भाग १
"ट्रिंग.. ट्रिंग...
ट्रिंग.. ट्रिंग..."
बराचवेळ फोनची रिंग वाजत होती. पण मघापासून सारखं Unknown नंबर वरून कुणी तरी कॉल करून छळत होता, म्हणून त्याने दुर्लक्ष केले. फोन वाजून बंद झाला. मिनीटभरातच पुन्हा खणखणला. कदाचित खरंच कुणाच अर्जंट काहीतरी काम असेल असा विचार करून त्याने शेवटी फोन उचलला.
" हॅलो, कोण ? "
"हॅलो मी निधी देशमुख."
अं.. हो हो बोला " तो थोडासा गोंधळला होता पण लगेच त्याने स्वतःला सावरलं.
" फोन का उचलत नवहतास ? "
" ते मी दुसऱ्या रूममध्ये होतो."
"एनी वेज, माझं जरा काम होत तुझ्याकडे ? "
"हो बोला ना."
" नाही असं फोनवर सविस्तर नाही सांगता येणार. तु माझ्या ऑफिसमध्ये येऊ शकतो का ? "
" हो. कधी येऊ ? "तो थोडा उत्तेजित होऊन म्हणाला.
" आता फ्री असशील तर..."ती घाईने म्हणाली.
"एनी थिंग सिरियस?" त्याच्या स्वरात काळजी डोकावली.
" येस."
"येतो थोड्याच वेळात."
" ओह, Thank you so much, by"ती जराशी लाडिक पणे म्हणाली. त्याला मनातून अगदी गुदगुल्या झाल्या सारखं वाटलं.
" बाय." फोन ठेवून तो घाईघाईने आवरून लागला. पुढच्या अर्ध्या तासात तयार होऊन तो त्याच्या कारमध्ये बसून निघालाही होता.
तो होता विराट जयकर. वय वर्षे २९. उंचापुरा, गोरापान. तो एक खासगी गुप्तहेर होता. पण बऱ्याचदा पोलिसांनाही गुन्ह्यांच्या तपासात मदत करायचा. अनेक गुंतागुंतीच्या, अवघड केसेस सोडवल्या होत्या त्याने. अगदी कॉलेजच्या वयापासूनच.
मगाशी ज्या निधी देशमुखचा कॉल आलेला ती उद्योगपती महिपतराव देशमुख यांची मुलगी. पण एवढीच तिची ओळख नव्हती. वडलांइतकीच किंबहुना त्यांच्या पेक्षा काकणभर जास्त सरसच होती ती. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने कंपनीची C.E.O व्हावं अशी त्यांची इच्छा होती. निधीलाही कुठल्या वेगळ्या गोष्टीत करिअर करायचं नव्हतं. पण तिला. वडलांच्या जीवावर नाही, तर स्वत:चर्या मेहनतीने वर यायच होतं. म्हणून कंपनीमध्ये साधी एम्पलॉई म्हणून तीने कामाला सुरुवात केली. आणि आता वयाच्या अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी ती कंपनीची जनरल मॅनेजर होती. एका केससंदर्भात विराटची तिच्याशी ओळख झाली होती. नंतरही काही कारणाने अधूनमधून भेट होत राहिली. हळूहळू वरूणला निधी आवडू लागली. म्हणून मगाशी फोन वर बोलताना तो एवढा Exited झाला होता.
जाताना वाटेत तो मगाच्या फोनवर झालेल्या बोलण्याबद्दल विचार करत होता. तेव्हा exitement मुळे लक्षात आलं नव्हतं. बोलताना तीचा आवाज घाबरल्यासारखा वाटतं होता. असं काय घडलं आहे ज्यामुळे निधी सारखी ब्रेव्ह मुलगी घाबरली होती.
थोड्याच वेळात तो Nidhi Group Of Industries च्या ऑफिसमध्ये पोहोचला.
" Excuse me, आत येऊ का ?" निधीच्यि केबिनच्या दरवाजा वर नॉक करत त्याने विचारलं. निधी समोरच्या टेबलावरील फाईल्स चाळत होती. पण तिचं त्यात लक्ष नाही हे कळून येत होते. एका हाताने ती टेबलावरचा पेपरवेट अस्वस्थपणे गरागरा फिरवत होती. विराटच्या आवाजाने ती भानावर आली.
" अरे विराट, ये ना." ती उभी राहत म्हणाली. विराटने आत येऊन तिला नमस्कार केला. सध्याच्या परिस्थितीमुळे हॅंडशेक करण्याचा मोह टाळावा लागत होता.
" Plese have a seat." समोरच्या खुर्चीकडे हात करत ती म्हणाली.
" काय घेणार ? चहा की कॉफी? काहीतरी घ्यावच लागेल. नाही म्हणू नकोस."
" बरं, चहा चालेल." तो. तिने प्यूनला चहा आणण्यासाठी सांगितले. थोड्या वेळात तो चहा घेऊन आला.
" निधी, नक्की काय झालय ? तुम्ही इतक्या टेन्स का दिसताय ?" चहा घेता घेता त्याने विचारलं.
" माझे पपा..." एवढ बोलून ती थांबली. किंचीत पुढे झुकून कुजबुजत्या आवाजात म्हणाली. " माझे पपा मिसिंग आहेत."
" काय ?? तो.
" हो
."
" कसं ? कधी ?"
" परवा रात्री मी रूममध्ये झोपले होते. इतक्यात बाहेरून पंपांचा आवाज आला. मी दचकून उठते. मोबाईलमध्ये पाहिले तर एक वाजलेले. मी उठून दरवाजा उघडला.पपा कपडे बदलून कुठेतरी जायच्या तयारीत होते."
" पपा तुम्ही कुठे निघालात."
" बाळा जरा महत्त्वाचे काम आहे. मी घाईत आहे. आल्यावर सगळं सांगतो. तु सकाळी उठेपर्यंत आलो असेन."
" बरं."
पपा घाईघाईने गेले. ते अजून आले नाहीत. फोनही लागत नाहीये."
" इथे कुणाला माहीत आहे ?"
" नाही मीच त्यांना आराम करण्यासाठी आमच्या महाबळेश्वरच्या फ्लॅटवर पाठवलंय, असं सर्वांना सांगितलं."
" पोलिस कम्प्लेंट का नाही केली."
" केली आहे. पण ते इन्स्पेक्टर फार बेफिकीर वाटले. ते नीट तपासून करतीलच वाटत नाही. मला खूपच काळजी वातीये म्हणुन तुला सांगितले. तुझ्यावर माझा पुर्ण विशवास आहे. तु लवकर शोधशील पपांना." त्याच्या डोळ्यात पाहत निधी म्हणाली." तो चक्क लाजला.
" हो. तु काळजी नको करूस." विराट तीला आश्वासन देत म्हणाला.
थोडावेळ बोलून तो निघाला. आता निधीला थोडं हलकं वाटतं होत.
" विराट." दारापर्यंत पोहोचताच मागून निधीने आवाज दिला.
" काय." त्याने मागे वळून विचारल.
" मला वाटतं आपली चांगली मैत्री झाली आहे. मग तू मला अहोजाहो का करतोस ? मला 'तू' म्हणत जा."
" हो." त्यालाही हेच हवं होतं.
" अजून एक विचारायच होते. मी तुला फक्त वीर म्हटल तर चालेल का."
"अं. हो हो आवडेल मला." तो चटकन बोलून गेला.पण लगेच स्वत:लागला सावरत म्हणाला "नाही म्हणजे विराटपेक्षा वीर म्हटलेल आवडत मला. बरं चल, भेटू"
"हं."
एकीकडे नव्या केसांचा उत्साह आणि दुसरी कडे ती निधीच्या वडिलांची मिसिंगची असल्याच दु:ख अशा द्विधा मनस्थितीत तो बाहेर पडला.
क्रमशः