय पण बरोबर असतो
ते म्हणतात ना कधी कधी चुकीची बस पण आपल्याला बरोबर स्टेशन वर आणून सोडते.....
म्हणजे बघ ना सावी नि सोहम शी लग्न करायच्या आधीच हा सगळा विचार केला असता तर तिला हे सगळा सहन नसता कराव लागला आणि कदाचित तिचा कुटुंब आज तिच्या सोबत असता
सुमेध ते म्हणतात ना परिस्थिती माणसाला सगळा शिकवते कदाचित मी पण परिस्थिती मुळेच शिकले
आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं
सुमेध म्हणाला सानू यार तुझ्या एवढुश्या डोक्याला किती त्रास दिलास
पण मी प्रॉमिस करतो आता मी या पुढे तुला त्रास नाही होऊन देणार...
..
सानू म्हणते..... थँक्स सुमेध
सुमेध म्हणाला यार सानू मला ना आज खूप मस्त वाटतं ए हे सगळा ऐकून म्हणजे मला एक तर समजला कि काही गोष्टी असतात ज्या आपल्या आपणच निस्तरायच्या असतात
त्या साठी कोणी आपली मदत नाही करू शकत आणि आपला निर्णय असा पाहिजे कि ज्यांनी कोणाला वाईट वाटणार नाही
सानू म्हणाली नाही येडू हे थोडा चुकता ए कधी कधी अशी वेळ येते कि आपल्या निर्णयानि कोणाला वाईट वाटेल कि नाही या पेक्षा आपल्या ह्या निर्णयावर आपण खुश आहोत कि नाही हे जास्त गरजेचं आहे
कधी कधी माणसानी आयुष्याचे निर्णय घेताना थोडं स्वार्थी होणा गरजेचं आहे
कारण जास्त चांगल्या माणसाला दुनिया विकून खाते
सुमेध म्हणतो सानू कोणता लेखक खाल्ला होतास ग जेवताना
सानू म्हणाली झाली तुझी नौटंकी सुरु...... शाब्बास
सुमेध म्हणाला अरे यारं सॉरी पण काय समजून सांगितलं ए ग पिल्लू तू मी नेहमी लक्षात ठेवेल हे सगळं
.......
good पण आता झोपायचं का खूप लेट झालं ए सानू म्हणाली...
सुमेध म्हणाला हो ठीके चल....
सुमेध तिला एक मिठी मारतो आणि म्हणतो गुडनाईट पिल्लू
सानू म्हणते गुडनाईट येडू......
सुमेध म्हणतो पिल्लू ऐक ना
हो बोल ना....... सानू म्हणते...
Love You So Much Jaan...... 😘💕
सानू म्हणते हो का... 🤭😂😂
जा आता जाऊन झोप
सुमेध म्हणतो अच्छा ठीके बाबा आता काय कोणाला कदर च नाही आमची तर काय
सुमेध....... सानू म्हणते
हम्म बोल..... खोटा रुसवा चेहऱ्यावर आणत सुमेध म्हणाला
Love You Too Yedu....😘💕 सानू त्याचे गाल खेचत म्हणते
सुमेध तर आनंदाने उडी मारून मग सानू ला मिठी मारतो
अरे मेरी जान.... 😘😘😘😘🤭🤭😂😂😂
सानू म्हणते आता तुझा ड्रामा झाला असेल तर जाऊन झोप उद्या अभि च्या घरी जायचं ए लक्षात आहे ना
हो ग येडू लक्षात ए जा आता तू झोप पटकन मी पण जाऊन झोपतो...
सानू म्हणाली हो ठीके.....
ते दोघे आपल्या आपल्या रूम मधे जाऊन झोपतात....
😴😴😴😴😴😴😴😴😴😴😴😴😴
...
...
....
...
...
...
...
...
...
.
( सॉरी वेळे अभावी हा भाग छोटा लिहिला आहे
लवकरच पुढचा भाग लिहायचा प्रयत्न करेल
तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा आजचा भाग कसा वाटला... )
..
...
...
...
..
...
...
....
...
( काही चुका असतील तर नक्की सांगा....
लवकरच भेटूया पूढच्या भागात..... )
....
...
...
....
....
....
....
......
......
...
...
आत्ता साठी बाय बाय..... 🙂☺️
....
....
....
.....
.....
....
......
.....
..
....
...
...
...
..
..
- सुकन्या जगताप......... 😘